चेहरे
आश्वासनास भुलले चेहरे
काळोख पीत निजले चेहरे
हातात आंधळ्यांच्या, बंदुका..
रक्तात हाय, भिजले चेहरे!
त्यांची नज़र ढगांना बोचली
अन् वावरात रडले चेहरे
मी कळवळून गातो मर्सिया
अन् दाद देत बसले चेहरे
लिहतोस तू कुणासाठी गझल
त्यांचे कधीच थिजले चेहरे
----------------------------
आणि जाताजाता ग़ालिबच्या एका शेराचा अनुवाद:-
सगळेच काय दडले चेहरे?
काही फुलांत दिसले चेहरे
मातीत काय शोधीशी अता?
झाले विलीन, लपले चेहरे
मूळ शेर :-
सब कहाँ, कुछ लाल:-ओ-गुल में नुमायाँ हो गईं
ख़ाक में क्या सूरतें होंगी, कि पिन्हाँ हो गई
💬 प्रतिसाद
(7)
ए
एक एकटा एकटाच
Mon, 08/31/2015 - 13:40
नवीन
मस्त
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Mon, 08/31/2015 - 19:32
नवीन
अप्रतिम हो स्वामीजी..! __/\__
- Log in or register to post comments
प
पथिक
Tue, 09/01/2015 - 04:48
नवीन
वा! मस्तच!
- Log in or register to post comments
क
कहर
Tue, 09/01/2015 - 07:29
नवीन
मर्सिया ??
- Log in or register to post comments
स
संजय पाटिल
Tue, 09/01/2015 - 08:51
नवीन
एक उर्दु शायरिचा प्रकार आहे!!
- Log in or register to post comments
स
स्वामी संकेतानंद
Tue, 09/01/2015 - 10:10
नवीन
मर्सिया म्हणजे विलापगीत. एखाद्याच्या मृत्यूवर शोक व्यक्त करायला लिहीलेली कविता म्हणजे मर्सिया. मूलतः मर्सिया हुसैनच्या शहादतवर(कर्बलाच्या लढाईत शहीद झालेले) रचल्या जाणार्या रचनांना म्हणतात.
- Log in or register to post comments
श
शब्दवेडी
Tue, 09/01/2015 - 09:18
नवीन
खूप सुन्दर :)
- Log in or register to post comments