Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चुलीमध्ये घाल

ग — गंगाधर मुटे, Tue, 09/22/2015 - 06:14
चुलीमध्ये घाल

मेघ भरजरी आठवणींचे, दाटून आले काल
नयनामधे आली त्सुनामी, वाहून गेले गाल

जाता जाता हळू घातली भुवई उचलून साद
या चिमणीच्या चोचीसाठी दाणा घेऊन याल?

बोल बोबडे मर्दुमकीचे बोलून झाले फार
असेल जर का तुझ्यात हिंमत, हाती घे तू मशाल

कर्ज काढुनी कशास शेती कसतोस मित्रा सांग
येडपटांचा येडा धंदा कुत्रं खाईना हाल

साहित्याचा खेळ गारुडी तेजीत आला फार
पराजितांचे अश्रू विकुनी झालेत मालामाल

या मातीचा लोळ एकदा क्षितिजे भेदुनी मार
चिंब न्हाऊ दे दिगंताला रंग दे लालीलाल

'अभय' देईना पोशिंद्यास; वाचू कशाला सांग?
तुझे प्रबंध तुपात घोळून चुलीमध्ये तू घाल

                                - गंगाधर मुटे 'अभय'
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

प्रतिक्रिया द्या
3758 वाचन

💬 प्रतिसाद (9)
अ
अनुप ढेरे Tue, 09/22/2015 - 06:30 नवीन
आवडली!
  • Log in or register to post comments
न
नाव आडनाव Tue, 09/22/2015 - 06:54 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Tue, 09/22/2015 - 07:10 नवीन
आवडली गझल!
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Tue, 09/22/2015 - 07:35 नवीन
वा ! छान !
  • Log in or register to post comments
D
dadadarekar Tue, 09/22/2015 - 11:00 नवीन
छान
  • Log in or register to post comments
द
दमामि Wed, 09/23/2015 - 02:32 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे गुरुवार, 09/24/2015 - 14:35 नवीन
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत गुरुवार, 09/24/2015 - 17:27 नवीन
साहित्याचा खेळ गारुडी तेजीत आला फार पराजितांचे अश्रू विकुनी झालेत मालामाल नेह्मिच पराजित अश्रूंना बाजारात भाव असतो, आपण राणा प्रताप यांचे गुणगान करतो अपराजित बाजीरावला कोण विचारतो...
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Sat, 09/26/2015 - 14:34 नवीन
खरे आहे विवेक पटाईत सर. शेतकरी पराजित आहे म्हणून त्याच्या अश्रूंना चांगला भाव मिळतो. मात्र शेतमालास भाव म्हटले की भुवया उंचावतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा