Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

इच्छामरण

ह
हेमंत लाटकर
गुरुवार, 09/03/2015 - 14:06
🗣 69 प्रतिसाद
इच्छामरण ह्याचा अर्थ ’युदेन्शिया’ (ग्रीक शब्द) "चांगले मरण" असा होतो. प्रत्येक व्यक्तीला आयुष्याची सुरवात आणि शेवट चांगल्या रितीने व्हावा असे वाटते. परंतु ते आपल्या हातात नसते. ’इच्छामरण हवे’ असे अंथरूणाला खिळलेल्या आजारी व्यक्तीने सांगितले तरी घरातल्यांना ते पटत नाही. अंथरूणाला खिळलेल्या वृद्ध व रूग्णांची सेवा करणे अवघड असते. नवरा किंवा बायको असली तर त्यातल्या त्यात चांगले. परंतु नवरा किंवा बायको वृद्ध असली आणि मुलगा-सुन दोघेही नौकरी करणारे असतील तर मात्र अशा वृद्धाची किंवा रूग्णाची अवस्था खुप दयनीय होते. त्यांचे करण्यासाठी माणूस किंवा बाई लावावी म्हणले तर पेपरमधील बातम्या वाचून भीती वाटते. शेवटी प्रत्येक अंथरूणाला खिळलेल्या वृद्धाच्या व रूग्णाच्या मनात इच्छामरण मिळाले तर बरे असा विचार येतो. हा विषय सर्वांना माहित असला तरी मिपावरील चर्चेतून प्रत्येकाच्या मनातील विचार कळतील.
वर्गीकरण
काथ्थ्याकुट

प्रतिक्रिया द्या
28662 वाचन

💬 प्रतिसाद (69)
ज
जेपी गुरुवार, 09/03/2015 - 14:11 नवीन
काल तर धाग्यावर शंभर झाले की! आवरा उगाच चघळुन झालेल्या जिल्ब्या टाकु नका. अवांतर-इच्छामरणासाठी लै कोर्टबाजी करायची गरज नाही. फार गरज असल्यास सांगा 101 जालीम उपाय सांगु.
  • Log in or register to post comments
र
रुस्तम गुरुवार, 09/03/2015 - 14:21 नवीन
आवरा ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 09/03/2015 - 14:23 नवीन
+१ खरेच आवरा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुस्तम
द
द-बाहुबली गुरुवार, 09/03/2015 - 14:25 नवीन
आवराच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्यारे१ गुरुवार, 09/03/2015 - 14:25 नवीन
+१ कालच्या एका बातमीमध्ये एका मुलीनं ८९ पर्यायांचा अभ्यास केला होता म्हणे. यशस्वी झाली कुठल्याशा एका पर्यायात. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ह
हेमंत लाटकर Fri, 09/04/2015 - 16:41 नवीन
फार गरज असल्यास सांगा 101 जालीम उपाय सांगु.... इच्छामरण म्हणजे आत्महत्या नव्हे. अथंरूणाला खिळलेले, कोणताही: इलाज नसलेल्या रूग्णांना डाॅक्टरी सल्ल्याने कायद्याचा आधार देऊन दिले जाणारे मरण. मला गरज नाही, संकटाला घाबरून आत्महत्त्या करणे म्हणजे भ्याडपणा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
म
मारवा Sun, 09/06/2015 - 07:29 नवीन
१- ज्ञानेश्वरांनी आत्महत्या केली. २- ज्ञानेश्वरांनी आपली जीवनयात्रा संपवली. ३- ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली. What's in a name? that which we call a rose By any other name would smell as sweet; - Shakespeare's वरील विधानात फरक आहे. तिसरे विधान महत्वाचे आहे. तिसरे विधान थेअरी दर्शविते. आत्महत्या वेगळी आहे हे दाखवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. जोन्सटाउन मध्ये पिपल्स टेम्पल या संप्रदायाच्या लोकांनी जिम्स जोन्स च्या मार्गदर्शनावरुन आत्महत्या केली. त्यामागे एक डिटेल थेअरी होती. त्यांच्या काही कल्पना होत्या. संज्ञा होत्या. जपानमध्ये हाराकीरी केली जाते त्यामागे ही एक डिटेल थेअरी संज्ञा कल्पना सर्व काही आहे. स्वामी विज्ञानानंद यांनी जनतेला मनशक्ती ची शिकवण देउन मग उंच इमारतीचा जिना चढण्यास सुरुवात केली. त्यांची तर फार च विस्ताराने मांडलेली थेअरी होती. तर सामान्य आत्महत्या केली या विधानाला झळाळी मिळते थेअरीने. थेअरी इज ऑल . नग्न सत्याला झाकण्यासाठी थेअरीचे शुभ्र महावस्त्र ह्वे. त्या महावस्त्राचा ताणा जस्टीफीकेशन ( जितका ताणाल तितक उत्तम ) ने व बाणा ग्लोरीफीकेशन चा हवा. मग शेक्सपिअर म्हणतो तसे न होता दुसरे च काहीतरी होते. भला उसकी थेअरी मेरी थेअरी से सफेद कैसी ? असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर
प
प्यारे१ Sun, 09/06/2015 - 08:07 नवीन
And 'this' is 'your theory', isn't it?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
म
मारवा Sun, 09/06/2015 - 09:27 नवीन
आत्महत्या म्हणजे आत्महत्या म्हणजे आत्महत्या च असते तुमची आमची त्यांची महापुरुषांची खलपुरुषांची सेम असते. थेअरी मात्र वेगवेगळी असते. काहींची प्राचीन काहींची अवार्चीन काहींची कैवल्यवादी काहींची अ‍ॅपॉस्टॉइक समाजवादी असते. काहींची वजनदार काहींची हलकी असते. काहींची हजार पानांची काहींची दहा पानी असते. काही बिचारयांची थेअरीच नसते. त्यांची आत्महत्या नुसतीच असते. थेअरी शिवाय जगण व्यर्थ आहे. थेअरी असेल तर मरणात सुद्धा अर्थ आहे. हाऊ सॅड टु डाय विदाउट थेअरी लाइक फॉर एक्झाम्पल सौ. मनिषा गटकळ. ऑर बालकवी अ‍ॅन्ड हाउ ग्लोरीयस टु डाय वुइथ थेअरी वुइ डोन्ट डाय लोनली !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ Sun, 09/06/2015 - 09:51 नवीन
चांगली झाली असती अजून. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
इ
इस्पिक राजा गुरुवार, 09/03/2015 - 14:30 नवीन
इच्छामरण ह्याचा अर्थ ’युदेन्शिया’ (ग्रीक शब्द) ????????????????????????????????????????????????????????????? इच्छामरणाचा अर्थ युन्देशिया?????????????????????????????????????????????????????????????
  • Log in or register to post comments
न
नाव आडनाव गुरुवार, 09/03/2015 - 14:41 नवीन
ते वृद्धाश्रमाचं कँसल का?
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 09/03/2015 - 14:43 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ गुरुवार, 09/03/2015 - 14:47 नवीन
काहीही म्हणा, पण जिलेबी दिसली की धारा ची जाहीरात आठवतेच. 'जाना तो है, लेकिन २०-२५ साल के बाद' हे आता 'वेगळ्या' अर्थानं जाणवायला लागलंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
च
चित्रगुप्त गुरुवार, 09/03/2015 - 15:04 नवीन
ग्रि़ ब्।आआस्।आआ स्।ई़आआट स्।ई़आआञाच्।अ‍ॅ फाआर्‍ वार्‍स्।आआम्पाआसुणंआणाआट।ऑटॅ,पाऩऊनिङूर्‍़इब्।अ‍ॅतॅणाआट ...च्यामारी, काहीतरी घोळ झाला टाईपताना, मला असे लिहायचे होते: ग्रीक भाषा शिकायचे फार वर्षांपासून मनात होते, पण कुणी गुर्जी मिळेनात. आता ती संधी आलीसे दिसते. तरी मिपावर ग्रीक भाषा शिकण्याची सोय करावी, ही विनंती. सुरुवात म्हणून खालील शब्दांचे ग्रीक भाषांतर द्यावे, ही विनंती: १. आचरट २. मूर्तीमंत ३. पाजी. ४. रिकामटेकडा. ५.हलकट ६. र्‍हदयस्पर्शी ७. पचपचीत ८. एकसमयावच्छेदेकरून ९. गांगरणे १०. दीडशहाणा ११. अगंबाई १२ अरेच्चा १३ इश्श्य्य.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 09/03/2015 - 15:35 नवीन
मलाही. मला एका ग्रीक पोरीला इंप्रेस करायचयं. मला खालच्या वाक्यांच ग्रीकात भाषांतर करुन द्याल का लाटकर काका? १. केहते है अगर तुम किसी चीज को दिल से चाहो तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश मे मिल जाती है! २. इतनी शिद्दत से मैने तुम्हे पाने की कोशिश की है के हर झर्रे ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की है! ३. खेड्याकडे चलणं हाचं ग्रीसच्या २०००० लीग्स समुद्राखाली गेलेल्या अर्थव्यवस्थेला सावरायचा राजमार्ग आहे. तसचं हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी दिसशी तु नवतरुणी काश्मिरी ह्या गाण्याला ग्रीक युद्धगीताची चालही लाउन द्याल का? तुमचे उपकार मी आजन्म विसरणार नाही. Σ 'αγαπώ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
व
विशाल कुलकर्णी Tue, 09/08/2015 - 07:52 नवीन
सुरुवात म्हणून खालील शब्दांचे ग्रीक भाषांतर द्यावे, ही विनंती: यात अजुन दोन शब्द अ‍ॅडून घ्या देवा.. १. आवरा आता २. जिलब्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
र
रेवती गुरुवार, 09/03/2015 - 15:15 नवीन
बास झालं हां आता! किती गैरफायदा घ्याल आमच्या टंकनसेवेचा! कालचं सगळं टंकनबजेट तुमच्या धाग्यावर खर्चलं की!
  • Log in or register to post comments
म
मितान गुरुवार, 09/03/2015 - 16:17 नवीन
ओ काका ! नुकतेच निवृत्त झालाय का ? की मिडलाइफ क्रायसिस ?
  • Log in or register to post comments
ह
हेमंत लाटकर Fri, 09/04/2015 - 16:44 नवीन
मितानराव, जरा भान ठेवा लिहताना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान
ख
खटपट्या Sat, 09/05/2015 - 16:36 नवीन
मितान या राव नसून ताई आहेत याची क्रूपया नोंद घ्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर
स
सूड Tue, 09/08/2015 - 14:51 नवीन
मितान या राव नसून ताई आहेत याची क्रूपया नोंद घ्यावी.
आपण मिपावर नवीन आहोत हे दाखवायला असं दादाला ताई आणि ताईला दादा म्हणायचं असतं म्हणे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 09/04/2015 - 16:51 नवीन
योग्य मुद्द्यांना हात घातला आहेस रे हेमंता.माझ्या आठवणीप्रमाणे पूर्वी(अरूणा शानभाग) ह्या विषयावर चर्चा झाली होती मिडियात.अनेकांचा सूर तेव्हा भारतात तसे होणे कठिण असे मोठ्या घटना तज्ञांचे मत होते.
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 09/04/2015 - 18:14 नवीन
तुम्हाला इच्छामरण म्हणायचं आहे ना? माईसाहेब दयामरणाबद्दल बोलत आहेत. दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. एक स्वतःच्या इच्छेने मरण आणि दुसरे जो माणूस निर्णय घेऊ शकत नाही त्याचे आयुष्य दुसर्‍या कोणाच्या इच्छेने संपवणे. जे मला पटत नाही. एक आत्महत्या होते तर दुसरी हत्या. जे जीवन आपल्या इच्छेने मिळालेलं नाही ते आपल्या इच्छेने संपवायचा अधिकार कोणालाही नाही. (इथे खाद्य म्हणून मारल्या जाणार्‍या प्राण्यांचा/वनस्पतींचा विचार केलेला नाही.) ;) (स्वगतः आयडींचे इच्छामरण आणि दयामरण यावर अजून कोणी विडंबन कसे पाडले नाही?)
  • Log in or register to post comments
अ
अजया Fri, 09/04/2015 - 18:33 नवीन
नानांना आलं ते कुठलं मरण? माईचे काय प्लॅन? इच्छा की दया मरण?
  • Log in or register to post comments
न
नाखु Sat, 09/05/2015 - 07:54 नवीन
माईंनी दया दाखवली नाहीतर आले ते "अनिच्छा मरण" दया दाखवीली तर "विलंबीत-सावकाश अनिच्छा मरण" आणि दोन्ही नसले तर आहेच "झुरत झुरत आडून आडून मरण" श्री गुरुजींच्या
"भावजींची पत्रे"
या ललित लेखांस्म्ग्रहामधील "वहिनींच्या शेवग्याच्या शेंगा,आणि नानुला ठेंगा" या लेखातून साभार. वाचक नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
म
मांत्रिक Sat, 09/05/2015 - 08:01 नवीन
मस्तच ओ नाखु का़का!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
अ
अजया Sat, 09/05/2015 - 08:19 नवीन
झुझुआआमरण फार आवडलं!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
प
प्यारे१ Fri, 09/04/2015 - 18:39 नवीन
ते यूथेनाशिया ज़रा शुद्ध करून लिहावं अशी इच्छा आहे मरणा आधी. किमान दया तरी करा. https://en.m.wikipedia.org/wiki/Euthanasia
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sat, 09/05/2015 - 09:39 नवीन
गांभीर्याने विषय घ्यायचा असल्यास मिपावरील याअगोदर झालेल्या चर्चा वाचाव्यात परमसखा मृत्यू : किती आळवावा... सुखांत
  • Log in or register to post comments
ह
हेमंत लाटकर Sat, 09/05/2015 - 13:34 नवीन
मला वाटते अंथरूणावर खिळलेल्या रूग्णानां इच्छामरण मिळायला पाहिजे. अंथरूणावर खिळल्यामुळे दुसर्यावर अंवलबून राहावे लागते, बोलणे खावे लागते, सगळे राग करतात.
  • Log in or register to post comments
अ
अजया Sat, 09/05/2015 - 14:55 नवीन
कोण देणार ते? डाॅक्टर? ते का जीव घेतील कोणाचाही.इच्छा आहे म्हणून? आणि कायदेशीर कटकटीत अडकतील ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 09/08/2015 - 14:40 नवीन
इच्छामरण भारतात कायदेशीर नाही. त्यामुळे मरताना उगाच इतरांना गोत्यात आणण्याऐवजी खालील देशात जावून कायदेशीरपणे इच्छापूर्ती करून घेता येईल... As of June 2015, human euthanasia is legal only in the Netherlands, Belgium, Colombia and Luxembourg. Assisted suicide is legal in Switzerland, Germany, Japan, Albania and in the US states of Washington, Oregon, Vermont, New Mexico and Montana.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर
अ
अजया Sat, 09/05/2015 - 13:45 नवीन
ते दयामरण हो!
  • Log in or register to post comments
ढ
ढंप्या Sat, 09/05/2015 - 14:58 नवीन
ते दयामरण हो!
उगाच वाटले की दार तोडून कोणतरी आत येतोय आणि उजवा हात हलवत पाश टाकतोय...........!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
अ
अजया Sat, 09/05/2015 - 15:17 नवीन
कुछ तो गडबड है!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ढंप्या
ह
हेमंत लाटकर Sat, 09/05/2015 - 14:28 नवीन
अजयाताई इच्छामरणाची व्याख्या सांगता जरा
  • Log in or register to post comments
अ
अजया Sat, 09/05/2015 - 14:56 नवीन
तो तुम्हाला नाहिये प्रतिसाद. पुढे आला.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sat, 09/05/2015 - 16:11 नवीन
मला स्वतःला आपला इच्छामृत्यू व्हावा अशी इच्छा आहे. म्हणजे आपले जीवन आता परिपूर्ण झाले. आता यापुढील यात्रा (जर तशी काही खरोखर असेल तर) करण्यासाठी अगदी नि:संग होऊन आपण तयार आहोत, असे उत्कटतेने वाटू लागले की. परंतु हा मृत्यू विष, खड्ग, उपास इ. उपाय अवलंबून नाही, तर योगक्रियेने श्वास अवरुद्ध करून आणता यावा. ही प्राचीन भारतीय विद्या आता विस्मृत झाली असली तरी आपण ती साध्य करावी अशी इच्छा आहे.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sat, 09/05/2015 - 16:14 नवीन
हो, आणखी एक सांगायचे राहिले. हे आपण अगदी धडधाकट असताना करायचे.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Sat, 09/05/2015 - 16:35 नवीन
माझी सगळी लोनं फीटली की विचार करेन असे वाटतेय..
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sat, 09/05/2015 - 17:14 नवीन
अतिशय चुकीचा विचार करताय मालक. असला काही घोळ घालू नये ही नम्र विनंती. कर्ज फिटल्यावर स्वत: साठी जगायला काही प्रत्यवाय आहे का??? आणि कर्ज संपलं तरी नंतरच्या तरतुदी कराव्या लागतात च की. एकदा बसून बोलायला हवं. कोणे रे तिकडे? ६-८ शीटा बुक करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ख
खटपट्या Sun, 09/06/2015 - 08:55 नवीन
अहो उगाच ते व्रुद्धाश्रम वगैरे कशाला कटकट. जे काय करायचं ते करुन झालंय असं आत्ताच वाटू लागलंय. सद्या फक्त विचार चालू आहे. पक्का झाला नाय अजून...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ Sun, 09/06/2015 - 09:58 नवीन
आयुष्य तुमचं, विचार तुमचे. योग्य रितीनं वापराल अशाच अपेक्षा करतो. 'करायचं ते करुन झालं' असं कुणी व्यक्ति कधी म्हणू शकते हे जाणून घेण्यास उत्सुक. (सर्वसाधारणपणे. पर्टिक्युलर केस नको आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ख
खटपट्या Mon, 09/07/2015 - 10:56 नवीन
भेटा सांगतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
पैसा Tue, 09/08/2015 - 06:13 नवीन
सगळा भारत नीट फिरायचा आणि पुस्तकं वाचायची एवढंच केलं तरी एक आयुष्य पुरेसं नाहीये!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ख
खटपट्या Tue, 09/08/2015 - 07:29 नवीन
हा हे बरोबर, ते तर करायचं आहेच. भारत फिरायला आणि पुस्तकं वाचायला हा जन्म पुरणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
स
सुबोध खरे Tue, 09/08/2015 - 06:07 नवीन
लोन फिटलं कि उलट दुप्पट जोमाने जगायला पाहिजे. आता काय जबाबदारी नाही मग एन्जॉय माडी. मरो तुमचे शत्रू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ख
खटपट्या Tue, 09/08/2015 - 07:31 नवीन
बरोबर डॉक, पण कधी कधी खूप थकून जायला होतं धावपळीनं आणि विचार करतो की का करतोय हे आपण? एक लोन फेडण्यासाठीच ना. पण तुम्ही सांगीतल्याप्रमाणे दुप्पट जोमाने जगायला शिकणार. सदीच्छांबद्द्ल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ब
बोका-ए-आझम Fri, 11/06/2015 - 06:20 नवीन
हा कसला डबल मीनिंग टाकलात डाॅक!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा