अनाहत
साकळली पावसाळी रात्र
गाते गहिऱ्या व्रणाचे गूढ
ऐकूनी तो अनाहत नाद
गायी गोठ्यातल्या दिग्मूढ़
पाचोळा नीजलेला शांत
येई दचकून त्याला जाग
शीरांच्या त्या शिळ्या स्वप्नांस
मंत्रोच्चारात लावी आग
घुबडांचे थांबले घुत्कार
छपराला टांगले वाघूळ
माळावरच्या कुबट कोषात
निर्वाताची व्यथा गाभूळ
घाबरला वळचणीचा जीव
सैरावैरा पळे फडताळ
केविलवाणे दडे ते बीळ
काळोखाला चरे विक्राळ
पागोळ्यांच्या भिडे हृदयास
भिजलेला आर्त अंतर्नाद
कातर सूरात देती हाक
देणारा ना कुणी प्रतिसाद
गहिवरलेल्या घराची भिंत
घेते पिऊन ते नि:श्वास
डोळे थिजले कुणाची आस
पावा वाजेल हा विश्वास
💬 प्रतिसाद
(19)
अ
अत्रुप्त आत्मा
Fri, 08/21/2015 - 04:49
नवीन
आहाहा...! अब हम क्या बोले स्वामिज्जि?
बस ऐसे ही छोड देते है.. बगैर शब्दों के .. खाली कागज भी कभी कभी बोहोत कुछ बोल जाए..वैसे।
- Log in or register to post comments
द
दमामि
Fri, 08/21/2015 - 04:52
नवीन
क्या बात!!!!!
- Log in or register to post comments
स
सनईचौघडा
Fri, 08/21/2015 - 05:01
नवीन
आवडली. मस्तच
- Log in or register to post comments
च
चाणक्य
Fri, 08/21/2015 - 06:22
नवीन
अस्वस्थ करून गेली रचना.
- Log in or register to post comments
म
मारवा
Fri, 08/21/2015 - 07:45
नवीन
कविता थोडी फॅब्रीकेटेड वाटली.
- Log in or register to post comments
प
पैसा
Fri, 08/21/2015 - 08:03
नवीन
किती छान लिहिलंय!
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Fri, 08/21/2015 - 09:03
नवीन
काही सापडेल असं वाटता वाटता हातातून निसटणारं काही....
नीटसा अर्थ लागला नाही.
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Fri, 08/21/2015 - 09:03
नवीन
काही सापडेल असं वाटता वाटता हातातून निसटणारं काही....
नीटसा अर्थ लागला नाही.
- Log in or register to post comments
द
द-बाहुबली
Fri, 08/21/2015 - 14:54
नवीन
वेरी कूल सँकी... और आने दो.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Fri, 08/21/2015 - 15:18
नवीन
केवढी हुकूमत आहे स्वामीजी तुमची शब्दांवर... एक नंबर. तुमच्या लिखाणाचे हे वैशिष्ट्य जाम आवडते बुवा आपल्याला.
अजुन टाका...
- Log in or register to post comments
म
मांत्रिक
Sat, 08/22/2015 - 06:21
नवीन
नमस्कार संकेजी, हे एखाद्या नाग / अजगर याचे वर्णन आहे का? शेवटी तो कुठल्यातरी पक्षाचा किंवा प्राण्याचा घास घेतो. बरोबर का?
- Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज
Sun, 08/23/2015 - 07:17
नवीन
+१...:-)
- Log in or register to post comments
स
स्वामी संकेतानंद
Mon, 08/24/2015 - 07:51
नवीन
नाही हो. ही एक चिरवेदना आहे. आता कल्पना करा की, कान्हा मथुरेला गेलाय. राधा शोकविव्हळ आहे. तिच्या वेदनेची तीव्रता कशी वर्णन करावी? ती चराचरात व्यापली आहे. ती वेदना तिथल्या सजीव निर्जीव सगळ्यांवर परिणाम करुन गेली आहे. प्रतिक्षेत थिजले आहेत पण अखेरीस आशावाद आहे. पण चिरवेदनेपासून मुक्ती हीसुद्धा शाश्वत असावी लागते, नाही का? आता परत कविता वाचा, कदाचित नव्याने प्रतिमा कळतील. प्रत्येक प्रतिमेमागे निश्चित अशी एक कल्पना आहे ती कदाचित कळेल. तुम्हाला जो अजगर जाणवला तो पोस्ट-कृष्ण ब्रजभुमीत व्यापून राहिलेल्या वेदनेचा आहे म्हणा हवे तर... :)
- Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच
Sun, 08/23/2015 - 06:33
नवीन
छान
सुरेख......
- Log in or register to post comments
अ
अजया
Sun, 08/23/2015 - 07:20
नवीन
अप्रतिम.
- Log in or register to post comments
स
स्वामी संकेतानंद
Mon, 08/24/2015 - 07:54
नवीन
सर्वांचे मन:पूर्वक आभार! _/\_
- Log in or register to post comments
त
तुडतुडी
Mon, 08/24/2015 - 13:31
नवीन
मला वाटलं कुणी तांत्रिक , मांत्रिक कोणाचा तरी बळी देतंय
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 08/24/2015 - 13:38
नवीन
आवडली कविता.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
स
सूड
Mon, 08/24/2015 - 13:50
नवीन
मस्त!!
- Log in or register to post comments