Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आवर्त

अ — अरुण मनोहर, Sun, 09/13/2015 - 15:16
माझ्या चरचरीत पंज्याला सुखावणारा तुझा चिमुकला मऊसूत तळवा तुला भान देखील नाही बोचऱ्या स्पर्शाचे गाढ झोपेत मंद हसरा तुझा चेहरा इकडे प्रेम आणि तिकडे आधार यांच्या आश्वासक सोबतीत विसावलाय, दिवसभराचे उनाडणे विसरून तुझ्या निर्व्याज निजेची गुंगी मलाही चढू लागली आहे हळूहळू खूप वर्षापूर्वी माझ्या शेजारी अशीच होती शांत निजलेली दोन छोटी पाउले. मला टक्क जागे ठेवून माझी शर्यत सुरू झाली होती त्यांना जिंकविण्याची ती कोमल पाउले, हजारो मैलांचा प्रवास समोर होता त्यांच्या त्यांना बळ देऊ शकणार कां मी? दिशा कशी दाखविणार? कुठे भरकटणार नाहीत नां ती? बिन उत्तराचे प्रश्न पांघरून मी तळमळत, चिमुकली दोन पाउले अशीच होती शांत निजलेली बाजूला. पण किती फरक, तेव्हा आणि आत्ता! त्यावेळी त्यांना बळ देण्याचा भार माझ्या पाउलांवर त्यांना दिशा दाखविण्याचे दायित्व माझ्या शिरावर! चिमुकली पाउले होती गाढ झोपेत, मी तळमळत! आता, तुझी रेशमी पाउले माझ्या खरखरीत तळपायाला गोंजारत आणि मी शांत, निवांत, बिनधास्त तुझा सगळा भार पेलणारी मी चालणे शिकवलेली, समर्थ पाउले, आहेत तुझ्या बाजूला! मी सुशेगाद! हा क्षण मुठीत पकडून ठेवता येईल?

प्रतिक्रिया द्या
3275 वाचन

💬 प्रतिसाद (17)
प
पद्मावति Sun, 09/13/2015 - 15:27 नवीन
आई ग....किती सुरेख. फारच गोड लिहिलंय. बाबा ते आजोबा हा प्रवास. दोन भूमिकांमधील फरक किती सुंदर उलगडलाय तुम्ही. फार आवडली ही कविता.
  • Log in or register to post comments
ए
एस Sun, 09/13/2015 - 15:33 नवीन
असेच म्हणतो. फार छान कविता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति
च
चाणक्य Sun, 09/13/2015 - 17:07 नवीन
मस्तच आहे कविता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
म
मांत्रिक Sun, 09/13/2015 - 18:18 नवीन
पद्मावतीताई यांच्याच प्रतिसादाची री ओढत म्हणतो, सुंदर! एकदम सुंदर! मनाला स्पर्श करणारे!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति
स
सटक Mon, 09/14/2015 - 14:40 नवीन
सुंदर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति
अ
अरुण मनोहर Sun, 09/13/2015 - 15:38 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 09/13/2015 - 15:40 नवीन
बाबा ते आजोबा स्थित्यंतरावरची सुंदर कविता !
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Sun, 09/13/2015 - 17:33 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
र
रातराणी Sun, 09/13/2015 - 17:13 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Sun, 09/13/2015 - 17:44 नवीन
सुरेख अगदी सुरेख
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Sun, 09/13/2015 - 23:37 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर Mon, 09/14/2015 - 09:11 नवीन
सुंदर कविता..
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 09/14/2015 - 09:37 नवीन
भावना शब्दात पकडणं खरच अवघड असतं आणि ते तुम्ही नेमकं पकडलयं आणि हे अनुभुतीवीण अस्सल येणार नाही. वाखु साठवली आहे (काव्य विभागात फारसी वाखु साठविण्याचा प्रसंग येत नाही) बाबा-अनुभवी नाखु
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Mon, 09/14/2015 - 23:38 नवीन
खरय तुमच निरीक्षण ! एकदा नातू शेजारी झोपला असताना त्याचा शांत चेहरा बघून असे विचार मनात आले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
म
मांत्रिक Mon, 09/14/2015 - 14:22 नवीन
अवांतर - तुम्ही मिपाचे बरेच जुने सदस्य दिसत आहात बाकी. ८९३ सदस्य क्रमांक दिसतोय. अगदी स्थापनेच्या काळात देखील तुम्ही सक्रिय असणार. मिपावरील स्थित्यंतराबाबत लिहिलं तर वाचायला आवडेल. :) इतके जुने पण सक्रिय आयडी अजून कोण कोण असतील?
  • Log in or register to post comments
म
मांत्रिक Mon, 09/14/2015 - 14:23 नवीन
हा प्रतिसाद अरूण मनोहर यांना आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक
स
सूड Mon, 09/14/2015 - 14:34 नवीन
मस्त लिहीलंय!!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा