Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज़ी जिल्बी:- स्कार्फ आणि डोळे! ;-)

अ — अत्रुप्त आत्मा, गुरुवार, 09/10/2015 - 06:40
स्कार्फ आडून चमकती डोळे खुणवून काही बोलताती मनी आमुच्या काही पक्षी हलकेच हळूच उडताती तरंग येतात मनी मग जोवर ती असते पुढे स्वप्न-रंजनाचा पारवा ऊंsssच आकाशी उडे ओढणि ती सँक ती ही डोकावे वॉटर बॉटली सुंदर किती रूप हे भावना मनात साठली हॉर्न मागून वाजताही किल killले तो आरसा निबरल्या आमुच्या मनी फरक न पडे फारसा! ;-) सिग्नलाला थांबताहि खेळ तोची राहे सुरु सुटता सिग्नल मागूनी ओ रडती, "अरे नको मरू!!!" :-\ ग्रीन सिग्नलाची वाट पाहू नये रे का मना? होतात की हो तुम्ही ही त्यात फक्त एकदा, "नाही" म्हणा! हाय याहि विचारात गेली ती निघुनी पुढे पुन्हा दुसय्रा स्कार्फ साठि मन आमुचे बागडे रस्त्या वरच्या ट्रेफ़िकात सुखाची ही झुळूक आहे एरवी कं'टाळून आंम्हा मरण येथे अटळ आहे पीरेम नव्हे हे फ़क्त ही सुखाची तर भावना सिग्नल चुकला तर होते केवळ ती ही वासना जाऊ दे ते तत्त्व आणि ज्ञान माझे तोकडे मी ही जातो मार्गी माझ्या जा तुम्ही तुमच्याकडे =========== सध्या एव्हढेच.. ;-) बाकी चे .. पुन्हा कधीतरी! :-D

प्रतिक्रिया द्या
21141 वाचन

💬 प्रतिसाद (54)
म
माम्लेदारचा पन्खा गुरुवार, 09/10/2015 - 06:47 नवीन
ही गाडी बुंगाट सुटली आहे बर्का ....णो शिगनल !!
  • Log in or register to post comments
ए
एस गुरुवार, 09/10/2015 - 07:05 नवीन
तो 'सँक' शब्द फारच भावला. :-)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 09/10/2015 - 09:06 नवीन
ते नुस्त अर्धचंद्र बोंबल्या च्या कळ फलकावर उपलब्ध नाय हो! :-\ दू दू दू! :-\
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ए
एस गुरुवार, 09/10/2015 - 09:43 नवीन
sEk असे टाईप करा सरळ. सॅक असे देवनागरीत उमटेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
स
सूड गुरुवार, 09/10/2015 - 11:04 नवीन
+१ सँक वाचून आय टोटली सँक!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 09/10/2015 - 16:34 नवीन
बुवा, असं काही करू नका. जिमो तुमच्यावर प्रताधिकारभंगाचा खटला भरतील ना ;) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
च
चाणक्य गुरुवार, 09/10/2015 - 07:11 नवीन
जमलीये. 'भावना'पोचल्या.
  • Log in or register to post comments
न
नाखु गुरुवार, 09/10/2015 - 07:14 नवीन
सकाळचे दहा वाजून ४० मिनिटे झालीत ऐकूयात दो रास्ते मधील हे सुमधूर गीत. नुस्तालोजीया नाखु
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 09/10/2015 - 07:15 नवीन
अतिशय अप्रतिम, सहज सुंदर कविता. दैनंदिन जीवनात सतत दिसत असणाऱ्या प्रसंगाचे अतिशय काव्यमय भाषेत भावविभोर वर्णन. ह्या सुंदर काव्यामुळे आम्ही कर्जदार झालोत तुमचे. आम्हाला तुमच्या लेखनाच्या चाहत्यांमधे एक स्थाण दया प्लीज.
  • Log in or register to post comments
अ
अन्या दातार गुरुवार, 09/10/2015 - 11:44 नवीन
अत्यंत सहमत. कसं सुचतं हो तुम्हाला बुवा??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
न
नाव आडनाव गुरुवार, 09/10/2015 - 07:28 नवीन
स्कार्फ आडून चमकती डोळे कालंच अरेबिक म्युजिक सर्च करून ऐकत होतो. असे बरेच "स्कार्फ आडून चमकणारे डोळे" होते :) ही घ्या लिंक त्या डोळ्यांची :) https://www.youtube.com/watch?v=H0kNHLXAQMo
  • Log in or register to post comments
स
सस्नेह गुरुवार, 09/10/2015 - 07:28 नवीन
अजून कुठल्या स्कार्फमध्ये अडकला नाहीत ना ?
  • Log in or register to post comments
प
पद्मावति गुरुवार, 09/10/2015 - 07:35 नवीन
मस्तं. मजेदार लिहिलय.
  • Log in or register to post comments
प
पियुशा गुरुवार, 09/10/2015 - 07:52 नवीन
मला काही कड्वी नाही समजलीत :( बुवासाठी स्थळ पहा आता :प
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 09/10/2015 - 09:08 नवीन
@मला काही कड्वी नाही समजलीत :( >> कसं ते!? :-D @ बुवासाठी स्थळ पहा आता : >> दुत्त जिल्बुचा! :-\ ब्वार! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा
स
स्रुजा गुरुवार, 09/10/2015 - 20:40 नवीन
या बुवा लायनीत .. अखिल मिपा वधुवर सुचक मंडळात स्वागत आहे तुमचं. वधु ने स्कार्फ बांधुन च कांदा पोहे प्रोग्राम ला यावं ही वि.सु. तुमच्या फायलीत टाकते. पियुशा तुला रेफरल चा काही बोनस मिळणार नाही ये, सगळी फी भरायचीच ! बाकी कविता लय भारी. मजा आली वाचताना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा
प
प्यारे१ Fri, 09/11/2015 - 09:39 नवीन
रेवती आज्जी नी नवीन पार्टनरशिप सुरु केली का तुमच्याशी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
द
दा विन्ची गुरुवार, 09/10/2015 - 07:56 नवीन
मस्तं. मजेदार लिहिलय.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ गुरुवार, 09/10/2015 - 09:13 नवीन
मस्त ओ बुवा. थोडीशी भाऊसाहेब पाटणकरांची याद आली. नै नै वयामुळं नै, कवितेतल्या निरागस चावटपणामुळे ;)
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 09/10/2015 - 09:29 नवीन
=)) पुणे तिथे काय उणे!
  • Log in or register to post comments
द
दमामि गुरुवार, 09/10/2015 - 09:34 नवीन
मामोआॅ शिव शिव शिव, आत्मुस शोभत नाही हो तुला, श्रावण चालू आहे हे विसरू नकोस हो. हे विचारत होते, तुझ्या फटफटीवर ह्यांना डबलसीट बसायला मिळेल काय?
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 09/10/2015 - 11:20 नवीन
हे नको! :-\ तु ये! ;-) मग शोभेल.. बर का, The मामी! :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि
ब
बॅटमॅन गुरुवार, 09/10/2015 - 14:03 नवीन
तू ये तुला डबल(शीट) नेईन? ;) बाकी कविता क्लासच! नाव आडनाव यांनी म्हटल्याप्रमाणे अरबी नेत्रपल्लवी हा एक वेगळाच प्रकार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
द
दमामि गुरुवार, 09/10/2015 - 14:10 नवीन
मामोअॅा इश्श, चावट कुठला. हे काय वय आहे का माझं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
भ
भैड्या गुरुवार, 09/10/2015 - 18:16 नवीन
हा द मामी आहे की द मामा? आम्ही तर मिरासदारच समजत होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि
क
कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 09/10/2015 - 16:36 नवीन
बुवा मांडी घालुन बसतात म्हणे गाडीवर. डबलसीटचा जरा घोळ होईल रे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि
च
चाणक्य गुरुवार, 09/10/2015 - 10:23 नवीन
बाकी ते 'स्कार्प' असं न लिहील्याबद्दल निषेध
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ गुरुवार, 09/10/2015 - 10:51 नवीन
याक्चुअलि त्याला 'स्टोल' म्हणतात. बुवा बाल्पणापासून अविवाहीत असल्यानं (चाणाक्ष वाचकांनी आम्ही ब्रह्मचारी म्हटलं नाही हे ओळखलं असेल्च) त्यांना म्हायती नाही. ;) -माहितगार (आयडी नव्हे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चाणक्य
ब
बाबा योगिराज गुरुवार, 09/10/2015 - 10:36 नवीन
खासच.....
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या गुरुवार, 09/10/2015 - 10:43 नवीन
स्कार्फ के पीछे कभी भागना नही चाहीये. एक गया तो दुसरा आयेगा.
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 09/10/2015 - 11:05 नवीन
अंमळ हिरवट कविता!! =))
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 09/10/2015 - 11:50 नवीन
तितकाच खवट परतीसाद! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 09/10/2015 - 12:20 नवीन
@प्रचेतस ह्या सुंदर काव्यामुळे आम्ही कर्जदार झालोत तुमचे. >> धन्य"वाद मारझन :P आम्हाला तुमच्या लेखनाच्या चाहत्यांमधे एक स्थाण दया प्लीज.>> असो! =============== @अन्या दा तार >> हल कट दू दू दू :-\ ल्लुल्लुल्लुल्लू :P ================ स्नेहा तै>> नै! :-D पळून गेले तीन स्कार्फ! :-D =================== @प्यारे बुवा बाल्पणापासून अविवाहीत असल्यानं>> :-D दुष्ट! :-D =================
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
प
प्यारे१ गुरुवार, 09/10/2015 - 15:14 नवीन
>>>> पळून गेले तीन स्कार्फ! :-D काय बुवा? काय हे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 09/10/2015 - 13:29 नवीन
बुवांच्या पिवळट कविताही मस्त असतात अर्थात हे देखिल आवडलीच पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
प
पिचकू गुरुवार, 09/10/2015 - 13:47 नवीन
अले वा !अश्श आहे का?
  • Log in or register to post comments
अ
अन्या दातार गुरुवार, 09/10/2015 - 15:11 नवीन
असं नव्हे ते. अच्चं जालं तल असं म्हणायच असतय :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिचकू
प
पिचकू गुरुवार, 09/10/2015 - 16:32 नवीन
कधितरी झालं तल "अच्च जाल्ल तल" नेहमीच होतंय तल "अश्श आहे तल"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार
भ
भैड्या गुरुवार, 09/10/2015 - 18:02 नवीन
नैवो, हे अगदीच पिचकल्यासारखं वाटतयं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिचकू
म
मी-सौरभ गुरुवार, 09/10/2015 - 13:58 नवीन
सिग्नलाला थांबताहि खेळ तोची राहे सुरु सुटता सिग्नल मागूनी ओ रडती, "अरे नको मरू!!!" :-\
हे तेवढ जरा ईस्कटून सांगा ना गडे!!
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 09/10/2015 - 14:08 नवीन
अग दी!! मागून सिग्नल सुटणे हा कवीने मराठी भाषेला दिलेला नवा वाक्प्रचार वाटतोय. यावर वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ
भ
भैड्या गुरुवार, 09/10/2015 - 18:10 नवीन
@ मी -सौरभ, ते असे आहे. सिग्नलला थांबल्यावर तोच खेळ सुरू राहतो. सिग्नल सुटल्यावर व थोडं पुढे गेल्यावर पाठीमागुन लोकं ओरडतात , " अरे नको मरू". - (आर. टी. ओ. महासंचालक) भैड्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ
अ
अजया गुरुवार, 09/10/2015 - 17:28 नवीन
भावविभोर कविता!
  • Log in or register to post comments
म
मांत्रिक गुरुवार, 09/10/2015 - 18:37 नवीन
बुवा मस्त आहे हो जिल्बी! अगदी अवखळ! थोडी चाबरट! पण मस्त जिल्बी!!!
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 09/10/2015 - 19:30 नवीन
च्यायला एकपण सणसणीत प्रतिसाद नाही? गद्यपद्यविडंबनकृतीमंचास जाहिर आव्हान.कोणरे तो बोल्ला विडंबनास पेर्णा देणारं येतच नाही?
  • Log in or register to post comments
श
शंतनु _०३१ Fri, 09/11/2015 - 09:37 नवीन
Office हुन परततानाची माझीच "कैफियत" मांडली हो नेमक्या शब्दात
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 09/11/2015 - 23:35 नवीन
कित्ती तरल भावना या!
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Sat, 09/12/2015 - 03:38 नवीन
मस्त मजा आली वाचुन
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sat, 09/12/2015 - 10:47 नवीन
अहाहाहा, काय ती प्रतिभा. अप्रतिम. गुर्जी तुमची चाहत्यांची यादी प्रचेतसरावाणंटर खुली असेल तर मला पन स्थाण द्या णा.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 09/12/2015 - 13:21 नवीन
त्या हत्तीला मी बुदकवणार आहे..... :-/ दुत्त दुत! ल्लुल्लुल्लुल्लु :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा