Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बनलो असतो दादा, मज साहेब भेटला नाही

ज — ज्ञानोबाचे पैजार, Mon, 09/07/2015 - 12:28
पेरणा सांगायलाच पाहिजे का? चहु दिशांत असे दु:कीर्ती, महाराष्ट्र टाचे खालती, तो , बारामती रहीवासी, मज साहेब भेटला नाही ....... किती निवडणुका झाल्या येड्या , निवडूनी येई परी हाची, ....... जरी मतदारसंघ बदलले त्याचे, तो साहेब पडला नाही तो परतून आला राज्यात, भुक न संपली त्याची जाहले अनेक घोटाळे , पण साहेब अडकला नाही ....... उमगता मोल जीवाचे, गेलेला झक मारत येई ....... समजून तयाला घे तू , तो साहेब सरळसा नाही सर्वस्व लुटले राज्याचे, काही ना बाकी उरले किती स्वतःस हरवून बसले , पण साहेब बधला नाही, .........इतुके न कुणाचे घ्यावे, की भार तयाचा व्हावा ........ बघ तुझ्यातही थोडा आहे, साहेब वेगळा नाही या राज्यातील उपेक्षा, मी मूठ वळवली नाही बनलो असतो दादा, मज साहेब भेटला नाही, ........ साहेबांची होता मेहेरबानी , कार्यकर्ता बने खंडणीस्वार ........ उघड्या नयनांनी बघ तू , महाराष्ट्राचा बनेल बिहार पैजारबुवा,

प्रतिक्रिया द्या
18550 वाचन

💬 प्रतिसाद (34)
प
प्यारे१ Mon, 09/07/2015 - 12:42 नवीन
आमच्या वयोवृद्ध आनि ज्येष्ठ नेत्यावर जे आकख्या महाराष्ट्राचे भूशन आहेत त्यांच्यावर अशी हीन कविता केलेली वाकून आमच्या कोमल(आयडी नव्हे) हृदयावर याठिकानी हे जे घाव घातले गेले आहेत ते बघून त्याठिकानी जनता तुम्हाला तुमची जागा त्याठिकानी दाखवल्याशिवाय राहनार नाही याची खात्री ह्या किंवा त्याठिकानी आम्हाला आहे. समस्त कार्यकर्त्यांनी ह्याठिकानी जास्त दंगा करु नये असं आव्वान जरी आमी केलेलें असलं तरी याठिकानी कार्यकर्ते नक्की काय भूमिका घेतली जाईल ते त्याठिकानी आम्ही सांगू शकत नाही. जै हिन्द जै महाराष्ट्र
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 09/07/2015 - 12:47 नवीन
हीण? आमी तर मोठ्या कौतुकाने लिहिली होती. तमाम म्हाराश्टाच्या जानत्या राजाबद्दल वंगाळ शबुद येईल का कोनाच्या थोबाडातुन? दातच पाडुन टाकेल त्याचे आहो आम्ही घरात साहेबाचा फोटु सुध्दा बारामती कडे तोंड करुन लावला आहे. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
ख
खेडूत Mon, 09/07/2015 - 13:21 नवीन
___/\__ बाकी त्यांचे जुने सहकारी दु. दु. झालेत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
द
द-बाहुबली Mon, 09/07/2015 - 12:52 नवीन
कवितेतील ज्या ओळी अक्षराने सुरु होतात, ते कोणाचे मनोगत व ज्या ओळी टिंब टिंबने सुरु होतात ते कोणाचे मनोगत आहे ?
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Mon, 09/07/2015 - 13:00 नवीन
माऊली सर्वोत्तम विडंबन. . जाता जाता श्रीगुरुजींसाठी त्यांचा नेहमीचाच हिट्ट विषय. बनलो असतो रागा, मज मम्मी भेटली नाही. किंवा बनलो असतो नमो, मज (लाल) कृष्ण भेटला नाही.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Mon, 09/07/2015 - 13:03 नवीन
" बनलो असतो दादा, मज चाकू भेटला नाही " हा सब्जेक्ट मात्र कॉपीराईटेड आहे याची नोंद घ्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ब
बॅटमॅन Tue, 09/08/2015 - 11:34 नवीन
खास श्रीगुर्जींसाठी असेल तर इशयाचे टैटल असे पायजे: "बनले असते माई, मज "हे" भेटले नाहीत". =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
न
नाखु Tue, 09/08/2015 - 12:15 नवीन
फकस्त किरकोळ दुरुस्तीसह.
"बनले असते माई, मज "हे" आडून भेटले नाहीत". =))
नाखु बेडेकर अभामिपातडकफलकदुरुस्तीसंघ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Tue, 09/08/2015 - 12:54 नवीन
सहीच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
ज
जेपी Mon, 09/07/2015 - 13:05 नवीन
आवडल..
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Mon, 09/07/2015 - 13:43 नवीन
स्वतंत्र कलाकृती म्हणून ही व्हॉट्सॅपवर व्हायरल व्हायच्या लायकीची रचना आहे.
  • Log in or register to post comments
द
दमामि Mon, 09/07/2015 - 14:13 नवीन
वा!!!! चपखल!!!
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Mon, 09/07/2015 - 14:25 नवीन
झक्कास!
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 09/07/2015 - 15:42 नवीन
लै भारी!
  • Log in or register to post comments
अ
अजया Mon, 09/07/2015 - 16:04 नवीन
=)) सही!
  • Log in or register to post comments
म
मित्रहो Mon, 09/07/2015 - 16:13 नवीन
एकदम झकास
  • Log in or register to post comments
D
dadadarekar Mon, 09/07/2015 - 19:07 नवीन
बनलोही असतो अकबर मज जोधा भेटली नाही.
  • Log in or register to post comments
स
संजय पाटिल Mon, 09/07/2015 - 19:46 नवीन
चहु दिशांत असे दु:कीर्ती, महाराष्ट्र टाचे खालती, तो , बारामती रहीवासी, मज साहेब भेटला नाही ....... किती निवडणुका झाल्या येड्या , निवडूनी येई परी हाची, यवडं उगडुन सांगायचं नसतं बुवा...
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 09/07/2015 - 19:51 नवीन
ह्या ह्य ह्या ह्या ! =))
  • Log in or register to post comments
प
पीके Mon, 09/07/2015 - 20:33 नवीन
गुर्जी, ठसका आडकला जनु नरड्यत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ए
एस Mon, 09/07/2015 - 21:14 नवीन
झालो असतो संपादक, मज कात्री (कातरी???) भेटली नाही. झालो असतो कन्हैय्या, मज मयत्रि भेटली नाही.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Tue, 09/08/2015 - 11:33 नवीन
ह्या ह्या ह्या =)) =)) =))
  • Log in or register to post comments
न
नि३सोलपुरकर Tue, 09/08/2015 - 12:44 नवीन
"उमगता मोल जीवाचे, गेलेला झक मारत येई"........ चपखल!!!
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 09/08/2015 - 13:29 नवीन
भारी! आता बिग्रेडी धावून येणार..........
  • Log in or register to post comments
ह
हेमंत लाटकर Wed, 09/09/2015 - 14:36 नवीन
बनलो असतो पहिला बाजीराव मज मस्तानी भेटली नाही.
  • Log in or register to post comments
ए
एस Wed, 09/09/2015 - 14:39 नवीन
कावरे कोल्ड्रिन्क्समध्ये चौकशी करायची होती ना! गेला बाजार सुजातामध्येपण मिळते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर
न
नाव आडनाव Wed, 09/09/2015 - 14:43 नवीन
चूक. ते "भेटली" नाही म्हणत आहेत, "मिळाली" नाही असं नाही. त्यामुळे तुम्ही दिलेले ऑप्शन चूक आहेत. आता त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे नवे ऑप्शन द्या त्यांना :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ए
एस Wed, 09/09/2015 - 14:47 नवीन
अर्रर्र! मग काय माहीत नाय ब्वॉ! बुंदेलखंडाला जावे लागेल त्यासाठी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाव आडनाव
ब
बबन ताम्बे Wed, 09/09/2015 - 14:53 नवीन
चहा भेटला नाही, कुठेच बियर भेटली नाही, पेट्रोल भेटले नाही वगैरे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
व
विशाल कुलकर्णी गुरुवार, 09/10/2015 - 08:00 नवीन
ए झक्कास्स ! याला म्हणतात विडंबन !!
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 09/10/2015 - 16:27 नवीन
एक लंबर इडंबण !
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Fri, 09/11/2015 - 14:41 नवीन
आत्ताच मी चंदेरी आणि अशोक नगरला जाऊन आलो, आजच घरी परतलो आहे. चंदेरी आणि अशोक नगरच्या मधल्या भागात राहणाऱ्यांचे भयानक वास्तव पाहिल्यावर 'श्रीमंत' पेक्षा 'साहेब' बरेच म्हणता येईल.
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत Sun, 09/13/2015 - 01:56 नवीन
चंदेरी,अशोक नगर आणि श्रीमंत हे तिन्ही नाही कळले. थोडे अधिक सांगता का, प्लीज ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
क
कैलासवासी सोन्याबापु Sun, 09/13/2015 - 02:15 नवीन
पैजारबुआ ____/\_____
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा