आठवन
सुरु होऊदे अबोल गोष्टी
पुन्हा येऊदे जुना शहारा
हळू चोरट्या नजरे मागुन
पुन्हा करावा कुणी पहारा
पुन्हा येऊदे रात्र बिलोरी
स्वप्नाला जी साद घालते
पुन्हा वाटूदे शणास मजला
कुणी पाहूनी मला भाळते
पुन्हा हाथ या हाथि यावा
पुन्हा साथीने रात्र सरावी
कुणी मिटोनि हळूच डोळे
मुक्या मिठिची आस धरावि
💬 प्रतिसाद
(9)
अ
अभ्या..
Sat, 08/22/2015 - 14:56
नवीन
मोठ्या नदीला नद म्हणातेत तसे मोठया हाथीला हाथ काय?
+८ 1
+८ 1
+८ 1
- Log in or register to post comments
स
संजय पाटिल
Sat, 08/22/2015 - 15:06
नवीन
"पुन्हा साथीने रात्र सरावी."... तल्या साथी चा यमक जुळवण्यासठी असावे बहुतेक.
- Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा
Sat, 08/22/2015 - 15:37
नवीन
चल चल चल मेरे हाथी..
- Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज
Sun, 08/23/2015 - 07:19
नवीन
+८ 1 ही ही ही..
- Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी
Sat, 08/22/2015 - 15:37
नवीन
वा ! आवडली . सा सं मं ना सांगून फक्त शुद्धलेखनातील चुका दुरुस्त करून घ्या .
- Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच
Sat, 08/22/2015 - 15:40
नवीन
कविता आवडली.
फ़क्त थोडसं शुध्दलेखनाकडे लक्ष दया..
अजुन मस्त वाटेल.
- Log in or register to post comments
म
मांत्रिक
Sat, 08/22/2015 - 16:23
नवीन
कविता आवडली. लय तर खूप छान पकडलीय. पण शुद्धलेखनाकडे कृपया कृपया कृपया लक्ष द्या.
- Log in or register to post comments
म
मांत्रिक
Sat, 08/22/2015 - 16:24
नवीन
शणास म्हणजे काय?
- Log in or register to post comments
स
सुमित_सौन्देकर
Sat, 08/22/2015 - 16:42
नवीन
शिकाऊ आहे अजुन...खुप चुका होतायत लिहिताना
- Log in or register to post comments