Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मॅगी नूडल्सः कसं असेल कमबॅक..? डोकं लढवा

स
संदीप डांगे
Wed, 08/19/2015 - 08:44
🗣 70 प्रतिसाद
नमस्कार मंडळी, नेहमीच्या काथ्याकूटांच्या लढायांतून वेळ काढूया (हे मी स्वतःला बजावतोय, गैरसमज नको ;-) ). आणि काहीतरी धमाल आणि डोकेबाज करण्याचा प्रयत्न करूया. मॅगीवरील बंदी माननीय न्यायालयाने उठवली आहे. खटला अजून संपला नाही पण आतापर्यंत उपलब्ध बातमी नुसार मॅगी परत विक्रीस येणार आहे असं खात्रीलायक वाटत आहे. ह्या सगळ्या परिस्थितीत जाहिरात जगतात एक कुतूहल लागून राहलंय की मॅगीचं पुनरागमन नक्की कसं असेल? काय करतील नेस्ले आणि त्यांचे ब्रँड मॅनेजर? नुसता जाहिरातींचा मारा करून प्रश्न सुटणार नाही. त्यांना काहीतरी ठोस आणि मौल्यवान असा संदेश द्यायला लागेल. "वी आर सेफ - आमचं उत्पादन सुरक्षित आहे" असं म्हणून चालणार नाही. कारण फक्त 'भूक भागवणे' ह्या अतिशय बेसिक विचारापासून आजची अन्नपदार्थ-उत्पादने पार पुढे जाऊन 'हेल्दी' म्हणजे 'आरोग्यदायी' आहोत असा (तद्दन खोटा) प्रचार करत आहेत. या परिस्थितीत 'खायला सुरक्षित' अशी प्रतिमा जास्त नुकसान करणारी आणि शंभर युगं मागं ढकलणारी ठरेल. सेलीब्रीटी वापरून उपयोग नाही कारण आधीच त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह आहे. मॅगीचे पुनरागमन कोक आणि कॅडबरीइतके सोपे कधीच नसणार कारण हे उत्पादन समाजाच्या सर्व स्तरांमधे, वर्गांमधे सारखेच लोकप्रिय होते. त्याचा एक लाइफस्टाइल प्रॉडक्ट पेक्षा जीवनावश्यक वस्तू म्हणून वापर होता. त्यामुळे आता फारच जपून पावलं टाकावी लागणार आहेत. मॅगीने काहीही कॅम्पेन केलं तरी प्रतिस्पर्धी -सन्फिस्ट, चिंग्स, आयटीसी, इत्यादी- त्याची हवा काढायला टपलेलेच असणार. आपल्या जाहिरातींमधून त्यांच्या टिकाटिप्पणीला खाद्य मिळू नये अशीही काळजी घ्यायला लागणार. मित्रांनो, एका जाहिराततज्ञासाठी ही एक खरंच आव्हानात्मक परिस्थिती आहे. तसंच कल्पक डोक्याच्या लोकांसाठी पुरेपूर खाद्य आहे. मॅगी अनेकांच्या जीवाभावाची आहे. तर अशा मॅगीसाठी जाहिरात मोहिम काय असावी यावर आपल्याला काथ्याकूट करायचा आहे. ब्रँडबद्दल तुम्हाला माहिती आहे, त्याच्या समस्येबद्दलही माहिती झालेच आहे. जाहिरात कंपन्या ज्याप्रकारे काम करतात त्यातला ५०% टक्के भाग तुमच्या हातात आलेला आहे. आता हा प्रश्न सोडवायचा आहे. तर येऊद्या एकएक भन्नाट कल्पना. वेळोवेळी जाहिरात एजंसी व नेस्ले तुमच्या कल्पनेवर कशी प्रतिक्रिया देऊ शकतात याचे मार्गदर्शन मी करेन. त्यासोबतच काही कल्पना राबवतांना येणारे अडथळे आणि समस्याही मांडेन. म्हणजे जाहिरात एजंसीचे कार्य कसे चालते हेही आपल्याला लक्षात येइल. मनोरंजन + माहिती असा दुहेरी उद्देश आहे या धाग्याचा. तुम्हाला काय करायचंयः १. ग्राहक दृष्टिकोणासंबंधी टिप्प्णी देऊ शकता. उदा. मुलांना मॅगी देण्याची आयांची वेळ साधारण दुपारनंतरची असते. भारतीयांना गोर्‍या रंगाबद्दल अवास्तव आकर्षण आहे. खेळतांना अचानक थकवा जाणवायला लागल्यावर काहीतरी पेय प्यावेसे वाटते. २. सिंगल लाइन नॅरेटीव - एका वाक्यात स्पष्ट होणारे धोरण, विचार - देऊ शकता. उदा. फेअरअँडलवलीने उजळपणा येतो, बूस्ट प्यायल्याने मरगळ झटकून अचानक शक्ती येते, ३. प्रत्यक्ष जाहिरात - टीवी कमर्शीयल किंवा इतर कोणतेही पारंपरिक माध्यम - कशी असेल त्याची स्क्रिप्ट - पटकथा लिहू शकता. उदा.: मेलोडी इतनी चॉकलेटी क्युं है असं विचारणारे वेगवेगळे प्रसंग लिहिणे, कोकच्या थंडा मतलब कोकाकोला हे दाखवणारे प्रसंग लिहिणे, ४. पारंपरिक माध्यमांशिवाय लोकांमधे जनजागृती करण्याचे नवीन फंडे सांगू शकता. उदा. महिन्द्रा त्यांच्या स्कॉर्पीओ आणि तत्सम एसयुव्ही चा दमदारपण व उपयुक्तता पटवून देण्यासाठी मोटरशोजमधे कृत्रीम ऑफरोड ट्रॅक तयार करून लोकांना प्रत्यक्ष टेस्ट ड्राइव देतात. ५. एखाद्या सदस्याने सादर केलेली कल्पना प्रतिस्पर्धी कंपनी कशा पद्धतीने हाताळेल याचीही कल्पन देऊ शकता. उदा.: जॅग्वारने मर्सिडीजच्या कोंबडीची काढलेली पिसं. त्यावर मर्सीडीजचे उत्तर. मग करताय ना मदत मॅगीला परतायला...? (हो. दिस्क्लेमर राहिलेच. : ही कुठल्याही पद्धतीने मॅगीची जाहिरात नाहीये. मिपा किंवा संदीप डांगे ही व्यक्ती कुठल्याही प्रकारे मॅगीशी संबंधीत नाही. हा फक्त मनोरंजनासाठी (ब्रेनस्टॉर्मींग-रोलप्ले) साठी काढलेला धागा आहे. मार्केटींग नाही. इच्छुक या धाग्यावर बिन्दास्त मॅगीची पिसंही काढू शकतात.)
वर्गीकरण
मनोरंजन
माहिती
अभ्यास
सृजन

प्रतिक्रिया द्या
16360 वाचन

💬 प्रतिसाद (70)
अ
अभ्या.. Wed, 08/19/2015 - 09:00 नवीन
मस्त धागा संदीपराव. आवडली आयड्या. पाहू या नेस्लेला काही मिळते का येथून ;) एनीवे मला वाटते आता मॅगी नो सेलेब्रिटी नो हेल्थ फंडे आणि नो कॅची लाईन करेल. आता फक्त जनरल पब्लिकच्या मॅगीशी अ‍ॅटॅचमेंटवर अ‍ॅड येतील. त्यांनी हा फंडा पॅकींगवर वापरला होता आता तो सगळीकडे वापरतील. मॅगी आयुष्यातल्या कुठल्या रिकाम्या जागा भरत होते ते जास्त डॉमिनेट केले जाईल. आगे आगे देखेंगे होता है क्या. ;)
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Wed, 08/19/2015 - 09:24 नवीन
प्रतिसाद वाचायलाही उत्सुक.
आता फक्त जनरल पब्लिकच्या मॅगीशी अ‍ॅटॅचमेंटवर अ‍ॅड येतील. त्यांनी हा फंडा पॅकींगवर वापरला होता आता तो सगळीकडे वापरतील. मॅगी आयुष्यातल्या कुठल्या रिकाम्या जागा भरत होते ते जास्त डॉमिनेट केले जाईल.
..सहमत.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 08/19/2015 - 09:27 नवीन
आयड्या सांगायला हरकत नै, पण नेस्लेचे सोवळे आम्ही नेसले तर आम्हाला काय देणार? नेस्ले!
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 08/19/2015 - 10:09 नवीन
नेसले तर आम्हाला काय देणार? नेस्ले! ?? Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 08/19/2015 - 13:57 नवीन
Image removed. >>> मग मारलं फाट्यावर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
व
विहंग Wed, 08/19/2015 - 10:12 नवीन
उपासाची मॅगी.
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Wed, 08/19/2015 - 10:32 नवीन
बॉलीवूड स्टाईल . सगळे लोक हिरोला (म्यागी) मारत असतात, शिव्या देत असतात ( आठवा साऊथचे चित्रपट इसे मारो. इसे मारो) पण नंतर लोकांना समजते की ते चूक होते पण सगळे हिरोला डोक्यावर वगैरे घेतात.
  • Log in or register to post comments
र
राही Wed, 08/19/2015 - 13:16 नवीन
नेस्ले कशी जाहिरात करेल ते सांगता येत नाही, पण मॅगीची लोकप्रियता आणि उपयुक्तता ही तिच्या 'फास्ट' आणि 'फुड' असण्यामुळे आहे. गिर्यारोहक, ट्रेकर्स, भटके यांना मॅगी म्हणजे वरदान आहे. उंच प्रदेशातील हॉटेल्समध्ये कित्येकदा मॅगीशिवाय काहीच खाण्याजोगे आणि झटपट बनवण्याजोगे नसते. मॅगी साठवून ठेवायला सोपी. पोहे-रव्यासारख्या त्यात अळ्या पडत नाहीत. फ्रिजमध्ये ठेवावी लागत नाही. लहान धडपडी मुले स्वतः प्रयोग करू शकतात. बॅचलर रूममेट्सना मॅगीचा खूपच आधार असतो. भुकेला मॅगी आणि निजेला स्लीपिंग बॅग अशी नवी म्हण बनू शकते. मातांना तर मॅगीने खूप मोठी सोय मिळवून दिली आहे. थकून भागून घरी आल्यावर दोन मिनिटात मॅगी तयार होउ शकते, स्वस्त आणि मस्त. आपल्या पद्धतीच्या घरगुती न्याहार्‍यांसाठी वेळ आणि खटपट खूप लागते. खूप भांडी पडतात. गॅस, वीज, जळण जास्त लागते. यामुळे वर्किंग वुइमेनना मॅगी खूप सोयीची ठरते. शिवाय मुलांनाही आवडते. मार्केटिंग मुळे चव जिभेवर उतरवली गेलीय असेही नाही. नव्याने खाणार्‍यालाही वाफाळती मॅगी आवडते. वाजवी किंमत हे देखील मॅगी लोकप्रिय होण्याचे प्रमुख कारण आहे. नाही तर बाजारात भात, पुलाव, कढी, पिठले, शिरा, खीर, आमटी, अश्या अनेक पदार्थांची झटपट पाकिटे मिळतात. पण त्यांचा खप मॅगीपुढे अगदी किरकोळ आहे. शिश्याबिश्याचा मुद्दा भारतीय ग्राहकांच्या संदर्भात किरकोळच नव्हे तर हास्यास्पद आहे. दुधात युरिया मिसळण्याचा प्रकार जिथे राजरोस होतो, हळद, तिखट, मसाले, गूळ, साखर, तेल, भाजीपाला, फळे, मासे, पाणी कशाच्याच शुद्धतेची हमी नाही, तांदळात, गव्हात, साबूदाण्यात त्या त्या रंगरूपाचे दगड जिथे बेमालूम मिसळले जातात, तिथे मॅगीतल्या शिश्याची काय दखल घेतली असती लोकांनी?
  • Log in or register to post comments
ज
जडभरत Wed, 08/19/2015 - 13:25 नवीन
बापरे तुमचा प्रतिसाद वाचूनच आता मॅगीचं पुनरागमन किती धडाकेबाज होणार आहे, याची कल्पना येते. मला तर वाटतं पहिल्या आठवड्यातच या २-३ महिन्याचं नुकसान भरून काढणार कंपनी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
ब
बाबा योगिराज Wed, 08/19/2015 - 15:05 नवीन
भुकेला मॅगी आणि निजेला स्लीपिंग बॅग अशी नवी म्हण बनू शकते. हा हा हा. येक लम्बर......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
अ
अभिजितमोहोळकर Fri, 08/21/2015 - 07:27 नवीन
मस्त लिहीलंय तुम्ही राही ताई.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
क
कपिलमुनी Wed, 08/19/2015 - 13:38 नवीन
१. अमेरीका आणि इतर प्रगत देशात मॅ गीला परवानगी आहे. तिथल्या लॅबमध्ये कडक टेस्टींग चालू आहे अशी लॅबची दृष्ये , AIFA , USAFII, GTBTA अशा अगम्या नावाच्या संस्थांनी मॅगी कित्ती छान आहे हे सांगितले आहे अशा जाहीराती. आणि मग पॉश घरामधल्या चिकन्याचुपड्या आया आपली पोरा मॅगी खाउन सुद्धा हुश्शार आणि हेल्दी आहेत हे सांगणार . ट्रेकर, क्रिकेटपटू , कब्बड्डी पटू , हीरो ईई पब्लिक आम्ही मॅगी लहानपणाप्स्सोन खातोय पण आम्ही बघा कित्ती हुश्शार अशा जाहीराती करता येतील.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Wed, 08/19/2015 - 13:48 नवीन
मस्त हो मुनिवर.. परदेशी हात पाहिजेच डोक्यावर कारण बहुसंख्य ग्राहक भारतीय सरकारी संस्था व अधिकार्‍यांवर विश्वास नाही असं म्हणतात. अशी अ‍ॅड इथे 'मॅगी तर आधीपासूनच हेल्दी आहे आणि आता हे जगानेही मान्य केलंय' हे सिंगल लाइन नॅरेटीव घेण्याची शक्यता आहे. कारण 'मॅगी इज सेफ' असं सरळ सरळ नाही म्हणून शकत म्हणून त्याच्याऐवजी असं. जाहिरात जगतात एकेका शब्दाला लाखो रुपयांचं मोल असतं. 'आधीपासून' आणि 'आता' या दोन शब्दात फार मोठा परिणाम करण्याची ताकत आहे. त्याच बरोबर 'आधीपासून' हा शब्द वापरला तर 'सरकारने उगाच खोटा आळ घेतला' असाही अर्थ निघू शकतो म्हणून हा शब्द टाळतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
स
समीरसूर Wed, 08/19/2015 - 13:44 नवीन
जाहिरात: मेगीची एखादी ४०-५० च्या वयोगटातली ज्येष्ठ अधिकारी टीव्हीच्या पडद्यावर येते: "मैं शारदा कपूर. मेगी की चीफ स्ट्रेटेजी ऑफिसर. और एक मां जो अपने परिवार का हमेशा खयाल रखती हैं. आपको तो सब पता हैं. वो कहते है ना, जो सही होता हैं, उसके रास्तोंपर ज्यादा काटे होते हैं. लेकिन जीत हमेशा उसी की होती हैं. मेगी नुडल्स एक कठिन परिक्षा से गुजरा और सही साबित हुआ. आपका फ़ेवरेट मेगी अब बस दो मिनट की दुरी पर! आपकी नजदिकी दूकान में फिर से उपलब्ध हैं. आपकी और आपके परिवार की भूख हेल्दी तरीके से मिटाने के लिये. मेगी - खुशियोंभरी सेहतमंद जिंदगी!" ही जाहिरात सुरु असतांना त्या महिला अधिकाऱ्याचे नाव आणि मेगीमधला हुद्दा लिहून येईल. नंतर मेगी पाकिट फोडतांनाची, शिजवतांनाची मोहक दृश्ये झळकतील. आणि नंतर अख्खे कुटुंब (हसणारे, एकदम फिट) आनंदाने मेगी खातील. जाहिरात संपेल. अशीच जाहिरात इंग्रजी आणि प्रादेशिक भाषांमध्ये झळकेल. यंग जनरेशन साठी खाली दिलेली थीम: ओन्ली स्ट्रोंग फोक्स बाऊन्स बेक - मेगी इस बेक...विथ द सेम फन...एंड द सेम ट्रस्ट. ग्रेब अ मेगी, हेव फन माझा आपला बारीकसा प्रयत्न! गोड मानून घ्यावा. :-)
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Wed, 08/19/2015 - 13:52 नवीन
हे छानच आहे. धन्यवाद! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर
प
पद्मावति Wed, 08/19/2015 - 14:22 नवीन
पूर्ण जाहिरात अगदी डोळ्यासमोर आली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर
म
मधुरा देशपांडे Wed, 08/19/2015 - 14:18 नवीन
रोचक धागा आणि प्रतिसाद. नेस्ले कंपनीचे माहेरघर असलेल्या वेवे या स्वित्झर्लंडमधील गावाला नुकतीच भेट दिली. बरे त्याची मिपावर झैरात करुन ती जागा अजुन किमान दहा मिपाकरांना आवडली. स्वित्झर्लंडच्या पर्यटनखात्याची बरीच जाहीरात करुन झाली आहे त्यातही नेस्लेच्या गावाची. याची जाणीव ठेवुन नेस्ले मला काही देतील काय? जिनेव्हा लेकच्या नितळ निळ्या स्वच्छ पाण्याच्या सान्निध्यात, एकीकडे सुंदर आल्प्सने नटलेल्या सुंदर जागेत जन्म झालेल्या ठिकाणच्या एखाद्या उत्पादनात काही खोट असुच कशी शकते? हे कदापि शक्य नाही. स्वित्झर्लंडमधील चीज फॅक्टरी जर कुणी बघितल्या असतील तर तिथे स्वच्छता आणि गुणवत्तेसाठी घेतली जाणारी काळजी देखील पाहिली असेलच. आता याचे उत्पादन जगात कुठेही होत असेल, तरीही सगळे नियम स्वित्झर्लंडमधील संस्थांकडुन कसोशीने पाळले जातात आणि त्यामुळेच भारतात मॅगीवर घातलेली बंदी हा निव्वळ राजकारण्यांचा डाव होता. सगळ्या चाचण्या पुनश्च यशस्वीरीत्या पार पडल्या आहेत आणि परिपुर्ण मॅगी लवकरच आपल्या भेटीला येते आहे. आता मला मॅगीबद्दल विशेष प्रेम नसले तरीही जर त्यांनी मला या वेवेत एक घर वगैरे देतो असे काही सांगितले, तर मी आनंदाने मॅगी हेच कसे उत्तम खाद्य आहे वगैरे अशी जाहिरात करेन. ;)
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 08/19/2015 - 21:08 नवीन
जाहिरातीतील गृहिणीची जागा कोणाला द्यायची ते नक्की झाले... लवकरच मानधनासंबंधी बोलणी करण्यासाठी बोलावणे येईल ! Image removed. ;) :) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मधुरा देशपांडे
म
मधुरा देशपांडे गुरुवार, 08/20/2015 - 10:27 नवीन
हाहाहा. :) मानधन ठरलंय हो आधीच. वेवेत फक्त एक घर. ;) तिथेच मॅगी बनवुन खाताना चित्रीकरण. :)))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
प
पगला गजोधर Wed, 08/19/2015 - 14:30 नवीन
(कृपया इथे कुजबुजणारी स्मायली कल्पावी ) लाख मोलाचा सल्ला तुम्हाला फुकट देतोय … काहीच महागड्या कॅम्पिंगची गरज नाही नेस्ले ला …। सरळ सरळ "मॅगी" नूडल्सचं री-ब्रांडीन्ग "नमो" नूडल्स अस करा, आणि पहा विक्री कशी गगनभेदी होतीय ते.
  • Log in or register to post comments
म
मास्टरमाईन्ड Wed, 08/19/2015 - 15:26 नवीन
+१११११ मस्तच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 08/19/2015 - 21:14 नवीन
वरवर हे ठीक वाटले तरी याबाबतीत एक फार मोठा धोका आहे... आजकाल नमो हा शब्द नुसता ऐकला तरी काही लोकांचे पित्त खवळते आणि त्यांत मेडियाधुरीण व बुध्दिवादींचा बराच भरणा आहे ! त्यामुळे "मॅगीमध्ये दाखविले त्यापेक्षा जास्त शिसे होते आणि भांडवलवादी सरकार आता ते प्रकरण दाबून टाकून कॉर्पोरेट लोकांना मदत करत आहे" असा गदारोळ होण्याची जोरदार शक्यता आहे. ;) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर गुरुवार, 08/20/2015 - 11:02 नवीन
ती सगळी दोन मिनिटात पाण्यात गेली, मी तर स्लोगन वैगरे तयार करून ठेवले होते ! हर घर नमो नमो (नूडल्स) हर जुबान नम नम (रुचकर खातानाचा होणारा आवाज) नये नमो नूडल्स खाव, खुदका अच्छा दिन पाओ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 08/19/2015 - 15:34 नवीन
कधी येणार त्याची वाट पहातोय. एक अडसा बीत गया मॅगी खाके. :(
  • Log in or register to post comments
म
मी-सौरभ Wed, 08/19/2015 - 15:37 नवीन
काहीही जाहीरात न करता केवळ न्यूज चॅनेल्स वरुन पेड न्युज वापरून मॅगी परत आल्याचा गवगवा करावा. एक्दा धंदा सुरु झाला की जुन्याच अ‍ॅड परत दाखवायच्या... हा का ना का
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Wed, 08/19/2015 - 15:55 नवीन
ब्रँडच्या प्रतिमेचा प्रश्न आहे. पेडन्यूज म्हणजे मागल्या दाराने चोरीछुपे प्रवेश असं मानल्या जातं. व त्याला सर्वत्र पोचण्याला मर्यादाही आहेत. त्याचबरोबर पेडन्यूज वापरूनच लोकांच्या प्रतिक्रिया दाखवता येतील मला पेडन्यूज प्लान करायची असेल तर मी देशात असंख्य (अर्थातच फेक:खोटे) फॅन क्लब तयार करेल आणि त्यांनी मॅगीच्या परत येण्याचे कसे जल्लोषात स्वागत केले याच्या बातम्या पसरवेल. अगदी अ‍ॅपलच्या धरतीवर लोक (परत विक्रीस येणार्‍या) मॅगीच्या पहिल्या पाकिटासाठी रांगा लावून उभे आहेत असं दाखवेल मग तिथे मोठे मोठे मॅगीचे ट्रक येतील अनलोड व्हायला. ते ट्रक बघितल्यावर लोक जोशपूर्ण आरडाओरडा करतील. ह्यातून प्रत्येक शहरात आपसूक बातमी होइल व इलेक्ट्रॉनिक तर्फे ही पसरेल. हे ट्रक आपलेच, लोकही आपलीच, न्यूजही आपल्याच. त्यात अनेक खरे फॅनही असतील जे घरी जाऊन बंदीनंतर खात असलेलं पहिलं पाकिट बनवून प्लेटसह सेल्फी काढून फोटो शेअर करतील. माझ्या मते जसं अभ्या... नी म्हटलंय तेच मॅगीचं धोरण असलं पाहिजे. लोकांनी उस्फूर्तपणे मॅगीला स्विकारलंय असंच जनतेत पसरलं पाहिजे. तरी या अँगलसोबतच आपली मलिन झालेली प्रतिमा नीट करण्यासाठी ब्रँडने स्वतःहून काय विशेष केलं हेही लोकांसमोर यायला हवं अन्यथा 'काच चिकटवली पण तडा कायम' हा भाव उत्पन्न होइल. केवळ उपभोक्त्यांनी उत्पादन वाचवलं असं होणं योग्य नाही. तुर्तास मॅगीसाठी तात्काळ एक चांगलं पीआर कॅम्पेन (जनसंपर्क मोहिम) राबवणं गरजेचं आहे. ते कसं हे पुढ्च्या प्रतिसादांमधे लिहिन. (बोर्ड-रुम मीटींग चालू असल्याचा फील येतोय.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ
श
श्रीरंग Wed, 08/19/2015 - 16:44 नवीन
पुनरागमन जोरदार होणार यात शंकाच नाही. मॅगीइतकी लोकप्रीयता क्वचितच एखाद्या ब्रँडला भारतात मिळाली असेल. मी स्वत: ८ वर्षं एका FMCG कंपनीत (ज्यांचे एक उत्पादन नूडल्सदेखील आहे) काम केले असल्यामुळे हे जवळून पाहिले आहे. ७०-७५% च्या मध्ये मार्केट शेअर असलेल्या मॅगीचे बाजारातून उच्चाटन होऊनही इतर कोणताच ब्रँड ती पोकळी भरून काढू शकला नाहिये. वास्तवीक, ITC, HUL, इत्यादी कंपन्यांसाठी ही सुवर्णसंधी होती. असे असूनही कोणत्याच ब्रँडची विक्री या काळात ८-१०% पेक्षा जास्त वाढू शकली नाही. थोडक्यात, मॅगी नसल्यामुळे हिरमुसलेल्या ग्राहकांनी नूडल्स या उत्पादनाकडेच पाठ फिरवलेली दिसत आहे. सोशल मीडीयावरील प्रतिक्रीया वाचल्या तर हेच स्पष्ट दिसतं. थोडक्यात, मॅगी पुनरागमनानंतर अजूनच धडाकेबाज पद्ध्तीने बाजारपेठ काबीज करणार यात शंकाच नाही.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे गुरुवार, 08/20/2015 - 10:31 नवीन
श्रीरंगजी, ही पोकळी भरून काढायला इतर असमर्थ ठरले असं म्हणू शकत नाही. एफएमसीजी मधे एवढ्या वेगाने मार्केट काबीज करणे कितीही मोठी कंपनी असली तरी तिला शक्य होणार नाही. एवढ्या अल्पकाळात ८ ते १० टक्के हे माझ्यामते तरी सकारात्मक आहे. जर 'मॅगी नाहीच' अशी परिस्थिती कायमस्वरूपी झाली तरच लोक हळूहळू इतर नूडल्स कडे वळतीलच. इतरांना हे 'मॅगीविरहीत' मार्केट काबीज करायला किमान तीन ते चार वर्षे लागतील. (उत्पादनवाढीसाठी कारखान्यांची निर्मीती, वितरण व्यवस्था, डीलर-नेटवर्क, नोकर-भरती, वित्तव्यवस्था, सर्वेक्षण, इत्यादी बाबी ध्यानात घ्याव्या). इथे तर फक्त काही महिन्यांचा प्रश्न होता. तसेच भारतात मॅगी हे नूडल्सचं समानार्थी समजलं जातं. त्यामुळे मॅगी नाही म्हणजे नूडल्सवरच बंदी आली असंही जनतेला वाटलेलं असू शकतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग
क
कोमल Wed, 08/19/2015 - 17:09 नवीन
चांगले प्रतिसाद.. मला तर अजून काही सुचलं नाहिये. एक अ‍ॅडव्हर्टाइजींगवाला आहे माहितीतला, त्याच्याकडुन आयडिया ढापायचा प्रयत्न करते ;) मॅगी पुन्हा आरामात मार्केट काबिज करेल यांत शंकाच नाही.. मॅगीचं नाव काढलं आणि तोंपासु झालं रावं. कधी येणार गडे परत.. Image removed.
  • Log in or register to post comments
इ
इरसाल गुरुवार, 08/20/2015 - 10:48 नवीन
तुम्ही शुध्धलेकनाच्या क्लासला कोणाकडे जाता ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोमल
म
माम्लेदारचा पन्खा गुरुवार, 08/20/2015 - 10:54 नवीन
तो दुसरा लेख ट्यार्पीसाठी आहे फक्त ! काय राव तुमी !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
क
कोमल गुरुवार, 08/20/2015 - 11:11 नवीन
जोशी वाडा, सदशिव पेठ, पुणे-३० का ओ? काही शंका असतील तर स्वतंत्र का कु मध्ये करुया. उगी इतक्या चांगल्या धाग्याचा काश्मिर करायचं नाही मला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
अ
अजया Wed, 08/19/2015 - 17:14 नवीन
मस्त धागा आणि अभ्या,समीरसूर दोघांच्या आयड्याच्या कल्पनाही!
  • Log in or register to post comments
न
नमकिन Wed, 08/19/2015 - 17:56 नवीन
जर अमेरिकेच्या मानकात मॅगी (बांग्लादेश) बसते तर मॅगी खुशाल निर्यात करावी (आहे तशी जसे अमेरिकी /पाश्चात्य देश औषधि करतात आपल्याला) व भारताला बहुमूल्य परकीय चलन प्राप्त करुन द्यावे. जाहिरातही अशीच असावी- "आम्ही खातो मॅगीशी, तुम्ही रहा/बसा उपाशी" व्यक्तिश: मॅगीवाचून काहीच न अडणारा अडाणी.
  • Log in or register to post comments
स
सत्याचे प्रयोग Wed, 08/19/2015 - 18:15 नवीन
सनीला करतील ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर बहुतेक. मग सांगितले जाईल मॅगी खाणे शरीरास कसे चांगले आहे. माझ्या आणि बाॅबीच्या पण नास्त्यात रोज मॅगीच असते आणि हो पाकिस्तानातील कूपनलिका उघडण्यात मॅगीचीच शक्ती होती.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Wed, 08/19/2015 - 18:30 नवीन
ओ हो देओल काय? आधी काय कनेक्शनच लागलं नाय बोवा, सनी काय बॉबी काय कूपनलिका काय. मग ड्वोक्यात ढाई किलोचा हाथ पडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सत्याचे प्रयोग
अ
अस्वस्थामा गुरुवार, 08/20/2015 - 11:26 नवीन
सनी काय बॉबी काय कूपनलिका काय. मग ड्वोक्यात ढाई किलोचा हाथ पडला
ठ्ठो...!! तुमच्यामुळे कॉफी टेबलावर सांडली आहे राव... (खरंच.!!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
त
तुषार काळभोर Fri, 08/21/2015 - 06:21 नवीन
+१ आज काल सनी 'देओल' पार विस्मरणातून गेलाय. 'सनी' म्हटलं की............
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
प
प्यारे१ Fri, 08/21/2015 - 08:25 नवीन
ये दुनिया ये दुनिया पित्तल दी..... लेकिन मॅगी है असली सोना! जो इल्जामो की आग से निकलने के बाद और ज्यादा निखरा आया है मेरी तरह - सुश्री १००८ सनी लियोनी कहे- मॅगी लियोनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
म
माम्लेदारचा पन्खा Wed, 08/19/2015 - 18:20 नवीन
भारतीय न्यायव्यवस्थेचा आणि लागणार्‍या वेळाचा विचार करता.... "वी आर बॅक इन टू मिनटस् !!!!"
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Wed, 08/19/2015 - 18:26 नवीन
हा हा हा. धमाल... मस्तच! मा. पं., प्रतिस्पर्धी चाल 'येस. बीकॉज यु फ्लश द सिस्टीम विथ कॅश.'
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा
र
रातराणी Wed, 08/19/2015 - 19:19 नवीन
मस्त आहेत सर्वांच्या कल्पना. माझे दोन पैसे : (यात assumption आहे की मॅगी पुन्हा त्याच रुपात [packaging] मध्ये येणार नाही, नवीन पाकीट + फूड administration चा verified असा शिक्का असेल, हे नसेल तर थोडी refine करावी लागेल आयडीया) सुरुवात मॅगीच्या जुन्या जाहिरातीनेच करायची. मुले खेळून आली आहेत आणि मम्मी भूक लगी है ओरडत येतात. ममी बस दो मिनट म्हणते आणि tvवर मुंग्या (व्यत्यय) दाखवायच्या. १ -२ सेक नंतर चित्र परत येत तेव्हा "रुकावट के लिये खेद है" अस म्हणून पुन्हा जाहिरात सुरु ( आता काही बदल) जस की मुलगा/मुलगी ममीला म्हणतो "नया मॅगीही बनाना. It has passed all tests" ममी कौतुकाने नवीन मॅगीच पाकीट उघडून ते बनवून देते आणि मुल "हम्म नया मॅगी. ये healthy भी है और मजेदार भी" म्हणत खातात. त्यांना कौतुकाने बघत ममा पुन्हा योग्य कलरच पाकीट/शिक्का बघूनच मॅगी घ्या आणि "enjoy" म्हणते.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे गुरुवार, 08/20/2015 - 10:54 नवीन
रातराणीताई, प्रयत्न चांगला आहे. तुम्हाला क्रीयेटीव रायटींगमधे काम करायचंय तर हे ही करता येईल. (मागे तुमच्या धाग्यावर चांगला मोठा प्रतिसाद दिला होता, पण पोस्ट करतांना मिपा गंडलं आणि मग सगळंच बारगळलं, जमलं तर परत लिहिन.) थोडं तांत्रिक बाजूबद्दलः नवीन पॅकींग सादर करणे हे पुर्वीच्या पॅकिंग व उत्पादनात समस्या होती असे मान्य करण्यासारखे आहे. या प्रसंगात 'योग्य कलर, पाकिट/शिक्का' वालं वाक्य आहे ते साधारण आपल्या उत्पादनाचं चोरून निर्मिती करत असेल तर (ड्युप्लिकेट प्रॉडक्ट्स) आवश्यक ठरेल. 'नया मॅगी पास्ड ऑल टेस्ट' हेही गोंधळ निर्माण करणारं वाक्य आहे. म्हणजे जुनं मॅगी हानीकारक होतं असा त्याचा अर्थ निघतो व नवीन तरी सुरक्षित आहे की नाही असा संभ्रम होऊन विक्रीवर परिणाम होऊ शकतो. परत 'कॅम्पेन ब्रीफ'चा विचार करून बघा आणि आणखी एक नवीन कमर्शीयल लिहा. वाचकांना वाटत असेल की 'का इतका काथ्याकूट करताय एका एका शब्दावर, आम्हाला तर हे कधीच जाणवत नाही. जाहिरात जाहिरात असते, सगळे छान छान सांगत असतात उत्पादनाबद्दल.' तर असं नाहीये. ग्राहकाच्या मानसशास्त्रानुसार फार सूक्ष्म विचार करून शब्द, प्रतिमा वापराव्या लागतात. कारण हे होणारे परिणाम अंतर्मनामधे संग्रहीत होतात व ग्राहकाच्या वागणुकीवर प्रभाव टाकतात. सूक्ष्म प्रवाहांचे ग्राहक-मानसिकतेवर परिणामाचे अ‍ॅपल उत्पादने हे सर्वोत्तम उदाहरण आहे. अ‍ॅपल कीतीही प्रसिद्ध आणि लोकप्रिय उत्पादन असले तरी पर्यावरणविरोधी, मानवाधिकारविरोधी वा तत्सम कृती अ‍ॅपलकडून घडतेय असं लक्षात आलं तर विक्रीवर परिणाम होतो. मोठ्या कंपन्यांच्या एक, दोन टक्के घसरणीनेही मोठा फरक पडतो, त्यामुळे त्या या बाबतीत फार जागरूक असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी
र
रातराणी गुरुवार, 08/20/2015 - 18:12 नवीन
सगळे मुद्दे पटले, पण मग मलीन झालेली प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी मॅगीने नक्की काय केले हे स्पष्ट नाही होत आहे. प्रतिस्पर्धी याचा फायदा घेतील का? अजून काही सुचतं का वेगळ बघते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
समीरसूर गुरुवार, 08/20/2015 - 10:22 नवीन
आणखी एक आयडिया: "मेगी लम्हे" एक तरुण मुलगी मेगीची चाहती. खरी ग्राहक. "जब रिमझिम बारिश होती है...दिल भीग सा जाता है. जी चाहता है बिस्तर मी बैठ के आराम से भीगे दिल को सुखाऊं, उसे थोडा प्यार दू, उसे सहलाऊं...उसे चंद फुरसत के लम्हे दू.......बरसों से मेगी ने ये लम्हे खूबसूरत बनायें है...ये है मेरे खास मेगी लम्हे..." सुरुवातीला ती हे म्हणायला सुरुवात करते तेव्हा ती पडद्यावर दिसते आणि मग ती बोलत असतांना खिडकी, बाहेरचा पाऊस, खिडकीच्या काचांवर ओघळणारे थेंब दिसतात. ती गरमागरम वाफाळाणारी मेगी घेउन पलंगावर येऊन बसते. पाऊस बघत बघत खाते. पाऊस बघत बघत, खात खात बालपणीचा अल्बम बघते...आणि मग शेवटचे वाक्य निवेदक म्हणतो: मेगी लम्हे...आपके अपने, आपके अपनों के... मुलगी तरुण, एकदम फिट, सडपातळ, आकर्षक, सुंदर हसणारी असावयास हवी. अशा जाहिराती घेऊन तरुण मुलगा, लहान मुलं, एखाद्या आज्जी (आज्जी - नात रिलेशन), एखादे आजोबा (आजोबा - सून किंवा आजोबा - मुलगी - मुलीची मुलगी) (सो-कोल्ड खरे ग्राहक) अशा वेरिएशन्सची केम्पेंस करता येतील.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे गुरुवार, 08/20/2015 - 11:08 नवीन
समीरजी, आधीच्या कल्पनेपेक्षा ही उत्तम बरं का! 'बरसोंसे' हा शब्द फार महत्त्वाचा. इमोशनल टचही झकास. मागे पारले-जी ने असं कॅम्पेन केलं होतं पण ते जरा अतीच झालं होतं. पारले-जीची जुनी प्रतिमा नव्या जाहिरातींतून काही भलतीच मांडली गेली. त्या जाहिरातींनी पारले-जीला अप्पर सर्किटमधे उचलण्याचा प्रयत्न केला, पण प्रॉडकट लोअर-मिडलक्लास टार्गेटेड दर्जाचं असल्याने फायदा झाला नाही. तुमच्या कल्पनेत राहीताईंनी मांडलेला मुद्दा चांगला आला आहे. लोक वाट पाहत आहेत, वर्षानुवर्षे खात आहेत. अनेक आठवणी आहेत. हे सगळं छान मांडलंय. पार्श्वनिवेदकाच्या ओळी साधारण अशा असाव्यात, 'मॅगी लम्हे, हमेशा से आपके है, हमेशा रहेंगे'
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर
र
राही गुरुवार, 08/20/2015 - 10:25 नवीन
धाग्याची कल्पना आणि प्रतिसाद छानच आहेत. पण खरं तर मॅगीला जाहिरात करण्याची जरूरच नाही. लोक मॅगीची वाट पाहात आहेत. त्याऐवजी किराणादुकानदारांना जरा जास्तीचं कमिशन द्यावं मॅगी शेल्फवर आकर्षरीत्या लावण्यासाठी. जून महिन्यात जेव्हा मॅगी शेल्फवरून अदृश्य झाली तेव्हा चुकार उरल्यासुरल्या पाकिटांचा शोध घेताना आसपासच्या तीनचार दुकानदारांकडून कळले की मॅगीच्या वेष्टनावर घटकांची खरी माहिती नसते असा त्यांचा आक्षेप आहे. भारतात विकल्या जाणार्‍या बहुतेक परदेशी खाद्यप्रकारांत प्राणिज मेद असतो आणि तो ठळक लाल वर्तुळ न छापल्याने आपल्या लक्षात येत नाही असे त्यांचे म्हणणे होते. हे खरे नसेल, प्रातिनिधिक तर नाहीच नाही, पण एक साधारण कल वाटला तो लिहिला.
  • Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ Mon, 08/24/2015 - 17:12 नवीन
भारतात विकल्या जाणार्‍या बहुतेक परदेशी खाद्यप्रकारांत प्राणिज मेद असतो आणि तो ठळक लाल वर्तुळ न छापल्याने आपल्या लक्षात येत नाही असे त्यांचे म्हणणे होते.
आपल्या रोजच्या "शाकाहारी" खाण्यातल्या "भयंकर हेल्दी" व "पॉप्युलर" प्राणीज मेदाचे नांव काय, ते सांगता येईल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
स
स्वप्नांची राणी Mon, 08/24/2015 - 18:47 नवीन
तूप ...????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
व
वेल्लाभट गुरुवार, 08/20/2015 - 11:52 नवीन
उत्तम धागा. भारतात जाहिरातींच्या कंटेंट वर बरेच निर्बंध आहेत असं जाणून आहे. डांगे साहेब जास्त सांगू शकतील. उदाहरणार्थ, कोक च्या कॅन वर चढून लहान मुलगा वेंडिंग मशीन मधून पेप्सी काढतो, ही जाहिरात कंपनी आपल्याकडे दाखवू शकणार नाही. असो. बाकी विचार करायला रंजक धागा.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा