Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सफर आडवळणावरील खेड्यांची....!

म
मेघनाद
Tue, 09/15/2015 - 07:55
💬 48
हि सफर विदेशाची नाही तर कोंकणातील खेड्यांची आहे, तेही फार प्रसिद्ध नसलेल्या खेड्यांची. हल्लीच जूलै महिन्यात कोकणात जाऊन आलो. तिकडच्या नातेवाईकांची भेट घ्यावी आणि कोकणातला पावसाळी ऋतू मनमुराद अनुभवावा एवढाच मानस होता. माझ्या ह्या खेपेला मी ३ गावी जाऊन आलो, टी पुढीलप्रमाणे - १.कोंड्ये, २.मीठगवाणे, गगनगड आणि गिर्ये. गुगल नकाश्यांचे दुवे: १. कोंड्ये २. मीठगवाणे ३. गिर्ये ४. गगनगड (नकाशे बघण्यासाठी नावावर राईट क्लिक "ओपन इन न्यू टाब" ) पैकी वरील दोन गावं (कोंड्ये आणि मीठगवाणे) हि गुगल नकाशावर मीच नोंदवली आहेत. काही दिवसांनी गुगल वाल्यांनी ह्या दोन खुणा सच्च्या असल्याची ग्वाही देऊन नकाशावर प्रकाशित केली. गिर्ये गावात पवनचक्क्या असल्याने ते गावं आधीपासूनच नकाशावर होते....धन्यवाद गुगल बाबा! असो.. २१ जून रोजी संध्याकाळी पनवेल डेपो वरून रिझर्वेशन केलेली बोरीवली-राजापूर एसटी पकडायची होती, लाल डब्बा आपला एकदम फेवरेट! अगदी लहान असल्यापासून एसटीचा प्रवास दरवर्षी केलेला असल्याने लाल डब्ब्याशी जिव्हाळ्याच नात तयार झालेलं आहे. पूर्वीच्या तुलनेत आता लाल डब्बा काही अगदीच डब्बा राहिलेला नाही हां. २x२ आणि आरामदायक सीट, स्वच्छता, शांत परंतु वेगवान इंजिन अश्या अनेक सुधारणा एसटी महामंडळाने केल्या आहेत, तरीहि नाक मुरडण्याची सवयच झालेली मंडळी अजूनही एसटी प्रवासाला नाकारतात...असो ज्याची त्याची आवड. तर अश्याप्रकारे आम्ही (मी आणि माझा आत्या भाऊ) डोंबिवलीहून पनवेलला पोहोचलो. काही काळाची प्रतीक्षा झाल्यावर ट्राफिक मुळे रखडलेली आमची एसटी येऊन दाखल झाली, ठरलेल्या सीटा पकडून बसलो.  एसटी चालक वेगवान होता परंतु सध्या चालू असलेल्या मुंबई-गोआ महामार्गाच्या रुंदीकरणामुळे रस्ता अगदीच बेकार झाला आहे, त्यामुळे होडीप्रमाणे आमची बस हेलकावे खात २०-३० च्या वेगाने प्रवास करत होती. तरी देखील ९ वाजता पनवेल सोडलेले आम्ही रात्री १२ वाजता महाडला पोहोचलो. पुढे अतिशय सुंदर असा कशेडी घाट वेगाने ओलांडून १:३० वाजता चिपळूण गाठलं. इथे चालक आणि वाहक बदलून दुसरे आले, दुसरा चालक तर विमानासारखी बस हाकत होता. त्याच ड्रायविंग कौशल्य खरच थक्क करणार होत. १५० किमी चा घाटांचा वळणावळणांचा रस्ता अगदी सहज २.३० तासात पूर्ण करून राजापूरला पहाटे ४ वाजता पोहोचलो, आणि टपरीवरचा मस्त गरमागरम चहा पिऊन फ्रेश झालो. इथून सकाळी ६ वाजताची दुसरी एसटी पकडून पुढे १४ कि.मी वरील कोंड्ये ह्या गावी उतरलो. मुंबई-गोआ हाइवेच्या दोन्ही बाजूला पसरलेलं टुमदार गावं आहे हे. घरी पोहोचून मावशी आणि माझ्या भावंडाना भेटलो आणि सगळे दैनंदिन व्यवहार आटपून हातात क्यामेरा (कॅनन 600डी विथ १८-५५ आणि ७५-३०० युएसम लेन्स) घेऊन फिरायला बाहेर पडलो. त्यातील काही छायाचित्र पुढे देत आहे. स्वागतोत्सुक म्हैस. स्वागतोत्सुक म्हैस. . अळवावरच पाणी अळवांवरच पाणी . गावातून जाणारा मुंबई-गोवा हाइवे गावातून जाणारा मुंबई-गोवा हाइवे . रस्त्याशेजारील शेतमळा   रस्त्याशेजारील शेतमळा . उनाड खोड उनाड खोड . नवीन पालवी नवीन पालवी . हिरव्या रंगछटा हिरव्या रंगछटा क्रमशः
  • सफर आडवळणावरील खेड्यांची....२
  • सफर आडवळणावरील खेड्यांची....३

Book traversal links for सफर आडवळणावरील खेड्यांची....!

  • सफर आडवळणावरील खेड्यांची....२ ›

प्रतिक्रिया द्या
36160 वाचन

💬 प्रतिसाद (48)
म
मांत्रिक Tue, 09/15/2015 - 07:58 नवीन
कल्पना तर सुंदर आहे. पुढील भागांची प्रतिक्षा देखील वाढलेली आहे. पण छायाचित्रांचे दुवे आलेले नाहीत.
  • Log in or register to post comments
ए
एस Tue, 09/15/2015 - 08:02 नवीन
गणेशा!
  • Log in or register to post comments
म
मांत्रिक Tue, 09/15/2015 - 09:10 नवीन
गणेशा होणे म्हणजे काय? जरा नवीन मेंब्रांना पण सांगा की ईस्कटून!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
स
सूड Tue, 09/15/2015 - 11:35 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
म
मेघनाद Tue, 09/15/2015 - 09:06 नवीन
गणेशा ऊत्तमच झाला आहे. छायाचिञांचे दुवे लवकरच अद्ययावत करतो. तोपर्यंत माफि असावी.
  • Log in or register to post comments
ब
बाबा योगिराज Tue, 09/15/2015 - 09:09 नवीन
पन फोटु दिसनात बगा...........
  • Log in or register to post comments
अ
अविनाश पांढरकर Tue, 09/15/2015 - 09:22 नवीन
पुढील भागांची प्रतिक्षा देखील वाढलेली आहे
  • Log in or register to post comments
अ
अजया Tue, 09/15/2015 - 10:48 नवीन
फोटो काय वापरून टाकले आहेत? पिकासा,फ्लिकर, फेसबुक यातल्या लिंक चालतात मिपावर.मोबाईलवर postimage.org वापरता येईल.
  • Log in or register to post comments
म
मेघनाद Tue, 09/15/2015 - 10:48 नवीन
वाचकहो छायाचित्र अद्ययावत केली आहेत.... कृपया भेट द्यावी....
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 09/15/2015 - 10:50 नवीन
ब्रम्ह कमळ दिसले ! :प मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Dekhoon Tujhe To Pyaar Aaye... ;) :- Apne
  • Log in or register to post comments
म
मेघनाद Tue, 09/15/2015 - 10:53 नवीन
मी हे फोटो गुगल ड्राइव्ह वापरून टाकले आहेत... सेटिंग चा थोडा घोळ झाला होता … आता सर्व ठीक झालय
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 09/15/2015 - 10:59 नवीन
सेटिंग चा थोडा घोळ झाला होता … आता सर्व ठीक झालय अजुनही फोटो दिसेनात... गुगल ड्राइव्ह वरचे फोटो दिसण्यात काय झोल आहे, ते कळत नाही... म्हणुनच ब्रम्ह कमळ दिसले असे गमतीने लिहले,एक्का काकांच्या धाग्यावर शेवट पर्यंत ते दिसले नव्हते ना ! ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Dekhoon Tujhe To Pyaar Aaye... ;) :- Apne
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघनाद
म
मेघनाद Tue, 09/15/2015 - 11:26 नवीन
हो खरच कि अजूनही फोटो दिसेनात. फ्लीकर वर उपलोड ते कसे वापरावे नाहीये. कोणी मार्गदर्शन केल्यास बरे पडेल
  • Log in or register to post comments
म
मेघनाद Tue, 09/15/2015 - 11:39 नवीन
आता तरी सर्वाना फोटो दिसतील आशा आहे। वाचकहो प्रतिसाद द्या.
  • Log in or register to post comments
स
संजय पाटिल Tue, 09/15/2015 - 11:39 नवीन
दिसले दिसले फोटो...
  • Log in or register to post comments
ए
एस Tue, 09/15/2015 - 11:45 नवीन
फोटु दिसले! म्हस लईच स्वागतोत्सुक दिसतीया. :-) मस्त फोटो.
  • Log in or register to post comments
स
संजय पाटिल Tue, 09/15/2015 - 11:59 नवीन
लेख आणी फोटो छान !!
  • Log in or register to post comments
अ
अजया Tue, 09/15/2015 - 12:18 नवीन
छान आहेत फोटो.म्हशीचा तर एका आय डीच्या प्रोफाईलला पण वापरता येईल.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 09/15/2015 - 12:21 नवीन
अभी सब फोटु बराबर दिख्या... :) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Dekhoon Tujhe To Pyaar Aaye... ;) :- Apne
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Tue, 09/15/2015 - 12:42 नवीन
यष्टी आणि म्हस विथ रस्ता..... मस्त फोटो आलेत पुलंची म्हैस आठवली. अखिल भारतीय म्हैस संघटनेच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावावा इतका मस्त फोटो आलाय म्हशीचा. आवडला.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 09/15/2015 - 12:59 नवीन
झकास सुरुवात आणि सुरेख छायाचित्रे.
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Tue, 09/15/2015 - 13:07 नवीन
मस्त फोटो दिसल्यावर तर चार चांद लागले लेखाला. अजुन डीट्टेलवारी वर्णन येऊ द्या. पुभाप्र.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 09/15/2015 - 13:29 नवीन
मस्त ! न मळलेल्या पाऊलवाटांवरच्या अनवट जागांची पुढची माहिती आणि चित्रे पाहण्यास उत्सुक आहे. पुभाप्र.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 09/15/2015 - 13:34 नवीन
तर काही फोटो बाबत आमचा "गणेशा." झाला.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 09/15/2015 - 18:12 नवीन
सुरवात ठीक आहे पण लेन्स ७५-३०० लिहिलंय.३०० एमेमचे फोटो टाका लवकर.
  • Log in or register to post comments
म
मेघनाद Sun, 09/20/2015 - 22:00 नवीन
कंजूसजी, ३०० एमेम ची छायाचित्रे पुढील भागांमध्ये येतीलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
प
पद्मावति Tue, 09/15/2015 - 19:01 नवीन
सफरीची मस्तं सुरूवात. पुढचे भाग वाचायला उत्सुक. म्हशीचा फोटो फारच क्यूट आहे.
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 09/15/2015 - 23:29 नवीन
फोटू दिसले व आवडले.
  • Log in or register to post comments
प
पीके Wed, 09/16/2015 - 04:02 नवीन
अळवांवरच पाणी हा फोटो मला आवडला...
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर Wed, 09/16/2015 - 07:18 नवीन
भारी फोटो आलेत सगळेच !! हिरवंगार शेत बघून डोळे आणि मन दोन्ही प्रसन्न झाले.
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Wed, 09/16/2015 - 15:06 नवीन
ह्या मीठगवाणे गावाला जायचा योग आला होता मागच्या वर्षी. चीपळूण हुन अचानक जायचा प्लॅन ठरल्याने आधी जायची टाळाटाळ करत होतो आणि प्रवास संपता संपत नव्हता. शेवटी पोहचलो एकदाचे. माय गॉड पण गाव ७ लाच चीडीचूप. पण खूप शांत वाटत होतं. गड्बड, गोंधळ, कोलाह्लापासून दुर्....एकंदरीत आवड्लं नंतर. लाल डबा सुद्धा दिवसातून दोनदाच जातो असं एकलं होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
म
मेघनाद Sun, 09/20/2015 - 22:04 नवीन
अरे वाह! मीठगवाणे गावात माझे आजोळ आहे. गाव खरच अतिशय शांत परिसरात वसले आहे. एकूणच अंतर्भागातील खेड्याचा अनुभव घेण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. बाकी गोष्टींचा खुलासा गावासंबंधीच्या भागात करेनच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत
आ
आदिअनन्त Wed, 09/16/2015 - 22:04 नवीन
अन्तिम चित्रात जी वेइल आहे त्याचे नाव आहे कारन्दे. हे कारन्दे. बतत्या सार्खे लाग्तात. आस्चर्या चि. गोस्त म्हान्जे मालआ आइइ ने ४ कारन्दे दीले होते. मी ते . इइकदे माझ्ह्य बागेत लाव्ले. उन्हाल आहे म्हानुन वेल्ल चन्ग्ल आला आहे. पान दोल्तान मास्त दिस्स्तत आनि खूप सुन्दर दिस्तत. बाघु हा वेल इकद्चि थान्दि सोसेल का.
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत गुरुवार, 09/17/2015 - 10:48 नवीन
कित्ती कित्ती गोल (गोड) बोलता तुम्ही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिअनन्त
आ
आदिअनन्त गुरुवार, 09/17/2015 - 17:36 नवीन
pahilyaanda marathi madhye type karaycha pranjal prayatna hota... shuddha lekhana che 3 13 wajle rao. Tya sathi kshama aasavi pan karandyancha vel baghun khup utsaahit zhaalo mhanun pratisad dila. ã
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत
प
पैसा गुरुवार, 09/17/2015 - 17:44 नवीन
होईल सवय हळूहळू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिअनन्त
प
पैसा गुरुवार, 09/17/2015 - 17:45 नवीन
लेख आणि फटु सुंदरच आहेत! म्हशीचा फटु जाम आवडला.
  • Log in or register to post comments
स
सत्याचे प्रयोग गुरुवार, 09/17/2015 - 19:26 नवीन
अळवांवरच पाणी जीवंत फोटोग्राफी.
  • Log in or register to post comments
र
रातराणी Fri, 09/18/2015 - 00:55 नवीन
सुंदर आहेत फोटो!
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 09/18/2015 - 07:04 नवीन
अशा शांत आणि सध्या अप्रसिद्ध ठिकाणांचे पर्यटन मला फार आवडते. अन्यथा प्रत्येक हवशा गवशा प्यारीसला जाऊन आयफेल टॉवर चिमटीत धरल्याचा फोटो किंवा पिसाच्या झुकत्या मनोऱ्याला टेकू दिल्याचा फोटो टाकतो ते पाहायला आणि ते वर्णन वाचायला आताशा कंटाळा येतो. गुलाबांचे प्रदर्शन फार झाले. अशी रानफुले आणि गवतफुले पाहायला फार आवडेल. अजून येऊ द्या.
  • Log in or register to post comments
M
mdmagar Sun, 09/20/2015 - 09:41 नवीन
राहण्याची व्यवस्था होऊ शकते का? तुमच्यासारखे आमचे कोणी नाते वायिक तिकडे नाहीत . पूर्ण माहिती द्यावी ही विनंती
  • Log in or register to post comments
म
मेघनाद Sun, 09/20/2015 - 22:05 नवीन
हो, होऊ शकेल, परंतु मला थोडी माहिती काढावी लागेल. लवकरच माहिती व्यनि करतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mdmagar
म
मेघनाद Sun, 09/20/2015 - 22:06 नवीन
सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मिपा वाचकांचे प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक आभार. हुरूप वाढतो प्रतिसादांनी
  • Log in or register to post comments
द
दीपा माने Mon, 09/21/2015 - 15:54 नवीन
फोटोतील म्हशी समोरील जांभा दगडांची कुस पाहून रत्नागिरीच्या गावाची भावुकतेने आठवण आली.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Mon, 09/21/2015 - 16:26 नवीन
तुमचा यातलाच एक फ़ोटो माझ्यासाठी प्रेरणा घेऊन आला आहे. लवकरच येईल भेटीला!
  • Log in or register to post comments
र
रीडर Sun, 07/12/2020 - 02:32 नवीन
म्हैशीचा फोटो खूपच cute
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sun, 07/12/2020 - 09:40 नवीन
व्हवा मस्तच ! लाल परीचं कौतुक आणि निष्ठा पाहून अंमळ सुखावलो ! फोटो अप्रतिम !
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Sun, 07/12/2020 - 11:55 नवीन
स्वागतोत्सुक म्हैस हा फोटो फारच आवडला!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा