Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नभाचा सातबारा

म — महासंग्राम, Sat, 09/05/2015 - 08:27
ढगच दाटतात आकाशात सध्या, नभाचा सातबारा राहतो कोराच हल्ली... जगणे सुद्धा कठीण झाले सध्या, पाऊसही बरसतो फक्त कवितेतच हल्ली... जरी बाप राबतो शिवारात त्याचा, शेतकरी असण्याची त्याला लाज वाटते हल्ली... पाहू कोण पुरुन उरतो सध्या, मारण्याचीच स्पर्धा सुरु झाली हल्ली... सारे नेतेच उदंड झाले सध्या, आश्वासनांचाच पाऊस पडतो हल्ली... जिप्सी

प्रतिक्रिया द्या
2567 वाचन

💬 प्रतिसाद (8)
द
दमामि Sat, 09/05/2015 - 08:48 नवीन
वाह!
  • Log in or register to post comments
र
रातराणी Sat, 09/05/2015 - 09:46 नवीन
आवडली!
  • Log in or register to post comments
ह
होबासराव Sun, 09/06/2015 - 07:30 नवीन
सारे नेतेच उदंड झाले सध्या, आश्वासनांचाच पाऊस पडतो हल्ली... ६८ वर्ष झाले..हे असेच आहे.
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 09/06/2015 - 10:21 नवीन
कविता आवडली. काय बोलणार!
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sun, 09/06/2015 - 10:27 नवीन
कोरा सातबारा हे चांगल्या स्थितीला वापरले जाणारे विशेषण आहे. म्हणजे कुणाचा बोजा जमिनीवर नसणे अशासाठी. बाकी रुदन सवयीचे झालेय. :(
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sun, 09/06/2015 - 10:36 नवीन
हम्म्म्म. अभ्या, तू म्हणतो ते काही अंशी बरोबर आहे. सातबारा कोरा म्हणजे कर्ज नाही इथपत बरोबर आहे पण कर्ज नसणे म्हणजे चांगली स्थिती का? हे म्हणजे अंधार नाही म्हणून प्रकाश असं म्हणण्यासारखं आहे. कष्ट करुन दोन पैसे मिळवून टोकं जोडण्याचा प्रयत्न करताना कर्ज काढण्याची वेळ आली नाही म्हणजे चांगली परिस्थिति नसते. उलट हल्ली गच्च कर्ज घ्या नि नंतर बुडवा असं करणारे चांगल्या परिस्थितीमध्ये असतात.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sun, 09/06/2015 - 10:48 नवीन
गरीब शेतकर्‍याला चार्वाक माहीत नसतो प्यारे. कुणाचे चार पैसे देणे असेल तर झोप हराम होणारी पिढी नसेल आत्ता पण सोसायट्या, डीसीस्या अन पतसंस्थाची नावे लिहिलेला सातबारा कुणालाच नकोसा वाटतो. अर्थात डॉलर दिनाराची ऊब देणारा घरातला एखादा मेंबर असेल तर होऊ दे खर्च. भरु दे सातबारा. आपण मल्ल्या की जय म्हणू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ Sun, 09/06/2015 - 19:51 नवीन
सोड रे, म्हायत्ये.... काय है ते. शेतकरी किती गुणी असतेत ते पण आन तु पण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा