Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

.बनलेही असते राधा, मज कृष्ण भेटला नाही ..

प — प्राची अश्विनी, Sat, 09/05/2015 - 17:57
चहु दिशांत पसरे कीर्ती, जग तुझिया पायावरती पण अवखळ गोकुळवासी, मज कृष्ण भेटला नाही ....... किती काळ उलटला राधे ,नित नवीन दिसशी तूही ....... जरी रूप बदलले त्याचे, तो कृष्ण वेगळा नाही तो परतून आला तरीही, माझा ना उरला काही दमले मी शोधून त्याला , मज कृष्ण भेटला नाही ....... उमगता मोल नात्याचे गेलेला परतून येई ....... समजून तयाला घे तू , तो कृष्ण वेगळा नाही सर्वस्व वाहिले त्याला , काही ना बाकी उरले मी स्वत:स हरवून बसले , मज कृष्ण भेटला नाही .........इतुके न कुणाला द्यावे, की भार तयाचा व्हावा ........ बघ तुझ्यात लपला आहे , तो कृष्ण वेगळा नाही या नात्यातील उपेक्षा मी मूक साहिली नाही बनलेही असते राधा, मज कृष्ण भेटला नाही ........ राधेची निर्मम प्रीती , गोपास बनविते कृष्ण ........ मिटल्या नयनांनी बघ तू , तो कृष्ण वेगळा नाही

प्रतिक्रिया द्या
50926 वाचन

💬 प्रतिसाद (91)
अ
अजया Sat, 09/05/2015 - 17:58 नवीन
अप्रतिम!
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Mon, 09/07/2015 - 03:11 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
ए
एस Sat, 09/05/2015 - 18:08 नवीन
सुंदर कविता आहे! शेवटचे कडवे फारच छान.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sat, 09/05/2015 - 18:10 नवीन
अतिशय सुंदर ! <<< तो परतून आला तरीही, माझा ना उरला काही दमले मी शोधून त्याला , मज कृष्ण भेटला नाही >> क्या बात है |
  • Log in or register to post comments
ब
बिन्नी Sat, 09/05/2015 - 18:15 नवीन
खूपच सुंदर कविता आहे ही
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sat, 09/05/2015 - 18:28 नवीन
वाह!
  • Log in or register to post comments
म
मितान Sat, 09/05/2015 - 18:31 नवीन
कित्ती सुंदर ! अप्रतिम !!!
  • Log in or register to post comments
म
मित्रहो Sat, 09/05/2015 - 18:33 नवीन
व्वा क्या बात है
  • Log in or register to post comments
म
मांत्रिक Sat, 09/05/2015 - 18:57 नवीन
सुंदर आध्यात्मिक अनुभव! कृष्णाच्या मोरपिसासारखी सुरेख कविता! मानवाच्या मनातील गोपीने परमात्मरूप कृष्णाला दिलेली हाक! खूप क्षीण असते की काय कुणास ठाऊक ही हाक! त्याच्यापर्यंत पोहोचतच नाही. आणि मग आत्म्याची परमात्म्यापर्यंत पोहोचण्यास झालेली ही तगमग! सुंदर!!!
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sun, 09/06/2015 - 14:17 नवीन
काव्य रसग्रहण एका वेगंळ्या अंगाने म्हणून मूळ कविते प्रमाणेच आवडले. साध्या आणि आध्यात्मिक दोन्हीही दृष्टीने '.........इतुके न कुणाला द्यावे, की भार तयाचा व्हावा' हे कवियत्री नेमके कशा बद्दल म्हणते आहे ते अद्याप नीटसे उलगडले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक
म
मांत्रिक Sun, 09/06/2015 - 16:15 नवीन
कवितेतील ज्या ओळी अक्षराने सुरु होतात, ते राधेचे मनोगत व ज्या ओळी टिंब टिंबने सुरु होतात ते कृष्णाचे मनोगत, असा माझा दृष्टिकोण. कदाचित कवयित्रीचा वेगळा असू शकतो. पण मी म्हणतो तसे वाचून पहा, उलगडा होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
मांत्रिक Sun, 09/06/2015 - 16:24 नवीन
.........इतुके न कुणाला द्यावे, की भार तयाचा व्हावा ........ बघ तुझ्यात लपला आहे , तो कृष्ण वेगळा नाही या ओळींचा माझ्या मते असा अर्थ आहे: भक्ताचे आत्यंतिक द्वैती प्रेम भगवंतालाही असह्य होते. मग भगवंत भक्ताला अद्वैतवादाची जाणीव करुन देतो की अरे तू व मी एकच... उत्तिष्ठ जाग्रत प्राप्यवरान्निबोधत!!! तुम्हाला अद्वैत मताची चांगलीच माहिती आहे, म्हणून थोडक्यात देतोय. नाहीतर यावर तासचे तास बोलावे लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Mon, 09/07/2015 - 06:05 नवीन
ह्म्म.. 'तुझ्यात लपलेला कृष्ण कुणाला देऊ नकोस की त्याचाच(त्याला शोधत बसण्याचा) तुला भार तुला व्हावा' असे काहीसे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक
प
प्राची अश्विनी Mon, 09/07/2015 - 11:34 नवीन
एव्हढ्या रसपूर्वक कविता वाचलीत , खुप बरे वाट्ले. मांत्रीक यांनी सांगितल्याप्रमाणे हा राधाकृष्ण संवाद आहे. राधेच्या तक्रारीला कृष्णाने दिलेली उत्तरे. राधा म्हणते, " मी तुला माझे सर्वस्व दिले, इतके की आता माझ्याजवळ माझे असे काहीही उरले नाही ,मी देखिल माझी राहिले नाही. एवढे करूनसुद्धा तू मात्र काही माझा झाला नाहीस. " त्यावर कृष्ण उत्तरतो, " अग दुसर्‍याला जे काही द्यायचे (अगदी सर्वस्व अर्पण करणे हे देखील )त्याचा बोझ ते घेणार्‍याला (किंवा दात्यालासुद्धा) वाटू नये इतपतच द्यावे. आणि तू एकीकडे म्हणतेस की,मी माझी उरले नाही आणि तक्रार करतेस की तो माझा झाला नाही.(हा विरोधाभास नाही का ?) जरा एकदा स्वतःमध्ये डोकावून पहा बरं, तुला ज्याचे दर्शन होइल तो कृष्णच आहे, कुणी वेगळा नाही ."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Mon, 09/07/2015 - 11:39 नवीन
त्यावर कृष्ण उत्तरतो, " अग दुसर्‍याला जे काही द्यायचे (अगदी सर्वस्व अर्पण करणे हे देखील )त्याचा बोझ ते घेणार्‍याला (किंवा दात्यालासुद्धा) वाटू नये इतपतच द्यावे. आणि तू एकीकडे म्हणतेस की,मी माझी उरले नाही आणि तक्रार करतेस की तो माझा झाला नाही.(हा विरोधाभास नाही का ?) जरा एकदा स्वतःमध्ये डोकावून पहा बरं, तुला ज्याचे दर्शन होइल तो कृष्णच आहे, कुणी वेगळा नाही ."
सिंप्ली ग्रेट ! आवडले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी
म
माहितगार Mon, 09/07/2015 - 11:41 नवीन
कविता यासाठीही आवडली की पत्नीला आणि मुलीला हि कविता एकाचवेळी आणि तेही घरातील वडीलधार्‍यांसमोर सहजपणे वाचून दाखवू शकलो. धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी
प
प्राची अश्विनी Mon, 09/07/2015 - 11:56 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
व
विशाल कुलकर्णी Tue, 09/08/2015 - 07:59 नवीन
मला वाटते विद्या सप्रेंच्या 'कृष्णमयि' मध्ये एक वाक्य आहे. "प्रेम करण्यात जे ऐश्वर्य आहे ते प्रिय होवून बसण्यात मुळीच नाही. म्हणून फक्त प्रेम करावं निष्पाप, निष्पक्ष, निरागस. राधेसारखं, मीरेसारखं." सुंदर झालीय कविता !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी
प
प्राची अश्विनी Tue, 09/08/2015 - 13:01 नवीन
सुंदर! नक्की वाचेन हे पुस्तक. अरुणा ढेरेंची कृष्णकिनाऱ्यातील राधा पण छान आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी
प
प्राची अश्विनी Sun, 09/06/2015 - 07:44 नवीन
धन्यवाद सर्वांनाच!
  • Log in or register to post comments
न
नूतन सावंत Sun, 09/06/2015 - 08:31 नवीन
सुरेख
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Sun, 09/06/2015 - 08:55 नवीन
छान लिहिली आहे. .मस्त..
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 09/06/2015 - 08:59 नवीन
सुंदर कविता!
  • Log in or register to post comments
म
मनिमौ Sun, 09/06/2015 - 09:01 नवीन
यथार्थ वर्णन केले आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 09/06/2015 - 09:31 नवीन
आवडली कविता. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
अ
अंतरा आनंद Sun, 09/06/2015 - 13:02 नवीन
सुंदर.
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Sun, 09/06/2015 - 14:47 नवीन
सुरेख कवीता. आवडली.
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Sun, 09/06/2015 - 14:52 नवीन
अप्रतिम
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sun, 09/06/2015 - 15:46 नवीन
शब्दांची रचना म्हणून सुरेख. पण बर्‍याच उपमा कळल्या नाहीत. मूळ म्हणजे कोण कुणाला कधी काय म्हणतय तेच कळले नाही. बिटविन द लाईन्स काही असेल तर पास. माझा कवितेतला अडाणीपणा असेल बहुतेक. :(
  • Log in or register to post comments
म
मांत्रिक Sun, 09/06/2015 - 16:16 नवीन
कवितेतील ज्या ओळी अक्षराने सुरु होतात, ते राधेचे मनोगत व ज्या ओळी टिंब टिंबने सुरु होतात ते कृष्णाचे मनोगत, असा माझा दृष्टिकोण. कदाचित कवयित्रीचा वेगळा असू शकतो. पण मी म्हणतो तसे वाचून पहा, उलगडा होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
प
प्राची अश्विनी Mon, 09/07/2015 - 11:36 नवीन
फार सुंदर रितीने समजून घेतलीत, धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक
ब
बोका-ए-आझम Sun, 09/06/2015 - 16:30 नवीन
फारच सुंदर. राधेची निर्मम प्रीती , गोपास बनविते कृष्ण हा एकदम वेगळा दृष्टीकोन वाटला. नेहमी आपण प्रत्येक गोपी राधा झाल्याचं वाचलंय किंवा ऐकलंय पण प्रत्येक गोप कृष्ण झाला हे पहिल्यांदाच!
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sun, 09/06/2015 - 16:41 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
म
माहितगार Mon, 09/07/2015 - 06:07 नवीन
'राधेची निर्मम प्रीती, गोपास बनविते कृष्ण' यास एकापेक्षा अधीक अर्थछटा आहेत असे वाटते का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
प
प्राची अश्विनी Mon, 09/07/2015 - 11:52 नवीन
कवितारुपी संवाद राधाकृष्णाच्या काळात सुरू होतो, आणि आजच्या काळात येउन थांबतो. आजची प्रेयसी म्हणते , मला राधेसारखं अशारिरीक, अविचल आणि अखंड प्रेम करणं (राधा बनणं) जमणार नाही कारण त्यासाठी कॄष्ण मिळावा/ जीवनात यावा लागतो. त्यावर कॄष्ण उत्तर देतो, राधेचं अस्तित्व कॄष्णामूळे नसून, कॄष्णाचं कॄष्णपण हे राधेमुळं आहे. म्हणून जेव्हा तू राधेसारखी निर्मम प्रीती करशील, तेव्हा तो तुझा प्रियकर कॄष्णच असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Mon, 09/07/2015 - 12:20 नवीन
"बनलेही असते राधा, मज कृष्ण भेटला नाही" या ओळीचं सरल वाचन मी "या नात्यातील उपेक्षा मी मूक साहिली नाही" या ओळी सोबत कृष्णा, तू उपेक्षा केलीस म्हणून मी तुझी राधा राहु शकले नाही हे जरा लटक्या रागाने असावे किंवा कृष्णाने राधेत राधा पाहील्याशिवाय राधा राधा कशी असेल ? या अर्थ छटा विचारात घेऊन केले. काळाचा फरक तुम्ही सांगीतलात म्हटल्यावर आणखी वेगळी आणि कवियत्रीची स्वतःची अर्थछटा कळाली. बाकी मांत्रिक यांच्या प्रमाणे मीपण या ओळींचे अध्यात्मिक अर्थासहीत वाचन केले ते परमेश्वराने केलेली उपेक्षा मी मुकपणे सहन केली नाही परमेश्वरा तू मला भेटला नाहीस किंवा भक्तातला भक्त पाहू शकला नाहीस म्हणून मी तुझ्या भक्तांच्या यादीत नाही जा! हा भक्ताचा लटका राग झाला. :) धन्यवाद. पु.ले.शु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी
स
स्वाती दिनेश Sun, 09/06/2015 - 17:03 नवीन
कविता आवडली. स्वाती
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 09/07/2015 - 05:06 नवीन
सुंदर थरांची ! अर्थवाही.
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Mon, 09/07/2015 - 05:09 नवीन
10 out of 10
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 09/07/2015 - 06:14 नवीन
शालेय आणि महावैद्यालयीन अभ्यासक्रमास लावावयास हवी असे वाटले !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
अ
अमृत Mon, 09/07/2015 - 06:21 नवीन
खूप आवडली
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 09/07/2015 - 06:25 नवीन
या कवितेतून राधा-कृष्ण संवादातून भारतीय संकल्पनेतील प्रणयाची जाणीव होते. भारतीय संकल्पनेतील प्रणयाची दखल घेण्याच्या मराठी विकिपीडियातील प्रणय या लेखातून केलेला आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर Mon, 09/07/2015 - 06:42 नवीन
क्या बात है!!
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Mon, 09/07/2015 - 11:38 नवीन
सुंदर रचना...
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Mon, 09/07/2015 - 11:53 नवीन
सर्वांनाच धन्यवाद!
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Mon, 09/07/2015 - 17:01 नवीन
मनभावन कविता. अशाच लिहित्या रहा. आम्ही वाचत्या राहू. हि कविता वाचून कधीकाळी ऐकलेली कथा 'दूध पोळलं' च्या निमित्ताने वर आली. दुसऱ्याला लिहीतं करणारी तुमची कविता ग्रेट! शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Mon, 09/07/2015 - 18:27 नवीन
सहसा या भागात येत नाही पण ही कविता खूप सुंदर
  • Log in or register to post comments
अ
अदि Tue, 09/08/2015 - 07:18 नवीन
रचना!!
  • Log in or register to post comments
म
मीता Tue, 09/08/2015 - 11:36 नवीन
कविता खूप सुंदर
  • Log in or register to post comments
G
gogglya Tue, 09/08/2015 - 12:39 नवीन
संवादाच्या लयीत लिहिण्याची शैली आवडली. बाकी मीरा पुर्णपणे कृष्णमय झाल्यामुळे तिच्याकडुन अश्या तक्रारी कधी आल्याच नसतील ना?
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा