केजरीवाल सरकारचा पहिला घोटाळा आणि गोबेल्स vs भक्त
‘केजरीवाल सरकार का पहला घोटाला ।’
‘केजरीवाल के प्याज ने दिल्लीवालों को रुलाया ।’
‘केजरीवाल सरकार ने प्याज से मुनाफा कमाया ।’
या अशा बातम्या काल पाहिल्याच असतील तुम्ही.
आजकाल मीडियाची विश्वासार्हता अशीही मायनसमध्येच गेलेली आहे, त्यामुळे तुम्ही बातमीकडे दुर्लक्ष केले असेल तर चांगलेच आहे.
पण जर तुम्हाला ही बातमी खरी वाटली असेल, तर खालील काही फॅक्ट्स बघा.
- SFAC ने नाशिकमधून १८ रूपये किलो या दराने कांदा विकत घेतला.
- त्यानंतर SFAC ने हा कांदा दिल्ली सरकारला ३२.८० रूपये किलो या दराने विकला.
- ट्रान्सपोर्टेशन आणि इतर खर्च जोडून दिल्ली सरकारला कांद्यासाठी एकंदरीत ४० रूपये प्रति किलो मोजावे लागले.
- पण दिल्लीच्या जनतेला ४० रूपयेसुद्धा द्यावे लागू नयेत म्हणून दिल्ली सरकारने १० रूपयांची सबसिडी दिली.
- आणि शेवटी दिल्लीच्या जनतेला हा कांदा ३० रूपये किलो दराने विकल्या गेला.
गणिताचा आणि माझा ३६ चा आकडा आहे, तेव्हा तुम्हीच कॅल्क्युलेट करून बघा, कोणाला फायदा झाला आणि कोणाला नुकसान.
बाय द वे, SFAC (लघु कृषक कृषी व्यापार संघ) ही संस्था केंद्र सरकारचीच संस्था आहे.
आणि काल दिवसभर वेगवेगळ्या न्यूज चॅनल्सवर येऊन दिल्ली सरकारला शिव्या घालणारे, नाफेडच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सवर असलेले श्री. अशोक ठाकूरसुद्धा भाजपाचेच आहेत. (ते स्वतः हे अभिमानाने सांगत असतात.)
असो.
या निमित्ताने का होईना, सगळ्या भारताला कळाले की दिल्ली सरकार फक्त ३० रूपयांना कांदा विकत आहे.
तोंडावर आपटणे हा छंदच झालाय सध्या जुमला पार्टीचा.
काही दिवसांपूर्वी डेंग्यूच्या विषयावरसुद्धा आम आदमी पार्टीच्या सरकारलाच जबाबदार ठरवण्याचा प्रयत्न केला होता मीडियाने.
वास्तविक पाहता डेंग्यू-मलेरियासारखे आजार पसरू नयेत म्हणून औषधांची फवारणी करणे हे पालिकेचे काम असते, जी कित्येक वर्षांपासून भाजपाच्या ताब्यात आहे.
डेंग्यूशी लढण्यासाठी दिल्ली सरकारने ५५ नवीन क्लिनिक सुरू केले आहेत जे रविवारी आणि सुट्टीच्या दिवशीसुद्धा चालु राहतील, सगळ्या दवाखान्यांना ताकीद दिली आहे की डेंग्यूच्या वेगवेगळ्या टेस्ट्ससाठी ६०० रूपयांच्या वर कोणत्याही दवाखान्याने चार्ज करू नये, दवाखान्यांमध्ये बेड्सची संख्या वाढवली आहे, ऍंटीकरप्शन हेल्पलाईनवर डेंग्यूसंबंधित काही समस्या असतील तर त्यासुद्धा सोडवण्यात येत आहेत.
आम आदमी पार्टी हे सगळे करत असतांना केंद्र सरकार दिल्लीच्या उपराज्यपालांच्या मार्फत ऑर्डर काढून ‘आप’च्या कामात अडथळे आणत आहे.
तुमच्यापर्यंत काय पोहोचवायचे हे ऑलरेडी ठरलेले आहे.
भक्त बिचारे त्यासाठी दिवसरात्र मेहनत करत असतात.
तुमच्यापर्यंत आलेल्या माहितीवर डोळे बंद करून विश्वास ठेवायचा की सुशिक्षित असल्याचा फायदा घेऊन स्वतः माहितीची शहानिशा करून घ्यायची हे तुमचे तुम्ही ठरवा.
हिटलरच्या गोबेल्समध्ये आणि आजच्या भक्तांमध्ये जास्त फरक नाहीये.
उलट त्याकाळी गोबेल्सकडे मर्यादित साधने होती आणि आज भक्तांकडे विकासाचे गाजर आहे, फोटोशॉप आहे, जी हुजूरसारखी न्यूज चॅनल्स आहेत, IT Cell कडून मिळणारा चांगला पगार आहे.
अजून काय पाहिजे ?
खरंच, गोबेल्स वरून बघत असेल तर त्याला हेवा वाटत असेल भक्तांचा.
अवांतर : मी दिलेली माहिती चुकीची असेल, तर कृपया खरी माहिती कळवा.
एक्स्ट्रा अवांतर : गोबेल्सबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी ...
http://www.history.com/topics/world-war-ii/joseph-goebbels
नांदेडियन, करपलेल्या भातातही काही शितं नीट शिजलेली असतात. म्हणून आपण सुगरण आहोत असा दावा कुणी करू जाइल तर त्याला काय म्हणतात माहीती आहे का...?हा... हा... इथे नांदेडियन स्वतः झाकण उघडूनही न बघता; "बघा, बघा, किती रुचकर भात !" असं म्हणत भाताचे पातेले वाचकांसमोर भिरकावताना सतत दिसत आहेत ! मग इतरांनी पातेले उघडून आतला खरा पदार्थ दाखवला की गायब होतात आणि थोड्या वेळाने दुसरा एखादा नवीन धागा काढून हरदासाची कथा मूळपदावरून सुरू करतात असेच दिसत आहे. मतितार्थ : १. "जनता गाढव असते व एखादी चूक गोष्ट उच्च स्वरात दहादा सांगून जनतेला उल्लू बनवता येते, या जुन्या भारतीय राजकारणातील वस्तूस्थितीचे दिवस जात आहेत आणि आंतरजालावरून थोडेसे संशोधन करून विरोधक आपल्या चुकीच्या दाव्यांचे पितळ उघडे पाडू शकतात" हे उघड सत्य जाणण्याची समज अजूनही बर्याच समर्थक/चेले/भक्त/गुलाम (हवा तो पर्याय उचला) यांच्यात विकसित झालेली दिसत नाही. २. भूतकालातल्या अनुभवावरून, सदर धाग्यातला राम संपला असून आपवर लवकरच एक नवीन धागा निघेल, असा अंदाज आहे... पण आळवलेला सूर अथवा तो आळवण्याची पद्धत "विकसित" असेलच याची खात्री नाही. तेव्हा तो वाचकांनी आपापल्या जबाबदारीवर वाचावा, असा फुकटा सल्ला द्यावासा वाटतो. ३. खुद्द 'आप'च्या नेत्यांचे स्वतःच्या कृतीने 'आप'ची छबी खराब करण्याचे प्रयत्न कमी पडताहेत, अश्या समजुतीने आपसमर्थक अश्या कारवायांनी ते सत्कार्य पुढे नेत आहेत, असा दाट संशय येत आहे ! ;) :)