भारतात वृद्धाश्रम वाढत आहेत.
आपल्या भारत देशातील वृद्धांची अवस्था बघुन मन भरून येते. मागच्या काही वर्षापासून आपल्या देशात वेगाने वृद्धाश्रमांची संख्या वाढते आहे. भारता सारख्या देशात जिथे आई-वडिलांना देवासारखे समजले जाते, तिथे अशा प्रकारची वागणुक बघुन मन अस्वस्थ होते. खरच आपण इतके पुढारलेले आहोत का आज आई-वडिल आपल्याला जड होत आहेत.
ज्या घरात त्यांनी आपल्या रक्ताचे पाणी केलेले असते त्याच घराच्या एका कोपर्यात त्यांना पडलेले पाहून मन दु:खी होते. आई-वडिल अशी आशा करतात की त्यांची मुले म्हातरपणी त्यांचा आधार होतील. वृद्धांना स्वाभीमानाने फक्त दोन वेळचे जेवण व मुलांचे प्रेम पाहिजे असते.
प्रत्येक मुलांनी हा विचार करावा ज्यांनी मुलांच्या सुखाकरता आपले पुर्ण आयुष्य घालवले. त्यांच्यासाठी थोडा वेळ द्यावा. त्यांच्यावर वृद्धाश्रमात जाण्याची वेळ येऊ देवू नये.
💬 प्रतिसाद
(159)
ए
एस
Wed, 09/02/2015 - 09:07
नवीन
मिपावर माबोसारख्या धाग्यांचे प्रमाण वाढत आहे.
- Log in or register to post comments
न
नाखु
Wed, 09/02/2015 - 09:27
नवीन
दौर था (कवीतांका) य भी एक दौर है !!!
दुपारचे १२.४० झाले आहेत ऐकू यात सुमधूर गीत "ये दुनीया ये महफिल.."
आप्कीफर्माइश नाखु
- Log in or register to post comments
G
gogglya
गुरुवार, 09/03/2015 - 12:17
नवीन
कहर कौमेंट आहे ही.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Wed, 09/02/2015 - 12:19
नवीन
वारलो की राव हसून हसून
- Log in or register to post comments
द
द-बाहुबली
Wed, 09/02/2015 - 09:13
नवीन
वानप्रस्थाश्रम स्विकारायची इछ्चा नसलेल्यांची हीच गत होणार.. म्हातरपणी स्वतःच्या अथवा मुलाच्या घरात रहावे असे नक्किच आपली प्राचिन संस्कृती बोलत नाही.
अहो मोठमोठे राजे लोक वयं झाली की सर्वत्याग करुन वानप्रस्थी होत असत...
- Log in or register to post comments
च
चैतन्य ईन्या
Wed, 09/02/2015 - 10:43
नवीन
टंकनश्रम वाचवल्या बद्दल धन्यवाद. इथे जी लोक ५०-६० व्या वर्षीच देवाघरी/अल्लाला प्र्यार/कैलासवासी वगैरे होत असत ते आता सहज ८०-९० वर्षे जगत आहेत. जरा सारासार विचार करायला शिका कि उगाचच आपले सगळ्या ठिकाणी धर्म बुडाला आणि काय हि संस्कृतिचे रडगाणे. एक जन वानप्रस्थाश्रम स्विकारायला स्वतःहून पुढे येत नाही.
- Log in or register to post comments
ह
हेमंत लाटकर
Wed, 09/02/2015 - 14:15
नवीन
इथे जी लोक ५०-६० व्या वर्षीच देवाघरी/अल्लाला प्र्यार/कैलासवासी वगैरे होत असत ते आता सहज ८०-९० वर्षे जगत आहेत.
तुम्ही उलट सांगताय.आपल्या आजोबाच्या काळात जन्मलेले लोक 80-90 वर्ष जगत. आताच्या लोकांना 50 शी आली की हार्ट अॅटक होत आहेत, 65 शी आली की स्वर्गवासी होत आहेत, बायका मात्र 85-90 वर्ष पार करीत आहेत.
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
गुरुवार, 09/03/2015 - 09:57
नवीन
मग वृद्धाश्रमात कोण जातं?
पंचवीशीचे लोक?
- Log in or register to post comments
ख
खेडूत
गुरुवार, 09/03/2015 - 10:14
नवीन
हा ह हा! :)
मधे कस्काय वर आलेली ही ढकल आठवली … (याला काय कविता म्हन्टात का?)
मध्य बिंदु आला आयुष्याचा
हाफ सेंच्यूरी हा शतायुषीचा
ना इकडचे राहीलो ना तिकडचे
ना जवान ना वृद्धावस्थेकडचे
काही झालेत थोडे स्थूल, काही लठ्ठे
काही मात्र आहेत टुणटुणीत पठ्ठे
काहिंची पिल्लं गेली घरटे सोडून
काहीं अजून काढतात रात्र जागून
लागले कोणास चश्मे, कोणाला कवळ्या
कोणा कोणाला बीपी शुगरच्या गोळ्या
चेहऱ्यावर दिसू लागल्या महीन सुरकुत्या
त्या लपवण्यास करतो अतोनात खटपट्या
आता लवकरच गुडघे दुखू लागतील
काहींच्या डोळ्यात कॅटरॅक्ट पण होतील
लागेल कार्डीयाक बायपास काहींना
नी जॉइन्ट हिप जॉइन्ट रिप्लेस बाकींना
काहींना अलझायमर्स...किंवा डिमॅनशीया
बऱ्याच जणांना इनसॉमनीया वा अॅमनेशीया
सुरू होण्या पूर्वी ही शरीराची घसरण
एन्जोय करा आयुष्याचे क्षण-क्षण
छंद जोपासा..मित्र बनवा..जग सारे फिरून घ्या...
काम तर आहेच हो...स्वत:ला पण थोडा वेळ द्या...
हाफ सेंच्युयरी आलीय...स्वत:ला पण थोडा वेळ द्या...!
- Log in or register to post comments
ह
हेमंत लाटकर
गुरुवार, 09/03/2015 - 11:08
नवीन
मग वृद्धाश्रमात कोण जातं?
काही नशीबवान लोक
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 09/03/2015 - 15:39
नवीन
नै वृद्धाश्रमात जाणारे लोक्स नशिबवान असतील तर तुमच्या धाग्याच्या मुद्द्यामधे कैच प्वॉईंट र्हात नै काका. धाग्याची नाडी आवळायची का?
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
गुरुवार, 09/03/2015 - 18:46
नवीन
लेगस्टम्प उघडा राहिला चुकून. लगेच काय पाडायचा का तो, चिमणराव?
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 09/06/2015 - 19:12
नवीन
लेगस्टंप उघडा? अहो ते डायरेक्ट नॉन स्ट्रायकरला आले तिन्ही स्टंप्स उघडेचं होते. =))
- Log in or register to post comments
ह
हेमंत लाटकर
Fri, 09/04/2015 - 16:27
नवीन
वृद्धाश्रमात जाणारे लोक्स नशिबवान असतील तर.....
नशिबवान म्हणजे धडधाकट असल्यामुळे वृद्धाश्रमात जायची गरज नसणारे
- Log in or register to post comments
ह
हेमंत लाटकर
Wed, 09/02/2015 - 15:16
नवीन
वानप्रस्थाश्रम स्विकारायची इछ्चा नसलेल्यांची हीच गत होणार..
वृद्धाश्रम म्हणजे वानप्रस्थाश्रम नव्हे
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Wed, 09/02/2015 - 09:17
नवीन
धागा वाचुन डोळ्यात पाणी आले !
- Log in or register to post comments
ह
हेमंत लाटकर
Wed, 09/02/2015 - 09:20
नवीन
स्वत:वर वेळ आल्यावर कळते.
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Wed, 09/02/2015 - 09:28
नवीन
खरे आहे .
: ढसाढसा रडणारी स्मायली :
- Log in or register to post comments
न
नाखु
Wed, 09/02/2015 - 09:30
नवीन
आज सुट्टी आहे काय का संप आहे ?
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Wed, 09/02/2015 - 11:07
नवीन
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ
आज काम कमी आही आणि बाकी
ऑफीसात काहीच "इन्टरेस्टींग" नसल्याने आम्ही वृध्दास्रमात असल्या सारखेच आहोत ... म्हणुन जरा भावना वाटुन घेतल्या =))
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Wed, 09/02/2015 - 11:09
नवीन
भावना वाटून घेऊ नयेत. नुस्तं टेचून घ्यावं. दाताखाली लागल्या पाहिजेत.
- Log in or register to post comments
च
चिगो
Wed, 09/02/2015 - 09:53
नवीन
मी पण भसाभसा, ढसाढसा रडलो.. नंतर नंतर तर पाणी पुसायला माणूस बोलवावा लागला. पाऊस पडतोय म्हणून बरं.. पर्जन्यतुषारांवर ढकललं सगळं..
भारतात वृद्धाश्रम वाढत आहेत... बरं, मग?
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Wed, 09/02/2015 - 10:13
नवीन
पाणी पुसायला माणूस
>>>>>ऑ
कैसन हो भैयाजी, तबियत ठीक बा?
- Log in or register to post comments
च
चिगो
Wed, 09/02/2015 - 12:10
नवीन
ठीकैही है, भाई.. किंतु दिल बडा उदास होईल रहा हैं, ई जो चिंता प्रकट किए हई ऊं का बारे मे सोचल से..
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Wed, 09/02/2015 - 12:43
नवीन
कौनो चिंता की बातइ नाही है, हमार बच्चा को अच्छी पढ़ाई देना हमार फरज है, ऊके बाद गर उसको उसका फ़रज याद ना आवत है तो हम का कर सकते है उसके लिए, बताईये तो. हमार भविष्य की पूंजी जमा करके रख देना है बस्स.
बाकी नए नए पढना लिखना सीखे बच्चे इधर उधर कुछ तो लिख देते ही है. जोस होता है. हो जाईल ठंढा!
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Wed, 09/02/2015 - 12:49
नवीन
भैबा आपके जइसन कहाँ सब सोचैबे करताऊ? ओकर को ता बस बच्चा तक को इन्शुरन्स पालिसी की तरह देखने का आदत पड़त बा! भैया संस्कारवा जब देइबै करेंगे तभी तो जा कर के कुछो होगा!
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Wed, 09/02/2015 - 12:55
नवीन
अरे छड़ो ई सब बात का.
ऊ करीना को देखे का?
कइसन दूध से नहाकर आयल लागत है हमार दिल में तो एकदम... अब का बताय आपको
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Wed, 09/02/2015 - 13:02
नवीन
कर दिए ससुरे बात!! आवा कभी सोनपुर मेला मा नौटंकी देखबे करेंगे
- Log in or register to post comments
अ
अजया
Wed, 09/02/2015 - 14:36
नवीन
=))
आमची पण ढसाढसा रडणारी स्मायली!
खरं तर वृध्दाश्रम ही काळाची गरज आहे हे त्यांची वाढती संख्या अधोरेखीत करत आहे.पण अशा दवणीय लिखाणामुळे ज्यांना अशा आश्रमाची गरज भासते त्यांच्या नातेवाईकांच्या मनात निष्कारण गिल्ट निर्माण केला जातो.
मी एका आनंदी वृध्दाश्रमासाठी अनेक वर्ष काम करतेय.तिथे राहाणारे बरेचसे उच्चवर्गातील रिटायर झालेले लोक आहेत.बर्याच जणांची मुलं भारताबाहेर सेटल्ड आहेत.या आजी आजोबांना घर सांभाळणे जमत नाही.नोकरवर्गाची भिती वाटते.ते इथे आनंदाने राहातात.त्यांच्यातले काही वृद्धांच्या आॅलिम्पिकमध्ये भाग घेऊन आलेत.काही बागकामात मन रमवतात.काही निपुत्रिक जोडपी तसेच अशाच जोडप्यातला जोडीदार नसल्याने देखील आहेत.समवयस्क असल्याने छान मैत्री दिसते.
अजून एक कॅथलिक ख्रिश्चन लोकांचा आश्रम माझ्या घराजवळ आहे.तिथे माझी ८३ वर्षाची मैत्रीण चार उच्चपदस्थ मुलं असताना स्वातंत्र्य असावे म्हणून राहाते.
सकारात्मकतेने गरजेकडे पाहिले तर ढसाढसा वाले एकटी छाप विचार करावे लागणार नाहीतच!
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 09/02/2015 - 15:42
नवीन
प्रगो ला रडताना बघुन मी धागा वाचला. तीन बादल्या भरायला आल्या ना :'(
- Log in or register to post comments
G
gogglya
Wed, 09/02/2015 - 09:34
नवीन
ही विनंती. नुसत्या सन्ख्येवर जायचे तर अनाथाश्रम पण वाढत आहेत ना ?
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Wed, 09/02/2015 - 09:40
नवीन
नात्यांचे बंध तकलादू होत आहेत ओ. बाकी कै नै.
पोरांना वेळेत वेळ दिला नसल्यानं वेळेला पोरं वेळ देत नाहीत.
- गुत्ताडलेला
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Wed, 09/02/2015 - 09:47
नवीन
सर्वच जण जड होतात म्हणून स्वतःच्या आईवडीलांना व्रुद्धाश्रमात धाडत नाहीत असा अनुभव आहे. बर्याच वेळेला आईवडील व्रुधापकाळामुळे ईतके जराजर झालेले असतात की त्यांना अंथुरणातुन उठताही येत नाही. नवरा बायको कामाला जाणार असतील तर अशा म्हातार्यांचे खूप हाल होतात. दीवसभरात पाणी हवे असेल ते देणारेही कुणी नसते तसेच वेळच्यावेळी औषधे देणेही शक्य होत नाही. सर्व सोपस्कार जागेवरच होत असल्यामुळे कपडे बदलणे, आंघोळ घालणे. अशावेळी म्हातार्या लोकांना अवघडल्यासारखे होते. घरात दीवसभर माणूस ठेवणे हा एक उपाय असतो पण आजकाल म्हातार्यांचा छळ करणारे व्हिडीओ बघीतले की तेही घातक वाटते.
उलट व्रुध्दाश्रमात पाठवणे आर्थिकद्रुष्ट्या जास्त जड जाते. एका व्रुद्धाचा महीन्याचा व्रुध्दाश्रमातला खर्च २० हजाराच्या पुढे जातो.
यावर उपाय म्हणून आता काही लोक व्रुद्धांची काळजी घेण्याची सेवा पुरवतात. माझ्या समोरील इमारतीमधे एकाने दोन फ्लॅट घेउन त्यात सर्व खोल्यांमधे पलंगांची व्यवस्था केली आहे. (हॉस्पीटल सारखी) जवळ जवळ १५ व्रुध्द तीथे सदैव पलंगावर झोपलेल्या अवस्थेत असतात. त्यांची देखभाल करण्यासाठी एक मावशी आहे. जी त्यांना जेवण देते. औषधे देते. त्यांची अंघोळ आणि बाकीचं करते. त्यांचे कपडे बदलते. प्रत्येक खोलीत टीव्ही आहे. ती जेवढी त्यांची काळजी घेते तेवढी त्यांची मुलं घेउ शकतील की नाही शंका आहे.
म्हणणे एवढेच की सर्वच जण आई बाबा नकोत म्हणून व्रुध्दाश्रमाचा पर्याय निवडत नाहीत. काही जणांना आपल्या आईबाबांची चांगली देखभाल व्हावी अशी ईच्छा असते म्हणून मग ते अशा सेवांचा विचार करतात. हॉस्पिटलपेक्षा स्वस्त आणि घराच्या जवळ.
- Log in or register to post comments
G
gogglya
Wed, 09/02/2015 - 14:23
नवीन
देउ शकाल का? कोणा अडल्या-नडल्या साठी उपयोगी पडू शकेल.
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
गुरुवार, 09/03/2015 - 05:28
नवीन
व्य.नि. केलाय.
- Log in or register to post comments
इ
इरसाल
Wed, 09/02/2015 - 10:10
नवीन
मिपाचे ॠन्मेष......................
- Log in or register to post comments
र
रुस्तम
Wed, 09/02/2015 - 11:50
नवीन
हा हा हा
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Wed, 09/02/2015 - 12:25
नवीन
आज मारताय मला सगळे हसवुन हसवुन ऋन्मेष
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Wed, 09/02/2015 - 23:21
नवीन
खरेखुरे ॠन्मेष आहेत मिपावर वेगळ्या नावाने बहुतेक.
- Log in or register to post comments
ब
बहुगुणी
Wed, 09/02/2015 - 23:31
नवीन
अत्यंत मुद्देसूद लिहिणारे 'ॠषिकेश' माहीत आहेत, पण ते हल्ली (मिपावर) दिसत नाहीत, तेच हे ॠन्मेष का?
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Wed, 09/02/2015 - 23:38
नवीन
तुम्ही मायबोलीवरचे ॠन्मेष ह्यांचे धागे पाहिलेले नसावेत बहुधा :)
- Log in or register to post comments
र
रुस्तम
गुरुवार, 09/03/2015 - 14:09
नवीन
सॅम्पल
http://www.maayboli.com/node/52037
- Log in or register to post comments
ब
बहुगुणी
गुरुवार, 09/03/2015 - 14:23
नवीन
माहीत नव्हतं, ज्ञानात भर पडली :-) धन्यवाद!
- Log in or register to post comments
य
यशोधरा
गुरुवार, 09/03/2015 - 22:26
नवीन
ओह बाय द वे, ॠषिकेश वायले.
- Log in or register to post comments
ख
खेडूत
Wed, 09/02/2015 - 10:17
नवीन
ओक्के !
बाकी आपण काही विदा जमवला आहे का?
.
.
.
.
.
.
.
(स्वगत: कै कै धाग्यांसाठीपण एखादा वृद्धाश्रम असायला हवा !)
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Wed, 09/02/2015 - 11:23
नवीन
शंभरी तर कुठेच नाय गेली. जेपी, आर्डर द्या...
- Log in or register to post comments
द
दिव्यश्री
Wed, 09/02/2015 - 12:18
नवीन
http://epaper.pudhari.com/details.aspx?ID=570441&boxid=235848437&pgno=10&u_name=0
- Log in or register to post comments
द
दिव्यश्री
Wed, 09/02/2015 - 12:32
नवीन
http://www.loksatta.com/manoranja-news/celebrity-blog-by-smita-gondkar-part-two-1136544/
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Wed, 09/02/2015 - 12:38
नवीन
आधीच काय एक रंगाण्णा लि़ंकन कमी होते म्हणून तुम्ही पण लिंकालिंका करायलात? ;)
- Log in or register to post comments
द
दिव्यश्री
Wed, 09/02/2015 - 14:20
नवीन
पर्तेक्ष रंगाण्णा पण्तांशी तुलणा... अरे ते कुठे , मी कुठे. मी आपली साधी,भोळी,सासुरवाशीण,गरीब बिच्चारी आणी बरीच काही(धुमध्डकाफेम उद्योग्पती श्टाइल वाच्णे) अशी सामाण्य गृहिणी आहे रेरेरेरेरेरेरेरेरेरेरेरेरेरेरेरेरेर्रे!!!!!!!!!!!!!!!!!!!!
- Log in or register to post comments
- 1
- 2
- 3
- 4
- ›
- »