Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हि दिल्ली हाय एक जतरा ...

व — विशाल कुलकर्णी, Sat, 09/19/2015 - 09:06
आमची प्रेरणा अर्थातच जगदिश खेबुडकरांचं हे जिवंत गाणं ही दिल्ली हाय एक जतरा, हौसं गवसं नवसं सतरा जो दिल्लीला भुलला न्हाई तो एक येडा भितरा पाच वर्षाचा फिरतो पाळणा ही अवघड फेरी नाव कुणाचे, नाकामंदी कुनी बांदली दोरी जागा होऊन बोलल त्याला, हाय कमांडचा हादरा यु आयडीचा शिनीमा बगा, बगा सोडुनी काम आधार झाला निराधार ना इथे राहीला राम कितीक योजना आशा लावूनी उगा दावतीया नखरा ह्यो फिरता घोडा नाव त्याचं सरकार कुनी नोकरशहा, मंत्री-संत्री टांग टाकुनी स्वार हितंच हाय परि दिसत न्हाई पब्लिक मारतय चकरा हि लोकशाहीची खानावळ लै खवाट कुनी चोर भेटतो, भ्रष्ट कुनी, कुनी 'भाट' सवलतीसाठी लाळ गाळुन शेपुट हालवी कुतरा ह्या सत्तेपायी इसर पडतो जनतेचा कागदावरी पाऊस पडतो सुसाट खोट्या वचनांचा आश्वासनांची जंत्री घेऊन पब्लिकला मारत्यात पतरा ही दिल्ली हाय एक जतरा, हौसं गवसं नवसं सतरा ह्या दिल्लीला भुलला न्हाई तो एक येडा भितरा ... !! h तळटिप : ('दिल्ली' हा शब्द इथे सत्तेचे प्रतिक म्हणून वापरलेला आहे. 'दिल्ली' या शहराविषयी मनात कसलाही आकस नाही) इरसाल म्हमईकर

प्रतिक्रिया द्या
2798 वाचन

💬 प्रतिसाद (9)
ए
एक एकटा एकटाच Sat, 09/19/2015 - 09:44 नवीन
यक नंबर......... सुसाट जमलीय
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 09/19/2015 - 16:27 नवीन
निर्विवाद +१ समांतर:-दिल्ली वाचून आधी वाटलेलं,स्वामिज्जी असतील... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक एकटा एकटाच
व
विवेकपटाईत Sat, 09/19/2015 - 15:36 नवीन
कविता आवडली, 'दिल्ली हि ठगांची नगरी आहे, इथले ठग (???) देश प्रसिद्ध असतात. त्यांच्याहि उल्लेख आला असता... बाकी दिल्लीकर कुणा बाबत आकस ठेवीत नाही. सर्वांचे स्वागत करतात. दिल्लीत येणारे एक तर दिल्लीकर बनतात किंवा दिल्लीत येऊन सर्वस्व गमवितात
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sat, 09/19/2015 - 15:45 नवीन
आज जर खेबुडकर असते तर त्यानीही दिलखुलास दाद दिली असती या "दिल्लीला" !
  • Log in or register to post comments
म
मित्रहो Sun, 09/20/2015 - 14:23 नवीन
छान मला वाटल दिल्ली हाय जतरा झालाय कचरा वगेरे काही येते का. तुम्ही मुळावर घाव घातला.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Tue, 09/22/2015 - 06:11 नवीन
धन्यवाद मंडळी !
  • Log in or register to post comments
न
नाखु Tue, 09/22/2015 - 06:26 नवीन
मस्त रे भावड्या !!!!
सवलतीसाठी लाळ गाळुन शेपुट हालवी कुतरा
हे लै फर्मास.
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम Tue, 09/22/2015 - 09:04 नवीन
एक नंबर झालाय. मस्त प्रयत्न कीप इट अप
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Tue, 09/22/2015 - 10:49 नवीन
धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा