Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चूक नाही

व — वेल्लाभट, Tue, 09/08/2015 - 10:45
जरी सुखाची आस असणे चूक नाही हाव आहे ही आता, ही भूक नाही ओरडूनी सांग अथवा बस कुढत तेच आहे सत्य की जे मूक नाही बुद्धीची तलवार तू चालव स्वतःवर जातीची तुझियाकडे बंदूक नाही आमुचे ते वेगळेपण प्रिय आम्हा एक बिक होणे मुळी ठाऊक नाही कारणाविण काही येथे होत नाही अचानक हसणे कुणी हा फ्लूक नाही वाटते ते हो करूनी मोकळा तू धाकधूक नाही आणि रुखरुख नाही शेवटी पैसाच देतो चार घास भावनांनी भागणारी भूक नाही आरशाला दोष देणे चूक आहे आरशावर प्रेम करणे चूक नाही एक माझे वेगळेपण वर्ज्य त्यांना यापरी माझी अपूर्व चूक नाही - अपूर्व ओक ब्लॉग दुवा हा

प्रतिक्रिया द्या
2235 वाचन

💬 प्रतिसाद (9)
द
दमामि Tue, 09/08/2015 - 11:17 नवीन
वा! सुंदर!
  • Log in or register to post comments
द
द-बाहुबली Tue, 09/08/2015 - 12:51 नवीन
हम्म... न चा पाढा. छान जमलाय.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Tue, 09/08/2015 - 13:37 नवीन
मस्त ..
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट गुरुवार, 09/10/2015 - 12:43 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
न
निनाव Fri, 09/11/2015 - 15:05 नवीन
वाह. अप्रतिम. \\ आरशाला दोष देणे चूक आहे आरशावर प्रेम करणे चूक नाही \\
  • Log in or register to post comments
स
सटक Fri, 09/11/2015 - 15:08 नवीन
मस्त..
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 09/11/2015 - 15:20 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Fri, 09/11/2015 - 16:35 नवीन
सुरेख ! कविता की गझल ?
  • Log in or register to post comments
म
मांत्रिक Fri, 09/11/2015 - 17:08 नवीन
शेवटी पैसाच देतो चार घास भावनांनी भागणारी भूक नाही कविताही सुंदर! वरील ओळी तर खूप अर्थपूर्ण! वैश्विक सत्यच!!!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा