चायनीज तुर्कस्थानातील प्राचीन खरोष्टी दस्तएवज
अर्काइव्ह डॉट ऑर्गवर प्राकृतातील साहित्य शोधत असताना १९४०च्या सुमारास प्रकाशित, चायनीज तुर्कस्थानातील प्राचीन खरोष्टी दस्तएवजांचा 'टि. बरो' कृत अनुवाद चाळण्याचा योग आला. अर्थात हा दस्तएवजाची 'टि. बरो' लिपी तेवढीच 'टि. बरो ने नमुद केली असावी पण अनुवादलेला मूळ दस्तएवज कोणत्या भाषेतील आहेत ते का नोंदवलेले नाही हे समजले नाही.
खरोष्टी लिपी ही पुर्वीच्या गांधार प्रदेशात वापरात राहीलेली आणि काळाच्या ओघात तेथून वापर कमी झाला तरी शेजारच्या चिनी तुर्कस्थानाच्या जवळील खोतान वगैरे प्रांतात सातव्या शतका पर्यंत प्रचलीत राहीलेली लिपी होती.
तर खोतान जवळच्या प्रांतात कुठल्याशा राज्याच्या महसूल आणि न्याय विभागाच्या दैनंदीन नोंदीचे स्वरुप उपरोक्त दस्तएवजांना आहे. प्रथम दर्शनीतरी त्या दस्तएवजात खूप अफलातून काही वाचण्यासाठी आहे असे दिसत नसले तरी तत्कालिन कर पद्धती, करार, त्या पार्श्वभूमीवर राजे आणि तेथिल बौद्ध भिख्खूंचा संघ यांच्या व्यवहारांची ढोबळ माहिती मिळते. करारांची नोंद घेतली जाताना हा प्रदेश जर सिल्क रूटवरचा असेल तर बर्याच मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय व्यापाराची नोंद असावयास हवी होती तसे तरी काही विशेष या दस्तएवजात नसावे. पण इतर व्यापार विषयक नोंदी बर्याच आहेत असे दिसते. सर्वाधिक व्यवहार उंटांच्या खरेदी विक्रीचे असावेत, त्या पाठोपाठ घोडे, गाई, शेत जमिनी एवढेच नाह तर स्त्रीयांच्या खरेदी-विक्री चे व्यवहार दिसून येतात. यातील काही व्यापारी करार, न्याय इत्यादींना बौद्ध भिख्खुंची सा़क्ष (विटनेस) ग्राह्य धरले असावेत. एखादा करार तुटला तर अमुक दंड, अधिक अमुक एवढे ठोसे आणि त्यास विटनेस हे जरासे रोचक वाटले.
दस्तएवजात खूपकाही ग्रेट आहे असे नाही पण आम्ही भारतीय आमच्या शेजारच्या प्रदेशात जाऊन कधी संशोधन करत नाही.
कोण कुठले युरोपीय कुठल्या टोकाच्या प्रदेशात पोहोचतात अनोळखी लिपी खोदून त्याचा अनुवाद करतात प्रकाशित करतात. हिच मोठी दखल घेण्या जोगी गोष्ट आहे.
अर्थात नाही म्हणावयास (मी दस्तएवज खोलात जाऊन वाचण्यास वेळ न मिळाल्याने) काही प्रश्न आहेत. कुणास हा दस्तएवज वाचणे जमले तर या दस्तएवजाचा प्रदेश, आणि कालावधी, कोणत्या राजवटीच्या काळात आणि दस्तएवज नोंदी कुणी कुणी केल्या आहेत त्या बद्दल अधिक बरा अंदाज बांधता येत असेल तर माहिती हवी आहे तसेच तुम्हाला स्वतःस त्यात काही रोचक वाटल्यास तेही नोंदवण्यास हरकत नाही. या निमीत्ताने दस्तएवजाची मराठी विकिपीडियातही नोंद घेता येईल. म्हणून या धागा लेखास येणारे आपले प्रतिसाद प्रताधिकार मुक्त गृहीत धरले जातील.
धन्यवाद
💬 प्रतिसाद
(4)
ग
गामा पैलवान
Wed, 09/16/2015 - 23:09
नवीन
माहितगार,
माहितीबद्दल धन्यवाद. एक अडाणी प्रश्न आहे. खरोष्ठी ही भाषा म्हणावी की लिपी?
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
म
माहितगार
गुरुवार, 09/17/2015 - 03:52
नवीन
(माझ्या इंग्रजी विकिपीडियावाचना प्रमाणे) खरोष्टी हि लिपी आहे. उपरोक्त दस्तएवजाचा 'टि. बरो' ने अनुवाद केला तेव्हा कदाचीत त्याला त्यातील पाली आणि संस्कृत शब्दांमुळे अनुवाद करता आला असेल पण तेव्हा त्या भाषेच्या नावाच वेगळ क्लासीफिकेशन झाल नसेल किंवा ते क्लासीफीकेशन 'टि. बरो' ने स्विकारले नसेल म्हणून 'टि. बरो' खरोष्टीचा उल्लेख भाषा म्हणून करताना दिसतो आहे. अर्थात इंग्रजी विकिपीडियावरील उल्लेखांनुसार इतर भारतीय प्राकृतांपेक्षा जराशी वेगळी गांधारी प्राकृत असावी. इंग्रजी विकिपीडियावर गांधारी प्राकृतातील बौद्ध दस्तएवज असा वेगळा लेख सुद्धा दिसतो आहे.
- Log in or register to post comments
म
माहितगार
गुरुवार, 09/17/2015 - 03:54
नवीन
अर्थात हे माझे स्वतःचे कयास आहेत हे वे.सां.न.ल.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
गुरुवार, 09/17/2015 - 08:51
नवीन
माहितगार,
लेखातलं हे वाक्य माझ्या नजरेतून निसटलं :
>> पण अनुवादलेला मूळ दस्तएवज कोणत्या भाषेतील आहेत ते का नोंदवलेले नाही हे समजले नाही.
यावरून खरोष्टी लिपी आहे हे सूचित होतंय. :-)
तर मूळ भाषा बहुतेक मिश्र बोली असावी. अगदी आपल्या प्रागतिक महाराष्ट्रातदेखील मराठीच्या अनेक बोली आहेत. तर सार्वजनिक मराठी ही प्रमाण भाषा आहे. ही प्रमाणभाषा विद्वानांनी मेहनत घेऊन बनवलेली आहे. तसे परिश्रम तत्कालीन मध्य आशियात घेतले गेले नसावेत. तसेच भाषेचा या अंगाने विकास होण्यासाठी प्रबळ राजसत्ता असावी लागते. तशी त्या प्रांतांत कधीच नव्हती. सत्तेची समीकरणे सतत बदलंत असंत. त्यामुळे दस्तऐवजांच्या प्रमाणीकरणासाठी स्थिर बुडाच्या राजदरबारात प्रचलित असेलल्या भाषेची मदत घेतली जाई. प्रस्तुत प्रसंगी मूळ भाषा अशीच एखाद्या राजकीय केंद्राशी (उदा. गांधार) निगडीत मिश्र बोली असावी असा माझा कयास आहे. कदाचित फारसीही असू शकते. अधिक संशोधन होणे आवश्यक आहे. :-)
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments