Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बेफाम बोलण्यात पह्यला माझा नंबर

म — माहितगार, Fri, 08/21/2015 - 08:25
बेफाम बोलण्यात, माझा नंबर पह्यला ! नकोत संदर्भ, नको पुरावे, तर्कविवेक नकोच नको, माझा नंबर पह्यला ! बेछूट लिहिण्यात, माझा नंबर पह्यला ! शंका काढलीस तर आरोप करेन जखमी असशील तर दोष तुझाच धरेन माझा नंबर पह्यला ! बे रोकटोक बोलण्यात माझा नंबर पह्यला माझा विरोध म्हणजे तुझेच चूक, वादविवाद हवा कशाला एक माझे अन शांती मिळव माझा नंबर पह्यला ! सेंसॉर करण्यात गचांडी धरण्यात माझा नंबर पह्यला बातमीत येईन, सत्ता घेईन सगळे म्हणतात बघ मलाच बरोबर माझा नंबर पह्यला ! बेफाम बोलण्यात, माझा नंबर पह्यला !

प्रतिक्रिया द्या
9351 वाचन

💬 प्रतिसाद (14)
प
प्यारे१ Fri, 08/21/2015 - 08:45 नवीन
आता याचं काय करायचंय? सगळे शब्द आणि अर्थ तुम्हाला माहिती असणार बहुतेक! (ह.घ्या) बाकी नमो नमो सुद्धा म्हणावंसं वाटतंय. आणि मी मी सुद्धा. एका रागाचं नाव आठवलं तरी उगाच का मारवून घ्या म्हणून गप्प बसतो.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 08/21/2015 - 09:16 नवीन
शेवटची ओळ ओळखा पाहू मी कोण ? लिहिण्याचा विचार होता, पण पहिल नाव माहितगारचच येईल म्हणून मोह टाळला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
न
नाव आडनाव Fri, 08/21/2015 - 09:17 नवीन
मस्तं :)
  • Log in or register to post comments
स
स्वामी संकेतानंद Fri, 08/21/2015 - 09:26 नवीन
हीहीही (दिल्लीकर) स्वामी
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 08/21/2015 - 18:25 नवीन
तुम्ही दिल्लीकर लोक संकटांना बोलावून घेता! "आ बैल मुझे मार!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद
प
पगला गजोधर Fri, 08/21/2015 - 09:59 नवीन
सत्यवचन !
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 08/21/2015 - 10:03 नवीन
माहितगारचा नंबर पह्यला असल्याचे स्विकारल्या बद्दल आभारी आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
ज
जव्हेरगंज Fri, 08/21/2015 - 16:21 नवीन
कोणाड्यात उभी हिंदमाता...
  • Log in or register to post comments
ज
जडभरत Fri, 08/21/2015 - 18:39 नवीन
ते व्हिंदमाता असतं!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज
श
श्रीरंग_जोशी Fri, 08/21/2015 - 16:47 नवीन
काव्यमय भाष्य आवडले बादवे 'बे रोकटोक' हे बेरोखठोख असे असायला हवे होते का?
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 08/21/2015 - 18:23 नवीन
तो हिंदी शब्द वापरलाय त्यांनी. अर्थ "विनाअडथळा"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
श
श्रीरंग_जोशी Fri, 08/21/2015 - 18:31 नवीन
रोखठोख ने अर्थ पूर्ण बदलून जाईल. रोकटोक हा हिंदी शब्द प्रथमच वाचला. 'रोका उसे टोका उसे' असा संवाद बहुधा मेरे यार की शादी हैं या चित्रपटात होता :-).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 08/21/2015 - 20:17 नवीन
काय ल्हिलय..आयला! ;)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 08/22/2015 - 05:55 नवीन
झकास्स्स्स... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Yasmine - Khodny W Rooh / ياسمين - خدني وروح
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा