पाककृती
वाटाण्याचा चविष्ट पराठा
Primary tabs
जिन्नस
- २०० ग्रॅम वाटाण्याचे दाणे
- ४/५ हिरव्या मिरच्या
- कोथिंबीर
- आले-लसूण यांची पेस्ट
- जीरे, तेल, मीठ
- २५० ग्रॅम कणीक
मार्गदर्शन
- प्रथम वाटाण्याचे दाणे, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर मिक्सरमधून जाडसर काढून घ्याव्यात.
- एका पॅन मध्ये २ चमचे तेल घेवून जीरे, आले-लसूण पेस्ट टाकावे.
- नंतर वाटाण्याचे जाडसर मिश्रण त्यात टाकावे. एक वाफ आणून घ्यावी.
- कणकेत मीठ टाकून नेहेमीच्या पोळीसारखे भिजवावे.
- कणकेचे गोळे करून वरील मिश्रण त्यात भरून पराठ्यासारखे लाटावे.
- तेल टाकून तांबूस रंग येईपर्यंत परठा शेकावा.
- सॉस किंवा चिंचेच्या चटणीसोबत अथवा दहीसोबत खायला द्यावा.
टीपा
याच पद्धतीने थोडा बदल करून वाटाण्याच्या कचोऱ्याही करता येतात.
माहितीचा स्रोत
माझी आई
छायाचित्र टाका ओ. बाकी हा पराठा अतिशय आवडतो. आमच्याकडे जिर्या ऐवजी अगदी थोडीशी बडिशेप घालुन करतात. त्याचा वास थोडा वेगळा आणि छान येतो. :)
मिपा वर स्वागत . तुमची ही पण पाकृ आवडली. पराठ्यांचे किती ही प्रकार कळले तरी कमीच असतात. कॅप्टन म्हणतात तसं फोटो टाका जमेल तसे. जे पहिल्यांदा करतील त्यांना निदान संदर्भासाठी का होईना फोटो हवेत च.
छान पाकृ.
ओला वाटणा आहे हे गृहीत धरतेय.ओल्या वाटाण्याचे सर्वच प्रकार आवडतात.एक तरी फोटो टाकावा..
मटारचे पराठे आवडतात :)
पाकृचे फोटो ही द्या.
फोटू.............................................................. :-/
फोटो?
फोटो असायलाच हवा बरोबर ..
Kachorichi recipi sanga