Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग २

क
किणकिनाट
Fri, 08/28/2015 - 11:17
🗣 114 प्रतिसाद
धाग्याच्या आधीच्या भागात प्रतिसाद शंभरहून जास्त झाल्याने नवीन भाग सुरु करत आहोत - आधीचा भाग वाचनमात्र करतो आहोत. यापुढील चर्चा इथे चालू रहावी. संपादक मंडळ.
ईतकी वर्ष आपल्या पहिल्यावहिल्या केबलला चिकटून राहिल्यावर आता डिश टि.वी. घ्यायचे म्हणतो. आम्हाला दोन जोडण्या (कनेक्क्षन्स) लागणार आहेत. टाटा स्काय का ईतर कुठला सेवा पुरवठेदार चांगला? दोन जोडण्या (कनेक्क्षन्स) साठी मासिक शुल्क दुपटिऐवजी एक आणि अर्ध्यापेक्क्षा थोडे कमी द्यायचे पॅकेज कोणि देत का? सेवा , दर्जा कोणाचा चांगला आहे. माहितगार मि.पा. कर मदत करा. महिती आणि सल्ला द्या ही विनंती.
वर्गीकरण
शंका
प्रश्न
मदत हवी

प्रतिक्रिया द्या
58709 वाचन

💬 प्रतिसाद (114)
भ
भिंगरी Sun, 04/03/2016 - 11:54 नवीन
मामाच्या गावाला जाउया हे गाणे कोणत्या सिनेमातले आहे?(जुना सिनेमा)
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sun, 04/03/2016 - 12:19 नवीन
गीत - ग. दि. माडगूळकर संगीत - वसंत पवार स्वर - आशा भोसले चित्रपट - तू सुखी रहा राग - भैरवी संदर्भ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भिंगरी
भ
भिंगरी Sun, 04/03/2016 - 12:34 नवीन
धन्यवाद पैलवानजी
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Mon, 04/04/2016 - 04:08 नवीन
एका माहितीतल्या कुटुंबातील लहान मुलावर शस्त्रक्रिया करण्याचे निदान झाले आहे . अशा कुठल्या सामाजिक संस्था आहेत ज्या खर्चामध्ये मदत करु शकतात .
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Mon, 08/15/2016 - 22:01 नवीन
परळच्या जेरबाई वाडिया हॉस्पिटलमध्ये बहुतेक लहान मुलांच्या शस्त्रक्रिया रास्त किंमतीत केल्या जातात, आणि त्यांच्या (वाडिया ट्रस्टच्या) आर्थिक मदतीचाही लाभ घेता येतो. यकृताच्या दुखण्यासाठी शस्त्रक्रिया असेल तर या संस्थेद्वारा मदत मिळेल. अन्यत्र आर्थिक मदत बहुतेक राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेद्वारा मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि
स
सिरुसेरि Mon, 04/04/2016 - 11:37 नवीन
टिव्ही मधील सेटिंग्स मेनुमध्ये अनेक पर्याय दिलेले असतात . त्यांच्या योग्य व्हॅल्युज काय असाव्यात ? जसे की - कलर शार्पनेस , कॉन्ट्रास्ट , बॅकलाईट , ब्राईटनेस . ऑडिओ - ट्रिबलम, ब्रास , पीसीम , ऑटो , स्टिरीओ
  • Log in or register to post comments
भ
भिंगरी Mon, 08/15/2016 - 21:26 नवीन
शाळेत असताना तिरंगी झेंड्याचे एक गीत पाठ केले होते.आता त्यातील काही ओळी आठवतात्,पण सुरुवात आठवत नाही...... ये चौबीसो अरे चक्र के हम को सिखलाते सावधान चौबीसो घंटे हम में है बल भरते येवढेच आठवते. कोणाला आठवते का पुर्ण गाणे?
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Mon, 08/15/2016 - 21:47 नवीन
स्काउट गाइड झंडा गीत भारत स्काउट गाइड, झंडा ऊँचा सदा रहेगा | ऊँचा सदा रहेगा, झंडा ऊँचा सदा रहेगा | नीला रंग गगन सा विस्तृत भ्रात भाव फैलाता | त्रिदल कमल नित तीन प्रतिज्ञाओ की याद दिलाता | और चक्र कहता है प्रतिपल, आगे कदम बढ़ेगा | ऊँचा सदा रहेगा, झंडा ऊँचा सदा रहेगा | भारत स्काउट गाइड झंडा ऊँचा सदा रहेगा | ये चौबीसो अरे चक्र के हम से प्रतिपल कहते | सावधान चौबीसों घंटे हम मे है बल भरते | | तत्पर सदा रहे सेवा मे जीवन सफल बनेगा | ऊँचा० हर हित रक्षा मे हम जीवन हँस- हँस दे दे अपना | इस झंडे पर मर मिटने का है सुखदायी सपना | | सेवा का पथ दर्शक झंडा घर- घर मे फहरेगा ऊँचा० भारत स्काउट गाइड झंडा ऊँचा सदा रहेगा | |
  • Log in or register to post comments
भ
भिंगरी Fri, 08/19/2016 - 12:37 नवीन
धन्यवाद बहुगुणी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी
प
पिलीयन रायडर Mon, 08/15/2016 - 22:28 नवीन
१. अमेरिकेत मातीचा गणपती बनवायचा असेल तर माती कुठे मिळेल? मायबोलीवर मागे कधीतरी ह्यावर चर्चा आणि गणपतीचे फोटो पाहिले होते पण आता सापडत नाहीत. कुणी अमेरिकेत गणपती घरीच करतं का? २. एखाद्या व्यक्तिची ओपन हार्ट सर्जरी झाली असेल, वय - ५५, डायबेटीस असेल तर मेडिकल इन्शुरन्स होत नाही का? (हार्ट सर्जरी व्हॉल्व्ह बदलण्यासाठी झाली होती. व्हॉल्व्हचे आयुस्।य १०-१२ वर्ष सांगितले होते. सर्जरी होऊन ७ वर्ष झाली.)
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Mon, 08/15/2016 - 23:09 नवीन
एक हौशी सहकारी कागदाच्या लगद्याचा गणपती (eco friendly papier mache) करतो. अति-सुंदर वगैरे नसलेला गणपती चालणार असेल तर विचारेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Mon, 08/15/2016 - 23:24 नवीन
हो नक्की विचारा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी
V
vikramaditya गुरुवार, 09/15/2016 - 15:15 नवीन
मंडळी , मी गोरेगाव मुम्बई येथे राहतो. ऑक्टोबर च्या शेवटच्या आठवड्यामध्ये सहकुटुंब ३ दिवसांची सहल काढू म्हणतो. बेसिकली , आराम करणे आणि चांगले सामिष (मासळीचे) भोजन करणे असा कार्यक्रम असेल. जवळपास काही टुरिस्ट स्पॉट असेल तर ठीक... किंवा समुद्र किनारा असेल तर उत्तमच. वडिलांचे वय (७५) लक्षात घेता बोरिवली ते डहाणू या मध्ये एखादा रिसॉर्ट शोधत आहे. कारण फार जास्त प्रवास करू इच्छित नाही. एखादा चांगला (फॅमिली साठी) रिसॉर्ट कोणी सुचवू शकेल का? धन्यवाद.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Tue, 10/22/2019 - 04:26 नवीन
गाणी शोधण्यात मदत हवी आहे. १. छान पालखी सजवा न माझ्या राजाला मिरवा ह्या गाण्याची चाल असलेलं मूळ मराठी गाणं कोणतं ? "डोंगर", "सपान" असे शब्द त्या गाण्यात आहेत. २. अशी चिक मोत्याची माळ होती गं तीस तोळ्याची गं ह्या गाण्याची चाल असलेलं मूळ गुजराती गाणं कोणतं? सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी ऐकलं होतं आणि तेंव्हा खूप आवडलं होतं, पण आता नेमके शब्द आठवत नाहीत. रच्याक, आकाश पांघरुनी जग शांत झोपले हे हे सुमन कल्याणपुरांचे सुमधुर गीत मला परवापर्यंत माहित नव्हतं.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा