Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रंगल्या रात्री अश्या

भ — भैड्या, Sun, 09/13/2015 - 14:41
रंगल्या रात्री अश्या गोलघुमट टक्कल जश्या तो विजेचा खांब तरर्राट उभा असा या सडकेच्या तोंडावरती देऊन टाक भसाभसा दुरून पहा ते कुत्रे सांडांच्या खांद्यावरचे लावलाय लळा तु त्यास आज असा कसा? बुंगाट ढेकर देऊन ऊठ त्या पानावरुन घेऊन जा घागरी अनं हलव तो हापसा आम्ही सुर्याची लेकरे कोवळ्या ऊन्हात निपजितो अन घेऊन या घागरी आज सकाळीच हापसितो दे दे मला तो बंजरखंड मशेरी त्यावर मी भाजितो आज सकाळी टकलावर हात मी फिरवितो

प्रतिक्रिया द्या
10944 वाचन

💬 प्रतिसाद (15)
म
मांत्रिक Sun, 09/13/2015 - 18:48 नवीन
बापरे! कविता काहिच्च कळली नाही! तरीपण आवडली!!! काय भयानक चित्रसृष्टी निर्माण केलीय लेखकाने!!! बाबौ!!! सलाम त्याबद्दल!!! आवडलं लिखाण!!!
  • Log in or register to post comments
ए
एस Sun, 09/13/2015 - 18:53 नवीन
काय शरदिनीतै आल्या का अंगात की मास्तरांनी डुआयडी घेतलाय परत? :-)
  • Log in or register to post comments
म
मांत्रिक Sun, 09/13/2015 - 18:56 नवीन
भौ! कृपया अमूर्त चित्रसृष्टीकडे लक्ष द्यावे. जे पकडायचा प्रयत्न करून देखील सापडत नाही असे काहीतरी आहे. त्या अमूर्ताचा शोध हाच कवितेचा प्लस पाॅईंट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
च
चांदणे संदीप Sun, 09/13/2015 - 20:11 नवीन
कळाली... मला कविता कळाली... अस वाटायच्या आतच लांब पळाली! (विको वज्रदंती लावल्यावर कळेल काय? :-/)
  • Log in or register to post comments
भ
भैड्या गुरुवार, 09/17/2015 - 14:29 नवीन
या भक्क्कळ कमेंटा वाचुन आमाला भरतं आलेलं हाये. डोळ्यातील चार टिपुस धाग्यावर शिंपडुन वरच्यांच्या आभारप्रदर्शनाचा ठराव पास खरतो. असावा लोभ भैडु.
  • Log in or register to post comments
न
नाव आडनाव Fri, 09/18/2015 - 12:04 नवीन
कायंच कळलं नाय, पण मस्तं. भक्क्कळ - व्वा. सरकार नवा शब्द दिला तुम्ही माय मराठीला. पण, तो "क्क्क" कसा वाचायचा आणि उच्चारायचा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भैड्या
भ
भैड्या Fri, 09/18/2015 - 16:24 नवीन
आधी चुळ भरा बघू.. मग घसा घराघरा खाक्रा. आता वर बघा (तिकडे नैवो).. परत खाली बघा. जोर लावुन वरडा " हे क्क्काय आहे?????" बघा जमलं की नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाव आडनाव
म
मदनबाण Fri, 09/18/2015 - 11:41 नवीन
काय झेपलं नाय बाँ आपल्याला... मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Gajanana... :- Bajirao Mastani
  • Log in or register to post comments
भ
भैड्या Fri, 09/18/2015 - 16:28 नवीन
उलीउलीकसं उचला की मग.. (नसता सगळा सान्डालवन्डा!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
व
विवेकपटाईत Fri, 09/18/2015 - 16:20 नवीन
कविता आवडली. टकल्यावर चंद्रमा चमकल्या सारखे वाटले. पांढरे केसं असती तर सूर्य चमकला असता.
  • Log in or register to post comments
फ
फुलथ्रॉटल जिनियस Fri, 09/18/2015 - 16:25 नवीन
भैड्याजी, निराकार गाढाव क्वोण वो तुम्चं
  • Log in or register to post comments
भ
भैड्या Fri, 09/18/2015 - 16:35 नवीन
भैड्याजी????? चरणकमळ करा हीकडे ( खेटरं बाजुला).. आपलाच (अडला हरी) भैडु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 09/18/2015 - 17:17 नवीन
बुंगाट ढेकर देऊन ऊठ त्या पानावरुन घेऊन जा घागरी अनं हलव तो हापसा
Image removed.
  • Log in or register to post comments
भ
भैड्या Fri, 09/18/2015 - 17:31 नवीन
महा-तम्यांचे चरण दोऱ्याला लागले अणिक जीव खालसा झाला. _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 09/18/2015 - 18:56 नवीन
ओळखलं मी तुला.... पां डुब्बा Ssssss. :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भैड्या
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा