राधा कृष्ण
अजून म्हणती फिरते राधा
यमुनेच्या निर्जन काठावर
अजून वाटते तिला सख्याच्या
ऐकू येतिल मुरलीचे स्वर !!
आणिक इकडे तीरावरती
लाटा उठती सुन्या सागरी,
बुडून गेली भग्न द्वारका
जिथे विसर्जित शाम मुरारी!
Book traversal links for राधा कृष्ण
💬 प्रतिसाद
(3)
र
रातराणी
Wed, 09/23/2015 - 08:34
नवीन
आवडली! अजून लिहा!
- Log in or register to post comments
प
पद्मावति
Wed, 09/23/2015 - 10:18
नवीन
सुरेख! कवीता अजुन वाढवता आली तर बघा. फार छान लिहिलंय.
शेवटच्या दोन ओळी....निशब्द झालेय!
- Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी
Wed, 09/23/2015 - 10:26
नवीन
वा! सुंदर !
- Log in or register to post comments