माळी, शेतकरी आणि वनस्पतीशास्त्राचे पदवीधर परस्पर अवलंबित्व
सध्या दुष्काळाच्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर माझ्या मनात खालील प्रमाणे विचार चालू आहे.
माळी काम करणारे सर्वसाधारण पणे फळबागा, फुलबागा यामध्ये निष्णांत असतात. कलम करणे, माती तयार करणे, रोग आणि किडी ओळखणे, त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे इत्यादी गोष्टी ती करीत असतात.
शेतकरी बांधव सर्वसाधारण पणे अन्नधान्याची निर्मिती, तेलबिया, फलबागा, फुलबागा इत्यादींना त्यांच्या क्षमतेप्रमाणे विकसित करत असतात. सर्वसाधारण पणे परंपरागत माहिती आणि न्यानावर अथवा सांगिव माहितीवर ते शेती करत असतात. अनेकदा मार्गदर्शनाच्या अभावी बर्याच न सुधारणार्या चूकाही होत असतात. जसे किटकनाशाकांचा अनिर्बंध वापर, कुपनलिकांचा प्रचंड वापर, चूकींचे पीक घेणे ( उसाची लागवड कमी पावसाच्या क्षेत्रात घेणे इत्यादी).
वनस्पती शास्त्राचे पदवीधर वनस्पती शास्त्राचा अभ्यास करत असतात त्यामध्ये, वनस्पतीचे प्रकार, त्यांचे वर्गीकरण, वाढीचे सूत्र इत्यादी इत्यादी.
वेळेच्या अभावी यावर बरेच काही लिहिता येऊ शकते, परन्तु माझ्या मते या तिघांनी जर एकत्र काम केले तर एक्मेकांच्या माहिती आणि अनूभवाचा उपयोग सर्वच समाजाला होऊ शकतो.
या मतामध्ये जर तथ्य असेल तर आजपर्यंत असा विचार का झाला नाही? आणि या पूढे हा विचार कसा पुढे नेता येईल.
कृपया आपापले मत व्यक्त करावे ही विनंती.
💬 प्रतिसाद
(5)
प
प्रभाकर पेठकर
Tue, 09/15/2015 - 09:39
नवीन
बिगरशेतीधारक आणि असंवेदनशील शहरी असल्याकारणाने मतप्रदर्शनाचा अधिकार मला नाही. आमाला पावर नाय....
- Log in or register to post comments
द
द-बाहुबली
Tue, 09/15/2015 - 09:43
नवीन
- Log in or register to post comments
ज
जेपी
Tue, 09/15/2015 - 09:54
नवीन
तिन तिगाडा...काम बिगाडा.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Tue, 09/15/2015 - 10:36
नवीन
मराठी विकिपीडियावर विकिपीडिया:विकिप्रकल्प वनस्पती नावाचा प्रकल्प आहे. या विषयाचे सर्व निव्वळ चाहते, रोपवाटिका, बागकाम इत्यादींची आवड असणारे, पर्यावरणाची दखल घेणारी मंडळी, वनस्पतींवर उपजीविका करणारे शेतकरी आणि आदिवासी , वनस्पतींचा अभ्यास करणारे विद्यार्थी, त्या विषयाशी संबंधित शिक्षक आणि संशोधक वर्ग, आणि आयुर्वेदाशी निगडित व्यक्ती हि सर्वच मंडळी विकिपिडियाच्या माध्यमाचा उपयोग करू शकतात.
ग्रामीण भागातील सर्वाधीक वाचक वर्ग मराठी विकिपीडियाकडे आहे. पण दुर्दैवाने मराठी विकिपीडियावर संबंधीत माहितीची प्रचंड वानवा आहे. काही मंडळी शेती विषयाबद्दल त्याच त्या चर्चा पुन्हा पुन्हा घोटताना दिसतात त्याच्या बदल्यात त्यातला दोन टक्के वेळ मराठी विकिपीडियासाठी काढल्यास आपल्याच मनास सकारात्मक केल्याचे काही सकारात्मक योगदान केल्याचे समाधान मिळू शकेल असे वाटते.
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Wed, 09/16/2015 - 08:39
नवीन
मुटे सरांच्या मताच्या प्रतिक्षेत ....
- Log in or register to post comments