मिरर मिरर...
लेखनामागची प्रेरणा: समाप्त...
"मिरर मिरर ऑन द वॉल, हू इज द फेअरेस्ट ऑफ देम ऑल !!"
'हिमगौरी आणि सात बुटके ' या कथेतील दुष्ट राणीचे हे वाक्य आपल्याला आठवत असेलच.
प्रत्येकाला वाटत असते की असं विचारल्यावर आरशाने उत्तर द्यावे तूच सगळ्यात सुंदर म्हणून...
पण आपण जर स्वत:लाच हा प्रश्न विचारला तर काय उत्तर येईल,
आपण असू सगळ्यात छान..चांगले...फेअर ??
आपल्या रोजच्या जगण्यात माणूस अनेक मुखवटे सोबत वागवत फिरत असतो.
जशी समोरची व्यक्ती किंवा परिस्थिती त्यानुरूप मुखवटे बदलण्यात तो तरबेज असतो.
मात्र या मुखवट्याआडचा खरा चेहरा वेगळाच असतो, त्याचे अनेक पैलू असतात,
जे तो इतरांसमोर आणू इच्छित नाही,जे फक्त त्यालाच माहीत असतात.
थोडक्यात आपण इतरांसाठी वेगळे असतो आणि प्रत्यक्षात वेगळे.
अर्थात यावर कोणी म्हणू शकेल की असं काही नसतं, मी जसा आत आहे तसाच बाहेरही,
पण ते तितकसं खरं नाही हे त्यालाही माहीत असतं.
इथे व्हॉटसएप वर फिरणाऱ्या एका विनोदाचे उदाहरण देता येईल, 'सोशल मिडिया वरील प्रोफाईल फोटो
हे बऱ्याचदा आपले मुखवटे असतात आणि आधार कार्डवरील फोटो हे प्रत्यक्षातले आपण असतो '
इतरांसमोर आपली स्वच्छ सुंदर प्रतिमा यावी असा सगळयांचा अट्टाहास असतो, पण मनाच्या आत, खोलवर
आपली एक काळी बाजू आपण लपवून ठेवलेली असते, जी कधी कोणासमोर येऊ नये यासाठी सतत आपली धडपड सुरू असते. (इथे काळा रंग नकारात्मक या अर्थाने वापरला आहे, कोणताही वर्णद्वेष इ.त्यात अभिप्रेत नाही)
मात्र इतरांपासून कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी स्वत:पासून कोणी लपू शकत नाही, किंवा काही लपवूही शकत नाही..
मग आपण द्वेष करत राहतो आपल्यातीलच या काळया बाजूचा, जी सावलीसारखी सतत आपल्या अवती-भोवती, टोचत, छळत, फिरत राहते. अर्थात इथे पर्याय असतो झाले गेले विसरून नव्याने सुरुवात करण्याचा,
पण कितीही घासून पुसून लख्ख केलं तरी पाटीवरील खडूचा पांढरा थर जसा पूर्णपणे कधीच जात नाही,
तसंच काही गोष्टी अशा असतात ज्या मनातून कधीच बाहेर पडत नाहीत, कायम घर करून तिथेच राहतात....
आपण आरशासमोर उभे राहतो तेव्हा त्यात दिसणारी प्रतिमा आपल्याला पूर्णपणे आवडली की आपण खूश होतो,
तसे जर मनाच्या आरशात डोकावून पाहिले तर आपल्याच आतील काही नकोशा छटा आपल्याला अस्वस्थ करतात का ??
अशी आपल्यातील एखादी नकारात्मक बाजू मग ती कुठल्याही रूपात असेल जसे की एखादा न्यूनगंड, केलेल्या चुका, वाईट गोष्टी, स्वभावातील एखादा वाईट भाग, आपल्यामधील न आवडणारे काही इ. ते सर्व व्यक्त करून थोडं मोकळं होण्याचा हा एक प्रयत्न..सगळेच करून पाहू.
💬 प्रतिसाद
(74)
अ
असंका
Fri, 08/28/2015 - 07:11
नवीन
आपण कुणाला मारलं वगैरे असणं तर शक्यच नाही! शाब्दीक वाद झाले असतील.
संघर्ष इतका कमी दिसतो आपल्या आजुबाजूला, की कदाचित त्या तेव्ढ्या वादाचंही ओझं झालं असेल तुम्हाला. सगळेच प्रवाहाबरोबर जातात. सत्तेशी संघर्ष केलात त्याबद्दल अभिनंदन...
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Fri, 08/28/2015 - 14:22
नवीन
मारणं वगैरे खूपच दूरची गोष्ट झाली अपशब्दही कधी वापरले नाही.
फक्त मागण्या फारच लावून धरल्या जे बहुधा त्या पूर्वी फारसे कॉलेजमध्ये झाले नसावे. इतर विद्यार्थ्यांचे असे होते की कॉलेजच्या लॅबमध्ये ४च डब्बा संगणक आहेत तर असुदेत बाहेर क्लास लावता येईल किंवा जमलंच तर घरी संगणक घेता येईल. शेवटी सायन्स कॉलेज असलं की प्रक्टिकलच्या मार्क्ससाठी एका अदृश्य सीमेच्या आत राहिले जाते जी मी कधीच पाळली नाही.
वरच्या माझ्या प्रतिसादात एक टंकनचूक झाली होती ती पण अशी झाली की...
आक्रमणामागचा उद्देश हे आक्रमकपणामागचा उद्देश असे टंकायचे होते.
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
Sat, 08/29/2015 - 06:52
नवीन
@ श्रीरंगजी,
आपण कधी चुकूनही आक्रमक वगैरे होत असाल असे वाटत नाही, कारण मिपावरील आपले प्रतिसाद, विचार इ.पाहून आपण एक साधी-सरळ सज्जन व्यक्ति असाल हा अंदाज येतो.
शिवाय तुमचे कट्ट्याचे फोटोही पाहिलेले आहेत :)
म्हणूनच हे जाणून घ्यायची उत्सुकता असते की अशा व्यक्तित काही नकारात्मक गुण असतात का आणि असतील तर ते का अन कसे बाहेर येतात. तुम्ही वर एक उदाहरण दिलंय पण त्यापेक्षाही अजून डीप लेव्हलवर एखादी नकारात्मक कृति वा विचार काही असेल तर ते इच्छा असल्यास सांगू शकता.
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Sat, 08/29/2015 - 07:02
नवीन
काही (थोडे या अर्थाने) नाही बरेच नकारात्मक गुण आहेत माझ्यात. त्यावर उद्या लिहीन.
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Tue, 09/01/2015 - 11:49
नवीन
मुक्त आणि स्वच्छ चिंतन + स्वदर्शन भावले.
स्वत:ला आहोत तसे स्वीकारणे फार कठीण असते. सदगुण आपली प्रतिमा स्वत:च्याच नजरेत उंचावतात आणि दोष, त्रुटी मात्र नाकारले जातात.
सर्वगुणसंपन्न कुणीच नसते. सर्वांचेच पाय मातीचे असतात. म्हणून दोषांना सहजपणे स्वीकारून जमले तर सुधारणे आणि नच जमले तर दुर्लक्ष करणे हे सयुक्तिक. त्यासाठी हिंपुटी होणे किंवा अट्टाहास करणे हे व्यक्तिमत्वाला मारक ठरू शकते.
...अंतर्मुख स्वभाव, एकांतप्रियता, अलिप्तता हे माझ्या स्वभावातले दोष मी स्वीकारले, त्यांच्याशी जुळवून घेतले आणि इतरांना ते त्रासदायक होणार नाहीत हे नेहमी पाहिले आहे.
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
Tue, 09/01/2015 - 13:51
नवीन
वरील सर्वच विचारांशी सहमत,
" अंतर्मुख स्वभाव, एकांतप्रियता, अलिप्तता हे माझ्या स्वभावातले दोष मी स्वीकारले, त्यांच्याशी जुळवून घेतले आणि इतरांना ते त्रासदायक होणार नाहीत हे नेहमी पाहिले आहे."
- मुळात हे स्वभावातील दोष आहेत असं लोक समजतात हेच चूक आहे, हा आपल्या स्वभावाचा,व्यक्तिमत्वाचा एक भाग असतो. समाजात बहिर्मुख लोकांची संख्या जास्त असल्याने अंतर्मुख लोक कायम स्वतःला मायनॉरिटी मधील समजून तो न्यूनगंड मनात ठेऊन वावरतात.
आपण मायनॉरिटी मध्ये आहोत हे खूप पूर्वीपासून समजत गेले होते आणि त्यावरून स्वतःला त्रास करून घ्यायची सवयही लागली होती, पण नंतर चूक लक्षात आली आणि याच गोष्टी सकारात्मकरीत्या घेण्यास सुरूवात केली.
आता चारचौघांपेक्षा वेगळे असण्याचा आनंद जास्त आहे.
- Log in or register to post comments
P
pradnya deshpande
Tue, 09/01/2015 - 14:49
नवीन
आरसा भावला. आज घरी गेल्यावर या आरस्यात नक्की पाहणार
- Log in or register to post comments
न
नाखु
Wed, 09/02/2015 - 13:29
नवीन
काही प्रसंगपरत्वे/तात्कालीक वागलो ते रास्त की गैर (मुद्दाम चूक की बरोबर असे लिहिले नाही कारण अगदी चूक्/बरोबर असे नसतेच. काळा पांढरा याच्या मध्ये करड्याच्या खूप रंगछटा आहेतच आणि त्या स्वीकाराव्या लागतातच)
हे समजण्यास जरा वेळ लागतो कधी दिवस तर कधी महीने /वर्षे सुद्धा.ती बोच्/जाणीव पुढील वर्तणूक्/प्रतीवाद यांच्यावर अंकुश ठेवत असतील तर काही शिकलो आहोत हे फलित. नुसती बोच उपयोगाची नाही.
मारवा यांचा प्रतीसाद सकारात्मक मुक्ताचिंतन आहेच शिवाय प्रांजळ्पणा आहे जो आजकाल दुर्मीळ आहे.
जगरहाटी टक्केटोणपे खाऊनच शहाणपण (२ पैशाचेच पण जगायला उपयुक्त)आले आहे असे वाटत असलेला जीवन्विद्यार्थी नाखुस
- Log in or register to post comments
ए
एस
Wed, 09/02/2015 - 13:40
नवीन
लेख स्तुत्य आहे पण...
मोकळे होणे हे सर्वांनाच सूट करेल असे नसते. काही कोश बरे असतात बाहेर मुक्त वावरण्यापेक्षा.
- Log in or register to post comments
अ
अजया
Wed, 09/02/2015 - 15:11
नवीन
लेख वाचला.आरसा हातात घेऊन आत्मपरिक्षण करणे जास्त भावते.सार्वजनिकपणे आपले दिसणारे दोष उघड करणे हे पटणारे नाही.प्रांजळपणे सांगणाऱ्या लोकांचं कौतुक वाटतं.पण सार्वजनिक संस्थळ अशा प्रकटीकरणासाठी चुकीची जागा असू शकते.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 09/02/2015 - 15:46
नवीन
सार्वजनिक संस्थळ अशा प्रकटीकरणासाठी चुकीची जागा असू शकते.
+१
पण अजया ताई
डू आयडीला काहीच घेणं देणं नाही. आपल्या मनातील मळमळ ओकून टाकायची आणि निर्मळ व्हायचं
जर अंगाशी आलं तर दुसरा डू आय डी घ्यायचा. हा प्रश्न तुमच्या आमच्या सारख्या स्वतःच्या नावाने वावरणाऱ्या व्यक्तींचा आहे. आता मी जर रावबहाद्दूर झाडबुके नावाने माझी जुनी लफडी लिहिली आणि त्याचा गवगवा झाला तर
आय डी बदलून घारू अण्णा घोड्नदिकर नाव घ्यायचे नाहीतर एखादा स्त्री आयडी घ्यायचा आणि वर अनाहीतात काड्या सारायच्या.
हा का ना का
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Fri, 09/11/2015 - 06:37
नवीन
सहमत. आता जी कादंबरी अनुवादित करतो आहे, तिची मूळ संकल्पनाच ही आहे. कुणासमोर किती व्यक्त व्हावं याला मर्यादा असतात, कारण इंटरनेटवर तुमच्या व्यक्त होण्यातून तुमच्याविषयी जी माहिती लोकांना कळत असते तिचा गैरवापर केला जाऊ शकतो.
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
Fri, 09/11/2015 - 07:35
नवीन
आपण जी कादंबरी अनुवादित करत आहात त्याबद्दल अधिक जाणून घेण्यास आवडेल.
- Log in or register to post comments
म
मांत्रिक
Wed, 09/02/2015 - 18:02
नवीन
नमस्कार ताई! तुम्ही सूड आणि पैसा यांचेविषयी गैरसमज का करत आहात ते कळत नाही. जरा डोके शांत ठेवून त्यांचे प्रतिसाद नीट वाचा. तुम्हाला कळेल की तुम्ही टार्गेट नाहिये. तर इंटरनेटवर ज्या दुष्ट, नीच प्रवृत्ती कार्यरत आहेत, त्या आहेत. भिकारपांड लोकांनी भरलेल्या जगात स्वतःच्या अवगुणांना असे उघड करणे म्हणजे स्वतःहून वाघाच्या तोंडात मान देणे होय. सूडच्या म्हणण्याचा हाच अर्थ आहे. तो तुम्हाला सत्य परिस्थितीची जाणीव करून देतोय. पैसाताई पण तेच म्हणताहेत. आतातरी समजून घ्याल अशी अपेक्षा आहे.
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
गुरुवार, 09/03/2015 - 09:10
नवीन
समजून घेण्यातच आयुष्य जात असतं, त्याला पर्याय नसतोच.
मला माहीत आहे त्यांचा विरोध मला नाही इतर काही लोकांना, प्रवृत्तींना आहे,
पण ते या धाग्यावर गरजेचे नाही एवढेच माझे म्हणणे होते.
त्यांनी जे शब्द वापरले त्यामुळे वाईट वाटले.
धोक्याची सूचना आणि वाघाच्या पिंर्यासमोर उभे करणे याची काहीच गरज नव्हती.
त्यांच्या वाक्यातील उपहास तुम्हाला समजला नसेल तर तुम्ही खूप भोळे आहात असं म्हणावं लागेल.
डोकं शांतच असतं, कारण नसतांना, गरज नसतांना गोष्टी वादग्रस्त होत असतील तर कोणालाही वाईट वाटेल, मनुष्य स्वभाव आहे तो.
असो. धन्यवाद.
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 09/03/2015 - 09:49
नवीन
मुद्दा समजून घेतल्याबद्दल धन्यवाद!
खरे तर नीलमोहर यांचा हा लेखही त्यांच्या इतर लिखाणाप्रमाणे चांगलाच होता, त्यांनी शेवट आपापले अनुभव शेअर करा म्हटले तिथे मतभेदाचा मुद्दा आला.
- Log in or register to post comments
स
सस्नेह
गुरुवार, 09/03/2015 - 11:50
नवीन
फोरमवर व्यक्त होताना इतरही त्याच पद्धतीने व्यक्त होतील अशी अपेक्षा करणे चूक आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती आणि प्रवृत्तीही !
- Log in or register to post comments
अ
अर्थहीन
गुरुवार, 09/03/2015 - 12:32
नवीन
मस्त आहे कल्पना...
- Log in or register to post comments
द
द-बाहुबली
Fri, 09/04/2015 - 10:38
नवीन
हा धागा मुक्तपिठीय वळन घेइल असा सपशेल अंदाज जाणकारांनी चुकवला...
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
Sat, 09/05/2015 - 08:28
नवीन
मिपा आणि मुक्तपीठ मध्ये हाच तर फरक आहे,
हा अंदाज ज्यांनी लावला त्यांनी मिपाकरांना ओळखलेच नाही मग..
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
गुरुवार, 09/10/2015 - 14:10
नवीन
म्हन्जे बाकी काहीच फरक नाही?
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
गुरुवार, 09/10/2015 - 14:18
नवीन
अवांतर - या नितांतसुंदर गाण्याबद्दल लेख असेल म्हणून लेख उघडला होता. पण काहीतरी वेगळे दिसले.
असो - आता याचे पण रसग्रहण येऊ द्या.
बाकी आता माझे मत -
मला व्यक्तिशः स्वतःशी प्रामाणिक राहायला आवडते. त्यामुळे मी कोणाशी कन्फेशन देत पण नाही, आणि इतरांच्या भानगडीत डोकावण्याची विशेष इच्छा नसल्यामुळे कोणी कन्फेशन देत असेल तर ते ऐकून फक्त सोडून देतो. कारण बर्याच वेळेस लोकांना डोके टेकायला एक निरुपद्रवी खांदा हवा असतो. तो मात्र मी नेहमी देऊ करतो.
अर्थात त्याचा वाईट परिणाम पण होतो, कारण मग लोक तुम्हाला गृहीत धरायला लागतात, आणि तोपर्यंत खांद्यावरच्या डोक्यांची पण सवय झालेली असते, तो मोडणे कठीण जाते.
असो इत्यलम.
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
Fri, 09/11/2015 - 07:30
नवीन
लेख तुम्हाला अपेक्षित विषयाबद्दल नसतांनाही वाचून आवर्जून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.
" कोणी कन्फेशन देत असेल तर ते ऐकून फक्त सोडून देतो. कारण बर्याच वेळेस लोकांना डोके टेकायला एक निरुपद्रवी खांदा हवा असतो. तो मात्र मी नेहमी देऊ करतो."
- सहमत, अशावेळेस तेवढेच अपेक्षित असते.
तुम्ही सांगितलेले गाणे आधी ऐकले नव्हते, ऐकून जेवढे कळले त्याप्रमाणे गाणे एका मुलीने प्रेमात, प्रिय व्यक्तीशी केलेल्या चुकीच्या वागणुकीबद्दल तिला वाटत असलेला पश्चात्ताप यावर आहे.
ती आरशाला म्हणते की तिच्या लक्षात आले आहे जगातील सर्वात मूर्ख व्यक्ती कोण आहे, त्याने तिला दाखवून देण्याची गरज उरली नाही, मात्र त्याचवेळी तिची इच्छा आहे की आरशाने तिला खोटेच सांगावे (की ती मूर्ख नाही) आणि त्यायोगे तिच्या प्रियाची परत भेट घडवून द्यावी .
पूर्ण गाण्याचे रसग्रहण करण्यास थोडा वेळ लागेल, मात्र तुमची इच्छा असल्यास नक्की प्रयत्न करेन.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Fri, 09/11/2015 - 07:50
नवीन
तूर्त इतकेच.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2