एक काली-पिली कविता
सकाळ-संध्याकाळ फेसबुकवर किंवा इतरत्र स्वतःच्या कित्येक कविता, चित्र, लेख प्रसवणार्या आणि स्वतः अनन्यसाधारण कलाकार असल्याचा साक्षात्कार झालेल्या फेसबुकी प्रतिभावंतांना सविनय अर्पण!
आपल्या दिव्य प्रतिभेची गिरणी अशीच अविरत, अहोरात्र चालू द्या! काल्या-पिल्या जनतेला गिरणीच्या धुराने खोकला आला तरी बेहत्तर, माघार घेऊ नका....
अजून एक - take it with a pinch of salt, don't read too much into it!
तर, सादर आहे -
एक काली-पिली कविता
काळी पँट, पिवळा शर्ट
आमच्या गल्लीत, आम्हीच फ्लर्ट
काळा रस्ता, पिवळा बहावा
इझमचा भार, आम्हीच वहावा
काळे आकाश, पिवळे तारे
व्हॅन गॉग कळला, आम्हालाच बरे!
काळी शिळा, पिवळी फुले
कलेला शोभा, आमच्यामुळे!
काळी रात, पिवळी सहर
अशीच शायरी, आमची लहर
काळी वॉल, पिवळे डिझाईन
स्नॉबीश गप्पा, साथीला वाईन
काळी गुपिते, पिवळे पत्रकार
ह्यांच्या मासिकात, आम्हीच चित्रकार
काळी मोहरी, पिवळा बहर
खाण्या-पिण्यात, आमचाच कहर
काळी कावीळ, पिवळी नजर
आमचा कंपू, आमचाच गजर
काळी विहीर, पिवळा बेडूक
आमची गंमत, डुबुक-डुबुक
काळ्या रंगाशिवाय, पिवळा व्यर्थ
मनिषशी बोलण्यात, काय अर्थ?
~ मनिष (३१/८/२०१५)
आणि तत्सम वर्गाची काळी होईपर्यंत पि(व)ळलीय अगदी.
याच प्रवर्गात ढ्कलंपंची कुक्कुट दिशादर्शकही येतात त्यांच्यावर येऊद्या पुढील भाग. आपलाच थोबाडासमोर (खरे) पुस्तक धरणारा नम्र नाखु