सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग २
धाग्याच्या आधीच्या भागात प्रतिसाद शंभरहून जास्त झाल्याने नवीन भाग सुरु करत आहोत -
आधीचा भाग वाचनमात्र करतो आहोत. यापुढील चर्चा इथे चालू रहावी.
संपादक मंडळ.
ईतकी वर्ष आपल्या पहिल्यावहिल्या केबलला चिकटून राहिल्यावर आता डिश टि.वी. घ्यायचे म्हणतो. आम्हाला दोन जोडण्या (कनेक्क्षन्स) लागणार आहेत. टाटा स्काय का ईतर कुठला सेवा पुरवठेदार चांगला? दोन जोडण्या (कनेक्क्षन्स) साठी मासिक शुल्क दुपटिऐवजी एक आणि अर्ध्यापेक्क्षा थोडे कमी द्यायचे पॅकेज कोणि देत का? सेवा , दर्जा कोणाचा चांगला आहे. माहितगार मि.पा. कर मदत करा. महिती आणि सल्ला द्या ही विनंती.
💬 प्रतिसाद
(114)
क
कंजूस
Fri, 08/28/2015 - 13:01
नवीन
सर्व डिटिएच सर्विस प्रवाइडर चानेल लिस्ट /पॅकेज मधले चॅनेल्स सारखे बदलत असतात.पाच वर्षे टाटा वापरून आता डिश टिव्ही आहे यात सरकारी फ्री चानेल दिसतात,सॅटेलाइट एकच आहे,रेकॅार्डिंग कितीही करता येते पेनड्राइवर/इकसटरनल रु१२०० अंदाजे.मिनि पॅकेज २६०,३६०मध्ये बरेच आहेत.सेकंड कने अंदाजे १६०.
आजुबाजूस टाटा आणि व्हिडिओकॅान चे प्रमाण जास्ती दिसेल.
रेकॅार्डिंग फार उपयुक्त वस्तु आहे.
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Wed, 09/02/2015 - 09:25
नवीन
१९९६ ते २०१० केबलचा निकृष्ट दर्जा सहन केल्यावर २०१० मध्ये डीटूएच घ्यायचा निर्णय घेतला. सगळ्या कंपन्यांचे पॅकेज पाहिले. माझी गरज व्हिडीओकॉनने भागेल असे वाटले. बेसिक पॅकेजमध्ये (तेव्हा रु १५० प्रतिमहिना) सर्व मराठी वाहिन्या, सर्व हिंदी वाहिन्या, सर्व हिंदी चित्रपट वाहिन्या, डिस्क्वरी+नॅटजिओ+फॉक्स हिस्टरी(आता ट्रॅवलर), सर्व हिंदी वृत्तवाहिन्या हे सगळं अंतर्भूत होतं. क्रिडा वाहिन्या नव्हत्या. कार्टून मध्ये फक्त कार्टूननेटवर्क होतं. पण बाकिच्या डीटूएच सेवांपेक्षा मला हे चांगलं वाटलं. अजूनही असंच आहे.
लईच जोराचा वादळी पाऊस असेल तेव्हा कधी कधी बंद पडतं. एकदा घराचं बांधकाम करताना ३ महिन्यासाठी दुसरीकडे राहायला गेलो होतो, तेव्हा १५० रु मध्ये शिफ्टिंग करून दिलं. (पुन्हा जुन्या घरी शिफ्टिंग करताना पुन्हा १५० रु.)
ग्राहक सेवा केंद्राचा (कॉल सेंटर) अनुभव अतिशय चांगला आहे.
मल्टीरूम कनेक्शन की २ वेगळे कनेक्शन ?
-> मल्टीरूम कनेक्शन असेल तर पैसे वाचतात, पण रिचार्ज केले नाही तर सर्व टीव्हींची सेवा बंद होते. प्रत्येक टीव्हीला वेगळे कनेक्श्न असेल तर पैसे थोडे जास्त जातील, पण प्रत्येक टीव्हीला गरजे नुसार वेगळे पॅकेज घेता येईल. शिवाय रिचार्जचा कालावधी वेगवेगळ ठेवला तर एखाद्या टीव्हीची सेवा बंद झाली तर दुसर्यावर दिसत राहील.
- Log in or register to post comments
ब
ब़जरबट्टू
गुरुवार, 09/03/2015 - 09:44
नवीन
सध्या माझापण डिटिएच बदलण्याचा निर्णय सुरु आहे. आता ऐर्टेल आहे, पण ते महागा वाटतय.. २५० मध्ये बेसिक , HD नाही..त्याचे वेगळे..पण पिक्चर क्वालिटी जबरदस्त आहे, व सहसा बंद पडत नाही.
पण आता व्हिडीओकॉन बारा वाटतोय.. पिक्चर क्वालिटी कशी आहे ..
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
गुरुवार, 09/03/2015 - 10:58
नवीन
मोठ्या टीव्हीवर/एच्डी माहिती नाही
- Log in or register to post comments
स
सुनील
Wed, 09/02/2015 - 06:58
नवीन
शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या कुंभमेळ्यातील एक विधी हा 'शाही स्नान' म्हणून ओळखला जातो.
'शाही' हा यावनी शब्द ह्या विधीला कधी आणि कसा लागला?
- Log in or register to post comments
क
कंजूस
Wed, 09/02/2015 - 07:20
नवीन
अमुक महाराज की जय कसे आले तसेच.अगदी कृष्णाबाईमहाराज की जय हे सुद्धा ऐकले आहे वाईत.
- Log in or register to post comments
न
नाव आडनाव
Wed, 09/02/2015 - 07:10
नवीन
महानगरपालिकेचं (चिंचवड) / बोअरिंगचं वापरायचं पाणी (पिण्याचं नाही) वापरण्याआधी प्रोसेस करायचं असेल तर काही कमी खर्चाचा आणि चांगला उपाय आहे का?
सोसायटीत ९४ घरं आहेत. बरेच जण पाण्यात क्षार जास्त आहेत अशी तक्रार करत आहेत. क्षारांमुळं हीटर / वॉशिंग मशीन खराब होइल आणि बिल जास्त येइल असा पण एक प्रॉब्लेम आहे.
पाणी टाकीत जाण्या आधी प्रोसेस करायचंय. ३ ईमारतींच्या ३ टाक्या आहेत.
- Log in or register to post comments
न
नया है वह
Wed, 09/09/2015 - 14:55
नवीन
पण कदचित उपयोग होईल तुम्हाला.
- Log in or register to post comments
क
कंजूस
Wed, 09/02/2015 - 07:24
नवीन
Satellite info
सर्व DTH कंपन्यांचे सॅटलाइटस आणि तांत्रिक माहिती
- Log in or register to post comments
अ
असंका
Wed, 09/02/2015 - 07:34
नवीन
स्पेस सिटी सिग्मा आणि जंतर मंतर या सिरीयल कुठे मिळतील ?
- Log in or register to post comments
ज
जेपी
Wed, 09/02/2015 - 07:42
नवीन
वारंवार नाक कोरडे पडण्यामुळे श्वास घेणे/बोलताना त्रास होतो.
काही स्प्रे वैगेरे उपलब्ध आहे का ?
- Log in or register to post comments
न
नाव आडनाव
Wed, 09/02/2015 - 08:00
नवीन
नाक कोरडं पडण्यावर होमिओपॅथी / आयुर्वेदिक डॉ़क्टरांनी गावरान गाईचं तूप नाकाला लावायला सांगितलं होतं. त्याने एकदम फरक पडत नाही, पण थोडा फरक पडतो. होमिओपॅथी च्या औषधांनी फरक पडला. ईथे डॉक्टरांचं नाव लिहायला नको म्हणून मी तुम्हाला व्यनी करतो.
- Log in or register to post comments
ज
जेपी
Wed, 09/02/2015 - 08:04
नवीन
धन्यवाद नाव आडनाव.
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
Wed, 09/02/2015 - 08:25
नवीन
Otrivin nasal spray
ऑट्रिव्हीन नेजल स्प्रे.
नाकावर लावायच्या स्ट्रीप्सही मिळतात.
नेहमीचे डी-कोल्ड, विक्स इ.चे इन्हेलर पण उपयोगी येते.
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
Wed, 09/02/2015 - 08:34
नवीन
अॅलोपथी डाक्टरच्या सल्यानुसार वापरा स्प्रे हा. अॅडिक्टीव असतो असं ऐकलं आहे.
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
Wed, 09/02/2015 - 08:48
नवीन
स्वतः वापरून पाहिले आहे, अॅडिक्टीव वगैरे काही वाटत नाही, प्रभावी मात्र आहे.
अर्थात जास्त त्रास होत असेल तर आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊनच वापरावे.
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
Wed, 09/02/2015 - 09:02
नवीन
मिपावरच वाचलं होतं.
http://www.misalpav.com/comment/490490#comment-490490
- Log in or register to post comments
म
मी-सौरभ
Tue, 09/29/2015 - 17:36
नवीन
मी खोबरेल तेल (मराठीत: पॅरेशूट) रोज सकाळि दोन्ही नाकपूड्यात आंघोळीनंतर लावतो. त्याचा ऊपाय होतोय, नाक कोरडे पडणे कमी झालय.
ऊपाय होईलच पण अपाय होणार नाही हे नक्क्की...
- Log in or register to post comments
प
पद्मावति
Wed, 09/30/2015 - 15:53
नवीन
साजूक तूप किंचित कोमट करून पातळ करा आणि दोन्ही नाकपूड्या मधे एक एक थेंब टाका. खूप आराम पडेल.
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Wed, 09/02/2015 - 07:47
नवीन
सोनी टीव्ही नवीन असताना "आय ड्रीम ऑफ जिनी" आदि सीरियल्स हिंदीत डब करून दाखवत असत. हे हिंदी डब्ड व्हर्जन आंजावर कुठे उपलब्ध आहे का?
- Log in or register to post comments
स
संजय पाटिल
Wed, 09/02/2015 - 08:38
नवीन
इथे बघु शकाल
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Wed, 09/02/2015 - 08:41
नवीन
हो. इंग्रजी पाहिलेलं आहे. हिंदी डब्ड व्हर्जन आहे का विचारत होतो.
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Wed, 11/04/2015 - 20:51
नवीन
नै. मिळालं तर मला पण सांगा. इंग्लिश मद्दे ती मज्जा नै.
- Log in or register to post comments
क
कंजूस
गुरुवार, 09/03/2015 - 02:28
नवीन
Tata sky होणार हाइटेक?
रेकॅार्डड कार्यक्रम पाहा मोबाइलवर ₹८००० च्या डब्यातून.
- Log in or register to post comments
त
तुडतुडी
Fri, 09/04/2015 - 11:50
नवीन
आय ड्रीम ऑफ जिनी अंड Bewitched my both my favourites. you tube वर कदाचित असू शकतं डबड वर्जन
- Log in or register to post comments
अ
असंका
Mon, 09/07/2015 - 02:56
नवीन
इ टीवी मराठी वर एक सिरीयल होती भूमिका नावाची. सुनिल बर्वे रविंद्र मंकणी इ. काम करणारे होते. त्या सिरीयल्चं शिर्षक गीत काय होतं?
- Log in or register to post comments
म
महासंग्राम
Sat, 09/19/2015 - 20:16
नवीन
गणेशोत्सवाच्या निमित्ताने काही मनात आलेले प्रश्न .
१. गणपतीची मुर्ती बनवण्याची पध्दत केव्हा पासून सुरु झाली ?
२. ती का निर्माण केली जाते ? त्याचा इतिहास काय आहे ( अगदी वैदिक काळापासून असला तरी चालेल) ?
३. पार्थिव मूर्ती म्हणजे काय ?
४. गणपतीचे विसर्जन का करतात ?
५. हि पद्धत जर पार्वतीने चालू केली आहे का ?
कोणाच्याही धार्मिक भावना न दुखावता/ खेचाखेची न होता माहिती मिळेल हि अपेक्षा करतो.
बाप्पा मोरया !!!
- Log in or register to post comments
S
shawshanky
Sat, 09/19/2015 - 20:20
नवीन
गणपती विसर्जन पाण्यामध्येच का करतात? सर्व देव देवतांमध्ये गणपतीला अग्रपूजेचा मान आहे. कोणतेही शुभ कार्य करताना प्रथम गणेशपूजा केली जाते. गणेशोत्सवानंतर गणपतीला पाण्यात विसर्जित करतात. असे करण्यामागे काय कारण आहे ????
- Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी
Tue, 09/29/2015 - 08:22
नवीन
"कांदे पोहे" कार्यक्रम होतो व मुलगी आवडते..होकार कळवायचा विचार करत असतानाच मुलिच्या कडुन नकार येतो...
"कांदे पोहे" कार्यक्रमात आपणास अश्या नकारलेल्या मुलिची जेंव्हा काहि वर्षानंतर लग्न समारंभ वा तत्सम कार्यक्रमात भेट होते व ति आपल्या पोट सुटलेल्या व टकल्या नव~याची ओळ्ख करुन देते त्या वेळी मनात कोणत्या भावना असाव्यात.
.आनंद..सुड..अनुकंपा?
