Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माज्या हातावरली चिम्नी

श — शब्दानुज, Sun, 09/06/2015 - 08:56
धन्याम्होरं ती लांब उडून जायची त्यो जाताच माज्या हातावर बसायची.. शेतावर फक्त तीच माजाशी बोलायची पावसात माज्या हाताआड हळूच लपायची.. आता लपण्याची गरजच राहिली नाय हातावरली जागा आजबी रिकामी हाय.. धनीनेबी चिम्नीवानिच मला रामराम ठोकला बायकापोरास्नी माग ठेऊन निगुन गेला.. मोठ्या गाडीतनं त्यो लोकनेता आला जाताना गाडीत दारुची बाटली उघडला.. सात दिवसानंतर छोटं धनी आलं ट्र्ाक्टरवर बसुन माझ्याकडं पाहून हसलं.. हातावरचं पाव्हण आता बिगीबिगी येईल.. पर धनीला परत कोणं आणिलं?

प्रतिक्रिया द्या
1723 वाचन

💬 प्रतिसाद (4)
ब
बबन ताम्बे Mon, 09/07/2015 - 12:43 नवीन
.
  • Log in or register to post comments
श
शब्दानुज Mon, 09/07/2015 - 15:16 नवीन
शंभर जणात कमीतकमी तुम्हाला तरी आवडली...
  • Log in or register to post comments
ए
एस Mon, 09/07/2015 - 15:26 नवीन
ही बुजगावण्यावरची कविता आहे का? बर्‍याचदा वाचूनही नीट कळली नव्हती म्हणून प्रतिसाद दिला नाही.
  • Log in or register to post comments
श
शब्दानुज Mon, 09/07/2015 - 15:32 नवीन
बुजगावणच बोलत आहे
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा