Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कोणी राहत नाही...

अ — अर्थहीन, गुरुवार, 09/03/2015 - 12:34
जाती जन्मतात. जाती शाळेत जातात. जाती प्रौढ़ होतात. जाती जातीशी(च) लग्न करतात. जाती पहिल्या -कधी सोळाव्या रात्री आपल्याच जातीवर चढ़तात. मग अशा रीतीने जाती ..पुन्हा कंटीन्यू होतात. जाती गावा.बाहेरच्या 'म्हारवाड्याला' असतात. --- जाती शहरा.बाहेच्या 'झोपड़पट्टीलाही' असतात. जाती देशा -त्याच्या झेंड्यात असतात. जाती गरीबांच्या कातड्याला कायमचा चिकटलेला सर्वात वरचा 'थर' असतात. जाती अंतयात्रा, जनाज्याला असतात. जाती दंगली. सना-उत्सवालाही असतात. मंदिरा, मशिदी, गुरूद्वारयाला जाती असतात. नेमाटी, दाढी, पगड़ीलाही जाती असतात. जाती रक्षणाला असतात, जाती आरक्षणाला असतात. जाती निवडणुकीला असतात. जाती 10विच्या दाखल्याला अन आताच्या जनगणनेलाही असतात. जाती ॐ, अर्धचंद्र, क्रॉसला असतात जाती गीता कुराण बायबललही असतात. जाती शरीरालाही असतात. त्याआधी जाती 'मनाला' असतात. जात आर.एस.एस.ला आहे, जात MIMला आहे, जात सेनेला आहे, जात पुरंदरेला आहे, पाटीदार पटेलाना आहे, रेल्वे रुळावर झोपलेल्या गुज्जर , खच्चर अन मराठ्यांना आहे. या धर्मनिरपेक्ष देशाच्या ..रक्ता-रक्तातुन हल्ली,, ......हा अदृश्य जातीभेद ...........अखंड-अखंड वाहत असतो. . . . . मग इथं जात कोणाला नाही?? तर ती फ़क्त 'भारताला' नाही. पण त्यात आता कोणी राहत नाही.

प्रतिक्रिया द्या
2898 वाचन

💬 प्रतिसाद (14)
व
वेल्लाभट गुरुवार, 09/03/2015 - 14:06 नवीन
जाम आवडली. क्लास. हार्ड हिटिंग.
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 09/03/2015 - 16:25 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
म
मितान गुरुवार, 09/03/2015 - 16:21 नवीन
ह्म्म...
  • Log in or register to post comments
न
नाव आडनाव गुरुवार, 09/03/2015 - 17:30 नवीन
असंच आहे आणि असंच राहणार :(
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 09/03/2015 - 17:51 नवीन
शेवटी हाणलेला टोला अत्यंत मार्किक सखोल आणि सेक्युलरि दांभिकांचि भंबेरि उडवणारा आहे!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 09/03/2015 - 17:55 नवीन
शेवटी हाणलेला टोला अत्यंत मार्किक सखोल आणि सेक्युलरि दांभिकांचि भंबेरि उडवणारा आहे!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 09/03/2015 - 17:56 नवीन
*मार्मिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
न
नाखु Fri, 09/04/2015 - 06:02 नवीन
पहिले इंग्लीश आणि दुसरे मराठी म्हणून!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
द
द-बाहुबली गुरुवार, 09/03/2015 - 18:03 नवीन
एकदम कडक...!
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा गुरुवार, 09/03/2015 - 19:01 नवीन
वरचा क्लास !!
  • Log in or register to post comments
आ
आस्तिक शिरोमणि गुरुवार, 09/03/2015 - 21:24 नवीन
उत्कृष्ठ
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Fri, 09/04/2015 - 08:31 नवीन
सत्य, टाळता न येणारे, हतबलता आणणारे आणि बरेच काही. आवडली कविता.
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Fri, 09/04/2015 - 15:44 नवीन
मस्त लिहीलीय
  • Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे Fri, 09/04/2015 - 17:32 नवीन
.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा