Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सलामी

ज — जव्हेरगंज, Mon, 08/31/2015 - 18:21
अगं, कसली तुझी ती स्वप्नांची गाठोडी, कसल्या तुझ्या त्या शब्दबंबाळ राती, कसली तुझी ती आठवणींची नाती, मी कधीच पाचोळ्यात भिरकावली होती. नुकत्याच वाहुन गेलेल्या तपाला, ही एक माजुरडी सलामी होती. मी उदास होतो, हताश होतो, निष्प्रभ प्रांगणात , माझे दु:ख उगाळून घेतो. तुझ्या डोळ्यांतील चांदणे, मी टिपांत गाळून टाकतो. चाललेल्या या विषण्ण तपाला, ही एक टोचरी सलामी देतो. तुझ्या स्वप्नांचे शिंतोडे, घरादारात हुंदडत राहो. तुझ्या अल्लड रातींची पाखरे, आभाळभर उडत राहो. तुझ्या वैराग्याच्या खपल्या, रानोमाळी झरून जावो. येणाऱ्या आव्हानी तपांना, ही सलामी जिव्हारी जावो.

प्रतिक्रिया द्या
2798 वाचन

💬 प्रतिसाद (8)
ए
एस Mon, 08/31/2015 - 19:00 नवीन
वेल, वेल, वेल! भारी आहे ही सलामी. आवडेश.
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Mon, 08/31/2015 - 19:17 नवीन
धन्यवाद स्वॅप्स...!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ए
एक एकटा एकटाच Mon, 08/31/2015 - 19:21 नवीन
मस्तच तुमच्या सलामी ला आमचा "सलाम" .....
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Mon, 08/31/2015 - 19:32 नवीन
थैक्स...! आमच्या 'सलामीला' तुमच्या 'सलामाने' अश्या अनेक 'सलाम्या' टाकण्याचा हुरुप येतो..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक एकटा एकटाच
र
रातराणी Tue, 09/01/2015 - 07:29 नवीन
आवडली कविता. :) जिव्हारी लागणे असा प्रयोग माहिती होता. जिव्हारी जावो ऑफ बीट वाटतंय. ( राहावल नाही म्हणून सांगितलं, राग मानू नका. )
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Tue, 09/01/2015 - 07:48 नवीन
नोप्स, राग कशाला मानू हो..! जसं आपण एखाद्दाल्या म्हणतो, दिवस आनंदात जावो,(किंवा दु:खात जावो), तसचं जिव्हारी जावो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी
प
प्रसाद गोडबोले Tue, 09/01/2015 - 18:11 नवीन
वाह ! छान ! ही घ्या आमच्या तर्फे तुम्हाला एक सलामी Image removed. =))
  • Log in or register to post comments
न
नाखु गुरुवार, 09/03/2015 - 11:56 नवीन
जाव कुठ खफवर "दमामी" इकडं सलामी. कवीता बेष्ट !!!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा