बाप्पाचा नैवेद्य : पुरवठ्याची काजूकतली
Primary tabs
पुरवठ्याची काजू कतली.
आईकडे गौरीच्या दिवशी मोठ्या आरतीच्या वेळी पूर्वी आवर्जून केली जाणणारी पाककृती देतेय.नंतर माझ्यापेक्षा धाकटा भाऊ कमवायला लागल्यावर काजूकतली विकत आणू लागला.पण तरीही त्याला चिडवत सगळे म्हणायचे,’’माईच्या हातची सर नाही हां.’’कारण वडीचे आकारमानही मोठे न् जाड असायचेच.चवही आगळीच.रवा घातलाय याची शंकासुद्धा येत नाही.चला तर बनवा यंदाच्या गणपतीला.
खालील प्रमाण हवे तवढे कमी जास्त करून घ्या.
साहित्य:-
१. १ वाटी रवा.(शक्यतो फाईन रवा घ्यावा०)
२. १ वाटी तूप.
३. ३ वाट्या दूध सायीसकट.
४. ४ वाट्या साखर.
५. १ वाटी रवाळ काजूपूड.
६. वासासाठी ७/८ वेलचांची पूड.
७. १०/१२ केशर धागे ऐच्छिक.
कृती:-
१. वाटीभर रवा जाड असेल तर कोरडाच रंग बदलू न देता भाजावा. थंड झाल्यवर मिक्सर मधून फिरवून घ्यावा.फाईन असेल तर नुसताच भाजावा.
२. त्यात अनुक्रमांक दोन ते चार चे साहित्य नॉनस्टिक पॅनमध्ये एकत्र करून अंदाचे २०/२५ मिनिटे मोठ्या आचेवर आटवावे.
३. खाली उतरल्यावर काजूपूड व केशर घालून ढवळत रहावे. गार झाल्या त्याचा गोळा होऊ लागतो.
४. त्यात वेलचीपूड घालावी.
५. तूप लावलेल्या ताटात अगर ट्रे मध्ये थापावे.वड्या पाडाव्यात.
६. दोन्ही बाजूला प्लास्टिक घालून लाटूही शकता.

(हा फोटो जालावरचा असला तरी तो माझ्या एका मामेभावानेच टाकला आहे.)
सुंदर सोपी रेसिपी.छानच!
कसल्या सुंदर दिसताहेत वड्या! मला वाटते मिठाईवाले पण अशाच करत असणार. नाहीतर १००० रुपले किलोचे काजूगर घेऊन काजूकतली ५००-६०० रुपये किलोने विकणे त्याना शक्य दिसत नाही. कारण साखर वगैरे असली तरी मेहनत, पॅकिंग इ. चा खर्च प्रचंड असतोच.
वा सुंदर ! किती सोपि आनी सुटसुटीत आहे . :)
वॉव...काय मस्तं दिसताहेत काजुकतली. खुप छान पाककृती.
सोपि नि छान पाककृती. आवडिचा पदार्थ.
मत्त्त्त्त!
आवडती काजुकतली.
काजूवड्या छानच दिसत आहेत.
स्वाती
झकास पाकृ. पुढच्या गणपतीला याच करुन ठेवेन आता.
हे मिश्रण थोडे अजून घट्ट करून मोदकाच्या साच्यात घालून काजू मोदकही करता येतील ग.
स्वाती
वाह. काजूकतली भयंकर आवडते. हा प्रकार करायला सोप्पा वाटतोय त्यामुळे लवकरच करणार.
मस्तच सुगरण ताई
रेसिपी छान आहे, पण रवा कधी घालायचा? अनुक्रमांक २ ते ४ च्या साहित्याबरोबर तो पण घालायचा का?
पाकृ आवडली, नक्की बनवणार.
फोटू व पाकृ आवडली. रवा व काजूपूड मिसळून मगच आटवायला घ्यायचे असावे.
सूड,तुझे बरोबर आहे."त्यात" हा शब्द २.च्या सुरुवातीला हवा.
छान आहे पाककृती.
कृती पण सोपी आहे.