..पापड कर वा पोळ्या लाट..
रस्ता सरळ भुमी सपाट
तरीही माझी चुकते वाट...
पंगतीमागुन पंगत उठली..
मेल्यानंतर भलता थाट..
दो मृत्युंच्या शिखरांमध्ये
आयुष्याचा अवघड घाट..
जरा किनारा दिसला आणि
लाटेमागुन आली लाट...
आयुष्याचे पीठ मळवले..
पापड कर वा पोळ्या लाट.. !!!!!
- योगेश
💬 प्रतिसाद
(7)
म
मांत्रिक
Tue, 09/22/2015 - 09:35
नवीन
सह्हीच! कवितेचा अर्थ काय आहे हे कळून पण सुंदर म्हणतोच. कारण गतीमानता व सूचकता! आवडली!
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Tue, 09/22/2015 - 11:27
नवीन
एक्सलंट!
- Log in or register to post comments
द
दमामि
Tue, 09/22/2015 - 13:09
नवीन
बढिया!!!!
- Log in or register to post comments
प
पैसा
Tue, 09/22/2015 - 19:40
नवीन
आवडली !
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Tue, 09/22/2015 - 20:54
नवीन
छान
- Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु
Fri, 09/25/2015 - 18:19
नवीन
सर्व प्रतिसादकर्त्यांना धन्यवाद ( व वाचुन गेलेल्यांनाही!)
गणपती बाप्पा मोरया!
- Log in or register to post comments
न
नाखु
Sat, 09/26/2015 - 07:53
नवीन
हे फारच आवडले आहे
- Log in or register to post comments