Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अंबाडा

च — चांदणे संदीप, Mon, 09/21/2015 - 17:15
अंधाराचा अन पहाटेचा तो बंध हळवा सोडला पैलतीरावर त्या घाटावर कुणी अंबाडा सोडला? प्रतिमा मोहक ती अर्पण पाण्याचे त्या होई दर्पण स्पर्शाविना शिरशिरीचा कुणी तरंग लहरता सोडला? दवांसोबत हलके निजेतून बाग पाहते डोकावून दहादिशांना बहकवणारा कुणी गंध नाशिला सोडला? ना अजून भैरवी निजली ना अजून भूपाळी उठली क्षितीजावर सकवार सुरांचा कुणी राग मारवा सोडला? अंधाराचा अन पहाटेचा तो बंध हळवा सोडला पैलतीरावर त्या घाटावर कुणी अंबाडा सोडला? - संदीप चांदणे

प्रतिक्रिया द्या
14328 वाचन

💬 प्रतिसाद (45)
ए
एक एकटा एकटाच Mon, 09/21/2015 - 18:21 नवीन
वाह!!!!!
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Mon, 09/21/2015 - 18:54 नवीन
धन्यवाद ३ए! एका शब्दांत अतिशय बोलकी प्रतिक्रिया!
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Mon, 09/21/2015 - 18:59 नवीन
अगदी पहिल्याच कडव्याला तोंडातून उत्स्फूर्त दाद बाहेर पडली.! संदीपराव प्रत्येक लेखागणीक आमच्या तुमच्यावर असलेल्या अपेक्षा वाढवताय.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Mon, 09/21/2015 - 19:02 नवीन
अहाहा. सुरेख. जिओ संदीपराव.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Mon, 09/21/2015 - 19:46 नवीन
धन्यवाद किसनदेवा आणि अभ्यादादा! __/\__ @किसन शिंदे : असेच अपेक्षांचे ओझे वाढवित राहा. त्यातच खरी मजा आहे!
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Mon, 09/21/2015 - 21:39 नवीन
सुरेख....!
  • Log in or register to post comments
श
शुचि Mon, 09/21/2015 - 21:52 नवीन
राग व गंध सांडला लिहीले तर मला जास्त आवडेल. अर्थात हे फक्त सजेशन. कविता आवडली.
  • Log in or register to post comments
स
स्रुजा Mon, 09/21/2015 - 21:55 नवीन
क्या बात हे !!
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Mon, 09/21/2015 - 21:59 नवीन
हळुवार सुंदर रचना. आवडली.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Mon, 09/21/2015 - 22:27 नवीन
धन्यवाद प्यारेदादा, शुचितै, स्रुजातै आणि चाणक्य! कवितेबद्दल अजूनही कुणाच्या काही सूचना असतील तर त्या ऐकायला आवडतील! :)
  • Log in or register to post comments
र
रातराणी Wed, 09/23/2015 - 08:30 नवीन
आवडली!
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Wed, 09/23/2015 - 09:59 नवीन
आवडली!
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Wed, 09/23/2015 - 13:21 नवीन
रातराणी आणि प्राची अश्विनी तुमच्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे!
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Wed, 09/23/2015 - 17:16 नवीन
लयदार लय!
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Wed, 09/23/2015 - 18:47 नवीन
कैच नै कळ्ळं!! :-/ कळेल अस लिहा की वो तै!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिव कन्या
च
चांदणे संदीप Wed, 09/23/2015 - 18:49 नवीन
कैच नै कळ्ळं!! :-/ कळेल अस लिहा की वो तै!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिव कन्या
च
चांदणे संदीप गुरुवार, 09/24/2015 - 13:09 नवीन
कळ्ळ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिव कन्या
प
पैसा Wed, 09/23/2015 - 18:59 नवीन
खूप छान लिहिताय! वेगवेगळे प्रयोग करून बघा. कधी मुक्तछंदात तर कधी वृत्तबद्ध.
  • Log in or register to post comments
इ
इशा१२३ Wed, 09/23/2015 - 19:22 नवीन
वा सुरेखच!
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Wed, 09/23/2015 - 19:29 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Wed, 09/23/2015 - 20:32 नवीन
पैसाताई, ईशा१२३, जव्हेरगंज, प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
न
निनाव Wed, 09/23/2015 - 22:08 नवीन
Kaay Mhanaave..shabda naahiyet...itka sundar lihile aahe..waah.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी गुरुवार, 09/24/2015 - 12:29 नवीन
आवडली...
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे गुरुवार, 09/24/2015 - 12:31 नवीन
आवडली!
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप गुरुवार, 09/24/2015 - 13:16 नवीन
अजूनही प्रतिसाद येत आहेत हे पाहून बरे वाटले! निनाव, विशाल कुलकर्णी, अनुप ढेरे प्रतिसादाबद्दल आभारी आहे. कवितेची मैफल जर घडली कुणासोबत तर मजा येईल! मला आवडेल जॉईन व्हायला, किंवा पाठिंबा मिळाल्यास आयोजित करायलाही! :) Sandy
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत गुरुवार, 09/24/2015 - 17:29 नवीन
कविता आवडली
  • Log in or register to post comments
व
विश्वजित रामदास जाधव Sat, 10/03/2015 - 18:11 नवीन
समोर मनात बिम्बलेल्या आजवरच्या काही सुंदर पहाट येऊन गेल्या! तुमची कविता त्यांच्यासारखीच सुन्दरय!
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sat, 10/03/2015 - 18:29 नवीन
प्रतिसादासाठी धन्यवाद विश्वजीत. ही माझीच कविता माझ्याच मनात एक वेगळी जागा करून राहिली आहे! तुझ्यासारखच प्रत्येकाला काहीना काही दिसावं वा अनुभवता यावं हाच माझा नेहमी प्रयत्न असतो. :) Sandy
  • Log in or register to post comments
प
प्रभू-प्रसाद Sat, 10/03/2015 - 19:32 नवीन
कडवे क्र.३,४ सुरेख छा गये दिलपे.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 10/03/2015 - 20:16 नवीन
बेहद्द आवडली!
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sun, 10/04/2015 - 03:48 नवीन
गुर्जीं, प्रसाद धन्यवाद!
  • Log in or register to post comments
द
दीपा माने Sun, 10/04/2015 - 04:48 नवीन
कवितेतले शब्द नेमके भावविश्व उभे करतात.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sun, 10/04/2015 - 13:58 नवीन
सुरेख रचना. एक सुचवावेसे वाटते की त्या, ती, तो वगैरे fillers सतत वापरले नाही तर अधिक योग्य होईल.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sun, 10/04/2015 - 14:05 नवीन
धन्यवाद यशोतै! वृत्तात बसवताना ते वापरावे लागले! पण सूचना एकदम मान्य. यापुढे कविता लिहिताना नक्की प्रयत्न करीन फिलर्स टाळण्याचा! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
त
तुडतुडी Wed, 10/07/2015 - 13:53 नवीन
अंधाराचा अन पहाटेचा तो बंध हळवा सोडला पैलतीरावर त्या घाटावर कुणी अंबाडा सोडला?
हडळ असेल कुणीतरी
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Wed, 10/07/2015 - 13:56 नवीन
तुम्ही तर नव्हता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
स
सूड Wed, 10/07/2015 - 14:04 नवीन
जमलंय!! अजून येऊ द्या.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Wed, 10/07/2015 - 14:33 नवीन
वरच्या प्रतिसादाने कवितेवर 'सूड' उगवलाय आणी तुमचा असा छान प्रतिसाद! केवढा विरोधाभास! धन्यवाद! आणखी येणारच आहे! Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ज
जव्हेरगंज Wed, 10/07/2015 - 15:50 नवीन
अहो, मला वाटतय तो प्रतिसाद मजेमजेत दिलाय! त्यावर तुमचा रिप्लाय जास्तच टोकाचा वाटला. हे आपलं माझं एक निरिक्षण!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
च
चांदणे संदीप Wed, 10/07/2015 - 15:55 नवीन
सोडा घ्या… आपल... (नुसतंच) सोडा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज
अ
अनन्न्या Wed, 10/07/2015 - 15:57 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Wed, 10/07/2015 - 21:42 नवीन
अप्रतिम..... आवडली
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 10/08/2015 - 03:16 नवीन
रचना आवडली... मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Ittage Recchipodham... ;) :- Temper
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर गुरुवार, 10/08/2015 - 04:09 नवीन
Avadli kavita. Pu.le. shu.
  • Log in or register to post comments
त
तुडतुडी गुरुवार, 10/08/2015 - 09:28 नवीन
तुम्ही तर नव्हता?
माझे केस अंबाडा घालण्याइतके लांब नैत
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा