Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नियती

व — विशाल कुलकर्णी, Wed, 08/26/2015 - 06:52
आयुष्य मागते काहीं रखरखाट तप्त कुठेसा त्या रस्त्यावरती ओला तो थेंब शुष्क रुधिराचा भिरभिरति नकळत डोळे शोधी आधार छताचा ते खांब चारच होते ना मागमुस भिंतीचा सुकलेल्या ओष्ठांना हलके स्पर्श तप्त अश्रुंचा थांबले गालांवर मोती ओघळला श्वास कोरडासा त्या श्वासांमधले अंतर मोजण्यापल्याड असते मी फ़क्त मोजतो श्वास अन्तरही फसवे असते जगणे बुभुक्षिताचे भूक संपता संपत नाही ते स्वप्न शोषिती माझे शोधती सत्य आभासी ते दिवे दूर जाताना सावली सोडते साथ बांधू पाहतो नशिबा पाठीवर बांधुनी हात ते दिवस कोडगे होते रात्री लाजिरवाण्या स्वप्नांचे इमले इतुके विश्वास बाटगा होता ती हलके हलके हसते ते नकळत मीही जगतो ते जगणे सुगंधी होते मी जगण्यावरती हसतो विशाल

प्रतिक्रिया द्या
3234 वाचन

💬 प्रतिसाद (9)
ज
जव्हेरगंज Wed, 08/26/2015 - 06:55 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 08/26/2015 - 18:27 नवीन
छान! मात्र या वेळी वृत्तबद्ध नाही वाटली. "मुक्त कविता" लिहिलंस, पण विशालकडून अशा कवितेची सवय नाही!
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी गुरुवार, 08/27/2015 - 07:12 नवीन
म्हणलं जरा मुक्तछंदसुद्धा हाताळून पाहावा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Fri, 08/28/2015 - 07:17 नवीन
यातली कल्पना खूप सुरेख आहे, पण काही ओळी पूर्ण वृत्तात आहेत आणि कुठे एखाद दुसरी मात्रा कमी जास्त वाटतेय. पूर्ण मुक्तछंदात लिहिलंस तरी ते खटकत नाही, छानच वाटेल. पण यात जरा गोंधळल्यासारखं वाटलं. म्हणजे कवितेची सुरुवात वृत्तबद्ध आहे, आणि नंतर ती बदलत गेलीय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी
ए
एक एकटा एकटाच गुरुवार, 08/27/2015 - 03:21 नवीन
ती हलके हलके हसते ते नकळत मीही जगतो ते जगणे सुगंधी होते मी जगण्यावरती हसतो मस्त
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 08/27/2015 - 04:18 नवीन
सुंदर!
  • Log in or register to post comments
म
मांत्रिक गुरुवार, 08/27/2015 - 08:44 नवीन
वृत्तबद्ध नसली तरी शब्द भावना तितक्याच ताकदीने पोहोचवताहेत. दुःखाची गडद गहिरी छटा आवडली.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी गुरुवार, 08/27/2015 - 14:08 नवीन
धन्यवाद मंडळी ! धन्यवाद मांत्रिक _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक
म
मदनबाण Fri, 08/28/2015 - 07:12 नवीन
सुरेख... मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Aashiqui Mein Teri... ;) :- 36 China Town
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा