Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

राधा कृष्ण....... जर...

श — शशीभूषण_देशपाण्डे, Wed, 09/23/2015 - 17:21
"राधा" घननीळा, का अवेळीच तू या राधेला परत भेटला? विराण आता झाले गोकुळ जुना पुराणा कदंब वठला अता न उरली स्वप्नामधली तरल अनामिक धूसर नाती कुठे पाहसी कृष्णा मधुबन भयाण या अवसेच्या राती कालिंदीचे उदासले जळ अता लोपली त्याची खळखळ नि:शब्दाचे पिसाट वारे ठेवून फिरते उरात खळबळ अता न उरल्या काठावरच्या कुरणातिल चरणाऱ्या गायी टपोर त्यांच्या डोळ्या मधली दूर हरवली वत्सल आई तुझ्या करातील सुस्वर मुरली आठवते केवळ प्राचीनता चैतन्याचा सूर हरवूनी फक्त विराणी गाते आता सांग, कशी मग मी तरी येऊ आठवुनी मागिल संमोहन अता कुठे उरला राधेचा तो पूर्वीचा घननिळ मोहन? आणि इकडे कृष्ण ........ मी शोधतोच आहे माझ्या मनात राधा युग संपले तशी का गेली लयास बाधा? सर्वस्व सोडले मी, हा धर्म रक्षिण्याला कल्पांत भोगताना पण राहिलो अकेला मी वेड लाविले का केले मलाच वेडे? जन्माहुनी निराळे पडले अगम्य वेढे हे कोणते किनारे? येथे विराट लाटा अभिशापिता परी या उध्वस्त सर्व वाटा मी गुंतलो कसा, या गुंत्यास थांग नाही एकांत भोगणाऱ्या जन्मास अंत नाही भोवंडुनी दिशा या गाती मला विराणी स्वप्नात काळनिद्रा स्मरते जुनी कहाणी.....!

Book traversal links for राधा कृष्ण....... जर...

  • ‹ राधा कृष्ण
  • Up

प्रतिक्रिया द्या
3571 वाचन

💬 प्रतिसाद (11)
म
मांत्रिक Wed, 09/23/2015 - 17:47 नवीन
सांग, कशी मग मी तरी येऊ आठवुनी मागिल संमोहन
याऐवजी सांग कशी मग मी तरी येऊ आठवुनी मागील ते संमोहन असे पाहिजे. बाकी कविता क्लासच! विस्ताराने लिहिन यावर!!!
  • Log in or register to post comments
म
मांत्रिक Wed, 09/23/2015 - 17:49 नवीन
जगाच्या कल्याणासाठी झटणार्या विभूतींचे वैयक्तीक आयुष्य कसे विराण होते त्याचे वर्णन आहे. त्या दृष्टिकोणातून वाचा कविता. समजेल!!!
  • Log in or register to post comments
म
मांत्रिक Wed, 09/23/2015 - 18:19 नवीन
राजे!!! मिपावर वाचक आणि प्रतिसादक म्हणून देखील रहा! अन्य लेखकांना त्याचीही अपेक्षा असते. केवळ लेखनमात्र रहाल तर ईतर लोक दुर्लक्ष करतील!!! पूर्ण डुबकी मारा मिपामध्ये!!! मगच गंमत कळेल!!!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 09/23/2015 - 19:34 नवीन
ककविताअप्रतीम! बाकी मांत्रिक, एकाच वेळी तीन मूडमधून मंत्र का हो मारलात? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक
म
मांत्रिक Wed, 09/23/2015 - 19:52 नवीन
३ मूड कुठल्ले हो गुर्जी!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
प
प्राची अश्विनी Wed, 09/23/2015 - 18:27 नवीन
अप्रतिम!!
  • Log in or register to post comments
र
रातराणी Wed, 09/23/2015 - 19:07 नवीन
सुरेख !
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Wed, 09/23/2015 - 19:57 नवीन
अता????? देशपाण्डे आपणच का? कविता आवडली हो!
  • Log in or register to post comments
श
शशीभूषण_देशपाण्डे गुरुवार, 09/24/2015 - 07:02 नवीन
धन्यवाद हो सर्वाना. सूचना नक्की लक्षात ठेवीन. घ्या सांभाळून!!!
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी गुरुवार, 09/24/2015 - 12:25 नवीन
वाह... सुंदर !
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत गुरुवार, 09/24/2015 - 17:33 नवीन
सुंदर कविता. या वरून आठवले एकदा वृंदावनात यमुना घाटावर एका बकरीला एका वाळलेल्या झाडाच्या बुंध्याला बांधलेले होते, ती मे मे करत होती, ते दृश्य पाहून मला हसूच आले, था जहां कभी कदम्ब का पेड़ बजती थी मुरलिया मोहन की. आज वहां है ठूँठ भर करती है बकरी मे में भर. शेवटी काले तस्मे नम:
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा