पाण्याचे स्फटीक
पाण्याला जीवन असे म्हटले जाते.शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे.
आपण तहान लागल्यावर पाण पितो,एखादा घाबरलेला असेल तर त्याला पाणी प्यायल्यावर बरे वाटते.रागावलेल्या व्यक्तीला पाणी प्यायल्यावर थोडे शांत वाटते.
पाण्यावर एवढे बोलण्याचे कारण म्हणजे गुगलवर Water Crystals - masaru emoto हे वाचनात आले.
या संशोधकाच्या म्हणण्यानुसार आपल्या भावनांचा पाण्यावर प्रभाव पडतो आणि त्याप्रमाणे त्या पाण्याच्या स्फटीकांमध्ये बदल होतो.
ह्याबद्दल कोणाचा काही अनुभव आहे का?
किंवा या विषयावर आधी चर्चा झाली आहे का?असल्यास दुवा कोणता?
💬 प्रतिसाद
(15)
श
शुचि
Fri, 09/04/2015 - 00:15
नवीन
पुस्तक वाचलं आहे इमोटो यांचं पण विश्वास असा पटकन बसत नाही :(
- Log in or register to post comments
स
स्पंदना
Fri, 09/04/2015 - 01:48
नवीन
काही नविनच भिंगरी ताई!!
बघते वाचून!!
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Fri, 09/04/2015 - 03:21
नवीन
पाण्याचे स्फटिक असतात? हेच मुळात नवीन आहे माझ्यासाठी!
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Fri, 09/04/2015 - 04:57
नवीन
++११
- Log in or register to post comments
श
शुचि
Fri, 09/04/2015 - 20:16
नवीन
तुला व्यनि केला आहे. आत्ताच पुस्तक चाळून आले.
- Log in or register to post comments
श
शुचि
Fri, 09/04/2015 - 20:36
नवीन
तू सुचविलेले पुस्तक दुकानात चाळले. पाण्याच्या स्फटिकांचे खूप सुंदर फोटो आहेत खरच. जर हॅपी किंवा लक किंवा सोल, थँक यु आदि सकारात्मक शब्द सतत ऐकविले तर पाणी गोठल्यानंतर जे स्फटीक तयार होतात ते फार चमकदार व अत्यंत मनोहारी असतात. प्रत्येक शब्द वेगवेगळे स्फटीक निर्माण करतो.
.
___
याउलट बॅड लक, अनहॅपी आदि नकारात्मक शब्द तेच स्फटिक अतिशय मोडके व सुमार बनवितो असा काहीसा आशय आहे.
.
.
बाकी हे खरेच आहे किंवा हे खोटेच आहे असा काहीही आग्रह नाही. एक नमूद केले बस्स.
- Log in or register to post comments
ए
एस
Sat, 09/05/2015 - 17:20
नवीन
पाण्याचे म्हणजे ते हिमवर्षावाचे स्फटिक असतात. आणि कुठल्याच स्फटिकाचा आकार नैसर्गिकरित्याच इतर कुठल्या स्फटिकाशी तंतोतंत जुळत नाही. 'मॅक्रो फोटोग्राफी' करणार्या छायाचित्रकारांना विचारा. यात कुठल्या भावनेचाबिवनेचा थेंबमात्रही संबंध नाही.
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Sun, 09/06/2015 - 08:33
नवीन
अशा छायाचित्रकाराने केलेल्या संशोधनाची लिंक द्याल का प्लीज?
- Log in or register to post comments
च
चित्रगुप्त
Sat, 09/05/2015 - 03:18
नवीन
मी अगदी ताबडतोब पाण्याचे स्फटिक बनवून बघायला तयार आहे. कसे बनवायचे याची पाकृ कोणीतरी द्यावी. सर्व प्रकारचे आदरार्थी आणि गोग्गोड शब्द, शिव्या, विविध प्रकारची गाणी वगैरे सर्व काही वापरून स्फटिक बनवणार, आणि त्यांचे फोटो लगेच इथे देणार.
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Mon, 09/07/2015 - 11:31
नवीन
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ !
लेख वाचुण मणोरंजन जाहले =))
चला आता पाणी पिवुन येतो
- Log in or register to post comments
च
चित्रगुप्त
Mon, 09/07/2015 - 13:21
नवीन
आम्ही काही सायंटिफिक, क्रियेटिव वगैरे करायचे म्हटले तर कुण्णी कुण्णी मदतीला येत नाहीये. सांगा ना-गडे कसे बनवायचे पाण्याचे स्फटिक ?
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
गुरुवार, 09/10/2015 - 13:30
नवीन
सोप्पे आहे
ग्लासभर पाणी घ्या , त्यात दोन चमचे पाणी विरघळवा , मग ते मिश्रण एका ताटात ओतुन कडक उन्हात वाळत ठेवा , उन्हाने पाण्याचे बाष्पीभवन खाले की ताटावर पाण्याचा क्रिस्टलचा एक बारीक थर तुम्हाला दिसुन येईल .
=))
- Log in or register to post comments
प
प्यारे१
गुरुवार, 09/10/2015 - 15:31
नवीन
अय्या किति छान गं.
पाक एकतारी की गोळीबंद ?
- Log in or register to post comments
न
नया है वह
गुरुवार, 09/10/2015 - 07:46
नवीन
नकारात्मक शब्द काय आणि सकारात्मक शब्द काय पाण्याला काय ठाऊक!
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
गुरुवार, 09/10/2015 - 13:56
नवीन
हे पहा - इथे साद्यंत माहिती दिसेल.
होम्योपॅथीच्या थिअरीला उपयुक्त आहे म्हणून थोडा अभ्यास केला होता मी याचा. पण नंतर कळले की असे काही अजून वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले नाही.
असो. त्यामुळे याचे महत्व कमी होत नाही. ही चित्रे सुंदरच आहेत.
- Log in or register to post comments