पाककृती

शिंगाड्याच्या पिठाचे लाडू

Primary tabs

शनिवारपासून श्रावण सुरू झाला. आता महिनाभर वेगवेगळे उपास केले जातील. उपासाला साबुदाणा खाऊन कंटाळा येतो, आणि आरोग्यासाठीही तो हितकर नाही. शिंगाडा हा कंद उपासासाठी वापरल्या जाणाय्रा पदार्थांपैकी एक असला तरी आपण त्याचा फार कमी वापर करतो. आयुर्वेदिकदृष्ट्या शिंगाडा ऊर्जावर्धक आहे, त्यापासून पीठ तयार करतात. हे पीठ थालिपिठासाठी वापरतात. त्याची खीर, लाडूही करतात.

साहित्यः शिंगाड्याचे पीठ दोन वाट्या, पिठी साखर दीड वाटी, साजूक तूप पाऊण वाटी, सुक्या खोबय्राचा कीस अर्धी वाटी, दाण्याचे कूट अर्धी वाटी, वेलची पावडर.

कृती: शिंगाड्याचे पीठ कढईत घ्यावे. त्यात तूप घालून तांबूस रंगावर भाजून घ्यावे, गार करण्यास ठेवावे. सुके खोबरे किसून, भाजून घ्यावे, शेंगदाणे भाजून त्याचे कूट करून घ्यावे. भाजलेले पीठ गार झाले की त्यात पिठीसाखर, दाण्याचे कूट, सुक्या खोबय्राचा कीस बारीक करून मिसळावा. स्वादानुसार वेलची पावडर घालावी. सर्व पीठ नीट मिसळून लाडू वळावेत. लाडू नीट वळले जात नसतील तर गरजेनुसार साजूक तूप घालावे.
यामध्ये डिंक तळून , खारीक पावडरही घालता येईल. फक्त त्यानुसार लागल्यास पिठीसाखरेचे प्रमाण वाढवावे. या प्रमाणात १५/१८ लाडू होतील. हा लाडू अतिशय पौष्टिक आहे, लहान मुलांना अवश्य द्यावा.

ladu

जडभरत

खूप सुंदर दिसताहेत लाडू.
मस्तच!

Mrunalini

पाकृ आवडली.. इथे आम्हाला काहि शेंगाड्याचे पीठ मिळणार नाही. त्यामुळे भारतात आल्यावर ट्राय करेल.

अनन्न्या

कणकेच्या लाडवासारखे लागतात. सर्वांचे आभार.

मला पायजे.

समांतरः- त्या खिचड्या खाण्यापेक्षा हे लाडू कित्ती चांगले.. पण करतच नैत कुणी असलं कै. :-/ दुत्त दुत्त :-/

दिव्यश्री

मी करेण पण मला कध्धी कध्धी :-/ दुत्त दुत्त :-/ अस म्हणाच णै .

बाय द वे मस्त पाकृ. :)

यशोधरा

अनन्न्या, दुत्त!! दुत्त!!!
पुण्याला असं म्हणते! वरुन लाडवांचे फोटो टाकते!!!

पियुशा

शिंगाड्याचे लाडु मस्त दिसताहेत :)

स्पंदना

भारी पाक्कृती.
आता मिळाले की आणेन हे पिठं.