सुखी जग
याहूनी सुखी जग ते कोणते?
भेटल्याचा आनंद नाही
निरोपाचा खेद नाही....
आभासी जगातला फिल कसा
गुड गुड व्हेरी गुड!
आठवणींचे सेल्फी कुठले?
हसल्याचा आवाज नाही
मुसमुसल्याचा गंध नाही......
आभासी जगातला टच कसा
साॕफ्ट साॕफ्ट मायक्रोसाॕफ्ट!
कोण जागतो कोणासाठी?
फिकट डोळे दिसत नाहीत
उरली रात्र सरत नाही....
आभासी जगातला गुंता कसा
क्रेझी क्रेझी काचणारा!
💬 प्रतिसाद
(5)
ए
एस
Fri, 08/21/2015 - 20:57
नवीन
बोचणारे भाष्य.
- Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच
Sat, 08/22/2015 - 09:41
नवीन
मार्मिक
- Log in or register to post comments
प
पद्मावति
Sat, 08/22/2015 - 10:25
नवीन
खूप मस्तं लिहिलय.
- Log in or register to post comments
प
पैसा
Sat, 08/22/2015 - 15:53
नवीन
कविता आवडली. हल्ली अशा कोमट भावनाच बर्या वाटतात.
- Log in or register to post comments
म
मांत्रिक
Sat, 08/22/2015 - 16:18
नवीन
हं, एकदम मार्मिक भाष्य.
- Log in or register to post comments