अफगाणिस्तानात १०० मीटर लांबीचा तिरंगा फडकला !
सलमा धरणाच्या रुपाने २००६ मध्ये सुरू झालेला भारताचा अफगाणीस्तानमधला सामाजिक मदत प्रकल्प लवकरच पूर्णत्वास येईल. धरणात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. पुढच्या ९ ते १२ महिन्यांत १०० टक्के काम पुरे होईल.
१९५० कोटी भारतीय रुपये खर्चून दहा वर्षे चाललेल्या या प्रकल्पामुळे ८०,००० हेक्टर शेतजमीन पाण्याखाली येणार आहे आणि त्यामधली ३ टर्बाईन्स ४२ मेगॅवॅट वीजनिर्मिती करतील.
या धरणाचा उपयोग अफगाणिस्तानच्या पश्चिम हेरात प्रांतातील रहिवाश्यांना होणार आहे. या प्रकल्पाने प्रभावित झालेल्या हजारो नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने हेरात येथील भारतीय उपदूतावासाला (काउंसलेट) भेट देऊन पुष्पगुच्छांसह भारताचे आभार मानले. त्याचबरोबर, रस्त्यावर मानवी साखळी तयार करून १०० मीटर लांबीचे भारतीय आणि अफगाण ध्वज फडकावून आपले मनोगत एका अनवट कृतीने त्यांनी व्यक्त केले ! अनेक जणांनी व्टिटरच्या मदतीने भारताच्या सदिच्छेचा आदर केला तर काही जणांनी बॉलिवूड चित्रपटांतील गाणी गात रस्त्यावर मिरवणूक काढून आपल्या भावना व्यक्त केल्या.
त्या प्रसंगाची काही क्षणचित्रे आणि व्टिटरचित्रे...
.
.
.
.
(संदर्भ : http://www.indiatimes.com/news/world/afghans-carry-100-metre-tricolour-to-thank-india-for-reconstructing-the-salma-dam-244102.html )
.
भारताने सावध रहायला हवे.नक्कीच, पण या संदर्भात सार्वकालिक सत्य असे आहे... १. "या जगात प्रत्येक राष्ट्राने इतर प्रत्येक राष्ट्रापासून सावध राहीलेच पाहिजे. कारण, "आंतरराष्ट्रीय राजकारणात मित्र नाही, केवळ हितसंबधच स्थायी असतात." (There are no permanent friends in international politics, only permanent interests.) हेच एकमेव सार्वकालीक स्थायी सत्य आहे" २. भारताच्या (किवा कोण्या एका देशाच्या) हितसंबंधांचा सतत पाठपुरावा केला आहे अश्या दुसर्या एका देशाचे नाव सांगता येईल का ? नाही. याचा अर्थ भारताच्या बाजून कधीच कोणताही देश नव्हता असे नाही... जेव्हा ज्याला पाठिंबा देत येत होता आणि पाठीबा देणे सोईचे होते, तेव्हा त्याने तो दिला, नव्हता तेव्हा नाही दिला. अश्या अस्थायी परिस्थितीत, आपणही एकाद्या वेळेस पाठिंबा दिला नाही म्हणुन कायम रुसून न बघता, दुसर्याच्या नाईलाजांना समजून घेवून, आपल्या हितसंबंधांना योग्य ती कृती करायची असते. ३. बर्याचदा अत्यंत समान हितंबंध असल्याने काही राष्ट्रे बराच काळ बर्याच वेळा घट्ट दोस्ती असलेली राष्ट्रे दिसतात... पण त्यामागील मूळ अंतप्रेरणा "हितसंबंध" हीच असते... नाटोसारख्या घट्ट सामरीक संघटनेची सभासद राष्ट्रे लष्करी सामुग्रीचे कंत्राट काबीज करताना एकमेकावर कुरघोडी करताना दिसतात ते यामुळेच. ३. उघडपणे दृश्य कृती वरवर दिसते तशी पूर्ण सहमतीने केलेली कृती असू शकतेच असे नाही. ती वरवर हासर्या चेहर्याने पण सद्य वस्तूस्थितीमुळे झालेल्या नाईलाजाने स्विकारलेला निर्णय व कृती असू शकतात. (हे जेवढे आंतरराष्ट्रिय राजकारणात खरे आहे तवढेच वैयक्तिक जीवनात "बॉसच्या नाराजीने होऊ शकणार्या धोक्याला टाळण्यासाठी न पटलेले काम हसर्या चेहर्याने केले जाते" तेव्हाही खरे असते !) ४. माणसे असो वा राष्ट्रे, दोनच प्रकारची असतात... (अ) क्रियावादी (proactive / active) : ही माणसे/राष्ट्रे गैरसोयीची वस्तूस्थिती बदलण्याचा प्रयत्न करून ती सोयीची करण्याचा प्रयत्न करतात... हे प्रयत्न दर काळच्या परिस्थितीप्रमाणे उघड किंवा गुप्त किंवा दिशाभूल करणारे असू शकतात. काही परिस्थितीत डोके थंड ठेवून काहीच न करता वस्तूस्थितीचे जवळून निरिक्षण करत राहणे आणि योग्य संधी हेरून तिचा फायदा उठवणे हा पण एक फार उपयोगी पर्याय असू शकतो. (आ) प्रतिक्रियावादी (reactive) : ही माणसे/राष्ट्रे गैरसोयीची वस्तूस्थिती बदलण्याचा प्रयत्न करण्याचे धैर्य दाखवू शकत नाहीत किंवा त्यांच्या तेवढी मानसीक आणि/अथवा वास्तव ताकद नसते. त्यामुळे परिस्थिती जशी रेटून नेईल तसे वाहत जातात किंवा अविचारी प्रतिक्रियेचा भाग म्हणून एखादा आतताई निर्णय घेवून नंतर बहुदा पस्तावतात. सद्य प्रतिकूल स्थितीत तगून राहणे आणि बर्याच काळपर्यंत यशस्वी होणे हे पहिल्या प्रकारच्या माणसात/राष्ट्रांत जास्त शक्य असते. यातही, आपण "नक्की काय आहोत आणि काय करणार आहोत ?" या संभ्रमात आपल्या प्रतिस्पर्ध्याला सतत गुंतवून ठेवणारे जास्त प्रमाणात यशस्वी होतात.