- Log in or register to post comments
प
पैसा
Tue, 09/29/2015 - 08:40
नवीन
तिलाच कदाचित "हुश्श! सुटले बुवा" असं वाटत असेल की वो!
- Log in or register to post comments
ब
बिन्नी
Tue, 09/29/2015 - 17:41
नवीन
मी नकार कळवलेला मुलगा एकदा भेटला तेव्हा त्याच्या किलोभर मेकप केलेल्या बायकोकडं बघून मला असंच वाटलं होतं हो पैसा
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Tue, 09/29/2015 - 13:41
नवीन
हा प्रश्न कोण विचारतो यावर उत्तर अवलंबून आहे.
१. तोवर लग्न न झालेला
२. लग्न होऊन स्वतःच पोट सुटलेला व टक्कल पडलेला
३. लग्न व सहवास-प्रेम म्हणजे काय याचे शष्प ज्ञान नसलेला
४. आपण कायम र्हितीक दिसत होतो व राहू असा ययातिसम वर मिळालेला
५. तिच्या नवर्याच्या श्रीमंतीने (वा ती आनंदात आहे हे पाहून) न्यूनगंड येऊन पराभवाची लाज लपवण्यासाठी फुटकळ डीटेल्स शोधणारा.
६. अजिबात महत्त्वाचे नसलेले दुसर्यांचे ओझे वर्षानुवर्षे आपल्या टीचभर मेंदूवर वागवणारा.
यापैकी तो कोण तो प्रश्न विचारणारा?
- Log in or register to post comments
अ
अर्जुन
Wed, 09/30/2015 - 12:42
नवीन
आमच्या माहितील एक मराठा मुलीचा काही कारणामुळे विवाह वेळेत होऊ शकला नाही. आज
तीचे वय ३९ पुर्ण आहे. रहाण्यास डोंबिवली येथे आहे. ती नोकरी करत असुन साधारण दहा हजार मासीक उत्पन्न आहे. इतर जाती मधे विवाह करण्याची तयारी आहे. शादी डॉट कॉम वर नाव नोंदले आहे. दुसर्या चांगल्या वेबसाइट किंवा विवाह मंड्ळाची माहीती असल्यास क्रुपया कळवा.
- Log in or register to post comments
P
palambar
Wed, 09/30/2015 - 20:06
नवीन
@कांदेपोहे , तुम्ही किती involve होता यावर
अवलंबून असेल.
- Log in or register to post comments
न
निमिष सोनार
गुरुवार, 10/01/2015 - 12:38
नवीन
सूर्य कोणत्या गोष्टींचा कारक असतो? तो उच्चीचा आणि निचीचा तसेच कुंडलीतल्या स्थानानुसार आणि इतर ग्रहांच्या युतीनुसार काय फळ देतो? सूर्यांच्या राशी ज्या स्थानात आहेत त्याचे फल काय?
सूर्य कुंभ राशीत बाराव्या स्थानी असेल तर काय फळ मिळेल?
सूर्य मेष राशीत चौथ्या स्थानी राहू आणि बुधा बरोबर असेल तर काय फळ मिळते?
सूर्य वृषभ राशीत मंगळ बुधासोबत अष्टम स्थानी असेल तर काय फळ मिळते?
सूर्य मकर राशीत बुधासोबत द्वितीय स्थानी असेल तर काय फळ मिळते?
- Log in or register to post comments
अ
असंका
Tue, 10/06/2015 - 07:14
नवीन
काही काही उपहारगृहात अन्न वाढताना वाढप्यांनी हातात मोजे घातलेले दिसतात. कशासाठी असे मोजे घातले जातात?
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
Tue, 10/06/2015 - 07:29
नवीन
स्वच्छतेचं इम्प्रेशन द्यायला. पाणीपुरी देणार्यांकडे पण पाहिला आहे हा प्रकार.
- Log in or register to post comments
अ
असंका
Tue, 10/06/2015 - 07:37
नवीन
:-))
- Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके
Wed, 10/07/2015 - 06:09
नवीन
भारत नेपाळ संबंधांना काय झालयं ? नेपाळची नवीन राज्यघटना अस्तित्त्वात आल्यापासून भारताने नेपाळकडे जाणारा बराच सप्लाय रोखलाय अशा बातम्या वाचनात येतायेत. दोन्ही बाजूंनी (म्हणजे वाचकवर्गाच्या) तीव्र प्रतिक्रियादेखील येतायेत. एकाएकी नक्की काय बिघडलयं ?
- Log in or register to post comments
त
तुडतुडी
Wed, 10/07/2015 - 11:45
नवीन
मंदार भालेराव आणि shawshanky .
पार्थिव मूर्ती म्हणजे मातीपासून (पृथ्वीपासून ) तयार केलेली मूर्ती . तिचं विसर्जन पाण्यात करतात . कोणतेही शुभ कार्य करताना प्रथम गणेशपूजा केली जाते. हि सर्व भौतिक रुपकं आहेत . ह्यामागे अध्यात्मिक रहस्य असं आहे .कुंडलिनी मूलाधार मध्ये जागृत होते . अध्यात्मिक प्रगतीची पहिली पायरी म्हणजे मूलाधार चक्राचं उघडणं . ह्याची अधिष्ठात्री देवता गणेश आहे . हे प्रथम चक्र आहे म्हणून गणपती प्रथमपूज्य मानला गेला आहे . ह्या चक्राचं तत्व पृथ्वीतत्व . म्हणून गणेशाची पार्थिव मूर्ती करतात . मूलाधार चक्र पूर्णपणे शुद्ध झाल्यावर गणेशाचे प्रत्यक्ष दर्शन होते . पुढचं २ नंबर चं चक्र स्वाधिष्ठान चक्र . ह्याचं तत्व जलतत्व . म्हणजे पृथ्वीतत्वाचा अंत जलतत्वा मध्ये होतो म्हणून गणेशाच्या पार्थिव मूर्तीचं विसर्जन पाण्यात करतात . प्लास्टर ऑफ प्यारीस च्या मूर्ती वापरणं पूर्णत: चुकीचं आहे . मूर्ती मातीचीच असायला हवी .
- Log in or register to post comments
त
तुडतुडी
Wed, 10/07/2015 - 12:00
नवीन
धर्मराजमुटके
नेपाळ हे आधी हिंदू राष्ट्र होतं . पण सध्याची नवीन राज्यघटना धर्मनिरपेक्ष केली गेलीये . हे मान्य नसणारा मोठा गट तिकडे आहे . त्यामुळे तिथे धुसफूस चालू आहे . भारतामुळेच आपली नवीन राज्यघटना धर्मनिरपेक्ष झाली असा काहींचा गैरसमज झाल्यामुळे त्यांच्या मनात भारताबद्दल संताप निर्माण झालाय तर विरोधी गटाचं म्हणणं भारतामुळे हिंदू राष्ट्राची संकल्पना जोर धरू लागलीय . त्यामुळे त्यांच्याही मनात भारताबद्दल संताप निर्माण झालाय .भारतीयांवर तिथे हल्ले झाले . संबंध तणावपूर्ण आहेत आणि नेपालने भारतीय T V च्यानेल्स block केले आहेत . भारतातून नेपाळमध्ये माल घेवून जाणारे हल्ला होण्याच्या भीतीने जात नाहीयेत . त्यामुळे माल जाणारा सप्लाय रोखल्य अशी समजूत झालीय . आत्तापर्यंत भारताने नेपाल ला सर्वतोपरी मदत केली आहे . नेपाळचं वागणं अत्यंत चुकीचं आहे
- Log in or register to post comments
प
प्रदीप
Wed, 10/07/2015 - 16:42
नवीन
काही वेगळेच आहे.
इथे व इथे पहा.
नेपाळच्या दक्षिणेच्या भागांत मधेसी ह्या जमातीचे लोक प्रामुख्याने रहातात. ते एकूण लोकसंख्येच्या सुमारे ३२ % आहेत.
भारताला लागूनच असलेल्या भागांतील हे लोक असल्याने, ते अनेक दृष्ट्या भारताशी जवळून निगडीत आहेत.
नेपाळच्या नव्या राज्यघटनेनुसार देशांतर्गत ७ प्रांत (provinces) नव्याने निर्माण करण्यात आले आहेत. मधेसींच्या म्हणण्यानुसार हे प्रांत मुद्दामहून अश्या तर्हेने निर्माण केले गेले की कुठल्याही प्रांतात त्यांचे प्राबल्य रहाणार नाही. तेव्हा त्यांचे आंदोलन सुरू आहे.
भारतातून पेट्रोल व इतर जीवनोपयोगी सामान घेऊन येणार्या ट्रक्सना ह्या आंदोलनामुळे काठमांडूपर्यंत पोहोचणे अशक्य होऊन बसले आहे, असे भारताचे अधिकृत म्हणणे आहे. पण ह्या कारणास्तव भारताने मुद्दाम ती वाहतूक ठप्प केलेली आहे, असा आरोप नेपाळमधील अनेकजण करताहेत.
- Log in or register to post comments
भ
भाते
Wed, 10/07/2015 - 13:49
नवीन
गेल्या रविवारी अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन झाल्यावर सोमवारी पौर्णिमा असल्याने कोल्हापुरला जायचा योग आला. सोमवारी सकाळी सुध्दा मंडपात गणपतीची मुर्ती पाहुन नवल वाटले. चौकशी केल्यावर समजले कि कोल्हापुरात गणपती विसर्जन एक दिवस उशिरा होते. मुंबईत दुसऱ्या दिवशी सकाळी उगवत्या सुर्याच्या साक्षीने काही मोठे गणपती विसर्जन करतात हे माहित आहे. पण पौर्णिमेला गणपती विसर्जन? कोणाला यामागचे शास्त्रिय / धार्मिक / इतर कारण माहित आहे का? कुतुहल म्हणुन विचारतो आहे.
- Log in or register to post comments
अ
असंका
गुरुवार, 10/08/2015 - 05:34
नवीन
नक्की कुठे चौकशी केलीत म्हणे?
- Log in or register to post comments
म
मोदक
Wed, 10/07/2015 - 13:56
नवीन
रिझर्व बँकेचे गव्हर्नर पद आत्तापर्यंत एकाही महिलेने भुषवले नाहीये. याला काही विशेष कारण / प्रतिबंध आहेत का?
- Log in or register to post comments
अ
अन्या दातार
Fri, 10/30/2015 - 11:11
नवीन
नाही. डेप्युटी गव्हर्नर या पदावर श्रीमती उषा थोरात कार्यरत होत्या. त्यांचा कार्यकाल संपल्याने गव्हर्नर बनू शकल्या नाहीत.
- Log in or register to post comments
त
तुडतुडी
Wed, 10/07/2015 - 14:04
नवीन
तसही सार्वजनिक गणेशोत्सवाला धर्माचा कोणताही आधार नसल्यामुळे विसर्जन अमुकच दिवशी करावं असं काही नाही . पौर्णिमेला गणपती विसर्जन केलं तर चालतं . पण प्रतिपदेला करू नये . प्रतिपदेला कोणतंही शुभकार्य करत नाहीत (बलिप्रतिपदा सोडून). तो वाईट मुहूर्त मानला जातो . पण पौर्णिम संपायच्या आत विसर्जन संपत नाही . प्रतिपदा चालू झाली तरी विसर्जन मिरवणूक आपली चालूच असते . म्हणून मग चतुर्दशीला करतात आणि पौर्णिमा चालू झाली तरी ते काही संपत नाही .
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
गुरुवार, 10/08/2015 - 07:31
नवीन
बाकी प्रतिसादाबद्दल काही माहिती नसल्याने नो कमेंट्स ऑन दॅट.
पण बलिप्रतिपदेबरोबर चैत्र-शुद्ध-प्रतिपदाही शुभ मानली जाते बहुतेक.
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Sat, 10/24/2015 - 06:40
नवीन
गाडीबरोबर येमारेफचे झॅपर टायर आले होते, सात वर्षात पहिल्यांदा आठ दिवसांपुर्वी गाडी पंक्चर झाली. आता बदलावेत म्हणतो. एकूण ४००००+ रनिंग झालंय. बदलावेत का?
१) ट्युबवाले घ्यावेत की ट्युबलेस?
२) ब्रॅण्ड्/मॉडेल?
३) पुण्यात किंमत किती असेल?
- Log in or register to post comments
ए
एस
Sat, 10/24/2015 - 08:06
नवीन
बटण टायर टाका. गाडी स्किड होण्याचे प्रमाण कमी होईल आणि पंक्चरही फार होणार नाही. सिएट चे टायर आहेत. एका परदेशी कंपनीचेही टायर आहेत. सिराझ स्ट्रीट म्हणून. कंपनीचे नाव लक्षात नाही. ते छान आहेत. एमआरएफ पेक्षा खूप चांगले.
ट्युबलेस उत्तमच. सगळीकडे चौकशी करूनच घासाघीस करूनच टायर टाकून घ्या. टायर बदलताना टायरवाल्याने व्हीलबॅलन्सिंग मोफत करून दिले पाहिजे. तसे आधीच ठरवून घ्या.
- Log in or register to post comments
- 1
- 2
- 3
- ›
- »