डॉ. कलबुर्गी..यांची हत्या..
https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=1&cad=rja&uact=8&ved=0CB4QqQIwAGoVChMIiPfbxL_QxwIVjG2OCh3btQKk&url=http%3A%2F%2Fwww.ibtimes.co.in%2Fkannada-scholar-dr-mm-kalburgi-shot-dead-644723&ei=Q83iVcjJLYzbuQTb64qgCg&usg=AFQjCNE_rncuIRsWQGjkLVr9yMCMN4tB8w
डॉ. नरेन्द्र दाभोळ्कर, कॉ. गोविन्द पानसरे आणि आता डॉ. कलबुर्गी यांना गोळ्या झाडुन ठार मारण्यात आले. नेमके काय चाललय?
💬 प्रतिसाद
(227)
फ
फुलथ्रॉटल जिनियस
Sun, 08/30/2015 - 11:51
नवीन
हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत,त्यातुनच पुरोगामी लोकांचे खून पडत आहेत.केंद्रात व अनेक राज्यात हिंदुत्ववादी सरकारं असल्यामुळे अश्या खूनातील आरोपींना मोकळे सोडन्याकडे कल वाढला आहे.
याला प्रत्युत्तर म्हणुन विद्रोही ,परिवर्तनवादी कार्यकर्त्यांनी हातात बंदुका घेतल्यास आश्चर्य वाटायला नको.
ल
लालगरूड
Sun, 08/30/2015 - 13:58
नवीन
हिंदुत्ववादी म्हणजे काय?
स
सुबोध खरे
Mon, 08/31/2015 - 05:36
नवीन
विद्रोही ,परिवर्तनवादी कार्यकर्त्यांनी हातात बंदुका घेतल्यास
मग नक्षलवादी, जिहादी,उल्फा, नागा बंडखोर कोण आहेत? आणि आत्ता काय ते लाटणे मोर्चा काढतात काय?
जाता जाता फुल थ्रोटल -- थ्रोटल म्हणजे ("गळा") आवळणे.
प
प्यारे१
Sun, 08/30/2015 - 12:28
नवीन
अशा भेकड हत्या करणार्या लोकांचा आणि त्यामागे जे कुणी असतील त्या सर्वांचा ती व्र नि षे ध.
ए
एस
Sun, 08/30/2015 - 12:52
नवीन
भेकड कुठले!
ड
डॉ सुहास म्हात्रे
Sun, 08/30/2015 - 13:46
नवीन
हत्येचा निषेध.
अश्या हत्यांनी काय साधले जाते कोणास ठावूक ?!
श
श्रीगुरुजी
Sun, 08/30/2015 - 14:48
नवीन
कलबुर्गी यांच्या खुनाचा निषेध! कर्नाटक सरकारने त्यांच्या खुन्यांना लवकरात लवकर पकडून न्यायालयात खेचून जास्तीत जास्त शिक्षा मिळण्याकरिता प्रयत्न करावे.
कलबुर्गी हे नाव आज आयुष्यात पहिल्यांदाच ऐकलं. हे नक्की कोण, कुठले, त्यांनी नक्की काय केलं इ. बद्दल आजतगायत कणभरही माहिती नव्हती. गुगलल्यावर खालील माहिती मिळाली आणि धक्काच बसला.
http://www.niticentral.com/2014/06/22/ur-ananthamurthy-should-leave-peoples-faith-alone-232055.html
हे स्वतःला विचारवंत, बुद्धीप्रामाण्यावादी आणि प्रागतिक विचारांचे समजले जाणारे अशी किळसवाणी आणि एका विशिष्ट समाजाच्या भावना व श्रद्धास्थाने दुखावणारी कृत्ये का करतात? अशी कृत्ये करून समाजातील मूर्तिपूजा थांबणार आहे का? इतरांच्या धार्मिक भावना दुखावून त्यांना नक्की कसले विकृत समाधान मिळाले?
जरी हे कृत्य बालवयात केले असले तरी त्याबद्दल खेद, खंत न वाटता वयाच्या उत्तरार्धात त्याबद्दल पुस्तक लिहून प्रसिद्ध करून त्यांना नक्की कसले समाधान मिळते?
अनंतमुर्तींच्या या किळसवाण्या कृत्याचा निषेध न करता जाहीर सभेत त्याचा संदर्भ देऊन कलबुर्गींनी नक्की काय मिळविले?
मूर्तीपूजा ही अंधश्रद्धा आहे हे या कृत्यातून अनंतमूर्तींना सिद्ध करायचे होते तर इतर धर्मात सुरू असणार्या मूर्तीपूजेला त्यांनी कधी अशा प्रकारे किंवा इतर कोणत्याही प्रकारे विरोध केला होता का? तसा केला नसल्यास फक्त हिंदू धर्मातील मूर्तिपूजा ही अंधश्रद्धा आणि इतर धर्मातील मूर्तिपूजा ही डोळस श्रद्धा आहे असा त्यांचा समज होता का? असेच कृत्य करण्याचे धाडस त्यांनी इतर धर्मांच्या श्रद्धास्थानांबद्दल दाखविले असते का?
मला कधी कधी वाटते की हिंदू अतिसहिष्णु असल्याने बिनदिक्कत कोणीही कसलीही कृत्ये करून सश्रद्ध समूहाच्या भावना दुखावतो आणि भावना दुखावणारा विचारवंत, बुद्धीप्रामाण्यवादी इ. विशेषणांनी गौरविला जातो.
श
श्रीगुरुजी
Sun, 08/30/2015 - 14:55
नवीन
याच संदर्भात कलबुर्गींसंदर्भात अजून माहिती मिळाली.
https://www.youtube.com/watch?v=mS5y9Asrzug
कलबुर्गींचा खून निषेधार्ह आहे. परंतु त्यांचे वरील उद्गार हे जास्त निषेधार्ह आहेत.
प
प्यारे१
Sun, 08/30/2015 - 15:07
नवीन
+११११.
तरीही हत्या समर्थनीय नाही वाटत.
म
मांत्रिक
Sun, 08/30/2015 - 18:54
नवीन
श्रीगुरुजी, योग्य प्रतिवाद.
अ
अंतरा आनंद
Mon, 08/31/2015 - 09:14
नवीन
वा तुमच्या भावना या एखाद्याच्या रक्तापेक्षा जास्त बहुमोल आहेत असं मानता यातच सर्व आलं उगाच तोंडदेखला निषेध तरी का करता?
प
प्यारे१
Mon, 08/31/2015 - 09:27
नवीन
किंचित असहमत.
बर्याचदा आपण १० रुपयासाठी खून, जेवणात मीठ कमी पडलं किंवा जास्त पडलं म्हणून खून, अमुक एक गोष्ट ऐकली नाही म्हणून खून वगैरे ऐकतो, वाचतो. यात या सगळ्या क्षुल्लक गोष्टी रक्तापेक्षा जास्त मोलाच्या असतात असं मानायचं असतं का? भावना तीव्र च असतात. त्या शब्दांद्वारे व्यक्त झाल्यावर प्रतिक्रिया (कौटुंबिक वादात बहुतेक वेळा ती 'पति'क्रिया असते) म्हणून खून होतात.
ध्वजासाठी जीवाची आहुति वगैरे देणारे, आई वडलांना अपशब्द बोलले म्हणून हाणामार्या करणारे, घराण्याबद्दल काही बोललं म्हणून डोकं फोडणारे यांच्याबद्दल काय बोलता येईल? एखाद्याला माणसावर मूत्रविसर्जन करण्याची भाषा करणार्या व्यक्तीचं किंवा तिला समर्थन देणार्या व्यक्तीचं समर्थन होऊ शकतं का? बहुतेक ९९.९% नाही. त्या व्यक्तीबद्दल घृणा च वाटेल. मग जी बहुसंख्यांची श्रद्धास्थानं आहेत त्याबाबत अशी भाषा का?
याशिवाय ज्या गोष्टीमुळं दुसर्या व्यक्तीला नंतरची कृती करायला उद्युक्त केलं जातं त्या गोष्टीचा निषेध अधिक प्रमाणावर आणि अधिक तीव्रतेनं केला जायलाच हवा.
श
श्रीगुरुजी
Mon, 08/31/2015 - 10:15
नवीन
+१
भ
भृशुंडी
Sun, 08/30/2015 - 19:50
नवीन
एक तांत्रिक कुतूहल आहे- कुठल्या सर्च टर्मसाठी गुगलल्यावर पहिल्या १० लिंक्स/ सर्च रिझल्ट niticentral कडे घेऊन जातात?
हे कळेल का?
आता आणखी एका लिंकनुसार -
.
विधान केलं अनंतमूर्तींनी, त्यातही आपल्या बालपणीच्या प्रयोगांबद्दल, त्याचा उल्लेख केला कलबुर्गींनी- आणि त्याचा विपरीत रेफरन्स घेऊन, हा बादरायण संबंध जोडून डायरेक्ट "विचारवंत, बुद्धीप्रामाण्यवादी मंडळी असं का करतात" असं generalization करून टाकता आहात. ही सरासर दिशाभूल आहे.
.
@भावना दुखावणे, इतर धर्मीय वगैरे - त्यांना आपल्या धर्माबद्दल काही बोलायचं असेल, तो त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. प्रत्येकाने तुम्हाला हव्या त्या धर्मातल्या त्रुटींबद्दल बोलायला हवं का? उठसूठ कुठल्याही विषयावर बोलल्याने धार्मिक भावना भडकणार असं म्हटलं, की मग काही करायलाच नको. बरं, दुखावल्या धार्मिक भावना, तर लगेच दारावर टकटक करून गोळ्याच घालून टाकायच्या! अधे मधे काहीच नाही? सुंदर. आवडली ही मेथडॉलॉजी आपल्याला, आणि ह्याचं अप्रत्यक्षरित्या समर्थन करणारे तुम्ही ( "खुनापे़क्षा विधान करणं हे जास्त निषिद्ध आहे") आणि तुमचा सहिष्णु धर्म, राईट?
.
मेळ बसत नाही ह्या सगळ्याचा.
श
श्रीगुरुजी
Mon, 08/31/2015 - 10:25
नवीन
अनंतमूर्तींनी बालवयात घृणास्पद कृती केली. ती कृती न कळत्या बालवयातील केलेली कृती म्हणून कदाचित हलकेपणाने घेता येईल. परंतु नंतर मोठेपणी, कळत्या वयात आपल्या घॄणास्पद कृतीबद्दल त्यांना आयुष्यात कधीही खंत, खेद वाटला नाही. उलट वयाची साठी उलटल्यानंतर एक लेख लिहून त्यात कृतीचे वर्णन करून समर्थन केले. कलबुर्गींनी सुद्धा २०१४ मध्ये वयाच्या ७६ व्या वर्षी त्या कृतीचे समर्थन केले.
विचारवंत, बुद्धीप्रामाण्यवादी समजल्या जाणार्यांपैकी किती जणांनी या कृतीवर टीका केली आहे? काल असे अनेक तथाकथित विचारवंत कुलबर्गींचे कौतुक करताना त्यांच्या हत्येचा निषेध करीत होते. त्यांच्या हत्येचा निषेध करताना हिंदू देवतांच्या मूर्तीवर लघवी करण्याचे समर्थन करणार्या त्यांच्या वक्तव्याचा का निषेध केला नाही? असले बहुसंख्य तथाकथित विचारवंत असे वागत असल्यावर आपोआप generalization होणारच.
श
श्रीगुरुजी
Mon, 08/31/2015 - 10:47
नवीन
अभ्यासाचा विषय असेल तर कोण विरोध करेल? परंतु देवतेच्या मूर्तीवर असले घृणास्पद कृत्य करून त्याचे नंतर समर्थन करणे योग्य आहे का? असे कृत्य म्हणजे उठसूठ कुठल्याही विषयावर बोलणे नाही. हे अत्यंत घृणास्पद आणि एका विशिष्ट धर्मियांच्या श्रद्धास्थानावर आघात करणारे कृत्य आहे.
मी गोळ्या घालण्याचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष समर्थन केलेले नाही. निषेधच केलेला आहे. परंतु माझ्या दृष्टीने आधी केलेले घॄणास्पद कृत्य हे नक्कीच जास्त निषेधार्ह आहे.
श
श्रीगुरुजी
Sun, 08/30/2015 - 15:00
नवीन
अनंतमूर्तींना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला होता. कलबुर्गींना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. सध्या जगातील प्रत्येक विषयावर वाटेल ते बरळणारे नेमाडे यांना देखील ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे.
या मानाच्या पुरस्काराकरिता अशा व्यक्ती निवडणार्यांची कीव आली.
श
श्रीगुरुजी
Sun, 08/30/2015 - 15:26
नवीन
https://en.wikipedia.org/wiki/M._M._Kalburgi
विकीवरून अजून माहिती मिळाली. लिंगायत समाजाचे संस्थापक बसवेश्वर यांच्या संदर्भातही कलबुर्गींनी वादग्रस्त विधाने केलेली दिसतात.
व
विनोद१८
Sun, 08/30/2015 - 20:15
नवीन
याचा काही सबळ पुरावा आहे का ??? हाती असल्यास तो हातोहात समोर ठेवावा, म्हणजे अभ्यासणे सोपे होईल.
श
श्रीगुरुजी
Mon, 08/31/2015 - 10:58
नवीन
लिंगायत हा हिंदुधर्माचाच एक भाग आहे. तो वेगळा धर्म नाही. ही ५ जानेवारी २०१५ ची लिंक बघा.
http://www.newindianexpress.com/states/karnataka/%E2%80%98Lingayats-Are-Not-Hindus%E2%80%99/2015/01/05/article2604482.ece
त्यातील काही वाक्ये -
Lingayat is an independent religion with its own culture, tradition and a sacred book, said Vishwa Lingayat Mahasabha national president Sanjay Makal.
Makal said if Lingayat becomes an independent religion, it would get Central government aid up to `300 crore, which can be used to uplift the community and the religion would get global recognition.
Expressing anguish over the status of Lingayats in Hinduism, he said: “Hindus consider us as shudras even though we follow Brahminic tradition.
लिंगायत हा वेगळा धर्म असल्याची कायदेशीर घोषणा केंद्र सरकारने करावी अशी गेल्या १०-१२ वर्षांपासून काही लिंगायत नागरिकांनी मागणी केली आहे. परंतु लिंगायत समाजात या मागणीला संपूर्ण पाठिंबा नाही. ऑक्टोबर २०१३ या दिवसी टाईम्स ऑफ इंडिया मध्ये याबद्दल एक बातमी आली आहे.
http://timesofindia.indiatimes.com/city/bengaluru/Lingayats-renew-demand-for-separate-religion/articleshow/23846654.cms
The All India Veerashaiva Mahasabha president and senior Karnataka minister Shamnur Shivashankarappa is lobbying at the Centre to seek 'religious minority' status for Lingayats by seeking a separate identity from Hinduism. But there don't seem to be many takers for this within the community.
The demand has been kept alive for the past decade by some Lingayat leaders, most of whom happen to be the Mahasabha's office-bearers. During the last census in 2011, the proponents for delinking Veerashaiva from Hinduism exhorted their community members to opt for the 'Other' in the column for religion during enumeration.
अ
अर्धवटराव
Sun, 08/30/2015 - 16:50
नवीन
निवडणुक जींकता येत नसेल तर असे बळी घेऊन विरोधकांना बदनाम करण्याचा प्रयत्न करायचा? हद्द झाली नालायकपणाची.
क
कवितानागेश
Mon, 08/31/2015 - 08:35
नवीन
.
ब
बोका-ए-आझम
Sun, 08/30/2015 - 16:57
नवीन
चार्ली हेब्दोवर मुस्लिम मूलतत्ववाद्यांनी हल्ला केला आणि तिथल्या लोकांना मारलं तेव्हा धर्माची कुचेष्टा करणं वाईटच. त्याचाच हा परिणाम आहे अशी एक प्रतिक्रिया वाचली होती. इथे फक्त धर्म बदलले आहेत. शिवाय स्वघोषित आरामखुर्चीतले न्यायाधीश काहीही पुरावा सापडलेला नसताना हिंदुत्ववादी संघटनांवर खापर फोडून मोकळे झालेले आहेत. एकूण काय तर इस्लामी धर्मांधांनी घेतलेला सूड समर्थनीय आहे आणि इथे कोणताही पुरावा नसताना हिंदू बॅशिंग चालू झालेले आहे. शिवाय वैयक्तिक टीकासुद्धा. टाका टाका, अजून आपापल्या मतांच्या पिंका टाका. असं करण्याचे किती पैसे मिळतात ते विचारलं तर लगेच व्यक्तिगत टीका वगैरे म्हटलं जाईल आणि स्वतःची तथाकथित धर्मनिरपेक्ष बडबड सोयीस्कररीत्या विसरली जाईल. दुस-याकडे आरोपाचं एक बोट रोखलेलं असताना बाकीची तीन बोटं स्वतःकडे रोखलेली असतात हे जेव्हा लक्षात येईल तो सुदिन. बाकी चालू द्या.
म
मांत्रिक
Sun, 08/30/2015 - 17:03
नवीन
सहमत बोकोबा.
श
श्रीगुरुजी
Sun, 08/30/2015 - 18:56
नवीन
अनंतमूर्ती किंवा कलबुर्गी यांना विचारवंत म्हणणार्यांची कीव येते. एखाद्या विचाराला किंवा कृतीला आपला विरोध असेल तर फक्त सेलेक्टिव्ह विरोध करायचा (म्हणजे हिंदू सोडून इतर धर्मातील मूर्तिपूजेविरूद्ध यांची तोंडातून ब्र काढायची हिम्मत नव्हती आणि ज्या ठराविक ग्रुपला विरोध करायचा त्यांच्या श्रद्धास्थानावर लघवी करण्याचे समर्थन करायचे.
हे म्हणे विचारवंत! हे तर खरे अविचारीच आहेत.
म
मांत्रिक
Sun, 08/30/2015 - 19:09
नवीन
अविचारी फक्त? इथे तिथे पाय वर करणारे श्वानवर्गीय म्हणा!
भ
भृशुंडी
Sun, 08/30/2015 - 19:26
नवीन
श्रीगुरूजी,
प्रतिसादांतून मताच्या पिंका टाकून आपला विरोध दाखवून देण्यात काहीच हशील नाही.
बरं, विरोध असला तरी तो एका किमान सभ्यतेच्या पातळीवर केला, तर हरकत नाही. पण आपल्या प्रतिक्रियांतून जी काही असभ्य आणि हेतूपुरस्सर टीका दिसून येते, ती किमान पातळी सोडून होते आहे, हे लक्षात घ्या.
तेव्हा विषयाशी संबंध नसलेल्या अनंतमूर्तींना वगळू. आता कलबुर्गींना नक्की काय विरोध आहे, त्यांच्या कुठल्या मुद्द्यांवर आक्षेप आहेत आणि त्यावर काय प्रतिवाद आहेत ते मांडा.
पण अमुक ह्यांना विचारवंत म्हणू नये, तमक्याची कीव येते, इतर धर्मांवर का टीका नाही केली- ह्या नेहेमीच्याच दिशाभूल करणार्या वाक्यांना टाळलंत तर बरं होईल, कारण वडाची साल पिंपळाला लावण्यार्या ह्या प्रतिक्रिया कुठल्याही मुद्द्यावर दिसतातच. (पहा-पीके!)
---
आणि मी डू आयडी आहे का वगैरे फालतू मुद्द्यांवर न आलेलंच बरं. नेहेमी वाचक मोडमधे असलो तरी असल्या प्रतिसादाला उत्तर दिल्यावाचून रहावलं नाही.
थँक्यू.
श
श्रीगुरुजी
Mon, 08/31/2015 - 11:05
नवीन
"देवतांच्या मूर्तीवर लघवी करणे चुकीचे नाही" असे कलबुर्गींनी २०१४ मध्ये जाहीररित्या सांगितले होते. त्यांच्या या विचारसरणीला विरोध व आक्षेप आहे.
जर तुम्ही एका विशिष्ट धर्मातल्या एका विशिष्ट कृतीला अत्यंत खालच्या पातळीची कृती करून विरोध करता आणि अशा घॄणास्पद कृतीचे समर्थन करता आणि त्याचवेळी इतर धर्मातील अगदी तशाच कृतीबद्दल तोंडातून विरोधाचा चकार शब्दही काढत नाही तेव्हा त्यांच्यावर टीका होणारच.
देवीच्या जत्रेत कोंबड्या-बकर्यांचे बळी द्यायच्या कृतीला विरोध आणि इदच्या दिवशी कापल्या जाणार्या बकर्यांच्या बाबतीत मात्र मौन, असे सेलेक्टिव्ह बॅशिंग केल्यावर टीका होणारच.
अ
अंतरा आनंद
Mon, 08/31/2015 - 09:19
नवीन
नका म्हणू त्यांना विचारवंत पण स्वतःच्या घरातली घाण दाखवल्यावर समोरच्याच्या घराकडे बोट दाखवता का? का त्याहीपलीकडे जाउन दुसर्^याच्या घरातली घाण हा आदर्श मानून आपलं घरही तितकं घाण करण्याच्या पाठी लागता का ?
श
श्रीगुरुजी
Mon, 08/31/2015 - 11:08
नवीन
आपल्या आवडत्या दैवतांच्या मूर्तीची पूजा ही स्वतःच्या घरातली घाण कधीपासून झाली? आणि ज्यांना मूर्तीपूजा घाण वाटते त्यांनी विरोधाच्या नावाखाली थेट मूर्तीवरच घाण करायची आणि त्याचे समर्थन करायचे? हे योग्य वाटते का?
अ
अंतरा आनंद
Tue, 09/01/2015 - 07:34
नवीन
याबद्द्ल बोलतेय मी .
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 09/01/2015 - 09:08
नवीन
अंतरा आनन्द यांच्या प्रतिसादाशी सहमत आहे.
-दिलीप बिरुटे
D
dadadarekar
Sun, 08/30/2015 - 19:42
नवीन
मुरतीपुजेचा विरोध हा गुन्हा आहे ?
आर्यसमाज हेच म्हणत होता ना ? आर्यसमाज्म्हणजे ते पिंडीवर उंदीर चढलेला पाहून पुजा वगैरे सोडुन दिलि ते.
न तस्य प्रतिमा अस्ति यस्यनाममहद् यशः
क
काळा पहाड
Sun, 08/30/2015 - 21:11
नवीन
अजिबात गुन्हा नाही. तो एका धर्माचा प्रेषित नव्हता का मूर्तीपूजेला विरोध करत, ६ वर्षाच्या बालिकेशी लग्न लावताना? आणि कुमारी नसणार्या कुमारी मातेचे पुतळे लावतातच ना त्यांच्या धर्मस्थानात. कसा असेल गुन्हा? हां आता एखाद्या अतिरेकी विचाराच्या माणसाचं डोकं फिरलं आणि घातल्या त्यानं गोळ्या तर तो धर्माशी संबंधित विषय थोडाच असेल?
D
dadadarekar
Mon, 08/31/2015 - 02:39
नवीन
कुंती , सत्यवती यांना एकेक पुत्र होऊनही त्यांचं कौमार्य शाबूत होतं ना ? तुमच्या पुस्तकात असा चमत्कार होऊ शकतो , तर इतर धर्मांतील स्त्रीयानाही असे अनुभव येऊ शकतात ना ?
ब
बोका-ए-आझम
Mon, 08/31/2015 - 05:06
नवीन
४०००-५००० वर्षांपूर्वी स्त्रियांच्या कौमार्याची. एवढं महाभारत वाचूनसुद्धा त्यातलं लक्षात काय राहिलं तर हे. यावरून मेंदू कुठे आहे आणि काय विचार करतोय हे समजतंय. बाकी चालू द्या.
D
dadadarekar
Mon, 08/31/2015 - 06:19
नवीन
दोन हजार वर्षे मागे त्यांची बुद्ध्ही गेली.
मg मी माझीही बुद्ध्ही अजुन दोन हजार वर्षे मागे नेली.
त्यांची बुद्धी युरोपच्या टूरवर चालली होती.
मी त्या बुद्धीला कुरुक्षेत्रावर नेऊन सोडली.
क
काळा पहाड
Mon, 08/31/2015 - 07:13
नवीन
चित भी मेरी पट भी मेरा असं होत नस्तं ना भौ. तुम्ही हिंदू धर्मातल्या गोष्टींवर आडून आडून हल्ले करणार, तुमची बुद्धी मागल्या शतकात किंवा त्यापूर्वी तुमच्या सोयीप्रमाणं नेणार आणि आम्ही बुद्धी याच शतकात ठेवायची? अजून पुरेसा मैदानातसुद्धा आलेलो नाही तर चार हजार वर्षापूर्वीचे साहित्य गोळा करायची तुमची धडपड. अभी तो पिक्चर बाकी है मेरे दोस्त.
ब
बोका-ए-आझम
Sun, 08/30/2015 - 21:54
नवीन
हा अजिबात गुन्हा नाही. पण तो व्यवस्थित आणि रीतसर पद्धतीनेही करता येतो. जसा आर्यसमाजाने केलेला आहे. प्रक्षोभक भाषा वापरल्याशिवाय विरोध करताच येत नाही अशी ज्यांची समजूत आहे आणि मूर्तिपूजेमागचं कारण जाणून न घेता जे विरोध करतात त्यांच्याबद्दल काय बोलावे? आणि मूर्तिपूजेला विरोध हा मुद्दाच नाहीये. मुद्दा हा आहे की जर तो तसा असेल तर इतर धर्मांमध्ये जी मूर्तिपूजा होते तिचाही हे विचारवंत विरोध करतात का? जर विरोध आहे तर सगळ्याच धर्मांमधल्या मूर्तिपूजेला हवा. Selective विरोध हा दांभिकपणा आहे.
D
dadadarekar
Mon, 08/31/2015 - 02:42
नवीन
सिलेक्टिव्ह हे गोड लेबल लावून स्वतःचा तांत्रिकदृष्ट्या बचाव करणे हा जास्ती मोठा दांभिकपणा आहे.
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 08/31/2015 - 04:14
नवीन
एकाच व्यक्तीने सर्वच धर्माच्या अनिष्ट गोष्टींना विरोध केला पाहिजे असं काही असतं का ? लिंगायत धर्म तसा पुरोगामी धर्म त्याच्यातही न पटणा-या गोष्टी असतील असा समाज धर्मांधतेच्या विळख्यात जात असतील आणि आजच्या काळात तो विचार कालबाह्य असेल तर त्याबद्दल मत मांड्णं, अनिष्ट गोष्टी चालत असतील तर त्याला विरोध केला म्हणुन कोणाची हत्या करणार का ?
-दिलीप बिरुटे
ब
बोका-ए-आझम
Mon, 08/31/2015 - 05:28
नवीन
अधिकृतरीत्या म्हणजे सरकारी नियमांनुसार लिंगायत हा वेगळा धर्म मानला जातो का यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा. त्याचा उल्लेख पंथ असा ऐकलेला आहे. धार्मिक अल्पसंख्यांकांमध्ये मुस्लिम,शीख,ख्रिश्चन, बौद्ध, जैन आणि पारशी यांचाच समावेश होतो. लिंगायत हा शब्द त्यात नाहीये. तस्मात् जाणकारांनी सांगावे.
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 08/31/2015 - 07:11
नवीन
लिंगायत पंथच आहे धर्म नाही..
-दिलीप बिरुटे
स
सुबोध खरे
Mon, 08/31/2015 - 05:55
नवीन
प्राध्यापक साहेब
कलबुर्गीनि समर्थन केलेली किंवा अनंत मूर्तींनी केलेली गोष्ट सर्वथैव त्याज्य आहे. मूर्ती हे एक प्रतिक असते आपल्या श्रद्धेचे. आपल्या श्रद्धेला तडा जाणार्री गोष्ट कुणी केली तर ती पटणार नाही. मी बलदंड असेन तर मी कुणाच्या आईवर मुत्र विसर्जन किंवा बापावर थुंकलेले चालेल का( येथे धर्माचा संबंध नाही) केवळ ते प्रतिवाद करू शकत नाहीत म्हणून असे करणे समर्थनीय होऊ शकेल का ?
मग लोकांच्या श्रद्धास्थानाला हीन धक्का लावण्यात काय हशील आहे.प्रत्येक धर्मात हीन गोष्टी आहेतच. म्हणून त्याचा प्रतिवाद हा विचारानेच करणे आवश्यक आहे. ख्रिस्ताच्या किंवा बुद्धाच्या मूर्तीवर किंवा कुराणावर किंवा एखाद्याने अगदी शेंदूर फासून उभा केलेला देव असेल तरी त्यावर मुत्र विसर्जन हे कृत्य समर्थनीय कसे ठरेल. मग अनंत्मुर्तींचे किंवा कल्बुर्गींचे कृत्य आपण समर्थनीय कसे ठरवणार?
अर्थात म्हणून त्यांची हत्या करणे हे कुठल्याहि अर्थाने समर्थनीय नाही आणि तो गुन्हाच आहे आणि त्याला शिक्षा झालीच पाहिजे. त्यांच्या( अनंत मूर्ती किंवा कलबुर्गी) या आचरट कृत्याचा प्रतिवाद हत्येने करणे सर्वथैव चूक आहे. (त्यांच्या तोंडाला काळे फासणे इ. कृत्य कदाचित समर्थनीय असू शकेल). पण त्याचबरोबर त्यांचे कृत्य समर्थनीय हि नाही.
आपल्याला एखाद्या १५ वर्षाच्या मुलाने आईवरून अत्यंत घाण शिवी दिली तर आपण त्याच्याशी प्रतिवाद करता का ताबडतोब त्याच्या श्रीमुखात भडकावता? मी आपणास हा प्रश्न आपण सुशिक्षित आणि विचारवंत( प्राध्यापक) म्हणून विचारतो आहे.
ग
गॅरी ट्रुमन
Mon, 08/31/2015 - 07:02
नवीन
+१०००००. याविषयी विवेकानंदांची वाचलेली एक गोष्ट आठवते.कुठल्याशा संस्थानाच्या प्रधानाने विवेकानंदांना मूर्तीपुजेविषयी प्रश्न विचारला.प्रधान म्हणत होता की मूर्ती तर दगड असते.त्यात थोडी देव असतो?विवेकानंदांना त्याच खोलीत लावलेली त्या संस्थानच्या राजाची तसबीर दिसली.त्यांनी त्या प्रधानाला त्या तसबीरीवर थुंकायला सांगितले.त्यावर प्रधान म्हणाला--अहो स्वामीजी मी असे कसे करू? राजे तर माझे अन्नदाता आहेत. त्यावर विवेकानंद हसून म्हणाले की ती तर तुमच्या अन्नदात्याची तसबीर आहे.तुमचे अन्नदाते तर वेगळेच आहेत!! यातून विवेकानंदांना नक्की काय म्हणायचे आहे हे प्रधानाला समजलेच.
आजही राष्ट्रध्वजाला वंदनीय का मानले जाते?ते तर एक कापडच असते.राष्ट्रध्वज जाळणे हा कायद्याने गुन्हा आहे. तो का? स्वातंत्र्यलढ्यातही गोळ्या खाऊनही जीवाचा आटापिटा करून ध्वज सांभाळायचा प्रयत्न स्वातंत्र्यसैनिकांनी कसा केला याच्या गोष्टी आपण सगळ्यांनीच ऐकलेल्या आहेत.
मूर्तीपुजेत आणि या गोष्टींमध्ये नक्की काय फरक आहे?
ब
बोका-ए-आझम
Mon, 08/31/2015 - 07:32
नवीन
सहमत. आणि पुरोगामी डावे मार्क्सचे, लेनिनचे झालंच तर मानवेंद्रनाथ राॅय यांचे विचार मानतात. समाजवादी लोहियांना मानतात. त्यांच्या विचारांमध्ये जरा बदल करण्याचा प्रयत्न केला तरी त्या माणसाची revisionist म्हणून निर्भर्त्सना करतात. ही पोथिनिष्ठा मूर्तिपूजेसारखीच आहे. तात्विक दृष्ट्या काहीच फरक वाटत नाही. स्कवतःला पुरोगामी म्हणवणारे कम्युनिस्ट त्यांच्या विळ्याकोयत्याच्या प्रतिकाबाबत, चे ग्वेव्हाराच्या त्या प्रसिद्ध फोटोबाबत टोकाचे आग्रही असतात. बरं, त्यांचा सलाम लालच का असतो? हिरवा, पिवळा, काळा वगैरे का नसतो? हीसुद्धा मूर्तिपूजाच आहे. कलबर्गींनीही तसं म्हटलं तर मूर्तिपूजाच केली - फक्त देवाऐवजी अनंतमूर्ती होते, एवढाच फरक आहे.
क
कैलासवासी सोन्याबापु
Mon, 08/31/2015 - 07:42
नवीन
१०००+,
भारतीय कम्युनिज्म यझ आहे
ग
गॅरी ट्रुमन
Mon, 08/31/2015 - 07:57
नवीन
यातील भारतीय हा शब्द काढला तरी या वाक्याचा अर्थ बदलणार नाही :)
क
कैलासवासी सोन्याबापु
Mon, 08/31/2015 - 08:24
नवीन
दादा बाहेरील कम्युनिज्म चा बेसिक अन काही क्रोनोलॉजी सोडता काही अभ्यास नाही तस्मात् ज्याचा अभ्यास तितकेच बोललो!! :)
म
मदनबाण
Mon, 08/31/2015 - 12:10
नवीन
हत्येचा निशेध...
बाकी, डॉक तुमचा प्रतिसाद वाचल्यावर क्षणभर मला माझाच एक जुना प्रतिसाद आठवला !
मदनबाण.....
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- ›
- »