Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गंड मार्गदर्शन काव्य- मार्फत प्रेरणा दायी हम्मा (आम्ही प्रेरणा देतो :) )

म — माहितगार, Fri, 09/11/2015 - 20:54
कामधेनु दावणं सोडून केव्हाच गेली काळाच्या पडद्याआड गोठाही केव्हाच गेला न पळी राहिलीए ना पंचपात्र किणकीणाट होतो कधीतरी कुठे कुठे रिकामा किणकीणाट करणारे,तेवढेच त्यांच्या नावे नुसताच टाहो फोडणारे संपत आलेल्या किणकीणाटाला खणखणाट समजून अथवा भासवून उगाच खडे फोडतात कधी कधी शिळ्याकढीला ऊत आणून कधी सत्तेच्या आशेने कधी कल्पवृक्ष मिळवून देण्याच्या मृगजळी स्वप्नाने कधी कामधेनू आपल्याही गोठ्यातून निघून गेली या दु:खाने त्यांनी इतिहासाच्या अभिमानाची रेष जेवढी फुगवून दाखवीली बरोबरीस अन्यायाची रेष तेवढीच फुगवून दाखवतो पण मूळ रेषेत फुगवटा होता हे मी विसरूनच जातो. ते इतिहासात आहेत याचं रडगाण मी गातो पण माझाही पाय इतिहासात अडकलाय हे मी विसरूनच जातो. आज करावयाची निर्मीती सर्जन आणि उत्पादन मी विसरूनच जातो. त्यांनी चुकीची दिशा दाखवली हे सांगण्याच्या नादात मी स्वतःची दिशा स्वतः शोधायची हे विसरुनच जातो. धर्माच्या नावावर मनशत्रु द्युत खेळण्यास सांगतो म्हणून ओम-होम फूटफटी खेळायची की दुष्काळात गोदावरीला दिशा देणारा एका गौतमाने जगलेला कर्म सिद्धांत निवडायचा की अथवा स्वयंप्रकाशित होण्यास सांगणार्‍या दुसर्‍या गौतमापासून प्रेरणा घ्यायची ? मृगजळाच्या अथवा आयत्या सुवर्ण मृगाच्या मागे न धावणारी चांगली प्रेरणा कोणत्याही गौतमापासून घ्या लक्ष्य मूख्य ध्येयावर केंद्रीत करा म्हणजे झाले शत्रुपक्षाने टाकलेल्या द्युताच्या खोट्या फाशांशी खेळत नका बसू म्हणजे झाले कोणत्याच गौतमींवर अन्याय नका करु म्हणजे झाले. गंड अहमाचा असो अथवा गंड न्यूनाचा असो, गंड दोन्ही प्रकारचे सोडले म्हणजे झाले. -प्रेरणा दायी हम्मा (आम्ही प्रेरणा देतो :) )

प्रतिक्रिया द्या
1712 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा