आज पुन्हा एकदा प्रेमात पडावे असे वाटतंय !!!!
आज पुन्हा एकदा प्रेमात पडावे असे वाटतंय
अन आठवणीच्या मेघांनी आभाळ पुन्हा दाटतय
थोडे रुसवे थोडे भांडण थोडी समजूत आणि खूप सारे प्रेम
पुन्हा मनात साठवावं असे वाटतय,
खरच आज पुन्हा एकदा प्रेमात पडावे असे वाटतंय
जुने झालाय प्रेम थोडे आणि आपण हि जुनेच झालोय आता
एकमेकांच्या मनातले पक्के ओळखू लागलोय आता
कोणत्या वाक्यावर तो वैतागणार तिला आहे नक्की ठावूक
आणि त्याला आता जमू लागलय सावरणे तिला, जेव्हा ती होते अगदी भावूक
तरीसुद्धा, पुन्हा एकदा नव्याने भेटावे असे वाटतय
खरच आज पुन्हा एकदा प्रेमात पडावे असे वाटतंय
जुने ते सोने म्हणतोच कि आपण
वेळ जाईल तसे दृढ होते नाते अस मानतोच कि आपण
वर्षामागून वर्षे सरता, एकमेकासोबत बरच काही पाहतो आपण
प्रेम थोडे मागे पडून, माया जास्त वाटू लागते हे पण जाणतोच कि आपण
तरी सुद्धा, ऋतू बदलला कि जुन्या झाडाला नवी पालवी फुटतेच कि,
हे मात्र सोयीस्कर रित्या विसरतो आपण
म्हणूनच तू मला अन मी तुला गृहीत न धरता
नव्या रंगांमध्ये नवे चित्र रेखाटावे असे वाटतय
खरच आज पुन्हा एकदा प्रेमात पडावे असे वाटतंय
तोच थोडा अवखळपणा, तोच थोडा बालिशपणा
तेच थोडे एकमेकांना मैत्रीच्या नात्याने भेटणे
अन काय आहे तिच्या मनात थोडे चाचपून पाहणे
अन त्याला नक्की काय वाटतंय याचे मनात अंदाज बांधणे
मागे वळून पाहता आता हे सारच गमतीचे वाटतंय
पुन्हा एकदा तेच चांदणे आपल्या मध्ये झिरपावे असे वाटतय
आणि म्हणूनच आज पुन्हा एकदा प्रेमात पडावे असे वाटतंय
- शीतल जोशी
💬 प्रतिसाद
(12)
प
पद्मावति
गुरुवार, 08/27/2015 - 18:58
नवीन
कविता खूप आवडली.
- Log in or register to post comments
र
रातराणी
गुरुवार, 08/27/2015 - 19:19
नवीन
मस्त !
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 08/27/2015 - 19:22
नवीन
छान
- Log in or register to post comments
म
मांत्रिक
गुरुवार, 08/27/2015 - 19:33
नवीन
मस्तच!!!
- Log in or register to post comments
म
मितान
गुरुवार, 08/27/2015 - 19:49
नवीन
Fresh !!! :)
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
गुरुवार, 08/27/2015 - 20:47
नवीन
:)
याच पठडीतलं...
चिरंजीव आता शाळेत जायला लागले. त्यांची प्रेमप्रकरणं सुरु झाली आहेत. मी मार्गदर्शन करतोच आहे :). पण ते दिवस मीसुद्धा परत जगतोय त्याच्यासोबत.
- Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच
Sat, 08/29/2015 - 08:54
नवीन
मस्तच
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Mon, 08/31/2015 - 12:32
नवीन
सुंदर ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ये ज़मीं गा रही है, आसमां गा रहा है... :- { Teri Kasam (1982) }
- Log in or register to post comments
'
'पिंक' पॅंथर्न
Mon, 08/31/2015 - 12:34
नवीन
मस्त ...
- Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर
Mon, 08/31/2015 - 12:51
नवीन
मस्त
- Log in or register to post comments
ब
बाबा योगिराज
Mon, 08/31/2015 - 13:35
नवीन
शिर्शक वाचुन हे गान आठ्वल.....
कविता खरच खुप छान आहे.
- Log in or register to post comments
क
कविता१९७८
Mon, 08/31/2015 - 18:21
नवीन
मस्त कविता
- Log in or register to post comments