Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पॉर्न साइट्सवरील बंदी ; किती योग्य, किती अयोग्य ?

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 08/09/2015 - 09:19
🗣 211 प्रतिसाद
राम राम मंडळी. मंडळी शतशब्दकथांच्या स्पर्धेच्या गर्दीत पॉर्नसाइट्सच्या बंदी विषयी काथ्याकुट आज येईल, उद्या येईल अशी वाट पाहात बसलो. रविवार उजाडला तरी अजूनही काही काही हालचाल दिसेना म्हटलं आपणच काथ्या घ्या आणि कुटा. मंडळी. पॉर्न साइट्सवर बंदी आणि पुन्हा सरकारने विरोधात उमटणार्‍या पॉर्न विरोधातील बातम्यामुंळे हलकेच चोरपावलांनी मागे येत ''चाइल्ड पॉर्न आणि ब्ल्यू फिल्म'' सोडून सर्व एडल्ट्स साइटवर बंदी हटविण्याचा निर्णय घेतला. सरकारने घोषणा केलेले असली तरी आता मोबाईल वर अशा साइट्स आता जवळ जवळ ब्लॉक केल्याचे दिसते. अश्लिल चित्रे, अश्लिल व्हिडियोज, अश्लिल लेखन, यामुळे समाजात वाईट परिणाम होतो म्हणजे कामुकता वाढते आणि स्त्रीयांना सार्वजनिक ठिकाणी वावरणे कठीण जाते आणि विविध अशी कारणे सांगितली जातात. विशेषतः लहान मुले अशा साइट्सवर रमु लागली तर काय परिणाम होईल असा एक विचार मांडला जातो. लहान मुला -मुलींच्या शरीराची जसजशी वाढ होत जाते तस तसे शरिरात अनेक बदल होतात आणि मग परस्पर भिन्न लिंग आकर्षण, उत्सुकता, यातून चित्र, व्हिडियोमधे, अश्लिल लेखन यात एक आनंद मिळायला लागतो. अशा माहितीतून विकृतीच निर्माण होते याचा काही माझ्याकडे विदा नाही. पण, अशा माहितीतून काही गैरसमज, भितीही दूर होते असे मला वाटते. आजच्या इतकं जाल जेव्हा मुक्त नव्हतं तेव्हा मुलांमधे कोणाच्या घरची मंडळी कुठे बाहेर गेलेली असली की अशा व्हिडियोज पाहण्याचा प्रचंड आटापिटा असायचा. आश्चर्य, भिती, न्युनगंड निर्माण व्हावा अशा प्रकारचे व्हिडियोज बघण्याची एक क्रेज असायची. लेखनातही असे लेखन आलं की दम घ्यावा लागायचा. मला आठवतं. मला शिकत असतांना अभ्यासक्रमाला ना.धो. महानोरांची 'गांधारी' नावाची कादंबरी होती. या कादंबरीतील नायिका केळीच्या बनात स्वतःला निर्वस्त्र करुन स्वतःच्या शरिराकडे बघते आणि लेखनाने त्या शरीराचं एकुण वर्णन त्यात केलेलं होतं. वाचतांना मला कोणी पाहात तर नाही, इतकी भिती वाटल्याचे स्मरते. बाकी अजून काही पुस्तकांवर तर बोलायलाच नको. कारण संस्काराखाली आपण दबले गेलेले असल्यामुळे अशा विषयावर चर्चा तरी कशाला करावी, असाही विचार येऊ शकतो. वेरुळ लेणीतील काही शिल्प, खजुराहो, या शिल्पांकडे बघतांना शिल्प अश्लिल आहेत म्हणुन पाहावे की कला म्हणुन पाहावे असाही विचार येऊ शकतो. अशीच बंदी घालावी लागत असेल तर भविष्यकाळात या शिल्पांवर काळा पडदा टाकावा लागेल. आता संकेतस्थळे वाढली. आंतरजाल आता सर्वांच्या घराघरात पोहचले आहे. चित्रपट, मालिका, यातून माणसांवर जे काही परिणाम व्हायचे ते होतातच, ते जसे थांबविता येतात तसे पॉर्न साइट्सच्या बाबतीत किती बघायचं, काय बघायचं याचंही भान असलं पाहिजे. सध्या वाट्सपच्या काळात काय काय व्हिडियोज येतात ते काही सांगायची गरज नाही. आपण बघतो पण दुसर्‍यांनी बघु नयेत. एकुणच जालमुक्त झालंय. समाजावर अश्लिल साइट्स खरच परिणाम करतात का ? त्याच स्वरुप कसं आहे ? सरकारची बंदी किती योग्य आणि किती अयोग्य त्यासाठी हा काथ्याकुट प्रपचं. (भाजप सरकार, काँग्रेस सरकार इकडे चर्चा घेऊन जाऊ नये)

प्रतिक्रिया द्या
66202 वाचन

💬 प्रतिसाद (211)
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 08/09/2015 - 09:47 नवीन
ज्या गोष्टींवर बंदी असते त्या गोष्टी हटकुन करायला जाणं हा मनुष्यस्वभावाचा एक अविभाज्य भाग आहे. मुळात पॉर्न पहाणं किंवा नं पहाणं हा ज्याचा त्याचा किंवा वैयक्तिक प्रश्ण आहे किंवा त्याच्या/ तिच्या विवेकबुद्धीचा प्रश्ण आहे. तिथे सरकारने हस्तक्षेप करणं पुर्णपणे चुकीचं आहे. जोपर्यंत ती व्यक्ती सार्वजनिक जागी ह्या गोष्टी करत नाही तोपर्यंत इतरांनी ह्या गोष्टीला आक्षेप घेणं चुकीचं आहे. जर का सरकार पॉर्नवर बंदी घालणार असेल तर हिंदी पिक्चरमधल्या आयटम साँग्ज वर बंदी घालणार आहे का? कारण वीतभर (त्यापेक्षा कमीसुद्धा असल्याची उदाहरणं आहेत) कपडे जेमतेम घालणारी आयटम साँग्ज आहेतचं की. चित्रपटामधले सेक्स सिन्स बंद करणार आहे का सेन्सॉर बोर्ड? जर का पॉर्न बघुन लोकांची मती भ्रष्ट होत असेल तर टीव्हीवरचे सो कॉल्ड फॅमिली ड्रामे बघुन काय सुधारणा होते ह्यावर कोणी सरकारचा प्रतिनिधी बोलताना दिसत नाही. जर का पॉर्न बघुन लोकं बलात्कारी होतं असतील तर ह्या सिरियल्स बघुन खुनी, दरोडेखोर, सतत दुसर्‍याचा तिरस्कार करणारी, छोट्या छोट्या गोष्टींवरुन खुन पाडणारी बनायला हवी होती एव्हाना. नंतर सविस्तर प्रतिसाद लिहितो विदा गोळा करुन.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 08/09/2015 - 10:15 नवीन
एकदम पर्फेक्ट..... वाक्या-वाक्याशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
स
सामान्यनागरिक Wed, 08/12/2015 - 12:54 नवीन
पोर्न कायदेशेीर पणे लोकांणा पाहु द्याव्या. त्यसाटठेी सरकारकडे रेीतसर अर्ज द्यावा त्या बरोबर आपल्या वयाचा पुरावा ई. द्यावा. एकदा परवानगेी मिळालेी केी मग त्याला पेशल इंतरनेट जोडनेी द्यावेी. हे बघण्याचे भरपूर पैसे घ्यावे. आपोआपच त्यावर नियंत्रण येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
द
द-बाहुबली गुरुवार, 08/13/2015 - 14:07 नवीन
पोर्न कायदेशेीर पणे लोकांणा पाहु द्याव्या.
ही:
त्यसाटठेी सरकारकडे रेीतसर अर्ज द्यावा त्या बरोबर आपल्या वयाचा पुरावा ई. द्यावा.
ही:ही:
एकदा परवानगेी मिळालेी केी मग त्याला पेशल इंतरनेट जोडनेी द्यावेी.
खिक्क..
हे बघण्याचे भरपूर पैसे घ्यावे. आपोआपच त्यावर नियंत्रण येईल.
तर काय. आज पर्यंत कोणी तॉरंट वापारलेच नाय ना...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्यनागरिक
व
विशाल कुलकर्णी Mon, 08/10/2015 - 08:51 नवीन
एकदम सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
न
निमिष सोनार गुरुवार, 08/13/2015 - 10:57 नवीन
खालील वाक्य १००% सत्य: जर का पॉर्न बघुन लोकांची मती भ्रष्ट होत असेल तर टीव्हीवरचे सो कॉल्ड फॅमिली ड्रामे बघुन काय सुधारणा होते ह्यावर कोणी सरकारचा प्रतिनिधी बोलताना दिसत नाही. जर का पॉर्न बघुन लोकं बलात्कारी होतं असतील तर ह्या सिरियल्स बघुन खुनी, दरोडेखोर, सतत दुसर्‍याचा तिरस्कार करणारी, छोट्या छोट्या गोष्टींवरुन खुन पाडणारी बनायला हवी होती एव्हाना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
प
पैसा Sun, 08/09/2015 - 10:47 नवीन
याबद्दल बरीच चर्चा वाचते आहे. लेखाच्या आशयाशी बर्‍यापैकी सहमत आहे. कोणत्याही बाबतीत सरकारकडून बंदी येणे हे आमच्यासारख्या तथाकथित बुद्धिजीवी वर्गाला कधीही आवडणारे नसते. मात्र काही गोष्टीत स्वयंशिस्त आवश्यक आहे. मी लहान असताना आंतरजाल हा प्रकार अस्तित्त्वात नव्हता. त्यामुळे साईट्सचा प्रश्नच नव्हता. तर आजूबाजूला इतकी चांगली पुस्तके उपलब्ध असायची की अशा पुस्तकांबद्दल कधी ऐकलेही नव्हते. लैंगिक शिक्षण अधिकृत नव्हते. पण गावात रहात असल्याने निसर्गात चालू असलेले सगळे सहज दिसत होते आणि कोणालाच त्याबद्दल काही वाटत नव्हते. मात्र पोर्न वाचून पाहून
अशा माहितीतून काही गैरसमज, भितीही दूर होते असे मला वाटते.
याबद्दल जरा शंका आहे. यासाठी व्यवस्थित आणि त्या विषयातील अधिकारी व्यक्तीकडून होणारे शिक्षण आवश्यक आहे. नाहीतर पोर्न पाहणार्‍या मुलांमधे बालंकांचे लैंगिक शोषण, समलिंगी संबंध हेच फक्त नैसर्गिक आहे, कॉमन आहे असे गैरसमज प्रसृत होण्याची शक्यता जास्त वाटते. एखादा प्रौढ माणूस स्वतः असे पोर्न पाहत असेल, त्याच्या १० ते १७ वयातल्या मुलांनी असे पोर्न पाहणे वाचणे त्याला कितपत आवडेल? आपला ११ वर्षाचा मुलगा अशी साईट बघताना पकडला गेला तर आपली काय रिअ‍ॅक्शन असेल? शिवाय, प्रौढ माणसे आपल्या मर्जीने काय ते पाहतील, वाचतील हे ठीकच वाटते. मात्र एखाद्या साईटवर जाणारे मूल १८ वर्षावरचे आहे हे कसे आणि कोण सुनिश्चित करणार? साईट्स बंद केल्या असे ऐकते. मग त्या पिवळ्या पुस्तकांचे काय? ते बंद होणे शक्य आहे का? कोणी समजा आपल्या मित्र मैत्रिणींचे चित्रण करून फेसबुक किंवा व्हॉट्स अ‍ॅपवर खाजगी वितरण केले तर त्याला कसा आळा घालणार? शृंगार हे आपल्या आयुष्याचे अविभाज्य अंग आहे आणि ते नाकारल्याने अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. सूचकता आणि बीभत्सता यात प्रत्येकजण आपल्या स्वभावानुसार निवड करील. मात्र पोर्नवर सरकारने बंदी घालणे हा सगळे आलबेल होण्यासाठी उपाय आहे असे मला वाटत नाही. आपल्या अर्धवट वयातल्या मुलांनी पोर्नपासून दूर रहावे असे वाटत असेल तर स्वयंशिस्त आणि मुलांशी संवाद या दोन अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत.
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 08/11/2015 - 10:08 नवीन
बारीकसा मुद्दा:
आपला ११ वर्षाचा मुलगा अशी साईट बघताना पकडला गेला तर आपली काय रिअ‍ॅक्शन असेल?
यावरुन पालकांची मानसिकताही दिसते नीट पाहिल्यास. पोरांच्या मनात गंड निर्माण होऊ नयेत असं वाटत असेल तर ही एकंदरीत "पकडल्या"ची भावना काढून टाकली पाहिजे. संभाषणात पोराला ह.मै. करताना "पकडला" की करताना "सापडला" असे उल्लेख अनेकदा ऐकलेत. अशावेळी बाप आणि पोरगं यात अजिबात दरी नसणंच चांगलं. हे सर्व स्वाभाविक आहे असं समजूनच त्याविषयी बोललं पाहिजे. ११ वर्षाचा मुलगा अशी साईट बघताना दिसला तर.. ११ वर्षाचा मुलगा अशी साईट बघतोय असं समजलं तर.. अशा रितीने विचारांची दिशा असावी असं व्यक्तिगत मत.. बाकी मुद्दे योग्यच आहेत. तळटीपः पकडला गेला म्हणजे सायबर कॅफेत पोलीसांकडून पकडला गेला असा अर्थ असेल तर वरील प्रतिसाद बाद समजावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Tue, 08/11/2015 - 10:21 नवीन
हे ठीक वाटतंय. १००% वेळा आपल मूल चोरून असं काही करतंय हे समजलं तर कोणाला आवडणार नाही. मात्र ते समजल्यानंतर आपली जी रिअ‍ॅक्शन असेल त्यावर बरंच काही अवलंबून असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ब
बाळ सप्रे Tue, 08/11/2015 - 11:40 नवीन
हेच म्हणतो !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
स
सुधीर Wed, 08/12/2015 - 10:49 नवीन
"तंत्रज्ञानातील बदलांमुळे लहान मुलांना सहज उपलब्ध होऊ लागलं आहे" पालकांची ही भीती रास्त आहे. पण आपलं मुल कुठल्या वयात आहे? त्याला कुठल्या तांत्रिक सुविधा पुरवाव्यात. त्यावर पॅरंटल कंट्रोल कसा असावा? ही जबाबदारी तर पालकांचीच आहे. त्यासाठीचे तंत्रज्ञानही हळूहळू विकसित होत जाईल. "पण एका वयानंतर" खास करून कार्ट (मुलगा) असेल आणि त्यात संगत असेल तर हमखास पॉर्न पाहण्याची उर्मी जागू शकते. आमच्या काळात मचाक हे माध्यम होत. नंतर रंगित मासिक आली. आणि आता तंत्रज्ञानामुळे चित्रफिती. म्हणजे समस्या अगदीच नवीन नाही. मध्यंतरी बिपी नावाचा मराठी चित्रपट आला होता, पाहिला नाही, पण तसे प्रसंग कसे हाताळावेत हे पालकांनीही समजून घ्यावे. बाकी पहावं, पाहू नये, नैतिक-अनैतिक हा ज्याच्या त्याचा खाजगी प्रश्न आहे. बाकी धुमशान चालू आहे या विषयावर. :) सगळेच प्रतिसाद नाही वाचले. पॉर्न साईट बंद होणार का? (नाही). केल्याच तर चोरून पाहणे बंद होईल का? (नाही, कदाचित काही प्रमाणात कमी होईलही. मग सरकार घेतलेल्या निर्णयापासून मागे हटायला नाही पाहिजे होतं. असो). पॉर्न पाहण्यामुळे बलात्कार करण्याची उर्मी बळावते का? त्यामुळे बलात्काराला प्रेरणा मिळते का? (नेमकं उत्तर ठामपणे सांगता यायचे नाही. आणि त्या प्रश्नाच्या उत्तराचा तसा काही फरक पडणार नाही. कारण पॉर्न पूर्ण बंद करणं शक्य नाही.) पॉर्न साईटी रेग्युलेट व्हायला हव्यात का? (होय, निदान मला तरी तसे वाटते. बिभित्स, चाईल्ड पोर्नोग्राफी आणि चोरून काढलेल्या क्लिप्स साईट यावर मालकांचं मॉडरेशन हवं. काही प्रमाणात युट्युब करू शकते तर हे अशक्य नाही. त्यासंबंधी कायदे हवेत असेही वाटते. देशांतर्गत करारही असावेत खास करूर जेव्हा सर्व्हार्स देशाबाहेर असतात) बाकी, मेन स्ट्रीम सिनेमाच्या अश्लीलते विषयी काय? नेमकं कशाला अश्लील म्हणावं? सॉफ्ट पॉर्न आणि अश्लील यात नेमका फरक काय? कथानकाची गरज म्हणून बलात्काराचे, शृंगाराचे शॉट्स कधी दाखवलेच गेलेच नाहीत काय? 'बेसिक इन्स्टीक्ट' ह्या विंग्रजी शिनुमाची सिडी आमच्या उमलण्याच्या काळात फेमस होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ट
टवाळ कार्टा Sun, 08/09/2015 - 10:51 नवीन
आप्ल्याकडचे उपाय हे "ठिगळ लावणे" याच कॅटेगरीमध्ये बसतात
  • Log in or register to post comments
प
पुणेकर भामटा Sun, 08/09/2015 - 11:00 नवीन
कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो, आणि अतिरेकाला योग्य वेळी आवर घालणे महत्वाचे असते, आणि वैयक्तिक माझ्यामते या गोष्टींना आवर घालण्याची हीच योग्य वेळ आहे. कमीत कमी त्यातील विकृत आणि अनैसर्गिक प्रकार दाखवणारी संकेतस्थळे तर बंद करायलाच हवीत.
  • Log in or register to post comments
क
कहर Mon, 08/10/2015 - 07:11 नवीन
मध्यंतरी समर्पण या कथेवरून असाच गदारोळ उडला होता त्यावरील कोणाचीतरी प्रतिक्रिया येथेही डकवतो. "कशाला विकृत म्हणायचे आणि कशाला अनैसर्गिक" हे कोण ठरवणार. याचे प्रमाण कोणते? म्हणजे हे ४०% विकृत आहे. ते ७०% अनैसर्गिक असे काही असेल का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुणेकर भामटा
ट
टवाळ कार्टा Mon, 08/10/2015 - 07:28 नवीन
४०% + ७०% = ११०%
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कहर
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 08/10/2015 - 15:21 नवीन
त्यातले १०% टक्के "विकृत्+अनैसर्गिक" असं पकडा, बरोबर हिशेब लागेल. हिशेबीतज्ञ : आमच्याकडे सर्व प्रकारचे हिशेब हव्या त्या सर्वमान्य प्रणालींत बसवून मिळतील. वैयक्तीक प्रणाली असल्यास अधिक आकार द्यावा लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
अ
अजया Sun, 08/09/2015 - 11:36 नवीन
लेखाच्या आशयाशी सहमत. याच विषयावरील एक चर्चा एका ग्रुपवर वाचण्यात आली होती.त्यात एका मित्राने इरावतीबाई कर्वेंचे याविषयावरचे विचार उधृत केले होते.ते देण्याचा मोह आवरत नाहीये. लेखिका इरावती कर्वे बाई त्यांच्या काळातील पिवळ्या कव्हर च्या पुस्तकांबद्दल बोलताना म्हणाल्या होत्या कि वाचून किंवा चित्रे बघून माणसाला मिळणारे सुख जास्त हवे हवे वाटते …कारण त्यात शारीरिक मेहनत नसते …. मनात विचार आले कि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी बऱ्याच गोष्टींची जुळवाजुळव करायला लागते … जोडीदार,त्याचा मूड, जागा, वेळ आणि स्वतःची इच्छा सगळ्यांची जुळवाजुळव करताना बऱ्याचदा इच्छेची तीव्रता कमी होते आणि त्यानंतरदेखील प्रत्यक्षात अनुभव घेताना; जागेची योग्यता, त्या वेळेची आल्हादकारकता, संपूर्ण वातावरणाचा परिणाम, जोडीदाराचा मुखश्वासगंध, आणि होणारे शारीरिक श्रम यामुळे अनुभव कल्पनेच्या तोडीस तोड असेल याची खात्री नसते… याउलट जेंव्हा शरीरभोगांची वर्णने पुस्तकात येतात, चित्रात दिसतात किंवा चित्रपटात पाहायला मिळतात तेंव्हा हे जागेचे, वेळेचे, वातावरणाचे, घामाचे, गंधाचे आणि श्रमाचे परिणाम भोगावे लागत नाही आणि मेंदूला मात्र सर्व समाधान मिळते …. संपूर्ण शरीरा ऐवजी केवळ डोळे आणि मेंदू हे दोनच अवयव बाकी सर्व अवयवांचे काम करतात …. गंध आणि स्पर्श देखील केवळ कल्पनेने अनुभवला जातो …. म्हणून पिवळी पुस्तके आणि कामुक चित्रपट बहुतेकांना खासगीत तरी आवडतातच …. ज्या गोष्टींमुळे मेंदूला श्रमाशिवाय मिळणारी गम्मत हवी हवीशी वाटते त्याच गोष्टींच्या अभावाने मग मेंदूला मिळणारे दृष्टीसुख कमी वाटू लागते …. मिळणाऱ्या झिणझिण्या कमी होऊ लागतात, अनुभवांची तीव्रता जाणवेनाशी होते … मग सुरु होते केवळ शब्दातून किंवा चित्रातून किंवा कलाकारांकडून मेंदूला पटकन उद्दीपित करू शकेल बोथटलेल्या जाणीवांना धक्का देऊ शकेल, अश्या कलाकृतीची अपेक्षा …मग कला कुठे संपते आणि क्रौर्य कुठे सुरु होते हे कळण्याचा मार्ग नसतो … सभ्य समाजात समाजघटकांना होणाऱ्या सर्वच नाही तरी शक्य तितक्या भावनांचे विरेचन होणे आवश्यक असते. यात एक विरोधाभासी गम्मत अशी कि विरेचनाची साधने नसल्यामुळे किंवा मुबलक प्रमाणात असल्यामुळे दोन्ही वेळेस समाजात बुभूक्षितपणाच वाढीला लागतो … म्हणून सरकारचे आणि नागरिकांचे काम केवळ साधनांच्या नियंत्रणाचे नसून समाजाला जाणवणाऱ्या भावना आपल्या पूर्वजांच्या संस्कृतीशी सांधून घ्यायला शिकवणे हे देखील असते … त्यामुळेच आपल्या भावनांबद्दल अपराधी वाटण्या ऐवजी किंवा त्यासाठी नैतिक-अनैतिक किंवा कायदेशीर - बेकायदेशीर मार्ग चोखाळण्याऐवजी समाज अधिक जबाबदार होऊ शकेल … (श्रेय: आनंद मोरे यांचे फेसबुक पेज)
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Sun, 08/09/2015 - 11:59 नवीन
पॉर्न बंदी वगैरे माहीत नाही.. पण पौगंडावस्थेतल्या "मुलग्यां"च्या वडिलांनी मुलाशी मोकळेपणाने बोलल्यास यातील बर्‍याच आक्षेपांना उत्तर मिळेल असे वाटते.. लहान वयातील मुलांना लैंगिक शिक्षण असे पॉर्न पाहून मिळू नये असे वाटते. दोन्ही टोके वाईटच. दुसरे म्हणजे व्यक्तीस्वातंत्र्याचा पुरस्कार करताना इतर काही गोष्टींकडेदेखील लक्ष दिले पाहिजे. त्यातील पहिली आहे पॉर्नचे लागणारे व्यसन. व्यसन या शब्दावर काहींचा आक्षेप असू शकतो, पण दारूप्रमाणे पॉर्नचे देखील व्यसन लागू शकते. आणि एव्हढेच नव्हदेखीलितर व्यसनांप्रमाणे त्या व्यसनाचा परिणाम देखील संसारावर होऊ शकतो. किंवा सॅडिस्ट पॉर्न बघून तश्या फँटसी जर एखाद्याच्या तयार झाल्या तर त्याचा त्याच्या जोडीदाराला मर्यादेपलिकडे त्रास देखील होऊ शकतो, ज्याची परिणीती संसार तुटण्यात होईल.. परंतु जसे दारूबंदी हा उपाय नव्हे तसाच पॉर्नबंदी हा देखील उपाय नव्हे असे माझेदेखील मत आहे. पण पॉर्नचा पुरस्कार करताना त्याच्या साईड एफेक्टकडे देखील लक्ष दिले पाहिजे, विशेषतः भारतासारख्या देशात, जिथे अजूनही विवाहसंस्था प्रबळपाहिजेया समस्यांवर काहीतरी मार्ग निघाला पाहिजे, पण त्यासाठी सरसकट पॉर्न बंदी म्हणजे आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी असा प्रकार आहे. जाता जाता १. ते सर्व्हे (३० टक्के महिला पॉर्न बघतात) वगैरे सगळे थोतांड आहे असे माझे मत आहे. २. आज पॉर्न आले म्हणजे नैतिकता बुडली वगैरे काही नाही. नैतिकता तिथेच आहे, साधने फक्त बदललीत. पूर्वी लोक तमाशाला जायचे, आता XXXला जातात इतकेच. आतली भावना तीच आहे, आविष्कार बदललाय. -- (देवपूजेला लागलेला) आनंदा. (ह. घ्या)
  • Log in or register to post comments
म
मालोजीराव Mon, 08/10/2015 - 13:35 नवीन
अरेरे…तमाशा आणि XXX ची तुलना, गेली शेकडो वर्षे आम्ही अश्लीलतेच्या डोहात डुंबत होतो,याचा थेट साक्षात्कार झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
स
सुबोध खरे Sun, 08/09/2015 - 12:18 नवीन
अश्लील साहित्य (पॉर्नो ग्राफी) पाहिल्यामुळे होणारे काही तोटे असे आहेत या चित्रफितीत काम करणारे स्त्री किंवा पुरुष सुंदर गोरे आणि तारुण्याने मुसमुसणारे असतात. यामुळे ते पाहून उद्दीपित होणार्या माणसाना किंवा स्त्रियांना स्वतःच्या शरीराचा न्यूनगंड वाटू लागतो. आपले शरीर क्षुद्र आहे अशी भावना वाढीस लागते. यामुळेच सर्व पुरुषांना आपले लिंग आकाराने फारच लहान आहे असा "साक्षात्कार" होतो.या फितींमध्ये लिंगाचा आकार ६ इंचापेक्षा मोठाच असल्याने बहुसंख्य(९०%+) पुरुषांना आपल्या "आकाराबद्दल" शंका निर्माण होतेच. एकदा हा कली डोक्यात घुसला कि त्याला सोपा उतारा नाहीच. आपण आपल्या बायकोचे "समाधान" करू शकणार नाही हा भयगंड डोक्यात बसतो. मग लिंग वृद्धीसाठी विविध उपचार सुरु होतात. आपल्या स्पॅम फोल्डर मध्ये आपल्याला अशा अनेक जाहिराती सापडतील.आणि मग यामुळे बंगाली बाबा, इंद्रजाल जादुगार इ बाबांच्या नादाला माणसे लागतात आणि स्वतःला नागवून घेतात. हीच परिस्थिती स्त्रियांची आहे. आपले स्तन फारच लहान आहेत किंवा ते ओघळलेले आहेत तेंव्हा आपल्या शरीराची जोडीदाराला किळस येईल अशा भीती पोटी त्या कानकोंड्या होताना आढळतात. अश्लील चित्रफितीत असणार्या स्त्रिया भरदार आणि उठावदार स्तनाच्या असतात. शिवाय कंबर बारीक, बांधा कमनीय असा असतो. तेथे घेतलेले नात आणि नट्या घेतानाची पात्रता पातळीच अशी असल्याने त्यात भाग घेणारा प्रत्येक तरुण तरुणी असे असतातच अशा दुर्दैवाने स्त्रियांना बाहेर जाऊन याचे निराकरण करण्याचा कोणताच उपाय नसल्याने त्यांच्या समस्येवर नीट उपाय नसतो. मग त्या आपल्या लग्न झालेल्या मैत्रिणीकडे उपायासंबंधी विचारणा करतात. बहुतांशी मैत्रिणीने दिलेल्या सल्ल्याचा फारसा फायदा होत नाही. कारण पहिल्या रात्री आपण काहीच करायचे नाही जे काही करायचे ते पुरुष च करणार या सल्ल्यामुळे त्या संबंधातील सुखाच्या अनुभवाला पारख्या होतात. कोणत्याही मासिकात लैंगिक तज्ञांना विचारलेल्या प्रश्नांपैकी ५० % प्रश्न या संबंधातच असतात हे आपल्याला आढळून येईल. याचा अर्थ असा मुळीच नाही कि पॉर्नोग्राफीवर सरसकट बंदी घालावी. कारण अश्लीलतेची व्याख्याच मुळी स्थळ काळ सापेक्ष आहे. आणि सरकारने त्यात न पडणे हे च उत्तम.
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Mon, 08/10/2015 - 17:33 नवीन
पोर्न बद्दल अनेक मान्यवर बोलत असतांना त ते ९० च्या काळातील पोर्न बद्दल वर्णने लिहीतात आजच्या काळात वेब केम ते होम मेड ते रिवेंज ह्या सदराखाली सामान्य माणसाच्या कामुक क्रीडा त्यांच्या कळत नकळत चित्रित केल्या जातात त्याला जगभरातून मोठी मान्यता आहे ,आमच्या पंचतारांकित दुनियेत हॉटेलात वर्षभरातील २०० हून जास्त दिवस हॉटेलात राहून बहुराष्ट्रीय कंपन्यांना अजून श्रीमंत बनवणारे कर्तबगार मान्यवर संध्याकाळी घरी फोन करून झाले की एकतर स्वतः वेश्यालयात जातात किंवा रूम वर बोलावणे होते एका फोन वर आणि रोज रोज असे करण्यापेक्षा मग मध्यममार्ग म्हणून हॉटेल काही पेड पोर्न वाहिन्या त्यांच्या टीव्ही वर दाखवतात त्या पाहून समाधान मानले जाते , बाकीच्या वाहिन्या फ्री असल्या तरी ह्या वाहिन्यांना भरपूर दाम मोजावा लागतो जो बिलात दिसून येतो , सांगण्याचे तात्पर्य एवढेच की पोर्न चा आवाका मोठा आहे आणि कामुक संस्थळं पोर्न ची वर्गवारीत विभागणी करतात , अनेकदा आम्हाला रूम मध्ये जाऊन एखाद्या व्यक्तीस पेड पोर्न वाहिन्या कश्या चालू करायच्या ह्याचे प्रात्यक्षिक करून दाखवावे लागायचे त्यांना नक्की काय पहायचे आहे त्यानुसार कोणत्या वाहिन्या साईट पहाव्यात ह्या बद्दल मार्गदर्शन करावे लागायचे , लंडन मध्ये हे मार्गदर्शन मी हिंदी व मराठी इंग्रजी तून अनेकांना केले आहे . त्यांच्या चेहऱ्यावर अजीजी कधी ओशाळलेले तर कधी निर्ढावलेले भाव पाहायला मिळायचे , पैसा करियर ह्यात आयुष्याचा वेळ जातो माणसाच्या नैसर्गिक गरजा सहजरीत्या पूर्ण झाल्या नाहीत तर मग जे इतर मार्ग शोधावे लागतात त्यात पोर्न हा सोपा सरळ मार्ग आहे ते सहजरीत्या समजत सर्वांना उपलब्ध असतील तर लैंगिक शिक्षण मिळालेला प्रौढ त्याचा आपल्या आयुष्यात योग्य व संतुलित वापर कर शकतो असा माझा स्वानुभव आहे पोर्न हे बहुतांशी गोर्या लोकांची मक्तेदारी असली तरी जगातील कोणत्याही देशाचे नाव व पोर्न असे गुगल काकांना विचारले तर ते खंडीभर साईट पुरवतील. अगदी भारतीय पोर्न मध्ये मराठी सिंधी पंजाबी गुजराती अशी वर्गवारी सुद्धा सापडते शोधा म्हणजे सापडले इच्छा तेथे मार्ग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
क
कहर Tue, 08/11/2015 - 06:36 नवीन
असे न्यूनगंड तर ह्रितिक जॉन ची बॉडी किंवा कतरिना दीपिकाची फिगर पाहूनही होऊ शकतात. मग पोर्न आणि सिनेमा यात फरक काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Tue, 08/11/2015 - 08:16 नवीन
ह्रितिक जॉन ची बॉडी किंवा कतरिना दीपिकाची कमनीयता आपल्याला व्यायामशाळेत बरेच कष्ट करून थोड्याफार प्रमाणात साध्य करता येईल( ज्याची तयारी फारच कमी लोकांची असते) परंतु त्यांच्या सारखा चेहरा करण्यासाठी ५-६ वेळेस प्लास्टिक सर्जरी करावी लागेल. रंग मात्र सहजासहजी बदलता येणार नाही. आजकालचे बहुसंख्य किंवा सर्वच नट किंवा नट्या यांचे शरीर शल्यकौशल्याने ताशीव रेखीव (SCULPTED) केलेलेच आहे. पॉर्न मध्ये दाखवतात तशी लिंगाची लांबी आपल्याला मिळवता येणार नाही. अर्थात त्यातही आजकाल इम्प्लांट वापरण्याचे प्रमाण खूप वाढलेले आहे. यात फरक एवढाच आहे वरील लोक उजेडात कामे करतात आणी खालील लोक "उजेड पडेल" असे काम करतात. आणी त्या दोघातील रेषा फार धूसर आणी अस्पष्ट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कहर
च
चिगो Tue, 08/11/2015 - 07:58 नवीन
उत्तम प्रतिसाद, डॉक्टरसाहेब..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
द
द-बाहुबली Sun, 08/09/2015 - 12:52 नवीन
वर डॉक्टर खरे साहेबांनी चांगला व प्रभोधनात्मक प्रतिसाद लिहला आहेच... पण सरकारने अर्थातच तो हेतु ठेउन बंदी घातली नसावी असा कयास आहे. बंदीमागे सरकारचा रोख काय आहे हेच मुळात स्पष्ट होउ दिलेले नाही ही सायलेंट मुव होती. आणी लोकांनी ते अभिव्यक्तीवरील आक्रमण मानले ज्याचा निरोध हवाच परंतु... ...लोकांना कामसुख/मनोरंजन मिळाले नाही आणी ते पिसाळले असा ही एक अँगल या बंदीविरोधाला लागु आहे की नाही यावरही विशेश्ग्यांची मते जवळुन तपासणे आवश्यक आहे. नाही का ? यावर नक्किच काथ्याकुट हवा. गोष्टी रोचक वळ्ण घेत आहेत मित्रजनांनो...
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Sun, 08/09/2015 - 12:53 नवीन
बंदी घालणे योग्य नाही, पण पोर्न साईटस वर नजर ठेवण्याचे आणि गरज पडल्यास काही साईटस बंद करणे इत्यादी कार्य सरकार कडून अपेक्षित. मर्यादाचे पालन करणे प्रत्येक साईटला हि गरजेचे आहे, विकृत स्वरुपात पोर्न दाखविणे उचित नाही.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 08/10/2015 - 05:57 नवीन
विकृत स्वरुपात पॉर्न (बलात्कार किंवा लहान बालकांबरोबर किंवा प्राण्यांबरोबर संभोग सारखे ज्यात त्या दुसर्या पक्षाच्या समती विरुद्ध संभोग केला असेल) यावर बंदी असावी याचे कारण या गोष्टी जगमान्य आहेत असा तरुण संवेदनशील मनांचा गैरसमज होण्याची शक्यता असते किंवा बलात्कार करण्यात गैर काही नाही असे वाटू शकते.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Mon, 08/10/2015 - 10:08 नवीन
याच्याशी १०१^१०१ वेळा सहमत. 'पॉर्नवर सरसकट बंदी'पेक्षा, अशा पॉर्नवर बंदी हवी ज्यामुळे विकृत गैरसमज पसरायला हातभार लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ग
गवि Mon, 08/10/2015 - 13:53 नवीन
खरेसाहेबांशी सहमत. गेल्या काही वर्षांमधे झालेल्या दिल्ली बलात्कार प्रकरण आणि त्याच्या मागोमाग लगेचच झालेलं बालिकेवर बलात्काराचं प्रकरण या दोन्हीमधे वेगवेगळे विकृत प्रयोग केले गेले होते. त्या मुलीच्या आणि दुसर्‍या केसमधेही लहान बालिकेच्या शरीरात वस्तू घुसवल्या गेल्या होत्या. हे सर्व विकृत पॉर्न बघूनच सुचत असल्याचं रीझनेबली म्हणता येतं. बातमीतील आठवणीनुसार किमान एकानेतरी अशा फिल्म पाहून हे केल्याची कबुली दिली आहे. कितीही कमी लोक इतके विकृत असले तरी एकसुद्धा केस या प्रकारच्या क्रूरता चित्रित करणार्‍या फिल्म्सच्या विरोधात जाणे रास्त वाटते. यासाठी एखाद्या रेग्युलेटर यंत्रणेने रीतसर फिल्म्स पाहून सध्याच्या रेटिंगखेरीज रीतसर प्रौढ+ ++ अशी काही रेटिंग देऊन या फिल्म्स बाहेर येतील असं पहावं. त्यामुळे कंटेंट आधी व्हेरिफाय झालेला असेल आणि क्रूरता दाखवणारे चित्रपट नेमके बॅन करता येतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
च
चिगो Tue, 08/11/2015 - 08:01 नवीन
गविंशी आणि डॉ. खरेंशी सहमत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
न
निमिष सोनार गुरुवार, 08/13/2015 - 11:12 नवीन
मान्य! अगदी मान्य!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
उ
उगा काहितरीच Mon, 08/10/2015 - 06:01 नवीन
प्रतिसाद वाचतोय...
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Mon, 08/10/2015 - 06:23 नवीन
बंदी घालुन लोक पहायचे थांबणारेत असं तर नाही. पण पोर्‍न पाहुन नक्की "फायदे" काय होतात? मजा येत असेल.. तेवढया पुरतं "भारी" वाटत असेल. पण पोर्न मध्ये जे काही दाखवतात त्यातलं काहिही सामान्य माणसाच्या आयुष्यात खरंच कधी घडतं का? अचानक अनोळखी बायका गळ्यात पडुन डायरेक्ट स्वाधीनच होतात का? की २-४ जणी एकदम येतात? सगळ्या सुबक आणि गोर्‍यापानच असतात का? मुळात जे होतच नाही ते जर वयात येणार्‍या मुलांनी बघितलं तर (त्यातही अत्यंत अनेसर्गिक / विकृत संभोग) नक्की त्यातुन काय साध्य होइल? माझ्यामते पोर्नच्या फायद्यापेक्षा तोटेच जास्त असावेत. यु ट्युबवर एक छान व्हिडीओ आहे. "This guy stopped watching porn" असं काहीतरी टायटल आहे.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Mon, 08/10/2015 - 07:05 नवीन
दुसर्‍याला कोणत्याही प्रकारचा क्लेश देत नसेल तर या जगात वि़कृत काहीच नाही. एखाद्याच्या आत्महत्येने दुसर्‍यास जेवढा क्लेश होतो त्यापेक्षा खून केल्याने अधिक गंभीर क्लेश होतो म्हणून खुनाच्या गुन्ह्यापेक्षा आत्महत्येचा गुन्हा सौम्य मानला गेला आहे. तसेच लैंगिक गुन्हे व पोर्न यांचे आहे. नवरसात बिभत्स हाही एक रस मानला गेलेला आहे. अपघात झालेला " पहायला" थांबणे ,पूर पहायला नदीवर जाणे, उंचावरून पोटात गोळा येईपर्यंत खोल दरीकडे पहाणे, भुतांचे चित्रपटाचा " आनंद लुटणे हे सामान्यपणे निखळ आनंदाचे उद्योग नाहीत तरीही त्यात मानवी मनाला रस वाटतो. 'मॅन वर्सस वाईल्ड' यात काही प्रसंग असे असतात की मांसाहारी माणसालाही किळस यावी तरीही तो कार्यक्रम जगभर लोकप्रिय आहे. मुलांनी पोर्न पहावे की नाही याचा समाजाने निर्णय घेऊन पावले जरूर उचलली पाहिजेत पण त्याने जन्मात काधीच काही असे पाहू नये असा आग्रह धरायचा झाला तर फक्त ताई भाउ ची नाटके पहाणे समाजाच्या हातात राहील. सारासार विवेक माणसाला येण्यासाठी काही वर्षांचा जीवनानुभव माणसाला घ्यावा लागतो त्याचा आपण नैसर्गिक रित्या प्रौढ होणे म्हणतो. अशा कालमर्यादेत मुलाला ड्रायव्हिंग लायसन्स जसे दिले जात नाही तसेच पोर्न चा ठाव ठिकाणा त्याला लागता कामा नये.
  • Log in or register to post comments
न
नाखु Tue, 08/11/2015 - 08:34 नवीन
सारासार माहीतीपूर्ण प्रतीसाद! आणि निकोप चर्चेबद्दल सर्वांना धन्यवाद. पक्षीय जोडे बाहेर ठेऊन केलेला(अलिकडचा) एक्मेव धागा असे म्हणावे लागते आहे. वरील मान्य्वरांनी व्यक्त केलेली मते आणि व्यावसायीक अनुभवांची जोड देऊन केलेले विवेचन विचारप्रवृत्त आहेच. मुलांशी विश्वासार्ह संबध+मोकळीक असतील तर नक्कीच अश्या बाह्य प्रलोभनांना आळा बसेल. पण बंदी हा सर्वसमावेशक उपाय नक्की नाही. गुटख्यावर बंदी आहे तरी लोक (२०-५० रू खर्च करून खात आहेतच) बंदीने "खायला" आणखी एक कुरण मिळेल इतकेच काय ते! कारण पोर्न ची साधी सरळ अशी "सामाज मान्य" व्याख्या नाहीच. आणि यावर कप्तानाने दिलेली निरीक्षणे इतकी चपखल आहेत की फार लिहायला शिल्लक ठेवलेच नाही. चांगल्या चर्चेने आनंदीत नाखु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
प
प्रसाद गोडबोले Tue, 08/11/2015 - 09:02 नवीन
२०-५० रू खर्च करून खात आहेतच
२५-५० ? कुठे मिळतो ? सातार्‍यात तर आर.एम.डी ८० - १०० रुपायाने विकला जात होता बंदी आली तेव्हा ! आता माहीत नाही . आता सगळे विमल +पानमसला असे मावा मिख्चर खातात !! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 08/11/2015 - 13:23 नवीन
पोर्न असो की की दारू की गुटका... त्यांच्यावरची बंदी त्याच्या निर्मात्यांनीच काळाबाजार करून अनेक पटींनी जास्त पैसा कमावायला घालून घेतली आहे असा संशय येण्याजोगी परिस्थिती आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
त
तुडतुडी Mon, 08/10/2015 - 09:34 नवीन
बंदी योग्यच आहे . स्वतामध्ये जसा न्यूनगंड निर्माण होतो तसा स्वतःच्या जोडीदाराबद्दल , बायकोबद्दल/ नवऱ्याबद्दल सुधा निर्माण होतो . म्हणजे स्त्रीचं शरीर असं असतं . आपल्या बायकोचं नाहीये (स्त्रियांच्या बाबतीत पुरुषाचं शरीर असं असतं . आपल्या नवर्याचं नाहीये ). मग अश्या शरीराच्या शोधात व्यभिचार वाढतो . नवरा पोर्न बघून किळसवाण्या गोष्टी करायला सांगतो , कामधंद्यात लक्ष देत नाही , विकृत झालाय अश्या गोष्टींमुळे अनेक घटस्फोट झालेयत आणि होतायेत . ..लोकांना कामसुख/मनोरंजन मिळाले नाही आणी ते पिसाळले >>> हा अत्यंत बिनबुडाचा युक्तिवाद आहे . पॉर्न साईट्स नवत्या तेव्हा किती लोक पिसाळत होते ? मोबाईल नवते तेव्हा लोकांचं एवढं अडत नवतं पण आता मोबाईल शिवाय पान हलत नाही . तसंच . आणि पॉर्न मुळे कामसुख/मनोरंजन मिळत नसून विकृत समाधान मिळतं . पुढच्या पिढीला विकृत बनवायचय का आपल्याला ?
  • Log in or register to post comments
क
कहर Tue, 08/11/2015 - 06:49 नवीन
द्रौपदीने पाच पुरुषांसोबत लग्न केले होते. आणि अर्जुन जिथे जाइल तेथे दिवे लाऊन यायचा (सुभद्रा उलूपी चित्रांगदा वगैरे). राधा आणि कृष्णाने रासलीलांमध्ये कपड्यांची अदलाबदली केल्याच्या गोष्टी आहेत. या गोष्टींचे आजच्या युगात अनुकरण केल्यास समाजाचा तोटा आहे. यावरही बंदी हवी का ?…
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
क
कपिलमुनी Tue, 08/11/2015 - 11:09 नवीन
त्यावेळी असलेली राधा आणि कृष्णाची वयं सांगा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कहर
क
कहर Tue, 08/11/2015 - 11:27 नवीन
नक्की कल्पना नाही पण आंतरजालावरील माहिती नुसार राधा कृष्णापेक्षा १० वर्षे मोठी असावी. म्हणजे दोघांना एकमेकांचे कपडे बसले तेव्हा कृष्णाचे वय कमीत कमी १५ (दहावी मधल्या नुकत्याच पौगंडावस्थेच्या दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यात )आणि राधेचे २५ (ज्वानीच्या पूर्ण बहरात ) एवढे असावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
प
प्यारे१ Tue, 08/11/2015 - 11:45 नवीन
>>> आंतरजालावरील माहिती नुसार >>> कृष्णाचे वय कमीत कमी १५ (दहावी मधल्या नुकत्याच पौगंडावस्थेच्या दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यात )आणि राधेचे २५ (ज्वानीच्या पूर्ण बहरात ) ब्वार्र! और कुछ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कहर
क
कहर Tue, 08/11/2015 - 11:48 नवीन
कुछ नही. बाकी सब ठीक है. ==))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ Tue, 08/11/2015 - 12:07 नवीन
नशीब जोर से बोलो म्हणालो नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कहर
आ
आनन्दा Mon, 08/10/2015 - 09:37 नवीन
एक बाजू म्हणून लोकसत्तामधला हा लेख मस्त आहे. दुर्दैवाने त्यातली आकडेवारी गंडलेली आहे. त्यांच्या मते भारतातील ३०% महिला पॉर्न पाहतात.. यापेक्षा आणखी मोठा विनोद कोणताच नाही. खरी आकडेवारी अशी आहे की भारतात पॉर्न पाहणार्‍यांमध्ये ३०% महिला आहेत. विंग्रजीमधून मराठीत भाषांतर करताना घोळ झालाय. असो. अजून काही गोष्टी मी मागच्या प्रतिसादात नमूद करायला विसरलो.. पॉर्न पाहून किती लोकांचे "समाधान" होते? समाधान पॉर्न मुळे होत नाही, पॉर्नमुळे फक्त उद्दीपन होते. समाधानासाठी माणसाला वेगळे मार्ग शोधावे लागतात. अजून एक म्हणजे निर्भयावरच्या अत्याचारात पॉर्नचा वाटा किती हा पण एक प्रश्न विचार करण्यासारखा आहे? इथे किती जणांना असे वाटते की निर्भयावरील अमानवी अत्याचारांमध्ये सॅडिस्ट पॉर्नचा अजिबात वाटा नाही? हे पॉर्नवरील बंदीचे समर्थन नाही, पण पॉर्न आणि लैंगिक अत्याचारांचा काही संबंध नाही असे म्हणणार्‍यांनी याचा देखील विचार करावा. तसेच लैंगिक अत्याचारांत सहभाग असणार्‍यांमध्ये किती टक्के जण पॉर्न बघतात हा देखील एक अभ्यासाचा विषय व्हावा. अवांतर - मिपावर माझ्या माहितीत प्रथमच प्रत्येक जण या लेखावर स्वतंत्र प्रतिक्रिया देतोय.. दुसर्‍याच्या प्रतिक्रेयाला उत्तर फार कमी जण देत आहेत :)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 08/10/2015 - 10:06 नवीन
>>>>> मिपावर माझ्या माहितीत प्रथमच प्रत्येक जण या लेखावर स्वतंत्र प्रतिक्रिया देतोय. स्वतंत्र मत आलंच पाहिजे. नेमकं कोणाला काय म्हणायचं आहे ते तरी कळतं. बाकी, पॉर्नमुळे उद्दीपन होते याच्याशी सहमत आहे. बर्‍याचदा कामसुखाचा संबंध मानवीमनाशी आहे, डॉक्टरमंडळी त्याचा खुलासा करतीलच. माझ्या एका डॉक्टर मित्राने एका रुग्णाला असं काही वाचायला, बघायला सांगितल्याचं स्मरतं. आता ते का ? कशासाठी ते लिहित नाही पण असा काही फायदा होऊ शकतो ? प्रश्न मला वाटतं पौगंडा अवस्थेतील मुलां मुलींच्या भावनिक कोंडमार्‍याचाही आहे, लैंगिक शिक्षण शाळा महाविद्यालयातून दिल्या जात आहे, तरीही सर्व प्रश्न सुटलेत असे वाटत नाही. अश्लिल साइट्सवर केवळ संभोगांच्या चित्रणापेक्षा मला भयानक वाटतं ते हे की छुप्या क्यामेर्‍याने अपलोड केलेले चित्र आणि व्हिडियोज हे सर्वात घातक प्रकार आहे, असे मला वाटते. बंदी यावी त्या अशा अपलोड केलेल्या चित्रणावर. अजून एक मुद्दा एकीकडे लैंगिक शिक्षणाची माहिती नव्या पिढीला देत आहोत पण ती माहिती विवाहित स्त्री-पुरुषांना तरी किती असते. म्हणुनच मागे मिपावर मी 'त्या चार योनींची गोष्ट' या नाटकावर लिहिता लिहिता राहीलो. एकीकडे नाटकातून तुम्ही स्त्री-पुरुषांची मागणी काय आहे, याविषयावर प्रबोधन करत आहात आणि एकीकडे माहितीचे सोर्स थांबवत आहात असेही वाटते, याही मुद्द्यांचा विचार व्हावा. अश्लिलता ही मनात असते.... असो, बाकी नंतर लिहितोच. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
श
शब्दानुज Mon, 08/10/2015 - 19:14 नवीन
असे शिक्षण खरेच दिले जाते यावर तुमचा विश्वास आहे ? दहावी ( फार फार तर ३-४ पाने)वगळता याचा उल्लेख कधीही झालेला नाही. त्यामुळे तो मुद्दा स्पष्ट कराल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 08/11/2015 - 13:14 नवीन
महाविद्यालयात जसे की अकरावी कला शाखेच्या वर्गातील मुलांच्या अभ्यासक्रमांमधील समाज शास्त्र या पुस्तकात विवाह संस्थेबद्दल माहिती आहे. प्रत्येक समाजामधे विवाहाची प्रथा या ना त्या स्वरुपात दिसते. कामवासनेची तृप्ती ही सर्वच प्राण्यांची गरज आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी मानव समाजात विवाहाची प्रथा उदयास आली. लैंगिंक गरजेच्या तृप्तीसाठी विवाहविषयक नियम तयार केले गेले तरी त्याच्याकडे केवळ लैंगिक संबंधाच्या दृष्टीने पाहुन चालणार नाही. मग विवाहाचा हेतु काय तर १) लैंगिंक गरजांची पूर्ती करणे. २) प्रजोत्पादन. ३) इ. ४) इ.इ. ..... आता विद्यार्थ्यांना मानवी प्रजनन संस्थेतील अवयवांची ओळख करुन देऊन, विवाह, लैंगिक गरजांची पूर्ती हा विषय समजावून सांगितला पाहिजे, सांगितला जातो तसेच लैंगिक शिक्षणाबद्दल माहिती व्हावी म्हणुन अनेकदा व्याख्यानंही आयोजित केली जातात. या अर्थाने महाविद्यालयात लैंगिक शिक्षण असे मी म्हणत आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दानुज
च
चिगो Tue, 08/11/2015 - 08:12 नवीन
अश्लिल साइट्सवर केवळ संभोगांच्या चित्रणापेक्षा मला भयानक वाटतं ते हे की छुप्या क्यामेर्‍याने अपलोड केलेले चित्र आणि व्हिडियोज हे सर्वात घातक प्रकार आहे, असे मला वाटते. बंदी यावी त्या अशा अपलोड केलेल्या चित्रणावर.
१००% सहमत.. जिथे 'अश्लील साहित्य आणि चित्रण' हा राजीखुशीचा मामला आहे, तो व्यवसाय आहे तिथे ठीक.. पण हे 'छुपे' चित्रण सरळसरळ 'राईट टू प्रायव्हसी'चे उल्लंघन असते आणि त्यातून एखाद्या स्त्री वा पुरुषाला बदनामीस सामोरं जावं लागू शकते. (कालच 'दृष्यम' बघितलेला) चिगो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ग
गवि Tue, 08/11/2015 - 08:48 नवीन
पण पण पण.. अमुक व्हिडीओ हा छुपा, इच्छेविरुद्ध गुप्तपणे काढलेला आहे आणि तमुक व्हिडीओ राजीखुशीने काढलेला आहे हे ठरवणं कठीण नाही वाटत? . केवळ कॅमेरा लपवल्याप्रमाणे त्याचा अँगल आहे किंवा फ्लिममधली व्यक्ती अनभिज्ञपणे वावरतेय असं बघून भासत असेल तर ते छुपं असं ठरवणार का? कोण ठरवणार? म्हणजे कोण्या एका सेंट्रल ऑथॉरिटीने सर्व कंटेंट स्कॅन करणं आलंच ना? की प्रत्येक गोष्ट कोणीतरी पोलीस कंप्लेंट करण्यावर अवलंबून ठेवायची? जर कंटेंट स्कॅन केल्याशिवाय नैसर्गिक, अनैसर्गिक, क्रूर, बालकयुक्त, प्राणीयुक्त वगैरे कॅटेगरी कळणारच नसेल (कळणार नाहीच) तर मग एका कोणत्यातरी ऑथॉरिटीकडून स्कॅन करुन घेतलेल्या आणि रेटिंग दर्शनी भागात लिहिलेल्या फिल्म्सच कायदेशीर आणि बाकी सर्वकाही बेकायदेशीर (बघण्यास गैर आणि शिक्षेस पात्र) असं ठरवलं तर ही विभागणी सरळसोपी होणार नाही का? त्याद्वारे अशा छुप्या, नकळत काढलेल्या क्लिप्स कोणाला कायदेशीररित्या रिलीज करायच्या असतील तर त्याचा कंटेंट स्कॅन तरी होईल. त्यात संशयास्पद आढळल्यास जबाबदारीनिश्चिती तरी होईल. या प्रकारे नियमित करुन घेण्याने प्रौढ कंटेंट उपलब्धही राहील आणि नेमकं नको ते बाजूला करता येईल. हे बाजूला केलेलं कोणी पाहिलंच तर त्याला प्रत्येक वेळी पकडता येईल असं नव्हेच, पण निदान त्याला राजरोस बेकायदेशीर ठरवता येईल. आणि आत्ता आहे त्यापेक्षा बरीच नियमित स्थिती होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा