तुला मी आठवतो का गं?
आजही जेव्हा
स्वप्नांत तुझ्या....
रात्र रंगुनी जाते,
एकएकट्या नभात तुझ्या
अनोळखी रंग भरुनी जाते,
दूर लुकलुकणाऱ्या चांदण्यात
मग स्वत:ला हरवताना
तू खरं खरं सांग
तुला मी आठवतो का गं?
आजही जेव्हा
येण्याने तुझ्या....
आसमंत मोहरून येतो,
नुसत्या चाहुलीने तुझ्या
अलवार गंधाळुन जातो,
धुंद मदहोशणाऱ्या निशिगंधात
मग स्वत:ला विरघळवताना
तू खरं खरं सांग
तुला मी आठवतो का गं?
आजही जेव्हा
ओढीने तुझ्या....
बेलगाम वहावत येतो,
हरएक अदेवर तुझ्या
बावरा खुळ्यागत होतो,
त्याच्या आसुसलेल्या आवेगात
मग स्वत:ला भिरकावताना
तू खरं खरं सांग
तुला मी आठवतो का गं?
आजही जेव्हा
इशाऱ्यावर तुझ्या....
बेधुंद बरसत जातो,
नाजुक स्पर्शाने तुझ्या
चिंब शहारत जातो,
ओंजळीत साठलेल्या त्याच्यात
मग स्वत:ला पहाताना
तू खरं खरं सांग
तुला मी आठवतो का गं?
आजही जेव्हा
क्षितिजावर तुझ्या....
सांज रेंगाळुनी जाते,
जाताना मागे आठवांच्या
सावल्या सोडुनी जाते,
आयुष्याच्या अश्या सांजरातीत
मग स्वत:ला शोधताना
तू खरं खरं सांग
तुला मी आठवतो का गं?
💬 प्रतिसाद
(27)
ए
एस
Sat, 09/19/2015 - 05:59
नवीन
मस्त आहे कविता.
- Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी
Sat, 09/19/2015 - 08:03
नवीन
मस्त रे...
- Log in or register to post comments
म
मांत्रिक
Sat, 09/19/2015 - 08:03
नवीन
सुंदर आहे! पण ३र्या कडव्यात वार्याचा आणि ४थ्या कडव्यात पावसाचा उल्लेख पाहिजे होता, असे वाटते. कारण त्याशिवाय अर्थ थोडा संदिग्ध होतोय.
- Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच
Sat, 09/19/2015 - 15:42
नवीन
मुद्दामून डायरेक्ट उल्लेख टाळला.....
वहावणं,बरसणं
ह्या क्रियापदातुन वाऱ्याचे आणि पावसाचे अस्तित्व जाणवेल असं दाखवायच होत.
तरी पुढच्यावेळेस काळजी घेईन.
- Log in or register to post comments
र
रातराणी
Sat, 09/19/2015 - 09:09
नवीन
वा! सही!
- Log in or register to post comments
प
पद्मावति
Sat, 09/19/2015 - 11:45
नवीन
मस्तं! सुंदर लिहिलंय.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 09/19/2015 - 12:27
नवीन
तिला खरंखरं काही विचारू नका. आणि प्रेमात पडला असाल तर विचारू नका की तुला मी आठवतो का म्हणून ! तुमची आठवण येईल तिला अगदी फुरसतीच्या वेळात जेव्हा तिचा वेळ जात नसेल तेव्हा तुमची आठवण येईल तिला. तुम्ही बसा च्युत्यासारखी तिची वाट पाहात ! :)
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Sat, 09/19/2015 - 13:49
नवीन
डिट्टो. ;)
बरं झालं सरांनीच टाकला प्रतिसाद.
बाकी सब भूल के सर तुम्हाला एक पार्टी लागू.
(प्रेमात आणि युद्धात सारं काही माफ असतं.)
- Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच
Sat, 09/19/2015 - 15:38
नवीन
ह्याच्याशी एकदम सहमत
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Tue, 09/22/2015 - 17:01
नवीन
तुम्ही बसा च्युत्यासारखी तिची वाट पाहात ! :)
सरांचा आयडी हॅक तर झाला नाही नं!
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Tue, 12/08/2015 - 14:55
नवीन
भारीच प्रतिसाद ओ सर. काय पण म्हणा पण तुम्ही भारी, तुमचं लॉजिक भारी. एकूण्च लै भारी.
जिंदगीभर पेडस्टल फ्यान बनून उभा केलेत तरी मुंडी हलवीत उभा राहीन. :)
आपले मित्र आजच ऐकवलेत हे तत्वज्ञान. पोरी फक्त स्वतःची सोय पाहतात. अहाहाहाहा. अप्रतिम.
- Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी
Sat, 09/19/2015 - 15:30
नवीन
छान आहे पण सौमित्र यांच्या 'बघ माझी आठवण येते का' या कवितेची आठवण झाली ही कविता वाचून
- Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच
Sat, 09/19/2015 - 15:46
नवीन
सौमित्र ची ती कविता मला ही खुप आवडते.
बहुतेक दोन्ही कवितेचा भाव सारखा असल्यामुळे तसं वाटत असेल.
पण तरीही सौमित्रच्या कवितेची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद.
तसाही आता बाहेर मस्त पाऊस पडतोय, ती कविता ऐकायचा मस्त चान्स जुळुन आलाय.
- Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज
Sat, 09/19/2015 - 15:34
नवीन
छान आहे की कविता....!
- Log in or register to post comments
अ
अजया
Sat, 09/19/2015 - 15:42
नवीन
छान कविता
- Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच
Sat, 09/19/2015 - 15:42
नवीन
सगळ्यांचे मनपुर्वक आभार.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Sat, 09/19/2015 - 16:23
नवीन
टाळ्या!
मस्त!
- Log in or register to post comments
न
निनाव
Tue, 09/22/2015 - 16:47
नवीन
Khoopach mastay..
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Tue, 09/22/2015 - 17:02
नवीन
का हो, का? अशी, भरलेल्या जखमेवरची, खपली काढलीत?
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Tue, 09/22/2015 - 18:26
नवीन
ही कविता वाचल्यावर मला का कुणास ठाऊक ' हम दिल दे चुके सनम ' मधलं हरिहरन यांनी गायलेलं ' झोंका हवा का ' हे गीत आठवलं. प्रेमभंगी माणसांची भावना अचूक पकडणारे दोन्हीही आविष्कार!
- Log in or register to post comments
म
मांत्रिक
Tue, 09/22/2015 - 18:36
नवीन
हं!!! खरंच!!! तितकेच रोमँटिक!!! तितकेच सुंदर!!!
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Wed, 09/23/2015 - 05:35
नवीन
अरेरे,
गेले ते दीन गेले....नकाहो
- Log in or register to post comments
स
समीर_happy go lucky
Mon, 09/28/2015 - 20:23
नवीन
अप्रतिम
- Log in or register to post comments
व
विश्वव्यापी
Tue, 12/08/2015 - 13:23
नवीन
सुंदर कविता .मस्त लिहिलंय.
- Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच
Tue, 12/15/2015 - 18:40
नवीन
सगळ्यांचे मनपुर्वक आभार
- Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर
Tue, 12/15/2015 - 18:46
नवीन
आठवणींच्या जगात घेऊन जाणाऱ्या ओळी आहेत या सगळ्या....
- Log in or register to post comments
म
मीता
Wed, 12/16/2015 - 12:56
नवीन
खूप आवडली कविता.
- Log in or register to post comments