Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

.... आभास

श — शिव कन्या, Tue, 08/11/2015 - 00:22
केवळ शब्द भारलेले इकडून तिकडे वाहणारे तिकडून इकडे झरणारे...... कुणाकुणाचे संचित असते क्षणामनाला जाणिव देते प्रत्यक्षाहून, अमूर्त संपन्न! भास नसे हा खास तरीही आभासाच्या जगात फिरते गूज मनाचे मनास वदते. इतक्या रुतल्या गाठी रेशीम व्रणही वाटे जपून ठेवू नशिबाला मग कौलच लावू दिगंताला निघताना तरी, हात खराच हाती घेऊ!

प्रतिक्रिया द्या
1335 वाचन

💬 प्रतिसाद (4)
ज
जडभरत Tue, 08/11/2015 - 05:09 नवीन
छान आहे. पण शेवटच्या कडव्यात जराशी लय बिघडते. तिथेही ३-३ ओळींचे विभाग पाहिजे होते. पहिल्या ३ कडव्यांत लय खूप छान जमलीये.
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Tue, 08/11/2015 - 11:42 नवीन
वाचून प्रतिसाद दिलात, धन्यवाद. शेवटच्या कडव्यातील लय मुद्दाम विस्कळीत केलीय.कारण त्यातील आशय अनिश्चित भविष्याशी निगडीत आहे.हा आशय अन् बांधणीचा खेळ आहे.लिहिणारीची अस्वस्थता ध्वनीत करण्यासाठीचा हा साधा प्रयोग आहे. याच ओळी शब्दांत फेरफार करुन तालात बांधता येतात.आशय दोन ओळीत मावला म्हणून शेवटी तिसऱ्या ओळीचे पाणी कशाला? इतक्या रुतल्या रेशीमगाठी! व्रणही वाटे जपून ठेवू नशिबाला मग कौल लावू! दिगंताला निघताना तरी हात खराच हाती घेऊ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जडभरत
ए
एस Tue, 08/11/2015 - 06:26 नवीन
छान, अमूर्त काव्य.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Tue, 08/11/2015 - 13:37 नवीन
सुंदरच !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा