प्रणयपंचमी
हळूच मंद मालवे, कालचा नवा शशी,
हळूच धुंद पैंजणे, वाजती मनी कशी...
विरत रात्र विझतसे, विरत ना तरी स्मृती,
फिरत फिरत नेतसे, स्मरत तुज तवप्रती,
तरल धुंद मोहकसे, अननुभुत मधुपिशी..
प्रहर शुक्र चढतसे, बहर प्रणय पंचमी ,
झरत झरत येतसे, मदन कैफ लोचनी ,
धुसर कुंद मधुरसे, सहजतृप्त भावनिशी
निवांत सौख्य रमतसे, सुगंध रक्त चंदनी,
परत परत जातसे, भ्रमित गात्र कोंदणी,
सुखद मंद शारिरसे, अमृतमय यौनरशी..
(या कवितेचे धृवपद व पहिले कडवे वेगळ्या नावाने व वेगळ्या अर्थाने पूर्वप्रकाशित )
💬 प्रतिसाद
(13)
ए
एस
गुरुवार, 09/10/2015 - 02:52
नवीन
वाह!
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 09/10/2015 - 03:41
नवीन
अप्रतिम.
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 09/10/2015 - 05:37
नवीन
खासच!
- Log in or register to post comments
प
पद्मावति
गुरुवार, 09/10/2015 - 07:36
नवीन
सुरेख!
- Log in or register to post comments
श
शैलेन्द्र
गुरुवार, 09/10/2015 - 09:05
नवीन
धन्यवाद..
- Log in or register to post comments
न
निनाव
गुरुवार, 09/17/2015 - 17:57
नवीन
Aprateem!!
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Fri, 09/18/2015 - 11:35
नवीन
मस्त...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Gajanana... :- Bajirao Mastani
- Log in or register to post comments
J
jo_s
Sun, 09/20/2015 - 08:09
नवीन
व्वा
मस्त
- Log in or register to post comments
क
किसन शिंदे
Sun, 09/20/2015 - 08:15
नवीन
अप्रतिम!
- Log in or register to post comments
म
मांत्रिक
Sun, 09/20/2015 - 09:03
नवीन
मस्तच! शृंगाररसाची रंगपंचमी!
- Log in or register to post comments
श
शैलेन्द्र
Fri, 09/25/2015 - 16:36
नवीन
धन्यवाद
- Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी
Fri, 09/25/2015 - 17:43
नवीन
मस्त
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Fri, 09/25/2015 - 18:19
नवीन
अप्रतीम...केवळ अप्रतीम!
ये तो लाजव्वाब से भी बढकर है।
प्रत्यक्ष अनुभूती आल्यासारख वाटल सगळं गीतकाव्य वाचताना.
आणि त्या जुन्या "नवीन आज चंद्रमा, नवीन आज यामिनी मनी नवीन भावना, नवेच स्वप्न लोचनी !" या गाण्याची तुमच्या गीतकाव्याची पहिली ओळ वाचताच आठवणहि झाली.
ते गीत देतोच इथे ऐकायला..
- Log in or register to post comments