होती एक नजर.......
होती एक नजर.......
मला पाहणारी
लाख झिडकारले तरी
अंगचटीस येणारी.....
होती एक नजर.......
मला शोधणारी
कधी कॉलेज, कधी बस्-स्टॉप
तर कधी खिडकीवर रेंगाळणारी
होती एक नजर.......
मला आसुसलेली
प्रत्येक नकाराने माझ्या
सुडाने ठसठसलेली...........
होती एक नजर.......
मला दाहणारी
पेटवून देहास माझ्या
खुनशी खदखदणारी..........
होती हर एक नजर....
माझ्यावरच खिळलेली
जेव्हा फोडला मी टाहो
तेव्हा हलकेच चुकचुकलेली.....
होती एक नजर.......
धुराने धुसरलेली
दिसत होते त्यात बाबा
अन आई लाघवी हसणारी.....
उरली एक नजर.........
जगण्यास धडपडणारी
प्रत्येक विझत्या निखर्यासवे
एक बाहुली कायमची.......निजलेली
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nancy Ajram - Ah We Noss / نانسى عجرم - آه ونص