Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बैसलो होतो पानटपरीवर

भ — भैड्या, Sat, 09/19/2015 - 16:48
बैसलो होतो पानटपरीवर उगाच फुंकित बिड्या, करीत खेळ आगिशी पेटविल्या अनंत काड्या ऊठुन बैसलो घेतला दगड टाकिला पत्र्यावरी आवाज जाहले शेजारचे कुत्रे पळता भुई थोडी. धाप लागिली घाम फुटला नरड्यात माझ्या कोरड. हाड कुत्र्या छौ साल्या बंद कर तुझी ती ओरड. झाड दिसले चढलो वरती बैसलोय मटकुळं करून. बैसलयं खाली बघतयं वरी कुत्रं खाकरून. एक थेरीडा बघुन प्रसंग गेलाय बावचळुन. हासडुनी शिव्या मजला गेला कुत्र्याला घेऊन. रोखुन मज दाखवा कुणी चालिलो मी अड्ड्यावर. चार शिपुरडे नेई मजला पुन्हा टपरीवर. क्रमश:

प्रतिक्रिया द्या
7458 वाचन

💬 प्रतिसाद (12)
च
चांदणे संदीप Sat, 09/19/2015 - 17:13 नवीन
धन्य आहे दादा.... यात आणि क्रमश: काय आहे??
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Sat, 09/19/2015 - 17:14 नवीन
कशा उगा नसती उठाठेव
  • Log in or register to post comments
ए
एस Sat, 09/19/2015 - 17:33 नवीन
तुमच्या मिपा-वयाच्या तुलनेत 'गरम पाण्याचे कुंड' तुम्हांला बरेच लवकर सापडले आहे. 'भूछत्र', 'कोडाईकनाल', 'गरम पाण्याचे कुंड' इत्यादी मिपापरिभाषा समजायला आम्हांला दोन वर्षे लागली! असो, चालू द्या.
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Sat, 09/19/2015 - 17:46 नवीन
बाप्पा मोड आॅन <आमची आख्खी जिंदगी गेली काशिनाथ तरी आजून आम्हाला सुधरना> बाप्पा मोड आॅफ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
च
चाणक्य Sat, 09/19/2015 - 17:49 नवीन
अर्धवट आला प्रतिसाद...परत टंकतो बाप्पा मोड आॅन - 'आमची आख्खी जिंदगी गेली काशिनाथ आमाला आजून सुधरना' - बाप्पा मोड आॅफ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चाणक्य
भ
भैड्या Sat, 09/19/2015 - 19:11 नवीन
काशिनाथा सद्बुद्धी दे रे बाबा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चाणक्य
अ
अभ्या.. Sat, 09/19/2015 - 19:30 नवीन
प्रतिसाद पण फेस्बुकी. कशाचा कशाला पत्ता नाही. काय म्हणतायेत ते समजून घ्यायचं नाही. त्यातली खोच कळाली नाही तर गप्पही राहायचे नाही, औघडे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भैड्या
भ
भैड्या Sun, 09/20/2015 - 05:54 नवीन
ख्याक्कीकिक्क....! घ्या अजुन एक बिनकामाचा परती साद खास तुमच्यासाठी. म्हणे खोच कळ्ळी न्हाय.^O^
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ह
होबासराव Sat, 09/19/2015 - 20:00 नवीन
बाप्पा मोड ऑन "जुडि !! कशाचि पालकाचि का मेथिचि ? आन काय करतो हा तुझा ज्यानराव, नाय म्हंजे पोटापान्याच काय? बबन्या ना आम्चा नॉन मॅट्रिक पासय " बाप्पा मोड ऑफ.
  • Log in or register to post comments
भ
भैड्या Sun, 09/20/2015 - 06:00 नवीन
काशिनाथ ऱ्हावद्या बाजुला. ही मेथीची जुडि काय प्रकरण आहे? नव्या ठोकळ्यांना कसं कळायचं राव..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
म
मनीषा Mon, 09/21/2015 - 03:47 नवीन
हाहाहा ... नसत्या काड्या करणार्‍या उपद्व्यापी माणसाची कविता आवडली.
  • Log in or register to post comments
म
मम्बाजी सर्वज्ञ Mon, 09/21/2015 - 13:25 नवीन
झक्कास कविता! आवडेश खन्ना प्रसन्न!!!! हसून हसून डोळ्यात पाणी आले. एकदम लहानपणची आठवण आली. घरा मागे एक ओढा होता पलीकडे सोसायटी चे नाव आठवत नाही. शनिवारी गल्लीतली पोरे खट्याळ पणा करायचो. सोसायटीच्या मध्य भागी एक वाचमान ची टपरी होती. ओढ्याच्या या किनार्यावरून दगड भिरकवायचा उंच, बरोब्बर टपरीवर पडला कि मोठा आवाज होत असे. वाच्मानच काय पण सोसायटीतल्या बर्याच लोकांची झोप उडायची. एक दिवस वाचमनची बायको ओढ्याजवळ दबा धरून बसली. पहिला दगड पडल्याबरोबर आम्ही सगळे हसून लोळायला लागलो. सगळे बेसावध होतो. अचानक पाठीत रट्टे पडायला लागल्यावर लक्षात आले तोपर्यंत उशीर झाला होता. संध्याकाळी सोसायटीत असले मोठे भांडण झाले कि काही बोलायची सोय नाही. भांडणाचा निष्कर्ष असा निघाला कि बाहेरची पोरे कोलानितल्या ग्राउंड वर सोसायटीतल्या पोरांना खेळू देत नसल्यामुळे असले उद्योग सुचतात. तेवा पासून ग्राउंड वर मोठे चक्कर मारून आम्हाला खेळायला जागा करून देऊ लागले. क्रिकेट आणि फुटबाल कितीही झाले तरी त्याला आमच्या जुन्या खेळाची सर कधीच आली नाही.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा