Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मोकळा आहे तरी ना मुक्त मी...

व — विशाल कुलकर्णी, Mon, 09/07/2015 - 06:18
श्वास आहे घास नाही कोरडे नि:श्वास केवळ भाकरीचा चंद्र नाही, चांदण्याचा भास केवळ साव म्हणती, चोर म्हणती, ढोरही म्हणती कुणीसे माणसाची जात माझी, दांभिकांचा फास केवळ मिरग गेला हस्त गेला पांढरीला ओल नाही धान नाही पेरणीला, पावसाची आस केवळ प्राक्तनी सगळ्या जिवांच्या शेवटी मातीच आहे मोह संपे ना तरीही, खेळ 'त्याचा' ख़ास केवळ खोल नांदे जखम ओली वेदनेला अंत नाही मोकळा आहे तरी ना मुक्त मी... आभास केवळ अंतरीचा रामराया शोधिसी का एकट्याने? सोड आता नाद वेड्या, वेच थोडे श्वास केवळ विशाल ५/०९/२०१५

प्रतिक्रिया द्या
3446 वाचन

💬 प्रतिसाद (18)
द
दमामि Mon, 09/07/2015 - 08:22 नवीन
वाह!!!!
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Mon, 09/07/2015 - 12:00 नवीन
आवडली१
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Mon, 09/07/2015 - 12:02 नवीन
आवडली!
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 09/07/2015 - 12:33 नवीन
साव म्हणती, चोर म्हणती, ढोरही म्हणती कुणीसे माणसाची जात माझी, दांभिकांचा फास केवळ या ओळी आवडल्या अंतरीचा रामराया शोधिसी का एकट्याने? सोड आता नाद वेड्या, वेच थोडे श्वास केवळ या शेवटच्या ओळीत फारच निराशा दिसते. यावरून कवी ज्ञानेश वाकुडकरांची शेतकर्‍यास आत्मविश्वास देऊ इच्छित एक कविता अलिकडेच वाचली नाव आठवत नाहीए आठवले की देतो.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Tue, 09/08/2015 - 07:21 नवीन
अंतरीचा रामराया शोधिसी का एकट्याने? सोड आता नाद वेड्या, वेच थोडे श्वास केवळ या शेवटच्या ओळीत फारच निराशा दिसते. धन्यवाद. पण त्या ओळीत निराशा नाही तर स्वत्वावर, स्वतःवर विश्वास ठेवण्याचा सल्ला आहे. सगळे काही रामभरोसे न सोडता 'जगण्याचे' काही क्षण वेच. अशी आशावादी मागणी आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
प
पद्मावति Mon, 09/07/2015 - 14:21 नवीन
आवडली कवीता !
  • Log in or register to post comments
ए
एस Mon, 09/07/2015 - 15:47 नवीन
कविता भेदक आहे.
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 09/07/2015 - 15:49 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Mon, 09/07/2015 - 18:02 नवीन
निव्वळ अप्रतिम विशाल दा
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Tue, 09/08/2015 - 07:22 नवीन
धन्यवाद मंडळी _/\_
  • Log in or register to post comments
क
कहर Tue, 09/08/2015 - 07:29 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Tue, 09/08/2015 - 07:40 नवीन
सुपर्ब ! क्लास
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Tue, 09/08/2015 - 07:44 नवीन
धन्यवाद श्रेष्ठी _/\_
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Wed, 09/09/2015 - 20:56 नवीन
अंतरीचा रामराया शोधिसी का एकट्याने? सोड आता नाद वेड्या, वेच थोडे श्वास केवळ आवडली
  • Log in or register to post comments
श
शुचि Wed, 09/09/2015 - 22:39 नवीन
प्राक्तनी सगळ्या जिवांच्या शेवटी मातीच आहे मोह संपे ना तरीही, खेळ 'त्याचा' ख़ास केवळ
खलास!!!
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Wed, 09/09/2015 - 23:17 नवीन
वाचनखूण साठवली आहे.
  • Log in or register to post comments
न
नाखु गुरुवार, 09/10/2015 - 08:22 नवीन
मीही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी
व
विशाल कुलकर्णी गुरुवार, 09/10/2015 - 08:00 नवीन
धन्यवाद _/\_
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा