ती वेळ
ती वेळ मंद वाऱ्याची
शब्द असे वितळावे
दुरून परतीच्या माझ्या
वाटेवर तुझे डोळे लागावे...
तुझ्या नेत्रात सरोवरे का
सखे दुष्काळ तिथे शोभे
गडद अबोल सावळी झाडे
सरणावर प्राण उगाच उभे....
ऊरला तुकडा नभाचा
होते वादळ कधी तिथे
मिटल्या सावल्या अंधाराच्या
जसा सूर्य दूर मंद उगवे...
अखंड घुमतो पाउस देवळापलीकडे
नक्षत्रांची ओंजळ पदरात तुझ्या
दु:खात तू सावित्री माझ्या
अन तरी घालतेस देवास साकडे...
💬 प्रतिसाद
(1)
ज
जडभरत
Sat, 08/08/2015 - 08:00
नवीन
मस्त!!! एकदम छान!!!
- Log in or register to post comments