Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तुझे मजवरी भाळणे ते अवेळी

व — विशाल कुलकर्णी, गुरुवार, 08/27/2015 - 07:20
या आधीच्या कवितेच्या वेळी पैसाताईने तक्रार केली की विशालकडून अशा कवितेची सवय नाही. ;) त्यामुळे ही भुजंगप्रयात वृत्तातली गझल :) तुझे लाघवी बोलणे ते अवेळी तुझे विभ्रमी हासणे ते अवेळी जसे पावसाचे अकाली बरसणे तुझे आर्जवी वागणे ते अवेळी लपे चंद्र मेघांमध्ये मत्सराने तुझे मुक्त तेजाळणे ते अवेळी सखे आप्त एकांत हा फक्त माझा तुझे मजवरी भाळणे ते अवेळी नको मोक्ष, स्वर्गात जागा नको ती तुझे स्पर्शही भासणे ते अवेळी मिटे आसही या क्षणी ऐहिकाची तुझे मंद घोटाळणे ते अवेळी लगावली : लगागा लगागा लगागा लगागा वृत्त : भुजंगप्रयात

प्रतिक्रिया द्या
10194 वाचन

💬 प्रतिसाद (36)
म
मांत्रिक गुरुवार, 08/27/2015 - 07:33 नवीन
छान आहे, गंमत म्हणजे मना सज्जना भक्तिपंथेची जावे या चालीवर पण बसतेय! मनाचे श्लोक पण भुजंगप्रयात मध्येच आहेत का? सखे आप्त एकांत हा फक्त माझा तुझे मजवरी भाळणे ते अवेळी इथे "त"ची पुनरावृत्ती मस्तच झालेली आहे. त्याला अनुप्रास म्हणतात नं?
  • Log in or register to post comments
ए
एस गुरुवार, 08/27/2015 - 08:28 नवीन
होय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक
व
विशाल कुलकर्णी गुरुवार, 08/27/2015 - 14:09 नवीन
तुझे मजवरी भाळणे ते अवेळी इथे "त"ची पुनरावृत्ती मस्तच झालेली आहे. त्याला अनुप्रास म्हणतात नं? चला मेहनत कामी आली तर.. हो, अनुप्रासच. धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक
व
वेल्लाभट गुरुवार, 08/27/2015 - 08:08 नवीन
झकास! फर्मास!
  • Log in or register to post comments
ए
एस गुरुवार, 08/27/2015 - 08:29 नवीन
तिसरे कडवे फारच छान!
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी गुरुवार, 08/27/2015 - 14:08 नवीन
धन्यवाद मंडळी :)
  • Log in or register to post comments
स
स्रुजा गुरुवार, 08/27/2015 - 14:28 नवीन
फार आवडली कविता.
  • Log in or register to post comments
प
पद्मावति गुरुवार, 08/27/2015 - 14:59 नवीन
खूप छान कविता. आवडली.
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच गुरुवार, 08/27/2015 - 15:35 नवीन
जनरली मी कविता वाचत नाही, पण ही वाचली आणि आवडली सुद्धा !
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 08/27/2015 - 15:35 नवीन
वा वा!!
  • Log in or register to post comments
अ
अजया गुरुवार, 08/27/2015 - 15:49 नवीन
वा! मस्तच.
  • Log in or register to post comments
स
सटक गुरुवार, 08/27/2015 - 17:35 नवीन
सुंदर कविता!
नको मोक्ष, स्वर्गात जागा नको ती तुझे स्पर्शही भासणे ते अवेळी
अप्रतिम!
  • Log in or register to post comments
श
शीतल जोशी गुरुवार, 08/27/2015 - 18:25 नवीन
कविता छान आहे !!!!
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच गुरुवार, 08/27/2015 - 18:57 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
म
मित्रहो गुरुवार, 08/27/2015 - 19:02 नवीन
मसत् कविता
  • Log in or register to post comments
र
रातराणी गुरुवार, 08/27/2015 - 19:21 नवीन
_/\_ अप्रतिम!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 08/27/2015 - 19:38 नवीन
@लपे चंद्र मेघांमध्ये मत्सराने तुझे मुक्त तेजाळणे ते अवेळी >> अप्रतीम @मिटे आसही या क्षणी ऐहिकाची तुझे मंद घोटाळणे ते अवेळी >> सल्लामच.. ================ या जब्बरदस्त रचनेबद्दल माझ्याकडून एक रंगावली या रचनेलाच भेट Image removed.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Fri, 08/28/2015 - 07:06 नवीन
मनःपूर्वक आभार गुरुजी _/\_ सर्व प्रतिसादकांचे खुप खुप धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
म
मदनबाण Fri, 08/28/2015 - 07:08 नवीन
केवळ अप्रतिम ! :) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Aashiqui Mein Teri... ;) :- 36 China Town
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 08/28/2015 - 07:13 नवीन
किती सुंदर! मस्त! आता कसं छान वाटलं!! कधी कधी ना कविता मुक्तपणे सुचत जाते, जसे मिसळलेला काव्यप्रेमी तसेच लिहितो. पण तुझी मागची कविता पूर्ण मुक्तछंदातही नव्हती. त्यामुळे कल्पना उत्तम होती तरी जरा "समथिंग मिसिंग" वाटत होती. आता काय तक्रार नाय भावड्या!
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर Fri, 08/28/2015 - 07:20 नवीन
मस्तच. ये आगई विशालदा स्टाईल कविता :)
  • Log in or register to post comments
न
नाखु Fri, 08/28/2015 - 07:27 नवीन
मिका कुठेय आणि चाणक्य्/गणेशा दिसेनात. शशक महापूरात हे फिरकेनात की काय मिपावर. साशंक नाखु स्वगतः विशाल्या जबरदस्त.(आहेस तरूण पण लिहितो धीरगंभीराशयी)
  • Log in or register to post comments
प
पिशी अबोली Fri, 08/28/2015 - 07:41 नवीन
आवडली..
  • Log in or register to post comments
अ
असंका Fri, 08/28/2015 - 07:59 नवीन
काय सुरेख..!! सतत याच ओळी आठवायचा प्रयत्न करतोय कालपासनं...बहुतेक पाठही होतील एक दोन दिवसात. धन्यवाद...!!
  • Log in or register to post comments
प
प्रसाद भागवत १९८७ Fri, 08/28/2015 - 08:03 नवीन
मस्त गझल आहे
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Fri, 08/28/2015 - 08:38 नवीन
वा!
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Fri, 08/28/2015 - 11:48 नवीन
अशी कौतुके ना कधीही अवेळी नसे शब्द गोंजारणे ते अवेळी कुणी कौतुके देत शाबासकीही मनाचेच शेफ़ारणे ते अवेळी मन:पूर्वक आभार मंडळी ! _/\_
  • Log in or register to post comments
म
मनीषा Fri, 08/28/2015 - 11:58 नवीन
सुरेख कविता .
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम Sat, 09/05/2015 - 07:05 नवीन
वा वा जियो….
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Sat, 09/05/2015 - 07:49 नवीन
जल्ला आपल्याला कवितेतली कवडीची अक्कल नाही तरी वाचुन प्रचंड आवडले ह्यात काय ते समजा
  • Log in or register to post comments
द
दीपा माने Tue, 09/15/2015 - 17:48 नवीन
तुमच्या कवितेतील शब्दरचना भावनांना सुरेख रूप देतात.
  • Log in or register to post comments
श
शुचि Tue, 09/15/2015 - 21:20 नवीन
लपे चंद्र मेघांमध्ये मत्सराने तुझे मुक्त तेजाळणे ते अवेळी
सखे आप्त एकांत हा फक्त माझा तुझे मजवरी भाळणे ते अवेळी
__/\__
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Wed, 09/16/2015 - 12:45 नवीन
मनःपूर्वक आभार मंडळी !
  • Log in or register to post comments
र
राघव गुरुवार, 01/21/2016 - 15:55 नवीन
आवडली रे गझल! :-) स्वगतः मागे बरेच दिवस फिरकला नव्हतास ना मिपावर राघवा.. त्याचेच हे फळ.. बरेच वाचायचे राहून गेलेले दिसतेय.. :(
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Fri, 01/22/2016 - 05:19 नवीन
मस्त गझल/कविता! कवितेतलं काहीही कळत नाही पण ही कविता आवडली!
  • Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर Fri, 01/22/2016 - 05:41 नवीन
आहाहाहा... स्मृतींचे मनी जागणे ते अवेळी..! :-)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा